निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तब्बल 19 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे, सर्वाधिक गुन्हेगार कोणत्या पक्षात?

| Updated on: Nov 19, 2024 | 9:41 AM

यंदा राज्यातील 288 मतदारसंघात तब्बल 4136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांपैकी तब्बल १९ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तर ३८ टक्के उमेदवार हे करोडपती असल्याचे बोललं जात आहे.

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तब्बल 19 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे, सर्वाधिक गुन्हेगार कोणत्या पक्षात?
Follow us on

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. यंदा महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. यंदा राज्यातील 288 मतदारसंघात तब्बल 4136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांपैकी तब्बल १९ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तर ३८ टक्के उमेदवार हे करोडपती असल्याचे बोललं जात आहे.

आपले राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी विधानसभेच्या मैदानात उतरलेल्या सुमारे चार हजार उमेदवारांपैकी तब्बल १९ टक्के उमेदवारांवर बलात्कार, महिलांवरील अत्याचार, हत्या, हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर २९ टक्के उमेदवारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत ३८ टक्के उमेदवार करोडपती आहेत.

ताजा अहवाल समोर

‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्मस्’(एडीआर) संस्थेने राज्यातील निवडणुकांबद्दल एक ताजा अहवाल मांडला आहे. या अहवालानुसार, २८८ मतदारसंघांत २०४ महिलांसह ४ हजार १३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच राष्ट्रीय पक्षांचे ४९०, प्रादेशिक पक्षांचे ४९६ आणि २ हजार ८७ अपक्ष मैदानात उतरले आहेत. यापैकी २२०१ उमेदवारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील तपशीलाच्या विश्लेषणानुसार २९ टक्के उमेदवारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर १९ टक्के उमेदवारांविरोधात बलात्कार, महिलांवर अत्याचार, हत्या, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत २०२ महिला उमेदवार रिंगणात उतरल्या आहेत. तर ४८ उमेदवारांकडे साधं पॅनकार्ड नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच ४७ टक्के उमेदवाराचे शिक्षण जेमतेम बारावीपर्यंत झाले आहे. तर ४७ टक्के उमेदवार पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. तसेच १० उमेदवार अशिक्षित आहेत.

कोणत्या पक्षातील उमेदवारांवर किती गुन्हे?

‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्मस्’(एडीआर) संस्थेच्या अहवालानुसार, भाजपच्या सर्वाधिक ६८ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यापाठोपाठ शिवसेना ठाकरे गट ६६ टक्के, शिवसेना शिंदे गट ६४ टक्के, राष्ट्रवादी शरद पवार गट ६१ टक्के, काँग्रेस ५८ टक्के आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ५४ उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.