Maharashtra Assembly Election 2024 LIVE : धुळ्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री जयकुमार रावल यांना पुन्हा उमेदवारी

| Updated on: Oct 20, 2024 | 5:20 PM

Maharashtra Assembly Election 2024 LIVE News and Updates in Marathi : राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या घडामोडींबाबतचे सर्व अपडेट्स वाचा.....

Maharashtra Assembly Election 2024 LIVE : धुळ्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री जयकुमार रावल यांना पुन्हा उमेदवारी
Follow us on

LIVE NEWS & UPDATES

  • 20 Oct 2024 05:52 PM (IST)

    पंजाब पोटनिवडणूक: AAP ने उमेदवारांची यादी जाहीर केली

    पंजाब पोटनिवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने डेरा बाबा नानकमधून गुरदीप सिंग रंधावा, छब्बेवालमधून इशान छब्बेवाल, गिदरबाहातून हरदिल सिंग डिम्पी धिल्लन आणि बरनालामधून हरिंदर सिंग धालीवाल यांना उमेदवारी दिली आहे.

  • 20 Oct 2024 05:37 PM (IST)

    मी आता फार काही बोलणार नाही, पुढे खूप काही सांगायचे आहे : उद्धव ठाकरे

    काँग्रेसवर नाराजी असताना उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. मी आत्ता फार काही बोलणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अजून बरेच काही सांगण्यासारखे आहे. शिवसेनेला यूबीटीची मशाल राज्याच्या कानाकोपऱ्यात घेऊन जायची आहे.


  • 20 Oct 2024 05:25 PM (IST)

    महाराष्ट्राबाबत काँग्रेस सीईसीची बैठक पुढे ढकलली

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस सीईसीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सभा उद्या सायंकाळी 5 वाजता होणार आहे. जागावाटपाबाबत अजूनही अडचणी असल्याचे मानले जात आहे.

  • 20 Oct 2024 05:14 PM (IST)

    मुंबईच्या दहिसरमधूुन मनिषा चौधरी यांना तिसऱ्यांदा उमेदवारी

    भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दहिसरमधून मनिषा चौधरी यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे.

  • 20 Oct 2024 05:04 PM (IST)

    जयकुमार रावल यांना सलग पाचव्यांदा भाजपकडून उमेदवारी

    धुळेतील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून भाजप माजी मंत्री जयकुमार रावल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. जयकुमार रावल यांना सलग पाचव्यांदा भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. जयकुमार रावल हे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार आहेत. जयकुमार रावल यांनी उमेदवारी दिल्याने पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत.


  • 20 Oct 2024 04:21 PM (IST)

    भाजपाच्या पहिल्या यादीत पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 16 उमेदवार

    भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या 99 उमेदवारांमध्ये 13 महिलांचा समावेश आहे. तसेच या यादीत पश्चिम महाराष्ट्रातील 16 उमेदवारांचा समावेश आहे.

    • 1. दौंड : एडव्होकेट राहुल कुल
    • 2. चिंचवड : शंकर जगताप
    • 3. भोसरी : महेश लांडगे
    • 4. शिवाजीनगर : सिद्धार्थ शिरोळे
    • 5. कोथरुड : चंद्रकांतदादा पाटील
    • 6. पर्वती : माधुरी मिसाळ
    • 7. सोलापूर उत्तर : विजयकुमार देशमुख
    • 8. अक्कलकोट : सचिन कल्याणशेट्टी
    • 9. सोलापूर दक्षिण : सुभाष देशमुख
    • 10. मान : जयकुमार गोरे
    • 11. कराड दक्षिण : डॉ.अतुल भोसले
    • 12. सातारा : छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले
    • 13. कोल्हापूर दक्षिण : अमल महाडिक
    • 14. इचलकरंजी : राहुल आवाडे
    • 15. मीरज : सुरेश खाडे
    • 16. सांगली : सुधीर गाडगीळ
  • 20 Oct 2024 04:11 PM (IST)

    प्रत्येक निवडणूक आव्हानात्मक असते आणि मी चांगल्या मतांनी निवडून येणार : आमदार माधुरी मिसाळ

    भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत आमदार माधुरी मिसाळ यांनाही संधी देण्यात आली आहे. मिसाळ यांनी त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

    माधुरी मिसाळ काय म्हणाल्या?

    पर्वतीमध्ये इच्छुकांची गर्दी जास्त होती, हे जिवंत लोकशाहीचे लक्षण होते. प्रत्येक निवडणूक आव्हानात्मक असते आणि मी चांगल्या मतांनी निवडून येणार. माझ्या उमेदवारी संदर्भात मला आत्ताच मीडियाकडून समजलं. जशी उमेदवारीसाठी संधी दिली तसंच पक्ष मंत्रिपदासाठी संधी देईल, असा विश्वास मिसाळ यांनी व्यक्त केला.

  • 20 Oct 2024 04:03 PM (IST)

    भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

    आगामी विधानसभा निवडणुकींसाठी वंचित बहुजन आघाडीनंतर आता भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने पहिल्या यादीत 99 जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. या यादीत राज्यातील पहिल्या फळीतील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तसेच भाजपने बऱ्याच विद्यमान आमदारांनाच उमेदवारी दिली आहे.

    भाजपची पहिली यादी, पाहा कुणाला संधी?

     

  • 20 Oct 2024 03:50 PM (IST)

    धामणगाव येथून प्रताप अडसड यांना पुन्हा संधी

    भाजपाच्या पहिल्या यादीत अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदार संघात भाजपाचे विद्यमान आमदार प्रताप अडसड यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.

     

  • 20 Oct 2024 03:35 PM (IST)

    भाजपाची पहीली यादी जाहीर

    भाजपाची पहीली यादी जाहीर झाली असून 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.या उमेदवारांना एबी फॉर्म पोहचविण्यात येणार आहेत.

     

  • 20 Oct 2024 03:24 PM (IST)

    महाविकास आघाडीत कोणताही तिढा नाही – नाना पटोले

    शिवसेनेसोबत आमचा कोणताही तिढा नाही अशी प्रतिक्रीया कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिली आहे.

     

  • 20 Oct 2024 02:56 PM (IST)

    विधानसभेसाठी मैदानात उतरेल- उद्धव ठाकरे

    नुकताच उद्धव ठाकरे यांनी मोठे भाष्य केले असून त्यांनी म्हटले की, विधानसभेत मैदानात उतरेल.

  • 20 Oct 2024 02:37 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांचे मोठे भाष्य

    प्रत्येक मतदार संघात 1 लाख मतदार मराठा असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

  • 20 Oct 2024 02:35 PM (IST)

    जिथे उमेदवार उभे करतील तिथे पडतील- जरांगे

    मनोज जरांगे पाटील यांनी मोठे भाष्य केले असून म्हटले की, जिथे उमेदवार उभे करतील तिथे पडतील.

  • 20 Oct 2024 02:24 PM (IST)

    लोकांना विचारला जरांगे पाटील यांनी मोठा सवाल

    उमेदवार पाडायचे की, उभे करायचे हा मोठा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित लोकांना विचारला आहे.

  • 20 Oct 2024 02:17 PM (IST)

    कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा पेच

    भाजप माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद. दोन दिवसापासून भाजप श्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर स्नेहलता कोल्हे पहिल्यांदाच मतदारसंघात. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांची घेतली होती भेट…

  • 20 Oct 2024 02:09 PM (IST)

    येत्या निवडणुकीत 100% मतदान झालं पाहिजे- जरांगे

    कोणाच्या सभेस जायचं नाही.  मतदार यादीतील नाव, नंबर एक दिवस आधीच पाहून घ्यायचं. कोणाला न बोलता मतदार केंद्रावर जायचं, गोपनीय पद्धतीने मतदान करायचं अन गुपचूप घरी जायचं, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

  • 20 Oct 2024 01:55 PM (IST)

    नवी दिल्लीत शाळेजवळ बॉम्बस्फोट

    नवी दिल्लीत रोहिणी भागातल्या सीआरपीएफ स्कूल जवळ बॉम्बस्फोट झाला आहे. घटनास्थळी एनएसजी डॉग स्कोड दाखल झाले आहे.  या स्फोटात अनेक दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.

  • 20 Oct 2024 01:47 PM (IST)

    जुन्नर विधानसभेत महायुतीत बिघाडी होणार ?

    जुन्नर विधानसभेत महायुतीत बिघाडी होण्याची चिन्ह आहेत. भाजपच्या अशा बुचके निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत. वरिष्ठांचा वरदहस्त असल्याशिवाय आणि वरिष्ठांशी चर्चा केल्याशिवाय मी कुठलीही भूमिका घेत नाही, असे आशा बुचके यांनी म्हटले आहे.

  • 20 Oct 2024 01:27 PM (IST)

    राज ठाकरेंची भेट राजकीय नाही- मुरलीधर मोहळ

    राज ठाकरे यांच्याशी माझे जुने संबंध आहेत. माझ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी स्वत: राज साहेब पुण्यात आले होते. मी निवडून आल्या नंतर राज साहेबांची भेट झाली नव्हती. आज मुंबईत असल्याने भेट घेण्यासाठी आलो, यात कोणताही राजकीय संदर्भ नाही, असे मुरलीधर मोहळ यांनी सांगितले.

  • 20 Oct 2024 01:04 PM (IST)

    संकष्ट चतुर्थीमुळे गर्दी

    आश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थी रविवारी आल्याने भाविकांनी अष्टविनायक क्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी आगलावे बंधु यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली.

  • 20 Oct 2024 12:48 PM (IST)

    मविआचा जागावाटपासंदर्भातील वाद विकोपाला – सूत्रांची माहिती

    मविआचा जागावाटपासंदर्भातील वाद विकोपाला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाने काँग्रेस हायकमांडकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर ठाकरे गटाने तातडीची बैठक बोलावली आहे.

  • 20 Oct 2024 12:36 PM (IST)

    आदित्या ठाकरे घेणार शरद पवारांची भेट

    शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे शरद पवारांची वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीतील जागांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

  • 20 Oct 2024 12:26 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अनेक उमेदवारांचे निर्णय अजूनही प्रलंबित

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात माढा, माण, श्रीगोंदा, मोहोळ, अणुशक्तीनगर, परळी या विधानसभेच्या उमेदवारांचं निर्णय अजूनही प्रलंबित आहेत.  माढा मतदारसंघात 6 , माण मतदारसंघात 4 जण, मोहोळ मतदारसंघात 5 जण परळी मतदारसंघात 5 जण इच्छुक आहेत.

    श्रीगोंदा मतदारसंघाबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार पक्षात अजूनही रस्सीखेच सुरू आहे. ठाकरे गटाकडून साजन पाचपुते उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील तर शरद पवारांच्या पक्षातून राहुल जगताप इच्छुक.

  • 20 Oct 2024 12:09 PM (IST)

    मविआच्या डोक्यात फक्त भाजपचा द्वेष – चंद्रशेखर बावनकुळे

    मविआच्या डोक्यात फक्त भाजपचा द्वेष आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा विचार नाही. राऊतांना दिवसभरासाठी ब्रेड बटर हवं असतं म्हणून आरोप करतात, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

  • 20 Oct 2024 11:58 AM (IST)

    सोने आणि चांदीची जोरदार मुसंडी

    जळगावच्या सराफ बाजारात एका दिवसात चांदीच्या दरात तब्बल तीन हजारांनी वाढ तर सोन्याचे दरात सुद्धा ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. जळगाव सोन्याच्या दराने केला ८० हजारांचा टप्पा पार तर चांदीचे दर एक लाख रुपयांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.

  • 20 Oct 2024 11:50 AM (IST)

    उद्धव सेनेचा पराभव निश्चित -संजय शिरसाट

    ज्या रिक्षा चालकाला बाळासाहेबांनी विधानभवनात पाठवलं होतं त्यावेळेस पैसे घेतले होते का ? आता उद्धव साहेबांनी दोन वेळेस तिकीट दिल त्यांच्या नावावर निवडून आले. त्यावेळेस यांनी पैसे दिले होते का ? त्यांना माहित आहे उद्धव साहेबांनी मला प्रवेश दिला, त्यामुळे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव निश्चित आहे, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.

  • 20 Oct 2024 11:40 AM (IST)

    निलेश राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

    भाजपचे कोकणातील नेते माजी खासदार निलेश राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर दुपारच्या सुमारास भेट घेणार आहे. निलेश राणे यांना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  • 20 Oct 2024 11:34 AM (IST)

    राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील मनसे च्या महत्वाच्या 10 पदाधिकारी सोबत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबत शिवतीर्थ वर बैठक आहे. बैठकीसाठी मनसे चे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, राज्याचे सरचिटणीस राजेंद्र वागस्कर, अनिल शिदोरे यांच्यासह 4 सरचिटणीस सहभागी झाले आहेत.

  • 20 Oct 2024 11:19 AM (IST)

    जरांगे यांनी रिंगणात उतरावे

    मनोज जरांगे यांच्या आजच्या भूमिकेअगोदरच छगन भुजबळ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. देशात लोकशाही आहे. जी भूमिका घेतील ते घेतील, मला तर असं वाटतं त्यांनी उमेदवार उभे करायला पाहिजे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे, कितीतरी पक्ष निर्माण झालेले आहेत. त्यांनी सुद्धा नशीब आजमावायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

  • 20 Oct 2024 11:11 AM (IST)

    फडणवीस क्रूर माणूस – मनोज जरांगे पाटील

    मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील बैठकीपूर्वी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस क्रूर माणूस आहे. ते खूनशी आहेत असा आरोप त्यांनी केला.

  • 20 Oct 2024 11:00 AM (IST)

    आज उद्धव ठाकरे गटाची दुपारी बैठक

    मातोश्रीवर आज दुपारी 12:30 वाजता उद्धव ठाकरे गटाची तातडीने बैठक घेण्यात येणार आहे. काही निर्णय घ्यावे लागतील, असा सूचक इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.

  • 20 Oct 2024 10:50 AM (IST)

    Maharashtra News: मविआची जागावाटपावर 10 तास बैठक – संजय राऊत

    मविआची जागावाटपावर 10 तास बैठक… निवडणुकीसंदर्भात सर्व नेते एकत्र चर्चा करणार.. मविआ टिकली पाहिजे असं आम्हाला वाटतं… मातोश्रीवर 12.30 वा पक्षाची तातडीनं बैठक बोलावली… पुढच्या वाटचालीसंदर्भात बैठकीत निर्णय घेऊ… असं वक्तव्या संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 20 Oct 2024 10:47 AM (IST)

    Maharashtra News: जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महिला मतदारांची वाढली

    जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या ७४ हजार ९४७ ने वाढली आहे.. विधानसभा निवडणुकीत एकूण ३६ लाख ५५ हजार ६४८ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे… त्यात १७ लाख ७५ हजार ८६० महिला मतदारांचा समावेश आहे… पुरुष मतदारांची संख्या ४९ हजार ५७६ ने तर महिला मतदारांची संख्या ७४ हजार ९४७ ने वाढली आहे.

  • 20 Oct 2024 10:32 AM (IST)

    Maharashtra News: ठाकरे गटात आर्थिक देवाण – घेवाण करुन उमेदवारी… शिरसाटांचा आरोप

    ठाकरे गटात आर्थिक देवाण – घेवाण करुन उमेदवारी… निष्ठावंतांना डावलून बाहेरुन आलेल्यांना उमेदवारी दिली जाते… ठाकरे गटात सगळा पैशांचा खेळ सुरु… असं देखील संजय शिरसाट म्हणाले आहेत.

  • 20 Oct 2024 10:20 AM (IST)

    Maharashtra News: वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपीटीचा जबर तडाखा…

    अमरावतीच्या तिवसा तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपीटीचा जबर तडाखा… वादळी वारा आणि पावसामुळे कपाशी, तूर, सोयाबीन सह संत्रा बागांचे प्रचंड नुकसान… नुकसानीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर पोहचल्या बांधावर… मोझरी, अनकवाडी, वऱ्हा, मालधुर गावातील शेतकऱ्यांचे नुकसान… कपाशी, तूरीचे पीक झाले जमीनदोस्त, काढनीला आलेले सोयाबिन झाले खराब…

  • 20 Oct 2024 10:06 AM (IST)

    Maharashtra News: 95 टक्के पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीणचे पैसे – छगन भुजबळ

    95 टक्के पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीणचे पैसे… समीर भुजबळांवरील बातम्यांना काहीत आधार नाही…. असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे.

  • 20 Oct 2024 09:57 AM (IST)

    काँग्रेसची आज महत्वाची बैठक

    विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसच्या आज महत्त्वपूर्ण बैठका होत आहेत. राजधानी दिल्लीत होणार दोन महत्त्वपूर्ण बैठका होत आहेत.  थोड्याच वेळात काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. नाना पटोले बाळासाहेब थोरात सतेज पाटील वर्षा गायकवाड विजय वडेट्टीवार दिल्लीत दाखल आहे. आज संध्याकाळी केंद्रीय निवडणूक समितीचीही बैठक होणार आहे. मलिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या उपस्थितीत होणार केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे,. आजच काँग्रेस उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे.

  • 20 Oct 2024 09:45 AM (IST)

    अमरावतीत पावसामुळे शेतीचं नुकसान

    अमरावतीच्या तिवसा तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीटीचा जबर तडाखा बसला आहे. वादळी वारा आणि पावसामुळे कपाशी,तूर,सोयाबीन सह संत्रा बागांचे प्रचंड नुकसान झालं आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या आहेत. मोझरी, अनकवाडी,वऱ्हा,मालधुर गावातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. कपाशी, तूरीचे पीक झाले जमीनदोस्त, काढनीला आलेले सोयाबिन खराब झालं आहे.

  • 20 Oct 2024 09:30 AM (IST)

    दक्षिण सोलापूर विधानसभेचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार मनसेच्या वाटेवर?

    काँग्रेसच्या महादेव कोगनुरे यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुंबईत जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दक्षिण सोलापूर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून कोगणूरे इच्छुक कोगणूरे होते.  काँग्रेस नेते आणि एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे हे मनसेकडून दक्षिण सोलापूरची जागा लढण्याची शक्यता आहे.

  • 20 Oct 2024 09:16 AM (IST)

    राष्ट्रीय समाज पक्ष करमाळ्यात लढणार

    राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा विधानसभा मतदारसंघ पूर्ण ताकदीने लढणार आहे. करमाळ्यातील अनेकजण राष्ट्रीय समाज पक्षाच्या संपर्कात आहेत. करमाळ्याच्या उमेदवारीसाठी चार ते पाच जण राष्ट्रीय समाज पक्षाच्या संपर्कात आहेत. आमचा उमेदवार हा जनमतातील आणि प्रबळ उमेदवार असणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे अत्यंत महत्वाची बैठक घेणार आहेत. विधानसभा लढवायची की नाही? याबाबत मनोज जरांगे पाटील ठरवणार आहेत. 11 वाजता त्यांची बैठक सुरु होणार आहे. या बैठकीच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. तसंच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाबाबतही भेटीगाठी सुरु आहेत. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमच्या ब्लॉगला फॉलो करा.