महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होत आहे. काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या. उद्या मतदान होणार आहे. काल अनिल देशमुख यांच्यावर काटोल जलालखेडा मार्गावर दगडफेक झाली. या हल्ल्यात अनिल देशमुखांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या गाडीवर दगदफेक करण्यात आली आहे. गंगापूरचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्यावर हल्ला झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. थंडीने पुणेकर गारठलेत. कारण पारा 12 अंशांपर्यंत घसरला आहे. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी भाजपचे विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याच्या बहुजन विकास आघाडीच्या आरोपावर काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाले की, आता ते फक्त पैशाची मदत घेत आहेत. निवड श्रीमंत आणि गरीब यांच्यात आहे. आम्ही गरीब जनतेसाठी निवडणूक लढवत आहोत, पण त्यांना (महायुती) पैशाच्या जोरावर निवडणूक हायजॅक करायची आहे. एवढा पैसा वसूल झाल्यावर तात्काळ अटक व्हायला हवी, पण अटक होत नाही.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. क्रेमलिन प्रेस सेक्रेटरी दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, आम्ही तारीख निश्चित करून लवकरच सांगू.
भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीवर केला आहे. यावर भाजपचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, विरोधकांनी आणखी एक प्रकारचा बेताल आणि निराधार आरोप करून महाराष्ट्रातील वातावरण प्रभावित करण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपवाले भेकड आहेत त्यामुळे त्यांनी अशा पध्दतीने अनिल देशमुख यांच्यावर हल्ला केला असा आरोप कॉंग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी केला आहे.
विरारच्या विवांता हॉटेलात भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केल्यानंतर तीन तासांचा ड्रामा झाला. त्यानंतर पत्रकार परिषद घेतल्यानंतर हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे एकाच गाडीतून रवाना झाले आहे.
आपण 40 वर्षे राजकारणात आहे.असा आरोप कधीही झालेला नाही. निवडणूक आयोग काय ते चौकशी करुन सत्य बाहेर आणेल असे पैसे वाटल्याच्या आरोपावर भाजपा नेते विनोद तावडे यांनी उत्तर दिले आहे.
विरार येथील विवांत हॉटेलात भाजपा नेते विनोद तावडे यांच्याकडे सापडलेल्या डायऱ्यांत पैशांचा उल्लेख असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
विरार येथील हॉटेल विवांतच्या काही रुममधून नोटांची बंडलं आता बाहेर आली आहे. रुम क्रमांक 406 मध्ये बॅग सापडल्या आहेत. त्यात नोटांची बंडलं सापडली आहे. त्यात 9 लाख रुपये निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोजल्या आहेत.
विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर यांच्यात सध्या हॉटेल विवांतमध्ये मोठा राडा झाला आहे. तावडे हे पाच कोटी रुपये वाटण्यासाठी आल्याचा आरोप बविआने केला आहे. याठिकाणी पोलिसांचा आणि माध्यमांचा गराडा पडला आहे. विनोद तावडे यांनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी बविआने केली आहे.
मतदारसंघात पैसे वाटपाचे कार्यक्रम हे पूर्वनियोजित कटकारस्थान आहे,जाणीवपूर्वक व्हीडिओ काढला आहे, आमचा यात संबंध नाही,पोलिसांनी याची चौकशी करावी.. पराभव दिसत असल्याने ते असले व्हीडिओ फिरवत आहे.. बरं 2 कोटी सोडले तर तपास करा ना, पाहिले 2 कोटी मग 18 लाख मग दीड हजार सत्य काय आहे… मुस्लिम लोक याना मतदान करणार नाही म्हणून यांचे कपाट कारस्थान सुरू आहे असा आरोप संजय शिरसाठ यांनी केला आहे.
गेल्या तीन तासांपासून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विवांत हॉटेलमध्ये घेरण्यात आले आहे. हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर हे पण हॉटेलमध्ये पोहचले आहेत. बविआ आणि भाजपमध्ये यावरून विरारामध्ये राडा सुरू आहे.
अनिल देशमुख यांना रात्री 10:00 च्या सुमारास आमच्या आपत्कालीन स्थितीत आणण्यात आले. ते आल्यावर शुद्धीवर आले आणि त्यांच्या कपाळाला दुखापत, गंभीर डोकेदुखी आणि चक्कर आल्याचा हिस्टरी नोंदवला. इमर्जन्सी मेडिसिन टीमने त्यांना तातडीने स्थिर केले. ग्रामीण रूग्णालयाच्या भेटी दरम्यान त्यांनी उच्च रक्तदाबाचा हिस्टरी देखील नोंदवला.देशमुख यांना निरीक्षण आणि देखरेखीसाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
वसई-विराराचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या सर्व राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “पाच कोटीच वाटप चालू आहे. मला डायऱ्या मिळाल्या आहेत. लॅपटॉप आहे. कुठे-काय वाटप झालय त्याची माहिती आहे” असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला.
स्वयंघोषित कालिचरण महाराज यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत एक विधान केलं. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मनोज जरांगे पाटील म्हणजे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेले राक्षस, अशा शब्दात कालिचरण महाराज यांनी टीका केली.
भाजपचा खेळ खल्लास, संजय राऊतांचं ट्विट… विनोद तावडेंना बविआनं घेरलं… राऊत आक्रमक… विरारमध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप…
भाजपा केंद्रीय नेते विनोद तावडे यांच्यासह भाजपा नालासोपारा उमेदवार राजन नाईक यांना हॉटलमध्ये घेरून दोन्ही गटात तुफान राडा झाला आहे… विरार पूर्व मनवेलपाडा येथील विवांत हॉटलमध्ये हा राडा सुरू आहे… विनोद तावडे, भाजपा उमेदवार राजन नाईक, बाविया उमेदवार क्षितिज ठाकूर स्वतः हॉटल मध्ये एकमेकांसमोर भिडत आहेत…
पैसे वाटपाच्या आरोपावरुन भाजपा आणि बाविआमध्ये नालासोपाऱ्यात तुफान राडा. भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडेंसह भाजपा नालासोपारा उमेदवार राजन नाईक यांना हॉटेलमध्ये घेरून दोन्ही गटात तुफान राडा झाला आहे. विरार पूर्व मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये हा राडा सुरू आहे.
स्टार प्रवाह या चॅनेलवरील काही मालिकांमध्ये आचारसंहितेचा भंग करून छुप्या पद्धतीने शिवसेना शिंदे गटाचा प्रचार होत असल्याची तक्रार निवडणूक आयोगात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. या तक्रारीच्या संदर्भात पुढील 24 तासात आपले म्हणणे मांडा असे आदेश निवडणूक आयोगाकडून शिवसेना शिंदे गटाला देण्यात आले आहेत.
बारामतीत श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांच अर्धातास सर्च ऑपरेशन. वाहनांची डिक्की खोलूनही तपासणी केली असं श्रीनिवास पवार यांनी सांगितलं. श्रीनिवास पवार अजित पवार यांचे सख्खे बंधु आहेत. त्यांचा मुलगा युगेंद्र पवार बारामती विधानसभा क्षेत्रात अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहे.
उद्धव ठाकरे गटाचे बडनेऱ्याचे उमेदवार सुनील खराटे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी. ऐन निवडणूक तोंडावर असताना धमकी आल्याने चर्चांना उधाण. सुनील खराटे यांच्याकडून राजापेठ पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल. राजापेठ पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित. धमकी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची खराटे यांची मागणी.
जळगावच्या चोपडा येथून रावेर येथे मतदानाच्या ड्युटीसाठी जाणाऱ्या तीन महिला अधिकाऱ्यांच्या गाडीचा यावलजवळ अपघात झाला. मतदान केंद्रावर जाणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या अपघाताच्या घटनेबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. तीन महिला अधिकारी आपल्या नियुक्त ठिकाणी मतदान केंद्रावर ड्युटी बदलण्यासाठी जात असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दिली. यात तिघाही महिला अधिकाऱ्यांना दुखापत झाली असून त्यांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
बारामतीत शरयू मोटर्समध्ये रात्री पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू होतं. श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलं. युगेंद्र पवार हे बारामतीत मविआचे उमेदवार आहे. तर श्रीनिवास पवार हे युगेंद्र पवारांचे वडील आहेत.
बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मल्याळम अभिनेता सिद्दीकीला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
उद्या होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. थोड्याच वेळात अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक एसडीओ कार्यालयातून मतदान केंद्राचे साहित्य होणार वितरित केले जाणार आहे. अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघांमध्ये 160 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…
जिल्ह्यात 2 हजार 708 मतदान केंद्र असून यामध्ये 12 लाख 52 हजार 680 महिला मतदार असून यासह 12 लाख 93 हजार 681 एवढे पुरुष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील
या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये 11 हजार 919 कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असून,कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 2 हजार 745 पोलीस कर्मचारी अधिकारी तैनात करण्यात आले आहे, तर 1877 होमगार्ड तैनात करण्यात आले आहे..
डोंबिवलीतील ठाकरे गटाचे उपनेते सदानंद थरवळ यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांचा ठाकरे गटाला ‘जोर का झटका’ लागला आहे.
वाशिम जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात एकूण तीन मतदारसंघासाठी
1100 मतदान केंद्र असून याकरिता 4400 कर्मचारी सज्ज झाले आहेत. तर आज मतदान प्रक्रियासाठी लागणारे साहित्य, ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यासाठी जवळपास 119 एसटी बसेस आणि खाजगी वाहनाच्या मदतीने सर्व साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत.
गोंदिया : निवडणुकीच्या तोंडावर आमगाव पोलिसांनी दोन वाहनासह अवैध दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कट्टीपार येथे नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी 12 लाख 76 हजार 870 रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.
हिंगोली- कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के हल्लाप्रकरणी कळमनुरी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच अज्ञातांविरोधात कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा शिवारात रात्री 12:30 ते 01च्या हल्ला करण्यात आला. सध्या डॉ. दिलीप दिलीप मस्के यांच्यावर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विधानसभेसोबतच नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूकसाठी उद्या मतदान होणार आहे. या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत. सर्व पोलीस कर्मचाऱ्याची ट्रेनिंग पूर्ण करण्यात आली आहे. सीआरपीएफ आणी एसआरपीएफच्या 10 तुकड्या, 3 हजार होमगार्ड, 802 कर्मचारी तसेच 25 अधिकारी हे तैनात करण्यात येणार आहेत. काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना कळवा, आम्ही तात्काळ कारवाई करू कुणाही कायदा हातामध्ये घेऊ नये, असे अवाहन पोलीस अधिक्षक अबीनाश कुमार यांनी केले आहे.
गृहमंत्री फडणवीस यांच्या नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्याड खुनी हल्ला झाला. हा राजकीय हल्ला आहे. मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते आणि नागपुरात माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न होतो. फडणवीस मिंधे यांच्या काळात हे घडतंय
मुंबई – निवडणुकीसाठी मतदानाच्या तयारीला सुरवात. उद्या राज्यभरात विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे.
वरळी विधानसभेच्या मतदानकरिता नेहरु सायन्स सेंटर मधे ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून वाटप करण्यात येत आहे
नागपूर – काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी 4 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अनिल देशमुख यांच्यावर मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू.
राजधानी दिल्ली बनली गॅस चेंबर, अनेक भागातला एअर क्वालिटी इंडेक्स हा 500 च्या वर पोहोचला आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने हवा अति गंभीर श्रेणीमध्ये पोहोचली असून आता दहावी बारावीचे क्लास ऑनलाइन होणार आहेत तर पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
प्रदूषणा संदर्भातील श्रेणी चार न हटवण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश असून बी एस फोर डिझेल गाड्यांना दिल्लीत पूर्णपणे बंदी आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केलेल्या कथित वादग्रस्त विधानावरून ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांची निर्दोष सुटका झाली आहे.
साल 2021 मध्ये एका वकिलाने मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीतून अख्तर यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईत हवेची गुणवत्ता बिघडली असून AQI 106 वर पोहोचला आहे. खराब स्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळ ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. एक्युआय बिघडल्यास प्रदूषण निर्माण करणाऱ्या यंत्रणांवर बंदी घालण्याचा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण 8462 मतदान केंद्र आहेत. पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात एकूण 303 उमेदवार आहेत, पुणे जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 88 लाख 49 हजार 590 आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण पुरुष मतदारांची संख्या 45 लाख 79 हजार 216 तर महिला मतदारांची 42 लाख 79 हजार 569 आहे. पुणे जिल्ह्यात 805 तृतीयपंथी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात 6 लाख 63 हजार आहे. इंदापूर, भोर, मावळ आणि शिवाजीनगर पुणे जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्र आहेत.
कॉंग्रेस, भाजपने निवडणूक आयोगाकडे 7 दिवसांची मुदत मागितली आहे. तक्रारींवर उत्तर देण्यासाठी एकमेकांवर आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. निवडणूक आयोगाला उत्तर देण्याची मुदत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी निवडणूक आचारसंहिता उल्लंघनावर तक्रारी दाखल केल्या. आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दल 7 दिवसांची अधिक मुदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
चंद्रपूरमधील मुल तालुक्यातल्या कोसंबी येथे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. मुल नगर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार यांनी भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. काल संध्याकाळी प्रचार थंडावल्या नंतर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील कोसंबी गावात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार रात्री जवळपास 12:30 वाजता सभा घेत असल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांना संशय होता. त्यामुळे काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोसंबी गाव गाठले. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी विजय चिमड्यालवार यांना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी करण्यात आली आहे. सकाळपर्यंत मूल पोलीस स्टेशन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठिय्या सुरु आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात बोटाला शाई लावून पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फेसबुक पोस्ट करत आरोप केला आहे. बोटाला शाही लावून मतदान कार्ड जमा करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जवाहर नगर पोलिसांनी 18 लाख जमा केल्याचा पोस्टमध्ये उल्लेख आहे. तर संजय शिरसाट यांच्या सांगण्यावरून 2 कोटी रुपये पोलिसांनी सोडल्याचा अंबादास दानवे यांचा आरोप आहे. संभाजीनगरच्या जवाहर नगर पोलीस ठाणे हद्दीत प्रकार घडल्याची माहिती आहे. रात्री उशीरा पर्यंत जवाहर नगर पोलीस ठाण्यात राडा सुरू होता.