Maharashtra Election News LIVE : महायुतीचे आतापर्यंत 215 उमेदवार जाहीर

| Updated on: Oct 27, 2024 | 2:12 PM

Maharashtra Assembly Election 2024 LIVE News and Updates in Marathi : आज 27 ऑक्टोबर 2024. महाराष्ट्रात आज महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. काही महत्त्वाचे पक्ष प्रवेश होऊ शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व महत्त्वाच्या, लेटेस्ट अपडेट या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Maharashtra Election News LIVE : महायुतीचे आतापर्यंत 215 उमेदवार जाहीर
महत्वाची बातमी
Image Credit source: tv9
Follow us on

LIVE NEWS & UPDATES

  • 27 Oct 2024 02:40 PM (IST)

    दर्यापूरमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी

    अमरावती जिल्ह्यात काँग्रेस मध्ये पहिली बंडखोरी होण्याची शक्यता आहे. दर्यापूर मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे नाराज गुणवंत देवपारे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. दर्यापूर मतदारसंघातून ठाकरे गटाच्या गजानन लवटे यांना उमेदवारी मिळाल्याने गुणवंत देवपारे यांचा पत्ता कट झाला आहे.

  • 27 Oct 2024 02:30 PM (IST)

    शासन आपल्या दारी या उपक्रमाचा देशात गौरव

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील “शासन आपल्या दारी” या उपक्रमाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार (SKOCH Award) जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे देशभरातील विविध श्रेणीतील २८० प्रकल्पांमध्ये “शासन आपल्या दारीवर” परीक्षकांनी अंतिम शिक्कामोर्तब केल्याने, नागरिकांना प्रभावीरीत्या सेवा देणार्‍या महाराष्ट्राच्या मॉडेलची देशात प्रशंसा झाली आहे.


  • 27 Oct 2024 02:20 PM (IST)

    इचलकरंजीत महाविकास आघाडीला दुसरा धक्का

    इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला दुसरा धक्का बसला. जांभळे गट अपक्ष म्हणून निवडणूक विधानसभा लढवणार आहे. अशोकराव जांभळे सुहास जांभळे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा निर्णय घेतला.

  • 27 Oct 2024 02:10 PM (IST)

    सगळा मराठा समाज चिडलेला आहे-मनोज जरांगे पाटील

    मराठा समाज एकत्र झाल्याने सगळ्याच पक्ष्यातील येत आहेत. रात्री दोन वाजले की, भाजपाचे सुद्धा असतात दिवसा सुद्धा येतात भाजप मधले तिकीट हुकलेले ते तर जाहीर आहेत आता. देवेंद्र फडणवीस यांनी फसवल्यामुळे सगळा मराठा समाज चिडलेला आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

  • 27 Oct 2024 02:01 PM (IST)

    हा मर्दपणा आहे का? -राधाकृष्ण विखे पाटील

    भगिणी गोळा करून आमच्या विरोधात का घोषणा द्यायला लावतात. हा मर्दपणा आहे का? राधाकृष्ण विखे यांचा कार्यकर्ता मेळावा भाषणात थोरातांवर टीका केली. यांचा खरा चेहरा राज्यासमोर आला आहे.
    आता गाठ आमच्याशी हे लक्षात ठेवा, असे ते म्हणाले.


  • 27 Oct 2024 01:55 PM (IST)

    इगतपुरीत सर्वपक्षीय बैठक

    इगतपुरी त्र्यंबक मतदारसंघात सर्वपक्षीय बैठकीस झाली आहे. इगतपुरी मतदारसंघात मविआ व महायुतीने दिलेल्या उमेदवारास विरोध केला जात आहे. स्थानिक भूमिपुत्राला उमेदवारी देण्यात यावी यासाठी बैठक घेतली आहे. बैठकीला माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, माजी आमदार शिवराम झोले, माजी आमदार पांडुरंग गंगाड उपस्थित होते.

  • 27 Oct 2024 01:41 PM (IST)

    पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक ठप्प

    पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग पुन्हा एकदा मंदावला आहे. मुंबईकर चाकरमानी आपल्या गावी दिवाळी साजरी करण्यासाठी निघाल्याने मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आली आहे. यामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागातील चाकरमानी दिवाळीसाठी निघालेत. मात्र घरी पोहचण्यापूर्वी त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

  • 27 Oct 2024 01:23 PM (IST)

    हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यामध्ये महाविकासआघाडीमध्ये बिघाडी

    इचलकरंजी : हातकणंगले व शिरोळ तालुक्यामध्ये महाविकासआघाडीमध्ये बिघाडी पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दोन माजी आमदार अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून सुजित मिंचेकर शिंदे गट किंवा अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. शिरोळ तालुक्यातील उल्हास पाटील अपक्ष म्हणून लढवणार शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहेत.

  • 27 Oct 2024 01:19 PM (IST)

    पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

    रायगड : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग पुन्हा एकदा मंदावला आहे. मुंबईकर चाकरमानी आपल्या गावी दिवाळी साजरी करण्यासाठी निघाल्याने महामार्गावर मोठा ताण निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागातील चाकरमानी दिवाळीसाठी निघाले आहेत. मात्र घरी पोहचण्यापूर्वी त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दिवाळी आणि सुट्ट्यांमुळे अनेक मुंबईकर हे आपल्या गावासाठी मार्गस्थ होत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस द्रुतगती महामार्ग असंच मंदावलेल्या असेल, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. तसेच वाहतूक कोंडीचा अंदाज घेऊनच मुंबईकरानी घेऊनच घराबाहेर पडावं अस आवाहन पोलिस प्रशासनाने केलं आहे

  • 27 Oct 2024 01:18 PM (IST)

    कसारा घाटात अपघात, तीन जखमी

    नवीन कसारा घाटात भीषण अपघात झाला आहे. तीन वाहनांचा भीषण अपघातात तीन जण जखमी झाले आहे. अपघातातील जखमींना कसारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

  • 27 Oct 2024 01:03 PM (IST)

    हातकणंगले व शिरोळ तालुक्यामध्ये मविआत बिघाडी

    हातकणंगले व शिरोळ तालुक्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये होणार बिघाडी होणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दोन माजी आमदार अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून सुजित मिंचेकर शिंदे गटातून किंवा अपक्ष निवडणूक लढवणार आहे. शिरोळ तालुक्यातील उल्हास पाटील अपक्ष म्हणून लढवणार शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे.

  • 27 Oct 2024 12:57 PM (IST)

    इगतपुरी त्र्यंबक मतदारसंघात स्थानिक उमेदवार द्या, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु

    इगतपुरी त्र्यंबक मतदारसंघात सर्वपक्षीय बैठकीस सुरुवात झाली आहे. इगतपुरी मतदारसंघात मवीआ व महायुतीने दिलेल्या उमेदवारास विरोध म्हणून ही बैठक बोलवण्यात आली आहे. स्थानिक भूमिपुत्राला उमेदवारी देण्यात यावी, यासाठी बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीला माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, माजी आमदार शिवराम झोले, माजी आमदार पांडुरंग गंगाड उपस्थित आहेत. सर्वपक्षीय नेत्यांकडून एक कोअर कमिटी तयार करुन स्थानिक उमेदवार देण्यावर चर्चा केली जाणार आहे. महायुती आणि मविआ च्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त कसं होईल यासाठी काम करण्यात येणार आहे.

  • 27 Oct 2024 12:27 PM (IST)

    अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजपात प्रवेश

    अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

  • 27 Oct 2024 11:58 AM (IST)

    Maharashtra News: आम्ही अटक व्हायला तयार पण तुम्हाला एक सांगतो… बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य

    जो गुन्हेगार आहे तो मोकाट आणि गुन्हे माझ्या मुलीवर दाखल करताय कायद्याच्या दुरुपयोग आहे , यांनीच आरोपीला लपवून ठेवलंय त्याला मारतील अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात आहे… आम्ही अटक व्हायला तयार पण तुम्हाला एक सांगतो की सुजय विखे पाटील यांचा जनता समाचार घेणार, २३ तारखेला चित्र स्पष्ट होईल… असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

  • 27 Oct 2024 11:40 AM (IST)

    Maharashtra News: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट जरांगे पाटील यांच्या भेटीला

    जरांगे पाटील व संजय शिरसाट यांच्यात चर्चा… छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत संजय शिरसाठ

  • 27 Oct 2024 11:25 AM (IST)

    Maharashtra News: गुन्हा दाखल झाल्याने जयश्री थोरात आक्रमक…

    संगमनेर शहर पोलिस ठाण्यावर महिलांसह मोर्चा… जयश्री थोरातांसह अनेक महिला एकत्र… राजकीय दबावाचा वापर करून आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले… सर्व सामान्य महिलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आले… मी घाबरत नाही पोलिसांनी मला अगोदर अटक करावी…

  • 27 Oct 2024 11:14 AM (IST)

    Maharashtra News: कन्नड विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराचे जोरदार शक्तीप्रदर्शन

    अपक्ष उमेदवार मनोज पवार यांनी शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज… हजारो लोकांची गर्दी जमवत केला उमेदवारी अर्ज दाखल… मनोज पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झाली हजारो लोकांची गर्दी… कन्नड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांना आव्हान…

  • 27 Oct 2024 10:57 AM (IST)

    किशोर जोरगेवार आज भाजपमध्ये प्रवेश करणार

    चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचं नाव भाजप उमेदवार म्हणून निश्चित झालं आहे. किशोर जोरगेवार यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. सर्वच पक्षात गट-तट असतात, इच्छुक उमेदवार असतात. त्यामुळे माझ्या उमेदवारीला झालेल्या विरोधात विशेष असं काही नाही हा लोकशाहीचाच एक भाग आहे. किशोर जोरगेवार यांना उमेदवारी दिल्याने आपला एक सदस्य वाढेल असं वाटल्यामुळे कदाचित भाजपने मला उमेदवारी दिली असेल, असं ते म्हणाले. अजित पवार यांनी देखील मला उमेदवारीसाठी विचारल्याची माहिती किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.

  • 27 Oct 2024 10:45 AM (IST)

    संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

    मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर प्रवाशांची चेंगरी चेंगरी झाली. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वांद्र्यातील चेंगराचेंगरीत प्रवासी जखमी झाले. ही रेल्वे मंत्र्यांची जबाबदारी नाही का? देशामध्ये 25 पैकी जास्त रेल्वे अपघात होतायेत, असं राऊत म्हणालेत. भाजप राजकीय नेत्यांची कुटुंब उद्धस्त करत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

  • 27 Oct 2024 10:30 AM (IST)

    29 तलवारीसह 3 कोयते सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून जप्त

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अक्कलकोटच्या सोलापूर ग्रामीण पोलिसांनी 29 तलवारीसह 3 कोयत्यांचा अवैध शस्त्रसाठा जप्त केला आहे. कारवाईत सोलापूरच्या ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या टीमने कारवाई केली आहे.

  • 27 Oct 2024 10:15 AM (IST)

    वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी

    मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर पहाटेच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. वांद्र्यावरून उत्तर प्रदेशच्या गोरखपूरकडे जाणाऱ्या 22921 ही गाडी प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली आहे. छट पूजेसाठी गावी निघालेल्या प्रवाशांची वांद्रे टर्मिनसवर गर्दी झाली होती. यावेळी ही चेंगराचेंगरी झाली. या घटनेत नऊ जण जखमी झाले आहेत. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.

विधानसभा निवडणूक होत आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. तर काही ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीची शक्यता आहे. पक्षाकडून डावलण्यात आल्याने अपक्ष लढण्याची तयारी आहे. तर मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत 9 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. याबाबतचे सर्व महत्त्वाच्या घडामोडी, तसंच मनोरंजन, क्रीडा विश्वातील घडामोडींचेही अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा हा ब्लॉग फॉलो करा.