त्र्यंबकेश्वर (नाशिक) : बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर ( Trimbakeshwar ) नगरीत महाशिवरात्रीला ( Mahashivratri ) दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. राज्यातूनच नाही परराज्यातूनही अनेक भाविक दर्शनसाठी येत असतात. त्यातच विकेंड असल्याने अनेकांचा ओढा हा नाशिक येथील त्र्यंबकेश्वरच्या दिशेने असणार यापार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतिने विशेष नियमवाली करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर पहाटे चार वाजेपासून सुरू राहणार असल्याचे मंदिर प्रशासनाच्या वतिने जाहीर करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान समितीच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
शनिवारी पहाटे चार वाजे पासून रात्री नऊ वाजेपर्यन्त मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतिने यावेळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गर्भगृह दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाशिवरात्रीला मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. अशातच विकेंड असल्याने पर्यंटनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरातील नागरिक नाशिकला प्राध्यान्य देतात.
शिवरात्रीला खरंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला मोठी गर्दी होत असते. त्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतिने जोरदार तयारी केली जाते. संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात आले आहे. भाविकांना दर्शनरांग उपलब्ध करून दिली आहे. दर्शन रांगेत असतांना भाविकांना काही त्रास झाल्यास आरोग्य पथकही असणार आहे.
गायत्री मंदिराच्या जवळ आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी सभामंडप, गर्भगृह, प्रवेशद्वार या ठिकाणी फुलांनी सजावट केली जाणार आहे. त्याची लगबग आता सुरू झाली आहे.
याशिवाय तातडीने दर्शन हवे असल्यास देणगी दर्शनची सुविधाही आता त्र्यंबकेश्वर येथे सुरू करण्यात आली आहे. शिर्डी संस्थानच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला आहे.
दर्शन रांगेत भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. आणि दर्शन रांग सुरू असतांना दर्शन मंडपातून दोन्ही बाजूंनी दर्शन रांगेची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे सभामंडपात गर्दी होणार नाहीये.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. याशिवाय तीन दिवस सांस्कृतिक कार्यकम असणार आहे. यंदाचा वर्षी शिवरात्रीला सितारवादक निलाद्री कुमार यांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याशिवाय नृत्य दिग्दर्शन मयुरी बेडककर यांच्या अकादमीचा कथक नृत्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. साधारणपणे सितारवादन झाल्यावर हा कार्यक्रम होणार आहे.
प्रवचन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यकाम पार पडणार आहे. याशिवाय महाशिवरात्रीच्या दुपारी घोषवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी महाशिवरात्री आणि विकेंड असा योग जुळून आल्याने मोठी गर्दी त्र्यंबकेश्वरमध्ये होण्याची शक्यता आहे.