Maharashtra Assembly Election 2024 LIVE : राजेंद्र शिंगणे यांच्याकडून तुतारी हाती घेण्याचे संकेत

| Updated on: Oct 16, 2024 | 10:09 PM

Maharashtra Assembly Election 2024 LIVE News and Updates in Marathi: येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागतील. मतदानाच्या तिसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे राज्यात कोणाचे सरकार येणार हे महिन्याभरातच स्पष्ट होईल.

Maharashtra Assembly Election 2024 LIVE : राजेंद्र शिंगणे यांच्याकडून तुतारी हाती घेण्याचे संकेत
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आज घोषणा
Follow us on

Maharashtra Assembly Election 2024 LIVE  : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अखेर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागतील. मतदानाच्या तिसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे राज्यात कोणाचे सरकार येणार हे महिन्याभरातच स्पष्ट होईल. सध्या महाराष्ट्रात महायुती की महाविकासआघाडी अशी लढत होत आहे. निवडणुकांची घोषणा होताच सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. लवकरच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे.

 

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Oct 2024 08:01 PM (IST)

    भारतीय न्यायदेवतेची मूर्ती बदलली, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली

    भारतीय न्यायदेवतेची मूर्ती बदलली आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली आहे. न्यायदेवताच्या हातातील तलवारी ऐवजी भारतीय संविधान देण्यात आलं आहे. तसेच न्यायदेवताच्या नव्या मूर्तीवर डोक्यावर मुकुट देण्यात आलं आहे.

     

  • 16 Oct 2024 07:32 PM (IST)

    कोपरीत रहिवासी भागात फटाके विक्रीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका

    उच्च न्यायालयाचे निर्देश डावलून कोपरीमध्ये रहिवासी भागात फटाक्यांची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात करण्यात आली आहे. कोपरी बचाव समितीच्या वतीने ही याचिका याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली असून यामध्ये ठाणे महापालिकेला प्रतिवादी करण्यात आले आहे. ज्याप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रेत्यांना खुल्या मैदानात फटाके विक्रीची परवानगी दिली जाते त्याच धर्तीवर रहिवासी भागात फटाक्यांची मोठमोठी दुकाने थाटून फटाक्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांनाही खुल्या मैदानात स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.


  • 16 Oct 2024 06:59 PM (IST)

    मी हाती तुतारी घ्यावी अशी 90 टक्के जनतेची इच्छा : राजेंद्र शिंगणे

    राजेंद्र शिंगणे यांनी तुतारी हाती घेण्याचे संकेत दिले आहेत. मी हाती तुतारी घ्यावी अशी 90 टक्के जनतेची इच्छा असल्याचं शिंगणे यांनी म्हटलं आहे.

  • 16 Oct 2024 06:43 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द, कारण काय?

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द झाला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा उद्या होण्याची शक्यता आहे. हरियाणात उद्या गुरुवारी 17 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शिंदे दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे.

  • 16 Oct 2024 06:36 PM (IST)

    देशातील व्हीआयपींच्या सुरक्षेत मोठा बदल, नक्की काय?

    राजधानी नवी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. देशातील व्हीआयपींच्या सुरक्षेत मोठा बदल करण्यात आल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्यांना झेड प्लस सुरक्षा आहे त्यांच्या सुरक्षा ताफ्यात यापुढे NSG कमांडो नसतील. तर यापुढे सीआरपीएफ सुरक्षा सांभाळणार आहेत. देशातील 9 व्यक्तींच्या झेड प्लस सुरक्षेत आता एनएसजी च्या जागी सीआरपीएफचे कमांडो असणार आहेत.

  • 16 Oct 2024 06:16 PM (IST)

    भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस-पियुष गोयल दाखल

    नवी दिल्ली मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पियुष गोयल बैठकीसाठी दाखल झाले आहेत. तसेच 7 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदीही भाजप मुख्यालयात दाखल होणार आहेत. महाराष्ट्रातील 105 उमेदवारांबाबत केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळेही दाखल झाले आहेत.

  • 16 Oct 2024 04:55 PM (IST)

    झिशान सिद्दीकी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात दाखल

    आमदार झिशान सिद्दीकी हा मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात दाखल झाला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आज पहिल्यांदाच झिशान हा घराच्या बाहेर पडलाय.

  • 16 Oct 2024 04:51 PM (IST)

    नांदेडमध्ये टेम्पोच्या धडकेत पती पत्नीचा मृत्यू

    नांदेडच्या किनवट तालुक्यातील सावरगाव येथील घटना. शेताकडे पायी जातांना टेम्पोने दिली धडक. संतप्त नागरिकांनी नांदेड निर्मल राष्ट्रीय महामार्ग रोखला

  • 16 Oct 2024 04:28 PM (IST)

    महादेव जानकर महायुतीची साथ सोडणार

    जागावाटपात विचारात न घेतल्याने निर्णय. २८८ जागा राज्यात लढवणार. दोन दिवसात पहिली यादी जाहीर करणार. महादेव जानकर यांच्या पक्षाला जागा वाटपात विचारात घेतलं नाही म्हणून बाहेर पडण्याचा निर्णय

  • 16 Oct 2024 04:27 PM (IST)

    महादेव जानकर यांचा स्वबळावर लढण्याचा नारा

    महादेव जानकर यांनी स्वबळावर चढण्याचा नारा दिला आहे.

  • 16 Oct 2024 04:07 PM (IST)

    माजी आमदार स्नेहलता कोल्हे फडणवीसाच्या भेटीला

    माजी आमदार स्नेहलता कोल्हे फडणवीसाच्या भेटीला पोहोचल्या आहेत.

  • 16 Oct 2024 02:56 PM (IST)

    राज्यात मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल – गिरीश महाजन

    “आज पत्रकार परिषद झाली. आमच्यासाठी जमेची बाजू आहे. आमची पूर्ण तयारी आहे. राज्यात मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल. जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी. लोकशाही पद्धतीने त्यांनी उमेदवार उभे करावे आणि जिंकावं. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत पण केवळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायचं हे चुकीचं आहे. शरद पवार यांनी आतापर्यंत काय केलं? असा प्रश्न त्यांनी पवारांना जाऊन विचारायला हवा” असं गिरीश महाजन म्हणाले.

     

  • 16 Oct 2024 02:31 PM (IST)

    राजेंद्र शिंगणे अजित पवारांना धक्का देणार का?

    “विधानसभा निवडणूक तुतारी चिन्हावर लढवावी अशी अनेकांची मागणी. आज कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक झाली. उद्यापासून जिल्हाभर फिरणार” असं अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे म्हणाले.

  • 16 Oct 2024 02:14 PM (IST)

    दोन वर्षांपूर्वी सरकार आलं, तेव्हा टोलमाफी का नाही दिली? आदित्य ठाकरे

    “सरकारला त्यांचे मालक अदानींच्या खिशात पैसे घालायचे आहेत. मुंबईची जमीन कितपत सोडायची. काही योजना निरंतर चालू राहतील. दोन वर्षापूर्वी सरकार आलं, तेव्हा टोलमाफी का नाही केली? 15 लाख देणारे 1500 रुपये देतायत. लाडकी बहिणसाठी तेव्हा पैसे का नाही दिले?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.

  • 16 Oct 2024 02:11 PM (IST)

    जाहीरात, कॉन्ट्रॅक्टरचा पैसा आम्ही महिलांना देऊ – आदित्य ठाकरे

    “सरकार तिजोरी रिकामी करत आहे. जाहीरात, कॉन्ट्रॅक्टरला देणारा पैसा आम्ही महिलांना देऊ” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “ही लूट महिलांना देण्यासाठी, टोल माफीसाठी चाललेली नाही. सरकारला त्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायचे आहेत, त्यातून त्यांचे खोके भरतील” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

  • 16 Oct 2024 01:53 PM (IST)

    मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला एक- दोन दिवसात जाहीर होईल- रोहित पवार

    “अजित पवार मतदार नाहीत. मला इथल्या लोकांनी निवडून दिलं, त्यामुळे त्यांच्यावर माझा विश्वास आहे. मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला एक- दोन दिवसात जाहीर होईल. महाराष्ट्राच्या जागा ठरवण्यासाठी दिल्लीतील नेते महाराष्ट्रात यायचे पण आता महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत जावं लागतंय,” असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.

  • 16 Oct 2024 01:40 PM (IST)

    विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

    विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करत आहोत, त्यामुळे निवडणुकांची वेगळी अशी तयारी करण्याची गरज नाही. केवळ लीड वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अजित पवार सोबत नसले तरी लोकं तीच आहेत,” असं ते म्हणाले.

  • 16 Oct 2024 01:30 PM (IST)

    ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेचा राष्ट्रवादीत प्रवेश

    ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडेनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. अश्विनीला महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपद देण्यात आलं आहे.

  • 16 Oct 2024 01:20 PM (IST)

    नायब सिंग सैनी दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

    नायब सिंग सैनी यांची हरियाणा भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. उद्या 17 ऑक्टोबर रोजी ते दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

  • 16 Oct 2024 01:12 PM (IST)

    बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणात झिशान सिद्दिकींचा जबाब नोंदवणार

    मुंबई क्राइम ब्रांचची टीम आज झिशान सिद्दिकी यांचा जबाब नोंदवू शकते. झिशान सिद्दीकी यांनी परवानगी दिल्यास आज गुन्हे शाखा त्यांचा जबाब नोंदवू शकते. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात क्राइम ब्रँचची टीम झिशान सिद्दीकी यांचा जबाब नोंदवणार आहे.

  • 16 Oct 2024 01:01 PM (IST)

    नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी घेतली जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी घेतली जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. ओमर अब्दुल्ला यांनी केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  श्रीनगर इथल्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर मध्ये घेतली शपथ.

  • 16 Oct 2024 12:50 PM (IST)

    आमच्याकडे कोणालाही मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले नाहीत

    Maharashtra News : आमच्याकडे कोणालाही मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले नाहीत, शरद पवारांना आवाहन करतो मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगावा – फडणवीस

     

  • 16 Oct 2024 12:37 PM (IST)

    रोज सकाळी भोंगा वाजतो, त्यापेक्षा विकासकामं दाखवा – एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना टोला

    Maharashtra News : लोकसभेत फेक नरेटिव्ह सेट केलं, पण  आता लोकं फसणार नाहीत. रोज सकाळी भोंगा वाजतो, त्यापेक्षा विकासकामं दाखवा असा टोला एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना लगावला.

  • 16 Oct 2024 12:28 PM (IST)

    लाडकी बहीण योजनेला कोणी टच केलं तर करेक्ट कार्यक्रम होणार – एकनाथ शिंदे

    Maharashtra News  : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला कोणी टच केलं तर करेक्ट कार्यक्रम होणार असा इशार एकनाथ शिंदे यांनी दिला.

  • 16 Oct 2024 12:24 PM (IST)

    म्हणून तर आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली – एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

    Maharashtra News : राज्यातला सर्वसामान्य माणूस, कॉमन मॅन त्याच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे. तो कॉमन मॅन नव्हे सुपरमॅन व्हायला पाहिजे. राज्यातील सर्वसामान्य माणसाला आम्हाला ताकद द्यायची आहे, म्हणून तर आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली – एकनाथ शिंदे

  • 16 Oct 2024 12:15 PM (IST)

    मविआच्या काळात विकासकामांना ब्रेक लागला होता  – एकनाथ शिंदे

    Maharashtra News : मविआच्या काळात विकासकामांना ब्रेक लागला होता.  अडीच  वर्षांता मनिआनं प्रकल्प बंद करण्याचं काम केलं. महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होता. पण महायुतीचं सरकार येताच महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावरून पहिल्या नंबर वर आला – एकनाथ शिंदेंनी मांडला महायुती सरकारचा लेखाजोगा

  • 16 Oct 2024 12:10 PM (IST)

    पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र नंबर 1 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

    Maharashtra News : पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. आम्ही एवढी कामं केली की ती रिपोर्ट कार्डमध्येही मावत नाहीत.  अटल सेतून, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोडचं काम सरकारने केलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 16 Oct 2024 12:04 PM (IST)

    Maharashtra News: विरोधकच संभ्रमात दिसतात, देवेंद्र फडणवीसांची टीका

    विरोधकच संभ्रमात दिसतात, देवेंद्र फडणवीसांची टीका… ठाकरे म्हणाले महायुती सरकारच्या सर्व योजना बंद करणार… ठाकरे पुन्हा योजनांना स्थगिती देण्यासाठी निघालेत – देवेंद्र फडणवीस

  • 16 Oct 2024 12:00 PM (IST)

    Maharashtra News: होमगार्डचं मानधन सरकारनं दुप्पट केलं – देवेंद्र फडणवीस

    वेगवेगळ्या समाजाचं महामंडळ स्थापन केलं… होमगार्डचं मानधन सरकारनं दुप्पट केलं…. ज्याला दिलासा दिला नाही असा एकही घटक नाही… असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

  • 16 Oct 2024 11:57 AM (IST)

    Maharashtra News: सरकारनं नदीजोड प्रकल्प आणला – देवेंद्र फडणवीस

    सरकारनं नदीजोड प्रकल्प आणला… सिंचनाच्या क्षेत्रात आम्ही अभूतपूर्ण कामगिरी केली… राज्यातल्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 16 Oct 2024 11:54 AM (IST)

    Maharashtra News: आता साडे आठ रुपयाची वीज ३ रुपयाला पडणार – देवेंद्र फडणवीस

    आता साडे आठ रुपयाची वीज ३ रुपयाला पडणार आहे. १० हजार कोटी बजेट आणि पाच हजार कोटी क्रॉस सबसिडीचे आम्ही वाचवणार आहोत… प्रिंटिंग मिस्टेक घोषणा नाही. हा वेल थॉट म्हणजे विचारपूर्वक निर्णय घेतलाय. अनेक वर्ष तो चालणार आहे – देवेंद्र फडणवीस

     

  • 16 Oct 2024 11:52 AM (IST)

    Maharashtra News: आमच्यासाठी निवडणुकीचा शंखनाद, काहींसाठी ऐलान – देवेंद्र फडणवीस

    आमच्यासाठी निवडणुकीचा शंखनाद, काहींसाठी ऐलान… मविआचं स्थगिती सरकार, आमचं गतीशील सरकार… परिवर्तन करणाऱ्या योजना आम्ही आणल्या… असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

  • 16 Oct 2024 11:48 AM (IST)

    Maharashtra News: आरोप करताना तारतम्य बाळगलं पाहिजे – अजित पवार

    आरोप करताना तारतम्य बाळगलं पाहिजे… विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत आहोत… मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणीच्या यशामुळे विरेधक गडबडले… असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

  • 16 Oct 2024 11:46 AM (IST)

    Maharashtra News: महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद, महायुतीचं रिपोर्ट कार्ड प्रदर्शित

    महायुतीची संयुक्त पत्रकार परिषदे दरम्यान महायुतीचं रिपोर्ट कार्ड प्रदर्शित करण्यात आलं आहे. आडीच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा महायुतीकडून प्रकाशित…

  • 16 Oct 2024 11:43 AM (IST)

    Maharashtra News: लाडकी बहीण योजनेमुळे राज्य कंगाल होईल – राज ठाकरे

    लाडकी बहीण योजनेमुळे राज्य कंगाल होईल… पैसे फुकट वाटून काही होणार नाही… पैसे तुमच्या घरचे नाहीत… सरकारचे आहेत… असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.

  • 16 Oct 2024 11:24 AM (IST)

    Maharashtra News: शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

    शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट… विक्रम काळे शिक्षक मतदार संघाचे आमदार… विक्रम काळे अजित पवार गटाचे आमदार… विक्रम काळे आणि मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीमध्ये भेट…

  • 16 Oct 2024 11:09 AM (IST)

    Maharashtra News: विधान परिषद मिळाल्यानंतर नांदेड येथे हेमंत पाटलांच जंगी स्वागत

    परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होतील आणि भगवा फडकेल… विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांचा विश्वास… बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले एकनाथ शिंदे शब्द पाळणारे नेते… विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर हेमंत पाटलांकडून मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार…

  • 16 Oct 2024 10:57 AM (IST)

    विधानपरिषदेचे नवनर्वाचित आमदार हेमंत पाटलांनी मानले शिंदेंचे आभार

    – विधान परिषद मिळाल्यानंतर नांदेड येथे हेमंत पाटलांच जंगी स्वागत करण्यात आलं आहे. परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होतील आणि भगवा फडकेल, असा विश्वास विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले एकनाथ शिंदे शब्द पाळणारे नेते आहेत, असं म्हणत विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर हेमंत पाटलांकडून मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानण्यात आलेत.

  • 16 Oct 2024 10:45 AM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद

    लवकरच महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होणार आहे. राज्यात पुढचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा खेळ भाजपच संपवणार आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

  • 16 Oct 2024 10:30 AM (IST)

    अंधेरीत रिया पॅलेसमध्ये आग

    मुंबईतील अंधेरी पश्चिममध्ये असणाऱ्या रिया पॅलेसमध्ये आग लागली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.सकाळी आठच्या सुमारास ही आग लागली, ही आग लेव्हल 1 ची होती.सध्या आग विझवण्यात आली आहे.अंधेरी पश्चिम लोखंडवाला येथील रिया पॅलेस इमारतीला आग लागली आहे.

  • 16 Oct 2024 10:15 AM (IST)

    सलमान खानच्या सुरक्षेत वाढ

    बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या सुरक्षेसाठी जवळपास 100 मुंबई पोलिसचे जवान तैनात आहेत. ज्यामध्ये काही पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये आहेत. सलमान खानच्या गॅलेक्सी घराबाहेर असलेली ही कार त्याच्या स्कॉटची आहे. याशिवाय त्याच्या घराबाहेर २४ तास पोलिस तैनात असतो. सीसीटीव्हीच्या मदतीनेही सुरक्षेवर लक्ष ठेवले जाते. सध्या सलमान खानच्या घराबाहेर सर्वत्र ठिकाणी पोलीस तैनात आहेत. त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा छावणी स्वरूप झाले आहेत.

  • 16 Oct 2024 09:53 AM (IST)

    कांद्याला मिळाला उच्चांकी दर

    आष्टीच्या कडा बाजारपेठेत कांद्याला पहिल्यांदाच चांगले भाव मिळाले आहेत. कांद्याला तब्बल 55 रुपयांचा भाव मिळाला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत कांदा उत्पादक शेतकरी आनंदित झाला आहे.

  • 16 Oct 2024 09:40 AM (IST)

    सरन्यायाधीश चंद्रचूड मूळ गावा येणार

    भारताचे विद्यमान सरन्यायाधीश डाॅ.धनंजय चंद्रचूड हे रविवार दि.२० ऑक्टोबर रोजी पुण्याच्या खेड तालुक्यातील कनेरसर गावाला भेट देणार आहेत. कनेरसर हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे गाव आहे.येत्या १० नोव्हेंबर रोजी चंद्रचूड हे सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होणार आहेत.

  • 16 Oct 2024 09:25 AM (IST)

    हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा रिंगणात उतरवणार

    निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेले आमदार हितेंद्र ठाकूर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. 2019 च्या निवडणुकीच्या मतदानानंतर मी पुन्हा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा हितेंद्र ठाकूर यांनी केली होती. परंतु बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष राजीव पाटील भाजपमध्ये जात आहे. त्यामुळे पक्षातील बंडाळी टाळण्यासाठी हितेंद्र ठाकुरांनी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरावे, असा बविआच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

  • 16 Oct 2024 09:20 AM (IST)

    बुलढाण्यात १ लाख ४७ हजार हेक्टरवर नुकसान

    बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या धुव्वाधार पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल १ लाख ४७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यातील 51 मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

  • 16 Oct 2024 09:06 AM (IST)

    डॉ.सदानंद मोरे यांची फेरनियुक्ती

    महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.सदानंद मोरे यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची नियुक्ती केली आहे. तीन वर्षांसाठी ही नियुक्ती असणार आहे.

  • 16 Oct 2024 09:01 AM (IST)

    अमरावती शहरात हत्येचे सत्र सुरुच, शुल्लक वादातून तरुणाची हत्या

    Maharashtra Breaking News : अमरावती शहरात हत्येचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. अमरावतीच्या चित्रा चौकात रात्री तरुणाची हत्या करण्यात आली. चाकूने पोटात सपासप वार करून शुल्लक वादातून ही हत्या करण्यात आली आहे. गोलू सुनील उसरेटे वय 30 वर्ष राहणार रतनगंज, अमरावती असे चाकू हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

    शुल्लक कारणावरून विकी गुप्ता याने गोलूच्या पोटात चाकूने वार करून ही हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसानी आरोपी विक्की गुप्ता याचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर तणाव निर्माण झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री 12.30 वाजता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

     

  • 16 Oct 2024 08:58 AM (IST)

    राज्यात मानसिक आजाराचे सर्वेक्षण करण्यात येणार

    Maharashtra Breaking News : राज्यात मानसिक आजाराचे सर्वेक्षण करण्य़ात येणार आहे. राज्यातील सर्वेक्षण करण्याची जबाबदारी पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयावर देण्यात आली आहे. मानसिक आजाराच्या रुग्णांची माहिती काढावी देशासह राज्यात मानसिक आजाराचे प्रमाण वाढले आहे का याची माहिती या सर्वेक्षणातून मिळणार आहे. राज्यातील सर्वेक्षणाची तयारी पूर्ण निवडणुकीनंतर सर्वेक्षण होण्याची शक्यता आहे.

  • 16 Oct 2024 08:56 AM (IST)

    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात

    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर होताच काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास काँग्रेसने सुरुवात केली आहे. काँग्रेसचे माजी खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी कल्याणमध्ये 95 उमेदवारांची मुलाखत घेतली आहे. यात भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 18 इच्छुक उमेदवार आहेत. या उमेदवारांची निवड सीट शेयरिंग प्रक्रियेच्या पूर्णतेनंतरच निश्चित केली जाईल अशी माहिती चंद्रकांत हंडोरे यांनी दिली.

  • 16 Oct 2024 08:51 AM (IST)

    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : मनसे अॅक्शन मोडमध्ये, राज ठाकरेंनी बोलवली महत्त्वाची बैठक

  • 16 Oct 2024 08:49 AM (IST)

    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : विधानसभा निकालानंतर फक्त तीन दिवस, अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? कारण…

  • 16 Oct 2024 08:44 AM (IST)

    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : विधानसभा निवडणूक जाहीर होताच महायुतीत बंडखोरीची पहिली ठिणगी

    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : विधान परिषदेचे आमदार असलेले सतीश चव्हाण महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसेच ते भाजप आमदार विरोधात निवडणूक रिंगणात उतरणार आहे. यामुळे महायुतीमधील राष्ट्रवादी आणि भाजपचे आमदार समोरासमोर येणार आहेत.

  • 16 Oct 2024 08:42 AM (IST)

    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु, असं असेल संपूर्ण वेळापत्रक

    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : विधानसभा निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक

    22 ऑक्टोबरला अधिसूचना निघेल
    23 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरता येईल
    29 ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे
    30 ऑक्टोबरला अर्जाची छाननी होईल
    4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे
    20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल