महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे उद्या 15 नोव्हेंबर रोजी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत.
बुलडोझरच्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री ओमप्रकाश राजभर वाराणसीत म्हणाले, “सुप्रीम कोर्टाने बुलडोझर चालवू नका असे म्हटलेले नाही… सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, हद्दीत नोटीस देऊन कारवाई करावी. कायद्याचे. आणि सरकार कायद्याच्या कक्षेत काम करत आहे. न्यायालयाने जे काही सांगितले त्याचे आम्ही स्वागत करतो आणि सरकार त्याच निर्णयानुसार काम करत आहे.”
ब्राझीलमध्ये होणाऱ्या G20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात भेट होण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही परिषद अशा वेळी होत आहे जेव्हा दोन्ही देश जागतिक आर्थिक, सुरक्षा आणि पर्यावरणीय आव्हानांना तोंड देत आहेत.
उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील महाराजगंज शहरात गेल्या महिन्यात दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीत उसळलेल्या जातीय हिंसाचाराच्या कथित मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर आरोपी खुर्शीद अहमद नेपाळला पळून गेला होता आणि गुरुवारी सकाळी भारतात परतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंदुरबार दौरा ऐनवेळेस रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा जिल्ह्यातील धडगाव येथे प्रचाच सभेचं आयोजन करण्यातं आलं होतं. शिंदे शिवसेना महायुतीचे उमेदवार आमश्या पाडवी यांचा प्रचार सभेसाठी येणार होते मात्र ऐनवेळेस ही सभा रद्द करण्यात आलीय. आता 17 नोव्हेंबरला सभा होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
मी जेथे जातो तिथे तपासणी..हे माझ्या सांगाती. आपण विचारलं मोदींच्या बँगांची तपासणी केली का ? तर आश्वासनं मिळतात असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मागाठाणे विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्याविरोधात मनसेने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.मतदारांना आमीष दाखवल्याचा आरोप मनसेचे उमेदवार नयन कदम यांनी केला आहे.
नितेश राणे बिस्कीटावर ठवेलेले आहेत.जेवढं बिस्कीट पडेल तेवढंच ते बोलतात.बिस्कीट संपले की वॉव..करतात अशी टीका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.
डोंबिवली विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे गुजराती सेलचे अध्यक्ष जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयामध्ये अज्ञात दोन इसमाने शिरूर उपाध्याय यांना खुर्चीच्या साहाय्याने मारहाण करत जाब विचारला.आमच्या जाती संदर्भात का बोलतो असा जाब विचारल्यानंतर दोन अज्ञात इसमांनी शिवीगाळ करत पळ काढला. सर्व फुटेज सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
नाशिकमध्ये निवडणूक आयोगाच्या पथकाने मल्लिकार्जुन खरगे यांची बॅग तपासली. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यामुळे ते संतप्त झाले होते.
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले तिरोडा गोरेगाव चे राष्ट्रवादी शरद पवार गट व महाविकास आघाडीचे उमेदवार रविकांत बोपचे याच्या प्रचारार्थ मुंडींकोटा येथे सभेसाठी जाताना तिरोडा येथील हेलिपॅड आले. यावेळी निवडणूक आयोगाच्या पथकाकडून सलग दुसऱ्या दिवशी बॅगची तपासणी केली गेली.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचा मातोश्री क्लब बाहेर राडा झाला आहे. त्यांचा महिला कार्यकर्त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे एका शिवसैनिकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचले होते.
येवल्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. एका वाहनातून 41 लाखांची रोकड आणि 1 लाख 92 हजार 880 रुपयांची रोकड जप्त केली आहे. हे पैसे कुणाचे व कुठे जात होते, त्याचा तपास सुरु आहे.
सुप्रिया सुळे या नाशिक पोलीस आयुक्तालयात पोहचल्या आहेत. गणेश गिंतेच्या भावाच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यांच्या वाहनाची तडफोड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तालय गाठले.
मंगळवेढा येथे भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. मंगळवेढा येथे हेलीपैंड वर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्याकडून गडकरींच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या भरारी पथका कडून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बॅगांची तपासणी केली जात आहे.
रश्मी शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेऊ नका, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. केवळ मागणीच नाही तर त्यासाठी काँग्रेस हायकोर्टात धाव घेणार असल्याचे समोर येत आहे.
परळीत पहिल्यांदाच घड्याळाला मतदान करावे लागत आहे. डोळे लावून मतदान करणार आणि धनंजय मुंडे यांना निवडून आणणार. कमळाची मतं कधीच कुठं जात नाही, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटेंसाठी शरद पवारांच्या उपस्थितीत रोड शो पार पडतोय.चिंचवडमध्ये पवारांचा आजवरचा पहिलाच रोड शो होत आहे, याद्वारे ते मतदारांना साद घालणार आहेत. भाजपचे उमेदवार शंकर जगतापांच्या बालेकिल्ल्यातून या रॅलीची सुरुवात होणार आहे.
उद्धव ठाकरे सध्या शिर्डी विमानतळावर आहेत. त्यांची श्रीगोंदा येथे सभा आहे. तिथे ते हेलिकॉप्टरने जाणार होते. पण त्यासाठी त्यांच्या हवाई उड्डाणाला परवानगी मिळालेली नाही.
महायुतीचा मुख्यमंत्री संख्याबळावर ठरणार नाही, असे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपदाची चर्चा निवडणुकीनंतर करू असं पक्षाने ठरवलं आहे. संख्याबळावर मुख्यमंत्री ठरणार नाही. निवडणुकीनंतर बसवून ठरवू, असे तावडे म्हणाले.
“लोकसभेला अब की बार 400 पार झालं. मोदी भक्तांनी मतदान केलं नाही. मोदी येणारच आहे, असं म्हणून मतदान झालं नाही. त्यामुळे चार पाच टक्के मतदान कमी झालं. त्याचा फटका बसला” असं विनोद तावडे म्हणाले.
“वंचित, सपा आणि एमआयएम स्ट्राँग आहेत. त्यांची पाच-दहा हजार मते घेण्याची क्षमता आहे. उद्धव ठकारेंना वरळीत मुस्लिम मते अधिक पडली हे लोकसभेत दिसली. पण अशी मते तिकडे गेल्यावर हिंदुत्वाची मते आमच्याकडे येतात” असं भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
जरांगेंचा फक्त भाजपाला दोष का? राणे समितीने दिलेलं आरक्षणही कोर्टाने फेटाळलं. लोकसभेला 400 पारमुळे मतदानाचा टक्का कमी. हरयाणात आम्ही केलेल्या कामामुळे विजय झाला असं भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
“मुख्यमंत्रिपदाची चर्चा निवडणुकीनंतर. राज्यात भाजपा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. महाराष्ट्राच हित पाहून निर्णय घेतला जाईल. महायुतीच नेतृत्व एकनाथ शिंदे करतायत. लोकसभेला बाहेर न पडलेला मतदार बाहेर पडेल” असं भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
“राष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा मला आनंद आहे. शरद पवारांनी मराठी समाजाला आरक्षण दिलं नाही. लोकांना विश्वास महायुती आल्यास विकास” असं भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
125 कोटींच्या घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी ED ची टीम मालेगावात दाखल. प्रमुख आरोपी असलेल्या सिराज अहमदच्या घरी ED कडून तपासणी सुरू. नामको बँकेची देखील ED चौकशी करण्याची शक्यता. त्यानंतर छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथे दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात चर्चा करणार. व्होट जिहाद साठी हा पैसा वापरला गेल्याचे किरीट सोमय्या यांनी केले होते वक्तव्य. काल सोमय्या यांनी येत्या दोन दिवसांत धमाका होणार असे वक्तव्य केले होते .
“आदिवासी लोकसंख्या 8 टक्के आहे तर भागीदारी 8 टक्के असली पाहिजे. पण या सरकारमध्ये 90 टक्के अधिकारी हे सरकार चालवता. सरकार 100 रुपये खर्च करत असेल तर आदिवासी अधिकारी फक्त 10 पैशांचा निर्णय घेतात,” असं राहुल गांधी म्हणाले.
“मोदी आदिवासींना वनवासी म्हणतात, ते तुमचे अधिकार हिरावून घेतात. तुमची जमीन, पाणी, जंगल घेऊन अरबपतींना दिलं जातंय. आदिवासी म्हणजे भारताचे पहिले मालक. मोदी म्हणतात की माझ्या हातातील संविधानाचं पुस्तक कोरं आहे. ज्यांनी संविधान वाचलं नाही त्यांना ते कोरं वाटतं,” अशा शब्दांत राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला.
नंदुरबार – राहुल गांधी यांच्या नंदुरबार इथल्या सभेला काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची अनुपस्थिती पहायला मिळाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उत्तर महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब थोरातही सभेला अनुपस्थित आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत फक्त पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित आहेत.
“कटुता संपणार नाही हे अजित पवार यांचं मत आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. ही वैचारिक लढाई आहे, कुटुंबाची नाही. महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाविरोधातली लढाई आहे. मी माझ्या कुटुंबासाठी लढत नाही महाराष्ट्रासाठी लढतेय. मायबाप जनतेसाठी लढतेय,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
डोंबिवलीत भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. डोंबिवली पश्चिमेतील गृहराती सेल पदाधिअरी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी अचानक येत शिवीगाळ करत मारहाण करून तोडफोड केली. तोडफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
“राज्यामध्ये महायुतीसाठी वातावरण चांगलं आहे. गाव खेड्यातले शेतकरी हे महायुतीबरोबर आहेत. यामुळे निश्चितपणे चांगलं यश महायुतीला मिळेल. मागच्या सरकारच्या वेळी शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतात सडून नुकसान झालं होतं. आमचं सरकार आलं आणि एका बाजूला कांद्याचे भाव वाढले तर ऊस, दूध, सोयाबीनसारख्या अनेक पिकांवरती सरकार सूट देत आहे. महाविकास आघाडीच्या काळात चांगले निर्णय घेतले नव्हते. त्यांना फक्त खाण्याचं आणि लुटायचं माहीत आहे. त्यामुळे परत राज्य लुटायला मिळावं यासाठी त्यांची चाललेली ही धडपड आहे,” अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
हरियाणा शिवसेना राज्यप्रमुख विक्रम सिंह यांना धमकी मिळाली आहे. बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्याचा दावा विक्रम सिंह यांनी केला. युकेमधून व्हॉट्सअप कॉल वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी विक्रम सिंह यांच्यानी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. विक्रम सिंह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्यप्रमुख आहेत.
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 23 ठिकाणी ईडीची छापेमारी… नाशिक मार्कटाइल बँकेशी संबंधित प्रकरणी छापेमारी… व्होट जिहादसाठी 100 कोटींहून अधिक पैशांचा वापर… सोमय्यांचा आरोप…
अधिकाऱ्यांनी माझ्याही बॅगेची आज तपासणी केली. कुटुंबासाठी लढत नाही, महाराष्ट्रासाठी लढत आहे. अजित पवारांनीच वक्तव्य करुन युटर्न घेतला… ४ वेळा कोणाला उपमुख्यमंत्री केलं… असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
पुणे चिंचवड राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमदेवार राहुल कलाटे शरद पवार यांना भेटीसाठी आलेत… आज शरद पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्यापूर्वी राहुल कलाटे मोदी बागेत आले आहेत…
अमरावतीच्या मेळघाट परिसरातील 6 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार… रंगूबेली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खामदा, किन्हीखेडा, धोकरा, कुंड आणि खोकमार या सहा गावाचा बहिष्कार… 6 गावातील 1 हजार 300 मतदारांचा मतदानावर बहिष्कार.. मूलभूत सुविधा, पाणी, रोड, वीज नसल्याने नागरिक आक्रमक… केवळ घोषणा होतात मात्र सुविधा मिळत नसल्याचा आरोप…. आधी सुविधा द्यावी, नंतर मतदान गावकऱ्यांचा निर्धार…
साखर हंगाम निवडणूक आयोगाच्या कात्रीत अडकला आहे. आता पंधरा नव्हे तर 25 नोव्हेंबरला सुरू होण्याचा अंदाज अद्याप एकाही कारखान्यास परवानगी नाही. दिवाळीमुळे आधीच पंधरा दिवस लांबलेला साखर हंगाम आता निवडणूक आयोगाच्या परवानगीच्या कात्रीत सापडला आहे. पूर्वी जाहीर केल्यानुसार हंगामाला 15 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. मात्र 20 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानामुळे हंगाम 25 नोव्हेंबर पासून सुरू करण्याची परवानगी मिळावी असे पत्र राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहे.
हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. फार्म हाऊस शेजारी बिना परवाना मंडप, लाउडस्पीकर आणि वाकोडी गावातील शिवारात पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. माजी खासदार अँड शिवाजी माने यांच्या तक्रारी वरुण कळमनूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सोय करण्यात आली आहे. शासकीय नोकरदारांना कार्यरत असतील, त्या जिल्ह्यामधून मतदान करण्याची सुविधा आहे. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत असलेले 6000 मतदारांचे अन्य जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्यासाठी मतपत्रिका जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत.
जळगावच्या बोदवडमध्ये रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा रात्री दोन वाजेपर्यंत बोदवड पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता.रोहिणी खडसे यांच्या प्रचार रॅलीत गोंधळ होऊन कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप रोहिणी खडसे केला आहे. बोदवडच्या जलचक्र तांडा येथे रॅली दरम्यान हा प्रकार घडल्याचा रोहिणी खडसेंनी म्हटलं आहे. पोलीस ठाण्यात कारवाई होत नसल्याने रात्री रोहिणी खडसेंनी कार्यकर्त्यांसह रात्रभर ठिय्या आंदोलन केलं. सतत मतदारसंघात गुंडगिरी वाढली रोहिणी खडसे यांचा आरोप आहे. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात उमेदवार आहेत.
राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. अशात राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईत सभा होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे आणि कार्यकर्त्यांचा रात्री दोन वाजेपर्यंत बोदवड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. रोहिणी खडसे यांच्या प्रचार रॅलीत गोंधळ होऊन कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप रोहिणी खडसे केला आहे. आमदार संतोष बांगर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात बुधवारी किमान तापमान 14.6°c नोंदवलं गेलं आहे. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.