Maharashtra Breaking News LIVE : सोलापूर शहर मध्यचे भाजप उमेदवार देवेंद्र कोठे यांची एमआयएमवर टीका

| Updated on: Nov 13, 2024 | 11:01 PM

Maharashtra Election News LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आज 12 नोव्हेंबर 2024 राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : सोलापूर शहर मध्यचे भाजप उमेदवार देवेंद्र कोठे यांची एमआयएमवर टीका
महत्वाची बातमी
Image Credit source: tv9
Follow us on

आज कार्तिकी एकादशी आहे. त्यानिमित्त विठ्ठल रूक्मिणीची महापूजा पार पडली. उदगीरच्या सगर दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला. तसंच विधानसभा निवडणूक होत आहे. ठिकठिकाणी प्रचारसभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पुण्यातील एस पी कॉलेजच्या ग्राऊंडवर सभा होत आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त स. प. महाविद्यालयाच्या भागातील रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. पुणे म्हाडाकडून अर्जासाठी महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. सातारा,सांगली, कोल्हापूर,सिंधुदुर्ग जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहरांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Nov 2024 04:06 PM (IST)

    सोलापूर शहर मध्यचे भाजप उमेदवार देवेंद्र कोठे यांची एमआयएमवर टीका

    सोलापूर शहर मध्यचे भाजप उमेदवार देवेंद्र कोठे यांनी एमआयएमवर टीका केली आहे. सोलापुरात एक विषारी पक्ष उभा आहे आपला व्यक्तीला विरोध नाही पण आपण एमआयएमचे समर्थन करू शकत नाही. औरंगाबादचे नाव संभाजीनगर केल्यावर विरोध करणाऱ्या महाराष्ट्रद्रोषी पक्षाला थारा द्यायचा नाही, असं कोठे म्हणाले.

  • 12 Nov 2024 03:49 PM (IST)

    मोदींचं विमान लँड होईपर्यंत सोलापुरातील उड्डाणं थांबवली

    मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान लँड होईपर्यंत सोलापुरातील उड्डाणं थांबवण्यात आली आहेत. मोदी सोलापुरात येत असल्याने उड्डाणास परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या विमानाच्या उड्डाणास लातूरमधूनही परवानगी नाही.ठाकरे उमरग्यातील सभेसाठी हेलिकॉप्टरने जाणार होते.


  • 12 Nov 2024 03:16 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

    • माझी बॅग तपासता मग मोदी-शाहांचीही बॅग तपासा, असं ठाकरे यांनी म्हटलं.
    • मोदी-शाहांची महाराष्ट्रातून जाताना बॅग तपासा.
    • मोदी-शाह महाराष्ट्र लुटून जातात
    • मोदी पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत.
    • अमित शाह गृहमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत.
    • 15 लाख रुपये देणार होते पण पंधराशे रुपये देत आहेत.
  • 12 Nov 2024 03:12 PM (IST)

    नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

    उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या दोघांवर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत, तर अमित शाह गृहमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी लायक नाहीत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे.

  • 12 Nov 2024 02:59 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांची लातूर येथे पुन्हा तपासणी

    लातूर जिल्ह्यातल्या कासार सिरसी हेलिपॅडवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सामानांची तपासणी केली आहे.यावेळी ठाकरे म्हणाले की माझी झडती घ्या,पण मला एक न्याय आणि मोदी शहा यांना एक न्याय असे करु नको असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

  • 12 Nov 2024 02:36 PM (IST)

    मी योगी आहे माझ्यासाठी देश प्रथम आहे – योगी आदित्यनाथ

    सतत तीन दिवसापासून मी मल्लिकार्जुन खरगे माझ्यावर नाराज आहेत. पण खरगेजी मी योगी आहे माझ्यासाठी देश प्रथम आहे असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

  • 12 Nov 2024 02:18 PM (IST)

    कोकणातील तिन्ही जागा महायुती जिंकेल-विनोद तावडे

    विधानसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगली काम झाली आहेत त्यामुळें तिन्ही जागा महायुती जिंकेल असा विश्वास भाजपा नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे.

     

     

  • 12 Nov 2024 12:56 PM (IST)

    पालघरमध्ये महायुतीत धुसफूस का?

    देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या डहाणू येथील प्रचार सभेकडे महायुतीतील शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची पाठ. पालघरमध्ये महायुतीत धुसफूस का?. शिवसेना शिंदे गटाचा एकही पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित नाही. डहाणूत सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव.

  • 12 Nov 2024 12:55 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांची बॅग तपासून सरकारने आपली नियत दाखवली – भास्कर जाधव

    “उद्धव ठाकरे यांची बॅग तपासून सरकारने आपली नियत दाखवली. बॅग तपासून एक अधोरेखित झालं, की केंद्रीय यंत्रणा वापरून केंद्रातील सरकार या ठिकाणी आलं आहे. महाविकास आघाडी सरकार येणार हे माहिती असल्यामुळे अशा पद्धतीच्या केंद्रीय यंत्रणा सरकार वापरते. उद्धव ठाकरेंची बॅग तपासणी नाही तर 12- 13 कोटी जनतेच्या मनाला त्यांनी हात घातला आहे. याची किंमत सरकारला नक्कीच मोजावी लागेल” असं उद्धव ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव म्हणाले.

  • 12 Nov 2024 12:24 PM (IST)

    मित्रपक्ष म्हणून सोबत राहतात आणि पाठीमध्ये खंजीर खुपसतात – अभिजित अडसूळ

    “आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा इकडे आलेत, त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. या निवडणुकीला 23 तारखेला महायुतीचा भगवा फडकेल. दर्यापूर मध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येणार आहे. जेव्हा माझं सभागृहात निलंबन झालं, तेव्हा एकनाथ शिंदे साहेब माझ्या पाठीमागे होते. मी या मतदारसंघात प्रत्येक गावात काम केलं. 60 कोटीचा निधी मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघासाठी दिला” असं अभिजीत अडसूळ म्हणाले. “मित्रपक्ष म्हणून सोबत राहतात आणि पाठीमध्ये खंजीर खुपसत आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे” अभिजित अडसूळ यांची आमदार रवी राणा यांच्यावर टीका.

     

  • 12 Nov 2024 12:17 PM (IST)

    वसईत काँग्रेस उमेदवाराचे प्रचाराचे बॅनर फाडले

    वसई विधानसभेत काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील यांचे अज्ञात व्यक्तीने फाडले प्रचाराचे बॅनर. वसई पश्चिम गास सनसिटी मुख्य रस्त्यावर होते निवडणूक प्रचाराचे अधिकृत बॅनर. काँग्रेस पदाधिकारी यांच्याकडून वसई पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल. भारतीय न्याय दंड संहिता आणि निवडणूक कायद्यांतर्गत आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बॅनर फाडाफाडीमुळे निवडणुकीच्या काळात शांतता बिघडण्याची शक्यता आहे.

  • 12 Nov 2024 11:59 AM (IST)

    राहुल गांधी यांची चिखलीची सभा रद्द

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीची सभा रद्द करण्यात आली आहे. ते आता थेट गोंदिया येथील सभा स्थळी पोहचणार आहेत.

  • 12 Nov 2024 11:50 AM (IST)

    ठाकरे गटाला मोठा झटका

    कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका बसला. उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

  • 12 Nov 2024 11:40 AM (IST)

    राज ठाकरे यांच्यावर राऊतांची टीका

    राज ठाकरे काय म्हणतात याला महाराष्ट्रात किंमत नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भान ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले.

  • 12 Nov 2024 11:30 AM (IST)

    अमित ठाकरे यांचा माहिम मतदारसंघात प्रचार

    मनसे नेते अमित ठाकरे यांनी माहिम मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे. माहिम मतदारसंघात सदा सरवणकर यांच्यामुळे खरा ट्विस्ट आला आहे. अमित ठाकरे यांना निवडणुकीसाठी भाजपाने हाक दिली आहे.

  • 12 Nov 2024 11:20 AM (IST)

    सगळ्यात मोठी सभा उद्धव ठाकरेंची होणार

    उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी सभा उद्धव ठाकरेंची होणार आहे, असा दावा ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गिते यांनी केला आहे. आम्ही डोर टू डोअर याच्यावर जास्त भर देत आहोत. चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. संवाद मेळावा होता नेते मार्गदर्शन करायला आले होते. चाळीस-पंचेचाळीस वर्षे आम्ही काम करत आहोत. आम्हाला नव्याने प्रचार कसा करावा हे सांगावे लागत नाही, असा टोला वसंत गिते यांनी लगावला.

  • 12 Nov 2024 11:10 AM (IST)

    संजय राऊत संतापले

    आम्ही दिवाळीत सांगितले होते की ही लोकं सामान्य लोकांच्या गाड्या अडवून तपासणी करत आहे अगदी महिलांचे बॅग देखील तपासत आहेत.उद्धव ठाकरे हेलीपॅड मधून उतरत असताना त्यांच्या बॅगेची तपासणी केली त्यांच्याकडे पैसे आहेत का? ज्यांच्याकडे खोके वितरण सुरू आहे त्यांच्यावरती हात टाकत नाही त्यांचे पैसे अगदी व्यवस्थित पोहोचत आहेत..पूर्ण मॅनेज आहे, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोगाने निपक्षपाती तपासणी करायला काहीच हरकत नाहीत, असे ते म्हणाले.

  • 12 Nov 2024 11:01 AM (IST)

    भिवंडीत उमेदवार सकाळीच पोहचले क्रिकेट मैदानावर

    भिवंडी ग्रामीण महाविकास आघाडी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार महादेव घाटाळ यांनी सकाळी सात वाजता ग्रामीण भागातील क्रिकेट मैदानावर पोहचून मतदारांशी संवाद साधला.

  • 12 Nov 2024 10:50 AM (IST)

    “दाऊद आणि सलमानसोबतच्या संबंधांमुळे बाबा सिद्दिकी यांना गोळ्या झाडल्या”

    माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील कथित नेमबाजांपैकी एक असलेल्या शिव कुमार गौतमने पोलिसांना सांगितलं की, “सिद्दिकी यांना फरारी गुंड दाऊद इब्राहिम आणि अभिनेता सलमान खान यांच्याशी जवळचे संबंध असल्याने लक्ष्य करण्यात आलं होतं.” गौतमला 10 लाख रुपये, परदेश दौरा आणि मासिक खर्च देण्याचं आश्वासन दिलं होतं.

  • 12 Nov 2024 10:39 AM (IST)

    निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, जे बोलतो तसं वागतो- अजित पवार

    “निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे. जे बोलतो तसं वागतो, निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आम्ही आमची भूमिका मांडू” असं अजित पवार म्हणाले.

  • 12 Nov 2024 10:29 AM (IST)

    12.30% जागा आदिवासी, 12.30% जागा मागासवर्गीयांना दिल्या- अजित पवार

    “आम्ही या निवडणुकीत सोशल इंजीनिअरींग केलं आहे. 12.50 टक्के जागा आदिवासींना, 12.50 टक्के जागा मागासवर्गीयांना, 10 टक्के जागा अल्पसंख्याकांना आणि 10 टक्के जागा महिलांना दिल्या”, असं अजित पवार म्हणाले.

  • 12 Nov 2024 10:19 AM (IST)

    राहुल गांधी आज गोंदियाच्या दौऱ्यावर

    काँग्रेसचे नेते तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज गोंदियाच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सातही उमेदवारांच्या प्रचारासाठी ते गोंदिया इथल्या सर्कस ग्राऊंडवर सभा घेणार आहेत. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

  • 12 Nov 2024 10:10 AM (IST)

    शाहरुख खान धमकी प्रकरणी एक जण ताब्यात

    अभिनेता शाहरुख खानला धमकी दिल्याप्रकरणी रायपूरमधून संशयिताला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

  • 12 Nov 2024 10:00 AM (IST)

    माझ्या बॅगांचीही तपासणी करण्यात आली : अजित पवार

    माझ्या बॅगांचीही तपासणी करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या बॅगा तपासल्या जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही बॅगा तपासण्यात आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.

  • 12 Nov 2024 09:33 AM (IST)

    राज ठाकरेंच्या म्हणण्याला महाराष्ट्र किंमत देत नाही – संजय राऊत

    राज ठाकरेंच्या म्हणण्याला महाराष्ट्र किंमत देत नाही. उद्घव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरेंनी भान ठेवावं. ठाकरे, पवारांची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी असे संजय राऊत म्हणाले.

  • 12 Nov 2024 09:30 AM (IST)

    शिंदेच्या उमेदवारांना २५ कोटी पोहोचले, संजय राऊतांचा आरोप

    निवडणूक आयोगाने सर्वांना समान न्याय ठेवावा. नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून १५ ते १६ बॅगा उतरवल्या होत्या. शिंदेच्या उमेदवारांना २५ कोटी पोहोचले, संजय राऊतांचा आरोप

  • 12 Nov 2024 09:25 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस आज पालघरमध्ये दोन सभा

    पालघर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. पालघरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आज दोन जाहीर सभा होणार आहेत. डहाणू विधानसभेचे भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांच्यासाठी 11 वाजता डहाणूमध्ये सभा होणार आहे. तर विक्रमगड विधानसभेचे भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र भोये यांच्यासाठी जव्हार येथे दोन वाजताच्या सुमारास जाहीर सभा होणार आहेत.

  • 12 Nov 2024 08:57 AM (IST)

    अमित शाह यांची धुळ्यात सभा

    धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथं केंद्रीय मंत्री अमित शाह यांची सभा होणार आहे, शिंदखेडा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ दोंडाईचा येथे उद्या सकाळी सभेचं आयोजन आलं आहे. पंचवीस हजार लोक बसतील यासाठी मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर अमित शहा यांची धुळे जिल्ह्यासाठी प्रचारार्थ दुसरी सभा होत आहे. अमित शाह काय बोलतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे.

  • 12 Nov 2024 08:45 AM (IST)

    निवडणूक काळात संजय शिरसाटांना नोटीस, काय कारण?

    छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम विधानसभा मतदार संघातील उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. निवडणूक खर्च कमी दाखवल्याप्रकारणी नोटिसा दिल्या आहेत. संजय शिरसाट, राजू शिंदे यांच्यासह तीन उमेदवारांना नोटिसा बजावल्या आहेत. 10 लाख खर्च झाला मात्र दाखवला फक्त 3 लाख दाखवण्यात आला. 24 तासात उत्तर देण्याचे नोटीसीत आदेश देण्यात आलेत.

  • 12 Nov 2024 08:30 AM (IST)

    पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात कडक पोलीस बंदोबस्त

    पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या दौऱ्यानिमित्त पुण्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलाचेही अधिकारी शहरात दाखल झाले आहेत. पुणे पोलिसांसह या दौऱ्याची मुख्य जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलाकडे असणार आहे. लोहगाव विमानतळ ते सभा स्थळापर्यंत मार्गाची पाहणी केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांकडून करण्यात आली आहे.

  • 12 Nov 2024 08:15 AM (IST)

    नरेंद्र मोदींची आज पुण्यात सभा

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पुण्यात सभा होणार आहे.  आज सर परशुरामभाऊ (एस पी) महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधानांची सभा होत आहे. या निमित्ताने महायुतीच्या शहरातील उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हुकलेल्या सभेची कसर या सभेच्या माध्यमातून भरून काढण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा निर्धार आहे.