Rahul Gandhi On PM Narendra Modi : “जातीजनगणनेच्या मुद्द्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची झोप उडाली आहे. जाती जनगणनेच्या मुद्दा लोकांनी लावून धरल्याने मोदींचा चेहरा पडला आहे. जातीजनगणना विकासाची पद्धत आहे. जातीजनगणनेने संविधान वाचेल. आपल्यावर काय अन्याय होत आहे हे जनतेला कळाल्यावर लोक संविधानाचा आधार घेतील”, असे विधान काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केले. ते नागपुरातील संविधान सन्मान संमेलनात बोलत होते.
“एकाच व्यक्तीच्या हाती संपत्ती असावी यात असं लिहिलं नाही. समानता असावी यात लिहिलं. पण आरएसएसचे लोक किंवा भाजपचे लोक त्यावर आक्रमण करतात तेव्हा या पुस्तकावर हल्ला करत नाही तर जनतेच्या आवाजावर हल्ला करत आहे. संविधान नसतं तर निवडणूक आयोग नसता. राजे महाराजांकडे निवडणूक आयोग नव्हतं. या पुस्तकाने देशाची शैक्षणिक सिस्टिम, प्रायमरी, सेकंडरी आणि आयआयटी आयआयएम सर्व येते. सार्वजनिक रुग्णालय यातून येते. संविधान हटवल्यास एकही सार्वजनिक रुग्णालय, शाळा मिळणार नाही. सर्व गायब होईल”, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.
“संघ यावर थेट हल्ला करू शकत नाही. ते संविधानाला घाबरतात. समोरून त्यांनी संविधानाविरोधात लढा दिला तर ते पाच मिनिटात पराभूत होतील. ते समोर येत नाही. ते घाबरतात. जेव्हा ते समोर येतील तेव्हा कहाणी संपेल. ते लपून येतात. वेगवेगळ्या शब्दांच्या माध्यमातून येतात. विकास, प्रगती, इकोनॉमी वेगवेगळ्या शब्दांच्या मागे लपून येतात. पण लक्ष संविधानावर सुरा मारण्याचा आहे. दम असता तर समोरून आले असते. आम्हीही म्हटलं असतं या. लपून छपून संघावर येतात. शिशू मंदिराच्या नावाने, एकलव्य स्कूलच्या नावाने येतात”, असे राहुल गांधी म्हणाले.
“वास्तव आहे. मी बघितली मोठी इमारत आहे. हजारो कोटीची जमीन असेल. शिशू मंदिरचा पैसा कुठून आला. मध्यप्रदेश आणि राजस्थानसह इतर सरकारचा पैसा आहे. नॅशनल हायवेचा पैसा आहे. विकासाचा पैसा आहे. अदानी अंबानीचा पैसा आहे,. गुजरात मॉडलचा पैसा आहे. मधूनच एक आवाज आला. मी ऐकत होतो. माझं काम जनतेचं ऐकण्याचं आहे तर मी ऐकत होतो. सुरुवातीला एक छोटा आवाज आला. छोटा होता. जातीजणगना. एका कोपऱ्यातून हा आवाज आला. नंतर जातीजनगणनाचा आवाज बुलंद झाला. याला आम्ही जातीजनगणनाचे नाव दिले आहे.
जातीजनगणनेचा खरा अर्थ न्याय आहे. जर या देशात ९० टक्के लोकांकडे कोणती पॉवरच नसेल, पैसा नसेल, धन नसेल असेट नसेल तर त्याचा अर्थ काय. तुम्ही सांगितलं, समानता हा शब्द वापरला जातो. मला वाटतं सत्तेशिवाय, पैश्याशिवाय… आदराचा अर्थ काय. कोणी भूकेला असेल कोणी त्याचं ऐकत नाही आणि त्याला मी हार घातला तर त्याचा अर्थ काय. त्यापेक्षा त्याला बळ द्या. त्याला पैसा त्या विकास करा. त्याला सर्व काही मिळेल”, असेही राहुल गांधींनी सांगितले.
“जातीजनगणनेच्या मुद्द्यामुळे मोदींची झोप उडाली. माझ्यामुळे नाही, तुमच्यामुळे झालं. माझं काम फक्त ऐकण्याचं आहे. जाती जनगणनेच्या मुद्दा लोकांनी लावून धरल्याने मोदींचा चेहरा पडला. जातीजनगणनेनंतर सर्व काही क्लिअर होणार आहे. आपल्या हातात किती सत्ता आणि संपत्ती आहे, हे लोकांना माहीत पडेल. मी गॅरंटी देऊन सांगतो आपण भारताचं असेट पाहिलं तर त्यात दलित, आदिवासी आणि मागास समाजातील कोणीच नसल्याचं दिसून येईल. जातीजनगणना विकासाची पद्धत आहे. काहीही करा जातीजनगणना होणारच आहे. त्यामुळे ५० टक्क्याची मर्यादा तोडली जाणार आहे. हळूहळू ही मागणी वाढणारच आहे. ती रोखता येणार नाही. आमचं काम समजावण्याचं आहे. जातीजनगणनेने संविधान वाचेल. आपल्यावर काय अन्याय होत आहे हे जनतेला कळाल्यावर लोक संविधानाचा आधार घेतील. आम्हाला देश बदलायचा आहे. या देशात ९० टक्के लोकांसोबत अन्याय होतोय, रोज होतोय. त्याविरोधात आम्ही सर्व लढत आहोत”, असेही राहुल गांधाीनी म्हटले.