सोलापूरमधील मंगळवेढा येथी हेलिपॅडवर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्याकडून खासदार सुप्रिया सुळे यांच्या बॅगाची तपासणी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून ही तपासणी करण्यात आली. त्या महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ आल्या आहेत.
“सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार त्यांना नव्हता. विकासाला स्टे (स्थगिती) देण्याचं काम त्यांनी केलं. ते सत्तेत राहिले असते तर महाराष्ट्र दहा वर्षे मागे गेला असता,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघात दहिवेल या गावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. शिवसेनेच्या उमेदवार आमदार मंजुळा गावित यांच्या प्रचारासाठी साखरी इथल्या दहिवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेसाठी मोठा शामियाना, मंडप आणि 25000 नागरिक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात आहे.
पंढरपूर- मंगळवेढा इथं राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. मंगळवेढा इथं हेलीपॅडवर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून विधानसभे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या आणि स्टार प्रचारकांच्या बॅगांची तपासणी केली जात आहे. पंढरपूरमधील मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे दाखल झाल्या आहेत.
करमाळा- “महिलांवरील अत्याचार थांबवायचे असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तरुणांच्या हाताला रोजगार पाहिजे असेल तर महाविकास आघाडीला मतदान करा. मी सत्तर हजार कोटींचं कर्ज माफ केलं होतं. ज्यांच्या हातात सत्ता आहे, मग ते देवेंद्र फडणवीस असो किंवा त्यांचे सहकारी असो.. त्यांना शेतकऱ्यांची कवडीची किंमत नाही,” अशा शब्दांत शरद पवारांनी टीका केली.
करमाळा- “जे तुमच्या हाताला काम देऊ शकत नाही, त्यांचा उपयोग नाही. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात वीस हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सोन्यासारखं पीक आलं आणि ते अतिवृष्टीमुळे नष्ट झालं. कर्ज डोक्यावर तसंच राहिलं,” असं शरद पवार म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री आज नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे जाहीर सभा घेणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमश्या पाडवी यांच्यासाठी मुख्यमंत्री यांची जाहीर सभा घेत आहेत.
नांदेड उत्तर – दक्षिण मतदारसंघातील बंडखोर काँगेसचे हस्तक आहेत असा गंभीर आरोप आमदार हेमंत पाटील यांनी केला आहे. काँगेसकडून पैसे घेऊन शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महायुतीचे मतदान खराब करण्यासाठी काँग्रेसने मॅनेज करून यांना उभे केल्याचा आरोप त्यांनी केला.
महाविकास आघाडी शिवसेना उबाठा गटाचे पालघर बोईसर विधानसभा मतदार संघातील दोन उमेदवार साठी उद्धव ठाकरे यांची आज बोईसर मध्ये जाहीर प्रचार सभा होत आहे.
नक्कीच या नेत्यांशी बेईमानी करणारा त्यांचा वारस होऊ शकत नाही कोणीही असेल कोणत्या पक्षाचा नेता असेल त्या नेत्याची बेइमानी करणारा त्यांचा वारस किंवा मी त्यांच्यानंतर हे कसं काय होऊ शकेल असं होऊ शकत नाही, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली. शरद पवारांची लेगसी फार मोठी आहे आणि ती आज आहे आणि शरद पवार यांना उदंड आयुष्य लाभणार आहे हे मला माहिती आहे, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या धर्मयुद्धाच्या घोषणेनंतर साधुसंत आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती गोविंददेवगिरी महाराज यांनी दिली. त्यांची पुण्यात पत्रकार परिषद होईल. यावेळी महाराष्ट्रातील संतांचे शिष्टमंडळ सोबत असेल.
भाजप सोबत जाण्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. झालेली चर्चा मला माहीत असली तरी जाहीररित्या सांगणार नाही. पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक झाली व त्यात सत्ते सोबत जाण्याचे ठरले. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला व 41 आमदार सोबत मीही सत्तेत गेलो. राष्ट्रवादीत फूट पडली. मी पक्षाच्या सत्तेत जाणाऱ्या आमदारांसोबत राहिलो मला ही भूमिका घ्याव लागली कारण आपला पाण्याचा प्रश्न, आंबेगावच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा होता, असे विधान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. बारामती हेलिपॅडवर शरद पवारांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे. बारामतीहून करमाळ्याकडे रवाना होताना ही तपासणी करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड : शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मार्फत वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जात आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अशीच शक्कल वापरून शहरात पहिल्यांदाच “भव्य विंटेज कार आणि बाईक रॅली व प्रदर्शनाचे” आयोजन केले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ऐतिहासिक दुर्मिळ कार व बाईक्स पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र रस्त्यावर पाहायला मिळालं.
गडचिरोली अहेरी मतदार संघातील नक्षलग्रस्त भागात मतदान पथके हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आली आहेत. नेहमीच निवडणुकीच्या तीन दिवसा अगोदर मतदान पथके नक्षलग्रस्त भागात पाठवण्यात येतात. बेस कॅम्पवर दोन दिन मुक्काम करून ही पथके पायदळी प्रवास करून मतदान केंद्रापर्यंत पोहोचतात. अहेरी मतदान संघातील एटापल्ली भामरागड या दुर्गम भागात मतदान पथके वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आले
एकनाथ शिंदे हे दिल्लीचे बूट चाटतात. हे बाळासाहेबांना मान्य नव्हतं. बाळासाहेबांनी कधीच काँग्रेसचा तिरस्कार केला नाही. इंदिरा गांधी, राजीव गांधींना राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात कायम एकोपा राहिल याची त्यांनी काळजी घेतली. एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे काय माहिती आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थितीत केला.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतीदिन. यानिमित्त उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना विनम्र अभिवादन केले. यावेळी पत्नी रश्मी ठाकरे, खासदार अनिल देसाई यांसह अनेकजण उपस्थितीत होते.
जळगावात पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच कोटी ५९ लाख ६१ हजाराचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले आहे. जळगावातील रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी नाकाबंदी करत ही कारवाई केली आहे. कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल मध्ये चार किलो सोने व ३४ किलो चांदीचा समावेश आहे. जळगाव शहरातील तीन सराफ व्यावसायिकांचे हे सोने-चांदी असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेना उमेदवार संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणूक प्रचाराच्या खर्चात तफावत आढळल्याने निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा नोटीस वाजवली आहे.छत्रपती संभाजी नगर शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चात तफावत आढळल्यामुळे चार उमेदवारांना निवडणूक विभागाने नोटीस बजावली आहे. 48 तासात याबाबत खुलासा करण्याचेही निर्देश देखील दिले आहेत. यामध्ये महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट, महाविकास आघाडीचे राजू शिंदे,रमेश गायकवाड यांना निवडणूक विभागाने ही नोटीस बजावली.
उद्धव ठाकरे यांची आज पालघरच्या बोईसरमध्ये जाहीर सभा होणार आहे. पालघर विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार जयेंद्र दुबळा आणि बोईसर विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विश्वास वळवी यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा होत आहे. दुपारी दोन वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरे यांचे खैराफाटा येथील मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
मी थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे. जरांगे पाटील लासलगाव येथील सभेत भावूक झाले. माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय याची काळजी वाटते. मी कधी जाईल माहित नाही. मी तुमच्यात किती दिवस राहील. माहीत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. असं असताना राजकीय नेत्यांच्या सभा होत आहे. गडचिरोली आरमोरी अहेरी या मतदारसंघासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज प्रचार सभा होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी देसाईगंज इथं प्रचार सभा होणार आहे. करमाळयात आज सकाळी 10. 30 वाजता शरद पवार यांची सभा होणार आहे. शिवसेना उमेदवार संजय शिरसाठ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार गावात माजी खासदार, भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या सभेत राडा झाला आहे. खुर्च्या फेकून मारल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.