Maharashtra Assembly Election 2024 LIVE : ‘मातोश्री’वर आज बैठकांचे सत्र, अनेक नावे निश्चित होणार

| Updated on: Oct 21, 2024 | 12:49 PM

Maharashtra Assembly Election 2024 LIVE News and Updates in Marathi : राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या घडामोडींबाबतचे सर्व अपडेट्स वाचा.....

Maharashtra Assembly Election 2024 LIVE :  मातोश्रीवर आज बैठकांचे सत्र, अनेक नावे निश्चित होणार
महत्वाची बातमी
Image Credit source: tv9
Follow us on

LIVE NEWS & UPDATES

  • 21 Oct 2024 12:57 PM (IST)

    माजी आमदार संतोष सांबरे मनोज जरांगे यांच्या भेटीला

    जालन्यातील बदनापूर विधानसभेचे शिवसेना ऊबाठा गटाचे माजी आमदार संतोष सांबरे हे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. बदनापूर विधानसभेत भाजपचे नारायण कुचे रनींग आमदार आहेत, आणि याच मतदार संघातून संतोष सांबरे हे, शिवसेना ऊबाठा गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

  • 21 Oct 2024 12:48 PM (IST)

    भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के मनोज जरांगे यांच्या भेटीला

    भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले आहे. राजेंद्र मस्के हे पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक होते, आणि ते सहा वर्ष बीड भाजपचे जिल्हाध्यक्ष, तसेच ते भाजपकडून बीड जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष होते.


  • 21 Oct 2024 12:37 PM (IST)

    बारामती लोकसभा मतदारसंघ अमित झेंडे यांची निवड

    राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष बारामती लोकसभा मतदारसंघ अमित झेंडे यांची निवड झाली आहे. अजित पवार यांच्या हस्ते अमित झेंडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वाची आहे.

  • 21 Oct 2024 12:19 PM (IST)

    एकनाथ शिंदे यांचा एकनाथ खडसेंचा मतदार संघात मेळावा

    एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ धडकणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  महायुतीचा मेळावा घेणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे.

  • 21 Oct 2024 12:06 PM (IST)

    जागा वाटप उद्यापर्यंत- विजय वडेट्टीवार

    महाविकास आघाडीचे जागा वाटप उद्या संध्याकाळपर्यंत सुटणार आहे. सगळ्या जागांचा तिढा सुटलेला असेल, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.


  • 21 Oct 2024 11:49 AM (IST)

    मुक्ताईनगर – महानायक म्हणून मुख्यमंत्र्यांचे बॅनर मुक्ताईनगरमध्ये झळकले

    मुक्ताईनगरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा असून शहरात महानायक म्हणून मुख्यमंत्र्यांचे बॅनर झळकलेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी शुभेच्छा बॅनर लागले आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे

  • 21 Oct 2024 11:38 AM (IST)

    ठाकरे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आणि इच्छुक अनिल पाटणकर यांच्या मधील वाद मिटवण्यासाठी मातोश्रीवर बैठक

    चेंबूर विधानसभेमधील ठाकरे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश फातर्पेकर आणि इच्छुक अनिल पाटणकर यांच्या मधील वाद मिटवण्याकरिता मातोश्रीवर दुपारी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    विद्यमान आमदार प्रकाश फातर्पेकर यांना काँग्रेस खासदार आणि चेंबूर विधानसभेचे माजी आमदार चंद्रकांत हंडोरे यांचा देखील विरोध आहे, असे समजते.

  • 21 Oct 2024 11:23 AM (IST)

    सुनिल राणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

    बोरिवली – सुनिल राणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत सुनील राणेंचे नाव नव्हते. त्यामुळे आता उमेदवारीसंदर्भात चर्चेसाठी राणे सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.

  • 21 Oct 2024 11:11 AM (IST)

    मनसेला काही जागांवर महायुतीचा बिनशर्त पाठिंबा – सूत्र

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काही जागांवर महायुती बिननशर्त पाठिंबा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात 2 तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 21 Oct 2024 10:42 AM (IST)

    महाराष्ट्र राज्यात हरियाणा पॅटर्न नाही महायुती चले जाव पॅटर्न : सचिन खरात

    आताच हरियाणा राज्यात विधानसभा निवडणूक झाली, त्यामध्ये हरियाणामध्ये भाजपाला यश मिळाले त्यामुळे महाराष्ट्र राज्यात संघ हरियाणा पॅटर्न चालवणार आहे असे समजते आणि महायुतीचे नेते सतत म्हणत आहे आता महाराष्ट्र राज्यात हरियाणा पॅटर्न चालणार, पण संघाने आणि महायुतीच्या नेत्यांनी थोडा राज्याचा अभ्यास करावा. महाराष्ट्र राज्य रायतेचे राजे शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे आहे. हेडगेवार, गोळवलकर यांच्या विचाराचे नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात हरियाणा पॅटर्न नाही, महायुती चले जाव पॅटर्न चालणार ! हे संघाने आणि भाजपाने ध्यानात ठेवावं !, अशा शब्दात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात यांनी टीका केली.

  • 21 Oct 2024 10:35 AM (IST)

    जागावाटपावेळी त्याग करावा लागतो- संजय राऊत

    अमरावती, रामटेक आणि कोल्हापूर लोकसभेची जागा आम्ही लोकसभेला काँग्रेसला दिली. जागावाटपची वेळ येते, तेव्हा त्याग करावा लागतो. जागावाटपात थोडेफार मतभेद होतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करा – संजय राऊत

  • 21 Oct 2024 10:27 AM (IST)

    विदर्भातील जागावाटपाच्या तिढ्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “फक्त १ ते २ जागा….”

    विदर्भात १-२ जागा सोडल्या तर काँग्रेससोबत मतभेद नाहीत. महाविकासाआघाडी आजही जागावाटपाचा फॉर्म्युला शेअर करु शकते, असे विधान संजय राऊतांनी केले.

  • 21 Oct 2024 10:13 AM (IST)

    फुलंब्री मतदारसंघात रंगणार भाजप विरुद्ध शिंदे लढत, एक नेता करणार बंडखोरी

    फुलंब्री मतदारसंघात भाजपच्या विरोधात शिंदे सेना बंडखोरी करणार आहे. भाजपच्या अनुराधा चव्हाण यांच्या विरोधात शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश पवार हे निवडणूक लढणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीत बंडाची पडली पहिली ठिणगी पडली आहे. अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी जाहीर होताच रमेश पवार यांच्याकडून निवडणुकीची घोषणा करण्यात आला आहे. त्यामुळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदे सेना आमनेसामने येणार आहेत. जिल्हाध्यक्ष रमेश पवार यांच्याकडून निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

  • 21 Oct 2024 09:53 AM (IST)

    Maharashtra News: नाशिकमध्ये सिमा हिरे यांना भाजपकडून ऊमेदवारी जाहीर

    नाशिकचे कार्यकर्ते नेते संजय राऊत यांच्या भेटीला…. भाजपचे नाशिकचे नगरसेवक शशिकांत जाधव, राष्ट्रवादीचे नेते अपुर्व हिरे, शिवसेना माजी आमदार योगेश घोलप, देवळालीचे योगेश भोर तसेच भाजपचे कार्यकर्ते विक्रम नागरे संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल… अर्ध्या तासापासून नाशिकच्या नेत्यांसोबत संजय राऊत यांची बैठक सुरू…

  • 21 Oct 2024 09:42 AM (IST)

    Maharashtra News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज डोंबिवली दौऱ्यावर

    मनसे आमदार आणि कल्याण ग्रामीण मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते… दुपारी तीन वाजता राज ठाकरे डोंबिवलीत राहणार उपस्थित..

  • 21 Oct 2024 09:30 AM (IST)

    Maharashtra News: आसमानी सुलतानी संकटामुळे दोन एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड

    सततच्या आसमानी सुलतानी संकटामुळे दोन एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड…गेल्या तीन-चार दिवसांपासून परतीच्या पावसाने द्राक्षबागेचे नुकसान … लासलगाव जवळील चांदवड तालुक्यातील वाकी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी गोरख यमाजी जाधव या शेतकर्याने घेतला दुर्दैवी निर्णय… गेल्या पाच वर्षांपासून नफा तर दूर आठ ते दहा लाख रुपये खर्च वाया गेल्याने निराशेपोटी दुर्दैवी निर्णय…संपूर्ण दोन एकरावरील द्राक्षबाग तोडून देत केले शेत भुईसपाट…

  • 21 Oct 2024 09:15 AM (IST)

    Maharashtra News: आंबेगाव मधून दिलीप वळसे पाटील 24 ऑक्टोंबर ला उमेदवारी अर्ज दाखल करणार

    अखेर दिलीप वळसे पाटील यांचे ठरलं असून आंबेगाव विधानसभेतून अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील 24 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मी माझ्या कामावर लढत असतो त्यामुळे समोर कोण उमेदवार आहे याकडे लक्ष देत नाही अशा शब्दात वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.

  • 21 Oct 2024 09:03 AM (IST)

    Maharashtra News: दिवाळीत धान्य दुकानदार जाणार संपावर

    नाशिक – दिवाळीत धान्य दुकानदार जाणार संपावर… वाढीव मार्जीन मिळत नसल्याने घेतला निर्णय… संपावर गेल्याने धान्य पुरवठा होणार ठप्प… प्रलंबित मागण्यासाठी लक्ष्मीपूजन पासून संपावर जाणार… तीनशे रुपये प्रतिक्विंटल मार्जिन मिळावी ही प्रमुख मागणी… यासंदर्भात राज्याचे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदन…

  • 21 Oct 2024 08:57 AM (IST)

    गुहागरमध्ये महायुती कुणाला उमेदवारी देणार?

    गुहागर विधानसभेच्या जागेवरून महायुतीचे ठरता ठरेना.शिवसेनेकडून गुहागरमध्ये कुणबी समाजाचा उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरु आहे. माजी आमदार रामभाऊ बेंडल यांचा मुलगा राजेश बेंडल यांच्यासाठी चाचपणी सुरू आहे. राजेश बेंडल गुहागर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत. गुहागर विधासभा मतदार संघात 60% हून अधिक कुणबी समाजाचा प्रभाव असल्यामुळे राजेश बेंडल यांचा विचार सुरू आहे. राजेश बेंडल यांच्यासह कुणबी समाजाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत घेतली भेट. भेटी दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांची देखील उपस्थिती आहे. गुहागरच्या जागेबाबत राज्य स्तरावर हालचालींना वेग….भाजपकडून माजी आमदार डॉ विनय नातू मतदार संघात सक्रिय असताना राजेश बेंडल यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीने गूढ वाढलं आहे.

  • 21 Oct 2024 08:45 AM (IST)

    मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नाशिक जिल्ह्यात उमेदवार देणार

    मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नाशिक जिल्ह्यात सहा जागा लढवणार आहे. कामगारांचे प्रतिनिधी सरकार मध्ये असावे म्हणून स्वतंत्र लढणार आहे. नाशिकच्या सिन्नर येथे सिटूच्या कामगार मेळाव्यात हा निर्णय झाला आहे. महाविकास आघाडीने दिलेला शब्द न पाळल्याने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी राज्यातील चार जागा सोडण्याचा महाविकास आघाडीकडून शब्द देण्यात आला होता. कळवण, डहाणू , सोलापूर नाशिक पश्चिम या चार जागा सोडण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र ते पूर्ण न झाल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नाशिकमध्ये उमेदवार देणार आहे.

  • 21 Oct 2024 08:30 AM (IST)

    भातपिकावर रोगाचा प्रादुर्भाव

    इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात भातपिकावर करपा, मावा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. पहिले अवकाळीने झोडपले आता रोगाने भातपीक नष्ट केले. तालुक्यातील मुख्य पिक असलेल्या भातपीकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. दुहेरी संकटाने बळीराजा हवालदिल झाला आहे. पाच एकर शेतात लावलेला भातपीक पूर्णपणे खराब झालं आहे. रोगामुळे भात खराब झाला, तो आता जनावरांच्या खाण्याच्या लायकीचा राहिला नाही. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा चिंतेत आहे. आचार संहितेचा बाऊ न करता त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

  • 21 Oct 2024 08:21 AM (IST)

    खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात काय घडणार?

    खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हा संघटक अक्षय जाधव हे निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत. रात्री उशिरा त्यांनी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. जाधव जरांगे पाटील भेटीने चर्चेला उधान आले. खेड आळंदी विधानसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला जात आहे. शिवसेनेकडून इच्छुक असलेले अक्षय जाधव हे आता जरांगे पाटील यांच्या आदेशेने खेड आळंदीच्या रिंगणात उतरणार अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. आता अक्षय जाधव काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. काल भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. यात 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. तर दुसरी यादी तीन ते चार दिवसात येण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पण जागावाटपाबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाहीये. महाविकास आघाडीचं जागावाटपही अद्याप झालेलं नाही. तसंच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भूमिकाही महत्वाची ठरत आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमच्या ब्लॉगला फॉलो करा.