विक्रोळी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील राऊत यांच्यावर महायुतीच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांनी आक्षेपार्ह्य विधान केल्याबद्दल विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याला प्रतिउत्तर म्हणून आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचार रॅली घेऊन विक्रोळी पोलीस ठाण्यासमोर आले आणि तिथे पोलीस ठाण्याला घेराव घातला आहे.
उद्धव ठाकरे 13 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात उद्धव ठाकरे घेणार जाहीर सभा होणार आहे. सकाळी 11.30 वाजता सावंतवाडी, दुपारी 1.00 वाजता कणकवली संध्याकाळी 4.00 वाजता मालवण येथे जाहीर सभा होणार आहे.
महायुतीची आज महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मैत्रीपूर्ण लढतीबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजापाचे उमेदवार भिमराव केराम यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार प्रदीप नाईक यांना उमेदवारी दिली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. भेटीदरम्यान शेखर गोरे यांना आगामी काळामध्ये विधान परिषदेवर घेणार असल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
“सगळ्यात चांगले उद्योग आमच्या काळामध्ये आले. महायुतीच्या काळामध्ये हे सगळे उद्योग बाहेर फेकले गेले. त्यामुळे आमचा थेट आरोप आहे की, उद्योगाच्या बाबतीत महायुतीची भूमिका योग्य नव्हती. उद्योग मंत्री ज्या पद्धतीने बोलत आहेत की कोणते उद्योग त्यांनी आणले. एअर बसचा उद्योग होता तो देखील बाहेरच्या राज्यामध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याला काही तथ्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे” अशी टीका सुभाष देसाई यांनी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. भेटीदरम्यान शेखर गोरे यांना आगामी काळामध्ये विधान परिषदेवर घेणार असल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला शब्द सूत्रांची माहिती. आताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शेखर गोरे भाजपाचे उमेदवार आणि त्यांचे बंधू जयकुमार गोरे यांच्यासाठी प्रचारात राहणार सक्रिय. मान खटाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला हा मोठा धक्का.
पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकास कामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले आणि भाजप परिवारामध्ये सामिल झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
“नाशिक मध्य मतदारसंघात मनसेने उमेदवार दिलेला नाही. मनसेने माझ्या प्रचारात सक्रिय व्हावं. यासाठी मी स्वतः राज साहेबांशी बोलणार. अशोक मुर्तडक नाशिकचे माजी महापौर आणि आमचे सहकारी. मनसेची मला मतदारसंघात निश्चितपणे ताकद मिळेल असा विश्वास आहे” असं भाजपा उमेदवार देवयानी फरांदे म्हणाल्या. “ताईंचे आणि आमचे 30 वर्षांचे संबंध आहेत. राजकारणापलीकडे सुद्धा संबंध टिकवण्याची आपली परंपरा. मध्य मतदारसंघात मनसेने उमेदवार दिलेला नाही, ही देखील एक प्रकारे मदतच आहे. माझ्या मतदारसंघात 15 हजारांहून अधिक मतदान” असं अशोक मुर्तडक म्हणाले.
“सदाभाऊ खोतसारख्या वाचाळविराला महायुतीच्या नेत्यांनी वेळीच आवरा,” अशा शब्दात अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेपाटलांनी थेट इशारा दिला आहे. “एखाद्या व्यक्तीच्या आजार, व्यंग, शरीरावर बोलणं योग्य नाही. सदाभाऊ खोत यांच्या विधानाचा अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहे असं नाही,” असं ते म्हणाले. आम्ही महायुतीचे घटक पक्ष असल्याचंही मोहितेपाटीलांनी यावेळी स्पष्ट केलं.
नाशिक- भाजप उमेदवार देवयानी फरांदे यांनी मनसेचे अशोक मुर्तडक यांची भेट घेतली. अशोक मुर्तडक नाशिकचे मनसेचे माजी महापौर आहेत. तर देवयानी फरांदे भाजपाच्या मध्य मतदार संघातील उमेदवार आहेत. मनसेने मध्य मतदार संघातून माघार घेतली आहे. मनसेची मदत घेण्यासाठी भेट घेतल्याचं देवयानी फरांदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर राजकारणापलीकडचे संबंध असल्याने भेट झाल्याचं अशोक मुर्तडक यांनी म्हटलंय.
“17 नोव्हेंबरला शिवसैनिक शिवाजी पार्कवर येणारच. संघर्ष टाळायचा असेल तर शिवाजी पार्कवर परवानगी द्या. माहीममध्ये मला सभा घेण्याची आवश्यकता नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मुलांना मोफत शिक्षण देणार. आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून दाखवलं. कोळीवाड्यांचा प्रशस्तपणा कायम ठेवून आम्ही विकास करणार. मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देणार. जीवनावश्यक वस्तूंचं दर पाच वर्षे कायम ठेवणार,” अशी आश्वासनं ठाकरेंच्या वचननाम्यात देण्यात आली आहेत.
“आमचा वचननामा दोन प्रकारात असेल. वचननाम्यावर क्यूआर कोडदेखील देण्यात आला आहे. आमच्या आणि मविआच्या वचननाम्यात फार असं काही वेगळं नाही. मविआचा सविस्तर जाहीरनामा काही दिवसांत समोर येईल. कोळीवाड्यांची ओळख आम्ही पुसू देणार नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी. खोत यांनी अत्यंत निंदनिय प्रकार केलाय. त्यांचं वक्तव्य निषेधार्ह आहे. भूमिका मांडा पण त्याला ताळमेळ हवा. विरोधकांवर बोलताना पातळी सोडू नये,” असं अजित पवार म्हणाले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातील सहाही जागा महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. हमखास निवडून येणारे आमदार म्हणून मतदार प्रशांत यादव यांच्याकडे पाहत असल्याचे ते म्हणाले. उदय सामंत यांच्या सारख्या टीवल्या बावळ्यांची टीका करण्याची सवय असल्याची टीका त्यांनी केली.
भाजपने राज्यात कायम विष पेरल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. मोदी ज्यांना कधी कधी राजकीय गुरू मानतात. त्यांच्यावर सदाभाऊ खोत अशा खालच्या पातळीवरील टीका करतात, त्यांना लाज वाटत नाही का? असा सवाल राऊत यांनी केला.
शरद पवार हे आज नागपूर येथे प्रचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्या तीन सभा होणार आहेत. काल राहुल गांधी यांनी नागपूरमध्ये जातनिहाय जनगणना करण्याची आग्रही भूमिका घेतली होती. त्याला पूरकच भूमिका शरद पवार यांनी घेतली.
सलमान खान याला धमकी देणाऱ्या आरोपीला बंगळुरूमधून अटक केली आहे. बीकाराम बिष्णोई याने पाच कोटींच्या खंडणीसाठी ही धमकी दिली होती. वाहतूक शाखेच्या संपर्क क्रमांकावर ही धमकी देण्यात आली होती.
पूर्व विदर्भात एकूण 28 जागा आहेत. त्यात एकच जागा आमच्या पदरात पडली. तिथे पण काँग्रेसची बंडखोरी झाली. राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केल्याने वेदना झाल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी सांगितले. त्यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेच्या देवळालीतील उमेदवार राजश्री अहिरराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. उमेदवारी अर्ज मिळाल्यानंतर राजश्री अहिरराव नॉट रीचेबल राहिल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे. याच मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज अहिरे ह्या उमेदवार असताना राजश्री अहिरराव यांना शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध शिंदे शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.
दक्षिण सोलापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. हत्तुर येथील सोमेश्वर मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचार शुभारंभात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. प्रचार शुभारंभाच्या सभेत अमर पाटील यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी दहा वर्षात केवळ कागदावर विकासकामे केली. शेती पाणी तसेच बेरोजगारी हे मुद्दे दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता परिवर्तनाची वेळ आली असून मला संधी द्या, असं अमर पाटील म्हणालेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आली आहे. निवडणुक शांततेत पार पडण्यासाठी शहरातील विविध भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या 20 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. अंबड,सातपूर, नाशिक रोड, उपनगर आणि देवळाली कॅम्प परिसरातील 20 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. हद्दपारीची कारवाई केलेल्यांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी नाशिक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
वर्ध्याच्या भूगाव येथील एवोनिथ स्टील कंपनीत दुर्घटना घडली आहे. कंपनीतील स्लॅगपिट परिसरात कुलिंग प्रोसेस सुरू असताना फ्लॅश होऊन दुर्घटना घडल्याची माहिती आहे. दुर्घटनेत १८ कामगार जखमी, जखमीपैकी ३ कामगारांवर नागपूरमधील रूग्णालयात उपचार सुरु आहेत. १५ कामगार सावंगी येथील रूग्णालयात भरती आहेत. जखमी कामगारांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आहे.
साताऱ्याच्या मान खटाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील नेत्यांचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. प्रभाकर देशमुख यांना डावल्याने भर प्रचार सभेत कार्यकर्त्यांमध्ये वाद आहे. शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख आणि अभय जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या उमेदवारी बाबत मान खटाव मधील नेत्यांमध्ये वाद आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. त्यासाठी ठिकठिकाणी प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. काल वांद्र्यातील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा झाली. या सभेतून राहुल गांधींसह इतर नेत्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जनतेला आश्वासन दिलं. हातात सत्ता आल्यास एकाही मशीदीवर भोंगा दिसणार नाही, असं राज ठाकरे काल झालेल्या सभेत म्हणालेत. आजच्या दिवसभरातील महत्वाच्या बातम्या या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.