निवडणुकीनंतर सुपारी बहाद्दरांचं दुकान बंद होणार, राज ठाकरे यांची खासियत काय?; काय म्हणाले राऊत?

| Updated on: May 17, 2024 | 12:52 PM

महाराष्ट्रात जशी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरुद्ध लाट आहे. त्यापेक्षा जास्त विरोधातली लाट देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहे. त्यांच्या भंपकपणा विरुद्ध ही लाट आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सगळ्यात जास्त नुकसान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. लोक त्यांना हेट करतात. या राज्याची जनता त्यांचा तिरस्कार करते हे तुम्हाला 4 जूनला कळेल, असं संजय राऊत म्हणाले.

निवडणुकीनंतर सुपारी बहाद्दरांचं दुकान बंद होणार, राज ठाकरे यांची खासियत काय?; काय म्हणाले राऊत?
sanjay raut
Follow us on

महाराष्ट्रात सुपारी बहाद्दरांची काही दुकाने आहेत. ही दुकाने बंद होणार आहे. राज ठाकरे यांचं एक दुकान त्यात आहे. तीन चार सुपारी शॉप इन पॉलिटिक्स बंद होणार आहेत, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रात येऊन जितक्या सभा घेतल्या जातील, तितकीच त्यांची वाट लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन सभांवर सभा घेत आहेत. याचा अर्थ तुम्ही 10 वर्षात काहीच केलं नाही. त्यामुळेच तुम्ही महाराष्ट्रात येत आहेत, असा हल्लाच संजय राऊत यांनी भाजपवर चढवला आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या, त्यांनाच मांडीवर घेऊन तुम्हाला बसावे लागत आहेत. राज ठाकरे ज्यांच्याबद्दल सवाल उठवतात त्यांच्याबरोबरच जातात, ही राज ठाकरे यांची खासियत आहे, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला आहे.

आज मुंबईत महाविकास आघाडीची सभा आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आज संध्याकाळी महविकस आघाडीची सभा आहे. शिवतीर्थावर सभा व्हावी यासाठी आम्ही प्रथम अर्ज केला होता. मात्र आमची सभा होऊ नये म्हणून पंतप्रधान आणि सुपारीबाज बोलवण्यात आले. सत्तेच गैरवापर करण्यात आला. पण ठीक आहे. बीकेसीमध्ये आमची सभा होणार आहे. या सभेला मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

आम्ही सवाल केलाच नाही

यावेळी त्यांनी आर्टिकल 370 वरूनही त्यांनी भाष्य केलं. या देशात आर्टिकल 370 बद्दल कोणीही प्रश्न उपस्थित केलेला नाही. हा प्रश्न तुम्ही स्वतःच उभा करत आहात. गौतम अदानी यांना काश्मीरची जमीन विकण्यासाठी तुम्ही कलम 370 रद्द केले. भाजपाच्या सगळ्यात मोठ्या फायनान्सरला म्हणजेच अदानीला, असा आरोप त्यांनी केला.

भाजपकडून बहुमताचा गैरवापर

संविधान बदलायचे असते तर गेल्या दहा वर्षात बदलले असते, पण आम्ही बहुमताचा कधी गैरवापर केला नाही, असं अमित शाह यांनी सांगितलंय. मात्र यांनी सगळ्यात जास्त बहुमताचा गैरवापर यांनीच केला आहे. याला राक्षसी बहुमत म्हणतात. हा दुरुपयोग त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केला. देशासाठी नाही, असा दावा त्यांनी केला.