महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी अवघे 10 दिवस शिल्लक आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. सध्या सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांच्या एकाच दिवशी चार ते पाच सभा पाहायला मिळत आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सभा सुरु आहेत. आजच्या दिवसभरातील महत्वाच्या बातम्या या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत 4 जवान जखमी झाले आहेत. ऑपरेशन अजूनही सुरू आहे. या चकमकीत ३-४ दहशतवादी अडकल्याची माहिती आहे.
खलिस्तानी दहशतवादी अर्श डल्ला याला कॅनडात ताब्यात घेण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्श डल्लाला 27-28 ऑक्टोबर रोजी कॅनडात झालेल्या गोळीबार प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. नरेंद्र मोदी यांची भव्य सभा मुंबईच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. 14 नोव्हेंबरला शिवाजी पार्क सोबतच छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबई येथेही सभा पार पडणार आहेत.
सांगोल्यातून उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभेतून शहाजीबापू पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहेत. मी गद्दराांना गाडायाला आलो आहे. एकाला रेल्वेने गुवाहाटीला पाठवायचं आहे. तसेच मी गद्दारांना गाडायला आलो आहे, असंही ठाकरे म्हणाले. सांगोल्यातून ठाकरे गटाचे उमेदवार दीपक साळुंखे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
आपल्या हक्काच्या घरांसाठी सर्व श्रमिक संघटनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. शेकडोच्या संख्येने गिरणी कामगार महाराष्ट्र हायस्कूल मैदानावर जमले आहेत. आंदोलनांच्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवडीचे उमेदवार अजय चौधरी यांनी भेट दिली. गिरणी कामगार आणि वारसांना मुंबईत घरे देऊन पुनर्वसन करण्याचा अधिकार नाकारणारी अधिसूचना रद्द करा, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. महाराष्ट्र हायस्कूल ग्राउंड येथून हा मोर्चा बीडीडी येथील आंबेडकर मैदान पर्यंत जाणार आहे.
महाविकास आघाडी लाडकी बहिण योजनेला विरोध करीत आहे.पण आमचे सरकार लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असे भाजपा नेते अमित शाह यांनी मलकापूरात सांगितले.
भारताची प्रगती मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असून साल 2027 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर असेल असे भाजपा नेते अमित शाह यांनी मलकापूरात सांगितले.
महाविकास आघाडी अफजल खानाच्या रस्त्यावर चालत असून तिला पराभूत करा असे आवाहन भाजपा नेते अमित शाह यांनी मलकापूरात केले आहे.
जातनिहाय जनगणना आम्ही लोकांमध्ये विभाजन करण्यासाठी करत नाही, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा पुढील शंभर दिवसांचा कार्यक्रम यावेळी जाहीर करण्यात आला. त्यात महिलांना सहा गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा लागू करणार आहे. एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करुन ४५ दिवसांत निकाल लावण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांची अपक्ष उमेदवार सुधाकर धारे यांच्या कार्यकर्त्याला प्रचारादरम्यान शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याचा व्हिडीयो व्हायरल झाला आहे.
मराठा समाज संभ्रमात आहे असे सांगितले जात होते. मराठा समाजात संभ्रम नाही. जे स्वत:ला निवडून यायचे म्हणून संभ्रम निर्माण केले आहेत. समाजाला सर्व माहीत आहे. ज्याला पडायचे त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा. मी स्पष्ट सांगीतले आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
मी मंत्री झालो त्यावेळी फक्त धनगरांच्याच लोकांनाच दुधाला दर दिला का सर्व जाती धर्माच्या लोकांना दिला. मीडियावाले म्हणतात महादेव जानकर धनगरांचे नेते आहेत. माझ्या पक्षाचे चार आमदार निवडून आले त्यातले तीन आमदार हे मराठा समाजाचे होते आणि एक वंजारी समाजाचा होता तरी मला म्हणतात धनगरांचा नेते हा डाव ओळखा, असे महादेव जानकर म्हणाले.
रक्षा खडसे यांनी गिरीश महाजन यांचा गिरीश काका म्हणून उल्लेख केला. तर मुक्ताईनगरचा ठिकाणी अनेक लोकांना शंका वाटते आहे मात्र या ठिकाणी महायुतीचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे यांच्या भावजयी रोहिणी खडसे या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत
भाजपचा जाहीरनामा म्हणजे दिव्या खालचा अंधार आहे, असा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. भाजप नेते ज्या बहिणी दुसऱ्या सभेला जातील. त्यांचे फोटो काढून पाठवा म्हणतायत, यावरून बहिणीविषयी भाजप च्या मनात काय भावना आहेत, हे समोर येतंय, असे ते म्हणाले. ही लाडकी बहीण योजना नसून मत विकत घेण्याची योजना भाजप ची आहे. हे भाजप नेत्यांच्या वक्तव्यावरून वाटतं, असा टोला त्यांनी लगावला.
जालन्यात पोस्टाच्या पार्सलद्वारे मागविलेल्या 2 धारदार तलवारी आणि 1 खंजीर पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात 2 तरुणांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये आले आहेत. यावेळी गेवराईमध्ये मनोज जरांगे यांचे समर्थक महेश दाभाडे यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी गेवराई तालुक्यातील मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय सुरु करण्यात आले आहे.
पंढरपुरात कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर दर्शन रांगेची तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांचे ऊन, वारा, पाऊस या पासून संरक्षण व्हावे यासाठी मंदिर समितीने गोपाळपूर रोड लगत दहा पत्राशेड तयार करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे 20 ते 25 हजार भाविकांची सोय होणार आहे.
उध्दव ठाकरे, राहुल गांधी आणि आम्ही ठरवले आहे, महाराष्ट्रातील सत्ता बदलायची आहे. मी म्हतारा झालो नाही. मी सत्ता बदलल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाचे संकल्पपत्र आज प्रसिद्ध झाले. त्यानंतर काँग्रेसचा जाहीरनामा आला. त्यात पाच गँरंटी देण्यात आली आहे. काँग्रेस नेते आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. सविस्तर वाचा…
“प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 3 लाखांची मदत मिळणार. लाडक्या बहिणींना दरमहिना तीन हजार रुपये मिळणार. महिलांना मोफत बससेवा दिली जाणार. शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंतचं कर्ज माफ करणार. 25 लाखांची आरोग्य विमा योजना लागू करणार,” असं खर्गे म्हणाले.
“भाजपच्या नेतृत्वात असंवैधानिक पद्धतीने महायुतीची सत्ता आली. 50 खोके एकदम ओके, घरात भरून ठेवा आणि सरकार चालवा,” अशा शब्दांत मल्लिकार्जुन खर्गेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
“मुंबईकडे संपूर्ण भारताची नजर आहे. महाराष्ट्रातील निवडणूक देशासाठी महत्त्वाची आहे. ही निवडणूक देशाचं भविष्य बदलणारी ठरेल. मुंबईत कोणीही उपाशी राहत नाही. सर्व गोष्टींचा विचार करूनच मविआचा जाहीरनामा तयार करण्यात आला,” असं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
महायुती सत्तेत आहे तर त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी का केली नाही, असा सवाल करत नाना पटोले यांनी शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीवर टीका केली आहे.
‘महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दीड हजारांऐवजी दोन हजार रुपये देणार. 300 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्यांचे 100 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करणार. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार,’ अशी आश्वासनं या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, “काँग्रेसचं जातीवादाचं राजकारण समाजाला बुडवतोय आणि पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील लोकांना याबाबत सावध करत आहेत.”
नवी मुंबई शहरात बेलापूर आणि ऐरोली असे विधानसभेचे दोन मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघात ९ लाख ४ हजार ६४९ मतदार आहेत. त्यापैकी ऐरोलीत सर्वाधिक म्हणजे ४ लाख ८४ हजार ४०७ तर बेलापूरमध्ये ४ लाख २० हजार २४२ मतदार आहेत. ऐरोलीमध्ये बेलापूरपेक्षा जवळपास साठ हजार मतदार अधिक आहेत. ऐरोली क्षेत्रात महिला मतदारांची संख्यासुद्धा बेलापूरच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे या मतदारसंघात महिलांचा कौल महत्त्वाचा मानला जात आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती हिंगोली लोकसभा निवडणूक… उद्धव ठाकरेंच्या उपस्थित आज नांदेडमध्ये पक्षप्रवेश… विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बि. डी चव्हाण यांचा आज ठाकरे शिवसेनेत प्रवेश… डॉक्टर बि. डी चव्हाण यांची पुन्हा घरवापसी…
पंढरपुरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भालके यांची सोडली साथ.. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे… उमेदवार अनिल सावंत यांना पाठिंबा जाहीर… काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांच्या अडचणी वाढल्या…
या देशात ३७० कलम संपेल कुणाला वाटत नव्हतं, ट्रिपल तलाक संपेल कोणीच मानत नव्हत, सीएए येईल कुणालाही वाटलं नव्हतं. राम मंदिर उभारलं जाईल हे कुणालाही वाटलं नव्हतं. पण आम्ही करून दाखवलं…. असं वक्तव्य अमित शहा यांनी केलं…
आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान, गरीबांचं कल्याण करण्याचं म्हटलंय. आम्ही महिलांचा सन्मान करण्याचं आश्वासन दिलंय. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जम्मूकाश्मीरमध्ये बाबासाहेबांच्या संविधानाची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. याशिवाय वेगळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काय श्रद्धांजली असू शकते. अराजकता फैलावणाऱ्यांना आम्ही दूर केली.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होत आहे. भाजपचं हे संकल्पपत्र म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह हे देखील उपस्थित आहेत.
संभ्रम असे सांगितले जात होते. मराठा समाजात संभ्रम नाही. जे स्वतःला निवडून यायचे म्हणून संभ्रम निर्माण केले आहेत. समाजाला सर्व माहीत आहे. ज्याला पडायचे त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा, असं मनोज जरांगे म्हणालेत.
नाशिकमध्ये भाजप आणि वंचित बहुजन आघाडीला धक्का बसला आहे. वंचितचे माजी नगरसेवक पवन पवार आणि भाजपचे नेते विक्रम नागरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आहे. सीमा हिरे यांच्यावर नाराजी असल्याने ठाकरे गटात प्रवेश, असं विक्रम नागरे यांनी सांगितलं आहे.- तर वंचितचे वरिष्ठ विश्वासात घेत नसल्याने ठाकरे गटात प्रवेश मात्र आमची आंबेडकरांवर नाराजी नाही, असं पवन पवार म्हणालेत. येत्या 15 तारखेला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
शरद पवार आज जालन्याच्या दौऱ्यावर आहेत. घनसावंगीमध्ये पवारांची जाहीर सभा होत आहे. माजी मंत्री राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ शरद पवार घनसावंगीमध्ये सभा घेणार आहेत. खासदार कल्याण काळे, संजय जाधव यांच्यासह तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहे. मराठा आरक्षणाच होम ग्राउंड असलेल्या घनसावंगीमधून शरद पवार काय बोलणार याकडे लागणार सर्वांचं लक्ष आहे.
नाशिकमध्ये मनसेच्या उमेदवारावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा सचिवाला मारहाण करत लुटल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार प्रसाद सानपसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचेच कार्यालयीन सचिव योगेश पाटील यांनी गुन्हा दाखल केला आहे. उमेदवार प्रसाद सानप यांनी मनसेचे पक्ष कार्यालयीन सचिव योगेश पाटील यांच्याकडे निवडणूक खर्चासाठी विशिष्ट रक्कम दिली होती. मात्र पक्ष कार्यालयीन सचिव योगेश पाटील यांनी निवडणूक खर्चासाठी दिलेली रक्कम वापरली नाही, असा आरोप प्रसाद सानप यांनी केला आहे.
हेच पैसे परत मागण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी गेलेल्या प्रसाद सानप आणि त्याच्या सहकाऱ्यांनी योगेश पाटील यांच्या घरात घुसून त्यांच्या घरातून 8 लाख 84 हजार रुपये रोख आणि त्यांच्या आईची अडीच तोळ्याची पोत असा एकूण 9 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून नेल्याची तक्रार पाटील यांनी केली आहे. या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी मनसेचे उमेदवार प्रसाद सानप यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही महाविकासआघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. नुकतेच समाजवादी पक्षाचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांना पक्षाच्या वतीने मैत्रीपूर्ण लढत देण्याचे आदेश प्राप्त झाले असून ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. आमचा विजय पक्का असल्याची प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे उमेदवार इर्षात जहागीरदार यांनी दिली
अमित ठाकरे यांच्या प्रचारासाठी आज राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे. प्रभादेवी परिसरातील सामना प्रेसजवळ राज ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी माहिम विधानसभेचे महिला-पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर : खासदार प्रणिती शिंदे यांचा भर सभेत लाव रे तो व्हिडीओ. भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ प्रणिती शिंदेंनी भर सभेत दाखवला. ही तुमची भाषा आहे का? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र म्हणत प्रणिती शिंदेंचा धनंजय महाडिक आणि भाजपवर हल्लाबोल केला. बिनधास्त फोटो काढा महाराष्ट्राच्या लेकी तुम्हाला घाबरणार नाहीत, अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी धनंजय महाडिक यांना सुनावलं. दक्षिण मतदार संघातील उजळाईवाडी येथील जाहीर सभेत प्रणिती शिंदे गरजल्या
लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकांपुरतीच आहे. सध्या लाडक्या बहिणींवर दबाव आणला जात आहे. आमचेच पैसे आम्हाला देत आहेत. शिंदे सत्तेत येणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. १५०० रुपयात मतं विकत घेण्याचा प्रकार सुरु आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकावर टीका केली.