मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात शिवभोजन थाळी (Shivbhojanthali) ही योजना सुरू केली होती. हीच शिवभोजन थाळी बंद होणार अशी मोठी चर्चा राज्यात होती. मात्र, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिवभोजन थाळी ही बंद होणार नाही ती सुरूच राहील असे स्पष्टीकरण राज्यमंत्रीमंडळच्या बैठकीनंतर दिले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने शिवभोजन थाळी राज्यात सुरू करण्यात आली होती. तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिवभोजन थाळी या योजेनेचा विस्तार केला होता. कोरोना काळात या योजनेचा मोठा आधार नागरिकांना झाला होता, दहा रुपयांवरून शिवभोजन थाळीची रक्कम पाच रुपये करण्यात आली होती.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेले बहुतांश निर्णय हे शिंदे-फडणवीस सरकारकडून रद्द करण्यात येत आहेत, तर काही निर्णय हे बदलले जात आहे.
यावरूनच राज्यातील शिवभोजन थाळी ही महाविकास आघाडीची योजना बंद होईल अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे शिवभोजन थाळीचे काय होईल अशी चर्चा सुरू होती.
शिवभोजन थाळी या योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप देखील अनेकदा झाले आहेत, तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ह्या योजनेचे खाते होते.
एकूणच शिवभोजन थाळीवर झालेले आरोप आणि महाविकास आघाडीची असलेली योजना यामुळे शिवभोजन थाळीबाबत आज झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.
यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवभोजन थाळी बंद होणार नाही अशी प्रतिक्रिया दिली होती,त्यावरून फडणवीस यांनी शिवभोजन थाळीबाबत दिलेला शब्द पाळल्याची चर्चा आहे.
शिंदे-फडणवीस यांनी शिवभोजन थाळी ही ठाकरेंची योजना सुरू ठेवल्याने या योजनेबाबत राज्यात मोठी चर्चा होणार हे नक्की.