नंदूरबार : महाराष्ट्रातील शेतकरीवर्ग अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. कधी पडलेल्या बाजारभावामुळे शेतमाल रस्त्यात फेकून द्यावा लागतो नाही तर कधी त्याच पिकावर नांगर फिरवावा लागत आहे. एकीकडे बाजारभावामुळे शेतकरी अडचणीत सापडला असतानाच दुसरीकडे मात्र निसर्गानेही शेतकऱ्यांना हैराण केले आहे. अशीच परिस्थिती नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दुसऱ्यांदा अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक मातीत जाण्याची वेळ बळीराजावर आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची उभी पिकं आता वाया जाण्याची वेळ आली आहे. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने नंदुरबार,नवापूर,तळोदा,धडगाव तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेले मका, गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर फळबागातील पपया आणि केळीच्या बागांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसाने आज तिसऱ्यांदा हजेरी लावल्याने या पावसात झालेल्या नुकसानीनंतर आता पंचनामा होणार की नाही याची चिंताही शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
कारण शासकीय कर्मचारी संपावर गेल्यामुळे आता पंचनाम्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवकाळीनंतर जर पंचनामा झाला नाही तर शेतकऱ्यांना मदत मिळणार कशी असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहेत तर दुसरीकडे आसमानी संकटापासून शेतकऱ्यांची सुटका होत नाही. त्यामुळे आता सामोरे जात आहे .
त्यामुळे शेतकऱ्यासमोरील आव्हान दिवसात दिवस वाढत आहे त्यात शेतकऱ्याने मदत केली तर काहीसा दिलासा मिळेल अशीच अपेक्षा आता शेतकरी करत आहे. त्यामुळे अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे.