महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. कालपर्यंत सगळ्या उमेदवारांचे अर्ज भरून झाले आहेत. आज या अर्जांची छाननी केली जाणार आहे. आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांच्या रॅली आणि सभा होत आहेत. उमेदवारी नाकारल्याने श्रीनिवास वनगा हे नॉटरिचेबल होते. आता अखेर 36 तासांनंतर त्यांच्याशी संपर्क झाला आहे. पकृती ठीक नसल्याने श्रीनिवास वनगा हे विश्रांती घेत आहेत, असं त्यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी सांगितलं आहे. या शिवाय दिवाळीचा सण आहे. अवघा भारत देश दिव्यांच्या लख्ख प्रकाशात उजळून निघाला आहे. याबाबतचे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
विधानसभेसाठी ठाकरेंच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून 24 जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत युवसेनेच्या कार्यकारिणी सदस्यांचा देखील समावेश आहे.
नांदेडमधून मोठी बातमी समोर आली आहे. एक दोन नेत्यांच्या जाण्याने काँग्रेसला फरक पडत नसल्याची प्रतिक्रिया सचिन पायलट यांनी दिली आहे. अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपच्या जाहीर सभेत आपण काँग्रेसमध्ये होतं असलेल्या छळामुळे पक्ष सोडल्याचे सांगितलं होतं. त्यावर पायलट यांनी ही तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
सिंधुदुर्गातून मोठी बातमी समोर आली आहे. कुडाळ तहसीलदार कार्यालयातच महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं समोरं आलं आहे. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं. वैभव नाईक या अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर सूचक म्हणून सही असलेल्या व्यक्तीने सही करण्यास नकार दिला. तसेच प्रतिज्ञापत्र सादर करायला जात असताना महायुतीच्या कार्यकर्त्याकडून त्याला अडवण्याचा प्रयत्न झाला. त्यांनतर दोन्हीकडचे कार्यकर्ते समोरासमोर आले. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीमुळे फार काही झालं नाही.
पालघरमधून मोठी अपडेट आली आहे. शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या श्रीनिवास वनगा यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. श्रीनिवास वनगा यांच्या घरी सध्या शुकशुकाट असून घरात कुणीही नाही. बंगल्याबाहेरील गेट बंद करण्यात आलंय. कुणालाही आत सोडलं जातं नाहीय. वनगा आराम करण्यासाठी कुठल्या नातेवाईकाकडे गेलेत याबाबत कुटुंबियांकडूनही सांगण्यात येत नाहीय. सकाळी त्यांचा पत्नीने सांगितल्यानुसार 4 ते 5 दिवसांनी घरी आल्यावर वनगा स्वतः मांध्यामशी संवाद साधणार आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले, “सर्व 288 जागांवर महाविकास आघाडी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. जेव्हा तुम्ही मविआची महायुतीशी तुलना करता तेव्हा आमच्या गटात कोणतेही मतभेद नाहीत. महायुतीमध्ये लढत सुरू आहे. आम्ही मविआमध्ये सर्व पक्षांना समान वागणूक दिली आहे. महाआघाडीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-शिंद्यांच्या सर्व जागा चोरल्या आहेत. भाजपला आपल्या मित्रपक्षांना संपवायचे आहे, हा स्पष्ट संदेश आहे. महाविकास आघाडी, आम्ही सर्व एकत्र आहोत.
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मी नाही, आयुष्मान योजनेत घोटाळा झाल्याचे कॅगच्या अहवालात म्हटले आहे. केवळ 5 लाख रुपयांची मर्यादा आहे, परंतु दिल्ली सरकारमध्ये कोणतीही मर्यादा नाही. मग दिल्लीला आयुष्मान योजनेची गरज का आहे? केंद्र सरकारने आमच्या योजनांचा अभ्यास करून त्यांचा अवलंब करावा.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी म्हणाले, “झारखंडमधील अंधार आता संपणार आहे. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झारखंडमध्ये गेली 5 वर्षे सरकार चालवले जात होते. त्याने संपूर्ण झारखंड दलाल आणि मध्यस्थांच्या ताब्यात दिले. त्यांनी संपूर्ण झारखंड लुटले. आता त्यांच्यापासून मुक्त होण्याची वेळ आली आहे. झारखंडमध्ये यावेळी भाजपचे सरकार स्थापन होईल”
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी अयोध्येत पोहोचले. आज अयोध्येतील दीपोत्सवादरम्यान सरयू नदीच्या काठावरील घाटांना 25 लाख दिवे लावले जाणार आहेत.
ऐन दिवाळीच्या तोंडावर गोंदिया शहरात ठीक ठिकाणी कचरा साचल्याने संतापलेल्या नागरिकांनी नगरपरिषद सफाई विभागासमोर ठिय्या आंदोलन केले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये तीन ब्रिटिशकालीन बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली आहे.पालिकेकडून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपचे लिकेज काढण्यासाठी खोदकाम सुरू असताना कामगारांना हे तीन बॉम्ब सापडले आहेत.
चिंचवड विधानसचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केलाय. हा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जावेद रशीद शेख यांनी केला आहे, यासंबंधी काळेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय.
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असली तरी उद्या होणारी दलित, मुस्लिम आणि मराठा समाजाची महत्त्वाची बैठक ते घेणार आहेत. ही बैठक महत्वाची असल्याने राज्यभरातील मराठा समाज आणि त्यांच्या समर्थकांनी आंतरवाली सराटीकडे येऊ नये असे आवाहन जरंगे पाटील यांनी केले आहे.
भाजपाचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत ऐन निवडणुकीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या मंचावरून बोलताना त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे आमदार आणि स्थानिक नेते मला कोणत्याही तालुक्यात स्वतंत्ररित्या फिरू देत नव्हते. माझावर बंधने होती. माझा पराभव भाजपच्याच स्थानिक नेत्यांनी केला. आता एकालाही सोडणार नाही असं शृंगारे म्हंटले आहे.
नेवासा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी होणार आहे. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी निर्धार मेळावा घेतला आहे. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा निर्धार मेळावा. उमेदवार न दिल्याने अपक्ष निवडणूक लढवणार. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या ऐवजी विठ्ठलराव लंघे यांना शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी. नाराज झालेल्या मुरकुटेंचा अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार. आज निर्धार सभा घेत शंकरराव गडाख विरोधात फुंकणार रणशिंग.
प्रचारामध्ये झोपडपट्टीच्या आत अदानी हटाव धारावी बचावच्या घोषणा. अदानीला हटवायचे असेल तर वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांना जिंकवावं लागेल असं म्हणत मतदारांना गळ घालण्याचा प्रयत्न. माझ्या रक्तात काँग्रेस आहे, मरेपर्यंत कांग्रेसमध्ये राहणार काम करणार आणि जिंकणार असं ज्योती गायकवाड म्हणाल्या. धारावी विधान सभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार राजेश खंदारे यांचं आव्हान नाही आमच्यापुढे अदानीच आव्हान असं ज्योती गायकवाड म्हणाल्या.
करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल केलेल्या 4 जणांचे अर्ज बाद. कल्याण चंद्रसेन खाटमोडे (अपक्ष), प्रतापराव नामदेवराव जगताप (अपक्ष), गणेश हनुमंत घुगे ( रिपाई ), महादेव औदुंबर कदम (बसपा) हे चार अर्ज छाननीत बाद. एकूण 44 पैकी 4 उमेदवारी अर्ज बाद, तर 40 अर्ज मंजूर. निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांची माहिती.
“रमेश चेंनिथला यांचा फोन आला होता. त्यांनी मला माघार घेण्यास सांगितलं. मात्र कोणत्याही परिस्थितीत मी माघार घेणार नाही. मी कालपर्यंत एबी फॉर्म ची वाट बघितली. आता मात्र मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारच. माझ्या डीएनएमध्ये काँग्रेस. काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना मी माझ्यासोबत बोलावलं नाही. मात्र काँग्रेसचा अस्तित्व टिकलं पाहिजे, यासाठी मी निवडणूक लढवत आहे” असं हेमलता पाटील म्हणाल्या.
“शिंदे सरकारकडून महाराष्ट्राची लूट केली जातेय. महाविकास आघाडीत कोणतेच मतभेद नाहीत, आम्ही एकत्र आहोत. लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीसाठी आणली”, असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.
“हेलिकॉप्टरने शिंदे गटाने तीन एबी फॉर्म दिले, मी पाहिलंय. इगतपुरीचा फॉर्म ते देऊ शकले नाहीत. एबी फॉर्म का दिले त्यावर वरिष्ठ चर्चा करतील. समीर भुजबळला सांगितलं की राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा दे. समीरने सर्व पदांचा राजीनामा दिला आणि अर्ज भरला”, असं छगन भुजबळ म्हणाले.
सदा सरवणकर यांच्याकडून माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंकडून निवडणूक लढण्याचे आदेश असल्याचं त्यांनी सांगितलं. “मी लोकांचं काम केलंय, म्हणून निवडणूक लढवणं गरजेची होती”, असं सरवणकर म्हणाले.
उत्तराखंड- दिवाळीनिमित्त श्री केदारनाथ मंदिर फुलांनी सजविण्यात आलं आहे. येत्या रविवारी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता श्री केदारनाथ धामचे द्वार बंद करण्यात येतील. काल श्री भकुंट भैरवनाथचे द्वार बंद करण्यात आले.
#WATCH | Uttarakhand: Shri Kedarnath temple decorated with flowers on the occasion of Diwali.
The portals of Shri Kedarnath Dham are closing for the winter season on Sunday, 3 November, at 8:30 am. Yesterday, the portals of Shri Bhakunt Bhairavnath in Shri Kedarnath Dham were… pic.twitter.com/vtbvQZqWqd
— ANI (@ANI) October 30, 2024
“शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाने आपलं नाव बदलून कचरा पार्टी नाव ठेवावं. कारण त्यांचं काँग्रेस कचरा करतंय. दिल्लीश्वरांच्या समोर मुजरा करुनसुद्धा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला नाही. बेडकासारखा फुगून आम्ही सेंच्युरी मारणार बोलणाऱ्या बालबुद्धी राऊतला हे समजत नाही की सेंच्युरी मारण्यासाठी 100 जागा लढवाव्या लागतात,” अशी टीका नितेश राणेंनी केली.
मनोज जरांगेंची तब्येत खालावली… मनोज जरांगेंना ताप, आणि अशक्तपणा… खासगी रुग्णालयात उपचार सुरु… जरांगे यांनी आरामीची गरज असल्याची डॉक्टरांची माहिती…
उल्हासनगरच्या मंगलमूर्ती मार्केटसमोरील न्यू गजानन मार्केटमधील एका कपड्याच्या दुकानात आज सकाळी आग लागली. आग इतकी भीषण आहे की बाजूला असलेल्या फटाक्यांच्या बाजारापर्यंत पोहोचू शकते…. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. पण चिंचोळ्या गल्ल्यांमुळे आग विझवण्यात अग्निशमन दलाला अडचणी येत आहेत…
अर्ज भरण्याची मुदत संपताच मनोज जरांगे सक्रिय… मुस्लीम आणि बौद्ध धर्मगुरुंसोबत जरांगे उद्या करणार चर्चा… मनोज जरांगे उद्या विविध समाजाच्या धर्मगुरुंशी संवाद साधणार… मराठा, अल्पसंख्याक, SC-ST मतांचं समीकरण जुळवण्यासाठी बैठक…
डॉक्टरांच्या संवादादरम्यान प्रमोद सावंत यांची काँग्रेसवर टीका.. भारतात 2014 सालानंतर फार मोठा बदल झाला मात्र काँग्रेसच्या काळात गरिबी नष्ट करण्याचा नारा दिला पण तो पूर्ण झाला नाही… पंतप्रधान मोदींनी तळागाळातल्या कष्टकरी जनतेसाठी अनेक योजना प्रत्यक्षात आणून देशाला प्रगतीपथावर आणले… वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांनीसुद्धा याचा भाग व्हावा असे आवाहन… भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ साधला डॉक्टरांशी संवाद…
रणजीत शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा… रणजीत शिंदे यांनी माढा विधानसभेसाठी दाखल केला आहे अपक्ष उमेदवार अर्ज… माढा मतदारसंघात अजित पवार गटाकडून मीनल साठे तर शरद पवार गटाकडून अभिजित पाटील आहेत उमेदवार… माढा विधानसभा मतदारसंघात रंगणार तिरंगी लढत…
कुणी बंडखोरी करुन अर्ज भरला असेल तर आम्ही समजूत काढू… 90 टक्के जागांवर आम्ही कार्यकर्त्यांची समजूत काढली… कोकणात शिनसेना जास्त जागा लढतंय… सांगलीचा पॅटर्न आता लोकांनी विसरायला हवा… जिथे पक्ष जिंकू शकतो तिथे जास्त जागा… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
अंतरवाली सराटी : माजी आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी रणजीत शिंदे व जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली. रणजीत शिंदे यांनी माढा विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माढा मतदारसंघात अजित पवार गटाकडून मीनल साठे तर शरद पवार गटाकडून अभिजित पाटील उमेदवार आहेत. त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत रंगणार आहे.
अयोध्या : राम मंदिर झाल्यानंतर आज अयोध्येत पहिली दिवाळी साजरी केली जाणार आहे. शरयू नदी घाटावर आज भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शरयू नदीच्या घाटावर 28 लाख दिवे उजळणार आहेत. मुख्यमंत्री योग्य आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत हा दीपोत्सव पार पडणार आहे. देशभरातून अनेक भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत.
मुंबई : आज सकाळीच दिवाळीनिमित्त दादर फुलमार्केट झेंडूंच्या फुलांनी बहरलं आहे. झेंडू चांगलाच भाव खाऊन गेला आहे. झेंडूच्या एक माळेची विक्री ७० ते ८० रुपयाला होत आहे. दिवाळीत लक्ष्मीपुजनात झेंडूच्या फुलांचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे झेंडूच्या फुलांचा भाव चांगलाच वधारलेला दिसत आहे.
सोलापूर : गोव्याचे मुख्यमंत्री सचिन सावंत यांच्या उपस्थितीत अक्कलकोट भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. अक्कलकोट मधील मुख्य भागातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली काढण्यात आली. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी पारंपारिक लढत असणार आहे. काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि भाजपाचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे.
पुणे : अजित पवार गटाने मावळ विधानसभेसाठी मैत्रीपूर्ण लढतीचा ठेवलेला प्रस्ताव स्थानिक भाजपने फेटाळून लावला. पक्षाने एबी फॉर्म दिला असताना ही स्थानिक भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, असा गौप्यस्फोट करत सुनील शेळकेंनी अखेर मावळ पॅटर्न बाबतचं मौन सोडलेलं आहे. अजित पवार गटातील बंडखोर बापू भेगडेंना भाजप, शरद पवार गटासह सर्व पक्षीयांनी पाठिंबा दहशत मावळ पॅटर्न राबवलाय. पण हा कसला मावळ पॅटर्न, हा तर फक्त चार कुटुंबाच्या हिताकरिता राबविण्यात आलेला पॅटर्न आहे. हा चुकीचा पायंडा तुम्ही पाडत असाल तर भाजपला याचे परिणाम राज्यभर भोगावे लागतील, असा इशारा ही शेळकेंनी दिला.
नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघात 361 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 506 लोकांनी उमेदवारी अर्ज नेला होता. 4 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ आहे. बंडखोरांना शांत करण्याचा सर्व पक्षातील नेत्यांसमोर आव्हान आहे. जिल्ह्यातील पाच ते सहा मतदारसंघात प्रमुख पक्षातील नेत्यांनी बंडखोरी केली आहे. बंडखोरांची समजूत काढण्यात पक्ष नेतृत्वाला यश येतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मोहळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचले आहेत. यशवंत माने मोहोळ विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. मनोज जरांगे पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्यात चर्चा होत आहे. आमदार यशवंत माने यांना शरद पवार गटाचे राजू खरे यांचं आव्हान आहे.
शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापल्यानंतर 36 तासांपासून अज्ञातवासात गेले होते. आता वनगांचा कुटुंबीयाशी संपर्क झाला . मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास घरी येऊन वनगा पुन्हा नातेवाईकांकडे गेले, अशी माहिती पत्नी सुमन वनगा यांनी दिली आहे. तिकीट नाकारल्यामुळे डिप्रेशनमध्ये ते घर सोडून गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसून आरामाची गरज आहे. वनगा पुन्हा नातेवाईकांकडे गेले. वर्षा बंगल्यावर जाण्याची त्यांची इच्छा नसल्याचं ही पत्नीने स्पष्ट केलं आहे.
राम मंदिर झाल्यानंतर आज अयोध्येत पहिली दिवाळी साजरी होत आहे. शरयू नदी घाटावर आज भव्य दीपोत्सव केला जाणार आहे. 28 लाख दिवे शरयू नदी घाटावर उजळणार आहे. मुख्यमंत्री योग्य आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत दीपोत्सव पार पडणार आहे. देशभरातून अनेक भाविक अयोध्येत दाखल झालेत.
हिंगोली विधानसभेत भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपाचे रामदास पाटील सुमठानकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. रामदास पाटील सुमठानकर अपक्ष म्हणून हिंगोली विधानसभेच्या निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीत भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांना उमेदवारी दिली आहे.