“या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व पक्षांचे जाहीरनामे येत आहेत. महायुतीचाही जाहीरनामा येणार आहे. सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष मुंबई येथून मतदारसंघ पुस्तिका सादर करणार आहेत. आम्ही सर्व घटकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलाय. AI आधारित जाहिरात सुरू केली आहे, त्याला चांगला पाठिंबा मिळतोय. बारामती उमेदवार असल्याने बारामतीचा जाहीरनामा सादर करतोय याचा अभिमान आहे,” असं अजित पवार म्हणाले.
अहिल्यानगर : धनगर आरक्षणासाठी लढा देणाऱ्या यशवंत सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी महायुतीच्या पाठिंब्याची घोषणा केली आहे. मागील दीड वर्षापासून धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण मिळावे, यासाठी यशवंत सेनेकडून आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाला महायुती सरकारमध्ये असलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आगामी काळात महायुतीचे सरकार आले तर धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे यशवंत सेना महायुतीला पाठिंबा देणार असून राज्यातील सर्व उमेदवारांचा प्रचार करणार -दोडतले
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ते जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत. यात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देणार
बॉक्सिंग, कुस्ती, भालाफेक खेळाडूंना प्रशिक्षण देणारी संस्था उभारणार
बारामतीला पहिलं सौरउर्जा शहर बनवणार
बारामतीत कर्करोगावर उपचारासाठी रुग्णालय उभारणार
लॉजेस्टिक पार्क उभारणार
बारामतीला प्रगत तालुका बनवण्याचे ध्येय
श्रीरामपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील सात नगरसेवक आणि चार माजी उपनगराध्यक्ष यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. बारामती येथील अजित पवार यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीरामपूर येथे लहुजी कानडे हे निवडणूक लढवत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय काँग्रेसच्या सात नगरसेवक आणि चार माजी नगराध्यक्षांनी लहुजी कानडे यांना पाठिंबा दिला आहे.
नाशिक : महायुतीचे उमेदवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. खेडलेझुंगे गावातून भुजबळांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. छगन भुजबळ हे येवला मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आहेत. श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन ते प्रचाराचा प्रारंभ करणार आहेत.
माझं काम प्रामाणिकपमे सुरू आहे, लोकांपर्यंत पोहोचत आहे. परतफेड होईल अशी आमची अपेक्षा नसते, भाजपच्या पाठिंब्यासंबंधी प्रश्नावर अमित ठाकरे यांचं उत्तर.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथील सात नगरसेवक आणि चार माजी उपनगराध्यक्ष यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. बारामती येथील अजित पवार यांच्या निवासस्थान असलेले सहयोग या निवासस्थानी प्रवेश पार पडला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीरामपूर येथे लहुजी कानडे निवडणूक लढवत आहेत
देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राहुल गांधी यांच्या भोवताली अराजकता पसरवणारे लोक आहेत. भारत जोडोतील संघटना डाव्या विचारसरणीच्या आहेत, फडणवीस यांचा आरोप.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला धमकीचा फोन. याप्रकरणी तक्रारीच्या आधारे मुंबईतील खार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता, असे प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले. फोन करणाऱ्या आरोपीने 5 कोटींची मागणी केली, अन्यथा जीवे मरण्याची धमकी दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
देवेंद्र फडणवीस हा माणूस महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा, अखंड महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कार्याचा द्वेष्टा आहे , हे काल पुन्हा एकदा स्पष्ट झालं, संजय राऊतांची घणाघाती टीका.
आम्ही शिवरायाचं मंदिर बांधतोय याची लाज वाटते का ? अशी माणसं महाराष्ट्रात जन्माला आली आणि भाजप त्यांना पोसतोय .
महाराष्ट्राच्या स्वाभिमान शिंदेंनी दिल्लीत गहाण ठेवला. ठाकरेंच्या घोषणेनंतर भाजपच्या पोटात दुखलं अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
नऊ तारखेला उद्धव ठाकरे यांची कळमनुरी विधानसभेत सभा… महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कळमनुरी विधानसभेचे माजी आमदार संतोष टारफे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सभा… कळमनुरी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष टारफे यांची माहिती
लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार… 25 हजार महिलांना पोलीस दलात भरती करणार… निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली महत्त्वाची आश्वासनं
शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पाठवला कारवाईचा अहवाल… पक्षाने सूचना देवून पण पक्ष विरोधी काम केलं… पक्षातून हकालपट्टीची कारवाई करण्यात यावी… पुणे शहर काँग्रेसने नाना पटोले यांना प्रस्ताव पाठवला… कसब्यात कमल व्यवहारे , पर्वतीत आबा बागुल , शिवाजीनगरला मनीष आनंद यांची बंडखोरी… महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी व्हा म्हणून दिल्या सूचना… दोन दिवसात पक्षातून हकालपट्टीची कारवाई होणार…
मुंबईतील बीकेसीत इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. बीकेसीतील या सभेत राहुल गांधींची तोफ धडाडणार आहे. त्यांच्या स्वाभिमान सभेची तयारी सध्या जोरात सुरू आहे. या सभेला मविआचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खर्गे , वर्षा गायकवाड सहीत इतर मान्यवर या सभेला उपस्थित राहणार आहेत. तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात काँग्रेसच्या 5 गॅरंटी आज राहुल गांधी विधान सभा निवडणुकांपुर्वीजाहीर करणार आहेत.
हत्तीच्या केसाचे दागिने विकणाऱ्या सराफाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वन्यजीव कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. हत्तीच्या केसापासून अंगटी आणि ब्रेसलेट तयार केल्याचा आरोप आहे. सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दागिने पडताळणीसाठी पाठवले. कुमठेकर रस्त्यावरील व्ही. आर. घोडके सराफाविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. आता ६ ते १९ नोव्हेंबर पर्यत भरता अर्ज येणार आहे. २० ते ३० नोव्हेंबर विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. जाहीरनाम्यात राष्ट्रवादीकडून कोणती आश्वासन दिली जाणार याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिल्यांदाच जाहीरनामा प्रसिद्ध होतोय. आज बारामतीत अजित पवार तर मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत.
विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. सभांचा धडाका सुरु आहे. इंडिया आघाडीची आज मुंबईत पहिली सभा होत आहे. आज संध्याकाळी सहा वाजता मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा होणार आहे. या सभेला राहुल गांधी, शरद पवार उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत. आज अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. पुण्यातील काँग्रेस बंडखोर नेत्यांवर कारवाई होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.