Maharashtra CM Eknath Shinde Resign LIVE : छगन भुजबळ किंवा पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा – मंगेश ससाणे

| Updated on: Nov 26, 2024 | 2:15 PM

Maharashtra CM Eknath Shinde Resign Today LIVE Updates : एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी जोपर्यंत नवीन सरकार येत नाही, तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. आज 26 नोव्हेंबर 2024 राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra CM Eknath Shinde Resign LIVE : छगन भुजबळ किंवा पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा - मंगेश ससाणे
महत्वाची बातमी
Image Credit source: tv9
Follow us on

LIVE NEWS & UPDATES

  • 26 Nov 2024 02:10 PM (IST)

    चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. शरद पवार यांच्या पक्षाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. अजित पवार यांनी घड्याळ चिन्ह वापरून मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. घड्याळ चिन्हासोबत जोडल्या गेलेल्या भावना आणि त्याबाबतचा लाभ घेण्याचाही प्रयत्न केला. याबाबतचे पुरावे म्हणून काही कागदपत्र दाखल करण्याची परवानगी द्या , शरद पवार यांच्या पक्षाने कोर्टात विनंती केले.

  • 26 Nov 2024 02:00 PM (IST)

    देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून हनुमानाला साकडे

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व्हावे याकरिता, भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने सुपारी हनुमान मारुतीला भव्य महाआरती करत, साकडे घालण्यात आले. यावेळी लाडक्या बहिणीचा लाडका, भाऊ देवा भाऊ.. देवा भाऊ.. अशा घोषणा देण्यात आल्या


  • 26 Nov 2024 01:59 PM (IST)

    मुख्यमंत्रीपदाबाबत रामदास आठवले काय म्हणाले?

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असा संदेश भाजपकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलाय असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

  • 26 Nov 2024 01:46 PM (IST)

    छगन भुजबळ किंवा पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा – मंगेश ससाणे

    “OBC विरोधी मुख्यमंत्री आम्हाला नकोय. जरांगेचा खुटा OBC ने उपटला आहे. महायुतीसाठी OBC समाज निर्णायक ठरला आहे. OBC समाजाला मुख्यमंत्री पद द्यावं. छगन भुजबळ किंवा पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करावं अशी आम्ही मागणी करतोय. महायुतीने याचा विचार करावा अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला फटका बसेल” असं OBC आरक्षण बचाव समितीचे मंगेश ससाणे म्हणाले.

  • 26 Nov 2024 01:44 PM (IST)

    EVM बाबत आता सुप्रीम कोर्टाने लक्ष घातले पाहिजे – राजू शेट्टी

    EVM बाबतचा संशय दूर करायचा असेल तर आता निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाने यात लक्ष घातले पाहिजे. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली मागणी.


  • 26 Nov 2024 12:58 PM (IST)

    नवी दिल्लीत नाना पटोले आणि राहुल गांधी यांची बैठक सुरु

    नवी दिल्लीत आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला राहुल गांधी उपस्थित आहेत. त्यासोबतच नाना पटोले, मल्लिकार्जुन खरगे हे देखील या बैठकीत सहभागी झाले आहेत. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होणार आहे.

  • 26 Nov 2024 12:54 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा, आमचा बिनशर्त पाठींबा, अपक्ष आमदाराचे आवाहन

    परभणी : राज्यात महायुतीला मिळालेल्या विजयाचा श्रेय देवेंद्र फडणवीस यांना जाते. भाजपचे 132 आणि अपक्ष 5 अशा 137 आमदारांचा देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा. यासाठी आमचा बिनशर्त पाठिंबा आहे, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेड येथील आमदार रत्नाकर गुट्टे यांचा भाजप पक्षश्रेष्ठींना केले आहे.

  • 26 Nov 2024 12:52 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी, शरद पवारांकडून प्रतिज्ञापत्र दाखल

    नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी आज पार पडणार आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. अजित पवार यांनी घड्याळ चिन्ह वापरून मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. घड्याळ चिन्हासोबत जोडल्या गेलेल्या भावना आणि त्याबाबतचा लाभ घेण्याचाही प्रयत्न केला. याबाबतचे पुरावे म्हणून काही कागदपत्र दाखल करण्याची परवानगी द्या, अशी मागणी शरद पवार यांच्या पक्षाकडून करण्यात आली आहे.

     

     

  • 26 Nov 2024 12:47 PM (IST)

    रावसाहेब दानवे-भूपेंद्र यादव यांच्यासोबत बैठक, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची चाचपणी सुरु

    नवी दिल्ली : विधानसभा निवडणूक संचालन समितीचे प्रमुख रावसाहेब दानवे यांची भूपेंद्र यादव यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय नेतृत्वाकडून चाचपणी करण्यात येत आहे. रावसाहेब दानवे हे सकाळपासून केंद्रीय नेतृत्वाच्या भेटी घेण्यात व्यस्त आहेत.

  • 26 Nov 2024 11:55 AM (IST)

    तीनही पक्षांनी स्पष्ट सांगितलंय की जो निर्णय मोदी आणि शाह घेतील, तो सर्वांना मान्य असेल- केसरकर

    “येत्या काही दिवसांत राज्यात नवं सरकार स्थापन होईल. प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. परंतु तीनही पक्षांनी स्पष्ट सांगितलंय की जो निर्णय मोदी आणि शाह घेतील, तो सर्वांना मान्य असेल. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं ही कायदेशीर तरतूद असते. सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागतो,” असं दीपक केसरकर म्हणाले.

  • 26 Nov 2024 11:48 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व्हावे यासाठी महाआरती अन् साकडं

    छत्रपती संभाजीनगर- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व्हावे याकरिता, भारतीय जनता पार्टी संभाजीनगर शाखेच्या वतीने सुपारी हनुमान मारुतीला भव्य महाआरती करत, साकडे घालण्यात आले. यावेळी लाडक्या बहिणीचा लाडका, भाऊ देवा भाऊ.. देवा भाऊ.. अशा घोषणा देण्यात आल्या.

  • 26 Nov 2024 11:37 AM (IST)

    येणाऱ्या काळात पालकमंत्री शिवसेनेचा असावा अशी आमची मागणी- हेमंत गोडसे

    “एकनाथ शिंदे हे 16 तास काम करणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जितक्या जागा लढल्या होत्या, तेवढ्या जागा निवडून आल्या आहेत. स्ट्राईक रेट सगळ्यांचा चांगला आहे. येणाऱ्या काळात पालकमंत्री शिवसेनेचा असावा अशी आमची मागणी आहे. सत्तेत महायुती आहे, शिवसेनेचा पालकमंत्री असला तर कुंभमेळा चांगला पार पडेल असं वाटतं,” असं मत हेमंत गोडसेंनी नोंदवलंय.

  • 26 Nov 2024 11:26 AM (IST)

    एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

    एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शिंदेंनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.  शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

  • 26 Nov 2024 11:20 AM (IST)

    शिंदेंच्या धाडसी निर्णयांमुळे महायुतीला लोकाभिमुख काम करता आलं- हेमंत गोडसे

    “संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा की शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत. वरिष्ठ पातळीवर चर्चा होतील. मात्र शिंदे साहेबांनी 2 वर्षात अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यामुळे महायुतीला लोकाभिमुख काम करता आलं. सर्वसामान्य माणसाची आणि आमची देखील इच्छा आहे की शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत,” असं हेमंत गोडसे म्हणाले.

  • 26 Nov 2024 11:10 AM (IST)

    राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वैभव पाटील यांचा EVM वर आक्षेप

    सांगलीच्या खानापूर मतदारसंघातून पराभूत झालेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वैभव पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवला आहे. हा कौल जनतेचा नसून ईव्हीएमचा आहे असा आरोप करत हा निकाल अपेक्षित नव्हता, त्यामुळे हे ईव्हीएम मशीन हे यंत्र आहे की, षडयंत्र आहे ? असा सवाल देखील वैभव पाटील यांनी पत्रकार उपस्थित केला आहे.

  • 26 Nov 2024 10:46 AM (IST)

    Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा पदारुढ व्हावेत यासाठी चंद्रपुरात शिवसैनिकांकडून होम हवन

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा पदारुढ व्हावेत यासाठी चंद्रपुरात शिवसैनिकांनी होम हवन केलं आहे… चंद्रपूरच्या देवी महाकाली मंदिरात युवा सेनेच्या वतीने यज्ञाचे आयोजन… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेसह राज्यात राबविलेल्या योजनांमुळेच पुन्हा महायुतीचा विराट विजय झाला असल्याची शिवसैनिकांची भावना…

  • 26 Nov 2024 10:26 AM (IST)

    Maharashtra News: सीएमपदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब – सूत्र

    सीएमपदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब… शिंदेंचे 6, दादांचे 4 आमदार घेणार शपथ… मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे…

     

  • 26 Nov 2024 10:20 AM (IST)

    Maharashtra News: एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला – सूत्र

    एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला… अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे माजी खासदारही दिल्लीत उपस्थित राहणार.. एकनाथ शिंदे यांचे 7 खासदार आणि 4 माजी खासदार पंतप्रधानांची भेट घेणार…

  • 26 Nov 2024 10:09 AM (IST)

    Maharashtra News: लोकसभेच्या वेळी संविधानाबाबत फेक नॅरेटिव्ह सेट केला गेला – अजित पवार

    लोकसभेच्या वेळी संविधानाबाबत फेक नॅरेटिव्ह सेट केला गेला… आम्हाला संविधानाबाबत अतिशय आदर, अभिमान आहे…. असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.

  • 26 Nov 2024 08:57 AM (IST)

    पुणे महानगरपालिकेची निवडणूक लांबणीवर पडणार?

    पुणे महानगरपालिकेच्या अहवालामुळे निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावे वगळल्याने एक प्रभाग कमी होणार असल्याचा महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवला आहे. महापालिकेच्या या अहवालामुळे नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेतील फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावे वगळून नवीन नगरपरिषद करण्यात आल्याने अहवाल सादर करण्यात आला आहे.

  • 26 Nov 2024 08:45 AM (IST)

    पुण्यात दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू

    पुण्यात आणखी दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहे. पुण्याहून देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये आता वाढ झाली आहे. पुण्यातून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमानसेवा सुरू झाली आहे. यामुळे पुण्यातून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या आता चार झाली आहे. पुणे विमानतळाने हिवाळी वेळापत्रकात या नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे नियोजन केले होते. इंडिगो एअरलाइन्सने पुण्याहून बँकॉकसाठी थेट विमानसेवा २२ नोव्हेंबरपासून सुरू केली आहे.

  • 26 Nov 2024 08:34 AM (IST)

    महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?

    विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पण अद्यातपर्यंत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? हे स्पष्टपणे समोर आलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे. तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असल्याचं कळतं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

  • 26 Nov 2024 08:27 AM (IST)

    शरद पवार गटाच्या नेत्यावर हल्ला

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मोताळा तालुकाध्यक्षावर प्राणघातक हल्ल झाला आहे. बुलढाण्यातील तालखेड फाट्या जवळील घटना आहे. चार अज्ञातांनी केला तालुकाध्यक्षवर हल्ला केला आहे. सुनील कोल्हे यांचे हात आणि पाय फ्रॅक्चर आहेत. कोल्हे वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल सायंकाळी चार जणांनी हल्ला केला आहे. कोल्हे शेतातून घरी परतत होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाली आहे. महायुतीला बहुमत मिळालं आहे. आज विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी जोपर्यंत नवीन सरकार येत नाही, तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. त्यामुळे आता नवीन मुख्यमंत्री कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभेतील उमेदवारांना एक महिन्याच्या आत निवडणुकीचा हिशोब द्यावा लागणार आहे. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.