घराणेशाहीवरुन आदित्य-राहुल गांधींचा सगळा प्रवासच अंधारेंनी मांडला, वारसाहक्कावरुन त्या म्हणाल्या…

| Updated on: Nov 15, 2022 | 10:46 PM

घराणेशाहीवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधताना सुषमा अंधारे यांनी थेट राहुल गांधींच्या वारशाचा इतिहास सांगितला.

घराणेशाहीवरुन आदित्य-राहुल गांधींचा सगळा प्रवासच अंधारेंनी मांडला, वारसाहक्कावरुन त्या म्हणाल्या...
Follow us on

कोल्हापूरः सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा विविध जिल्ह्यातून सुरू आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात येत आहे. सध्या आमदार आदित्य ठाकरे मंत्री झाल्यानंतर त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे. त्यांच्यासारखाचा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर केला जात असल्याने आजच्या महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे यांनी ठाकरे घराण्यांपासून ते प्रमोद महाजन यांच्या राहुल महाजन यांच्याही घराण्याचा संदर्भ दिला.

यावेळी त्या म्हणाल्या फक्त घराणे असून चालत नाही तर त्यासाठी स्वतःला सिद्धही करावे लागते असं स्पष्ट मत त्यांनी घराणेशाहीवर मांडले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडमध्ये ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रेची सभा आयोजित केली होती. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

यावेळी त्या म्हणाल्या की आदित्य ठाकरे यांच्यावर नेहमीच घराणेशाहीचा आरोप केला जात आहे. त्यामुळे त्यांनी घराणेशाहीचे थेट समर्थन न करता त्यांनी त्यासाठी काम आणि पक्षासाठी राबावं लागतं हेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

काँग्रेसचे राहुल गांधी यांना पंतप्रधान घराण्याचा वारसा आहे तरीही आज तो माणूस रस्त्यावरुन चालत आहे असा दाखलाही त्यांनी यावेळी दिला.

प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन यांचा दाखला देताना त्यांनी प्रमोद महाजन यांचा राजकीय प्रवासही सांगितला. तरीही राहुल महाजनसारख्या राजकीय नेत्याच्या मुलाला स्वतःला सिद्ध करता आले नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मडकं बनवणारा कुंभार कितीही ग्रेट असला तरी मडकं मातीने बनते वाळूने नाही असा टोला विरोधकांना लगावण्यात आला.