मुंबई | कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या गिरना अॅग्रो कंपनीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केला. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. विधानसभेतही याचे जोरदार पडसाद उमटले. दादा भुसे यांनी आज विधानसभेत या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. जगातली कोणतीही यंत्रणा लावून या आरोपांची चौकशी करा. मी दोषी ठरलो तर राजीनामा देईन. पण आरोप खोटे निघाले तर महागद्दार संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा, असं आव्हान दादा भुसे यांनी दिलंय. संजय राऊत हे मातोश्रीची चाकरी खातात तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची चाकरी करतात, असा गंभीर आरोप दादा भुसे यांनी केला.
शिंदेंची शिवसेना समर्थक दादा भुसे यांनी आज संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, हे आरोप खरे ठरले तर मी आमदारकी, मंत्रीपद सोडेन, राजकारणातूनही निवृत्त होईन. हे लोक आम्हाला गद्दार म्हणतात. पण आमच्याच मतावर हे महागद्दार निवडून आले आहेत. ते खोटे ठरले तर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. दैनिक सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा द्यावा.
हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीची, पवारांची करतात, असा आरोप दादा
हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत.गिरणा अग्रो नावाने178 कोटी 25 लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले.पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले.
ही लूट आहे.लवकरच स्फोट होईल.@dir_ed@Dev_Fadnavis pic.twitter.com/fYuLIZEhEL— Sanjay Raut (@rautsanjay61) March 20, 2023
दादा भुसे यांच्या आरोपांवर अजित पवार यांनी सभागृहातच उत्तर दिलंय. शरद पवार यांचं नाव सभागृहात घेण्याचं काही कारण नव्हतं. सभागृहाच्या रेकॉर्डवरून हे काढून टाकण्याची मागणी अजित पवार यांनी केली.