Mumbadevi Vidhan sabha : मुंबादेवी मतदारसंघात इतिहासाची पुनरावृत्ती होणार की नवा इतिहास रचला जाणार ? कशी आहे परिस्थिती ?

| Updated on: Oct 23, 2024 | 3:39 PM

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. मुंबादेवी मतदारसंघाचे नाव हे येथे असलेल्या मुंबा देवी मंदिराच्या नावावरून पडल्याचे सांगितले जाते. सध्या येथे काँग्रेसचे अमीन पटेल हे विद्यमान आमदार आहेत.

Mumbadevi Vidhan sabha :  मुंबादेवी मतदारसंघात इतिहासाची पुनरावृत्ती होणार की नवा इतिहास रचला जाणार ? कशी आहे परिस्थिती ?
Follow us on

राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे, त्या अंतर्गत 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर आजपासून बरोब्बर एका महिन्याने, म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल. राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाची महायुती पुन्हा सत्तेवर येते का महाविकास आघाडी सत्ता स्थापन करते याकडे राज्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वज राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू करत उमेदवारांची यादीही काही पक्षांनी जाहीर केली आहे.

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील मतदार इतिहासाची पुनरावृत्ती करणार की नवा इतिहास रचणार हे तर आता 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. मुंबादेवी मतदारसंघाचे नाव हे येथे असलेल्या मुंबा देवी मंदिराच्या नावावरून पडल्याचे सांगितले जाते. सध्या येथे काँग्रेसचे अमीन पटेल हे विद्यमान आमदार असून तीन वेळा त्यांनी निवडणूक जिंकली आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हटली जाणारी ही जागा गेल्या सहा निवडणुकांपासून काँग्रेसच्या ताब्यात आहे.

2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनेच इथली निवडणूक जिंकली होती. 2019 मध्ये मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अमीन पटेल यांनी विजयाची हॅटट्रिक करत 58 हजार 952 मतं मिळवतं निवडणूक जिंकली. तर 2014 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमीन पटेल यांना 39 हजार 188 मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय जनता पक्षाचे अतुल शहा होते त्यांना 30 हजार 675 मतं मिळाली. 2009 मध्येही अमीन पटेल यांनी 45 हजार मतं मिळवत विजयय संपादन केला होता. तेव्हा मध्ये शिवसेनेचे अनिल चंद्रकांत पडवळ दुसऱ्या क्रमांकावर होते.

यंदा काय असेल चित्र ?

मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चित्र काही वेगळ असू शकते अशी चर्चा आहे. लागोपाठ मिळालेल्या विजयामुळे काँग्रेस या मतदारसंघात रसा बदल करण्याच्या मनस्थितीत नाही. काँग्रेसने अजून उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. मात्र यंदा व्होटिंग ॅटर्न काय असेल हे पाहणंही औत्सुक्याचं ठरेल.

विधानसभा निवडणूक 2019

अमीन पटेल – काँग्रेस – 58952 मतं

पांडुरंग गणपत सकपाळ – शिवसेना – 35297 मतं

बशीर मूसा पटेल – एमआयएम – 6373 मतं

केशव रमेश मुळे – मनसे – 3185

विधानसभा निवडणूक 2014

अमीन पटेल – काँग्रेस – 39188 मतं

अतुल शाह – भाजपा – 30675 मतं

मोहम्मद शाहिद रफी – एमआयएम – 16165 मतं

सळेकर युगंधरा यशवंत – शिवसेना – 15479 मतं

विधानसभा निवडणूक 2009

अमीन पटेल – काँग्रेस – 45285 मतं

अनिल चंद्रकांत पडवळ – शिवसेना – 28646 मतं

बशीर मूसा पटेल – सपा – 19936 मतं

याकूब खान उस्मान खान – स्वतंत्र – 1265 मतं

मुंबादेवी विधानसभा निवडणुकीत झालेल्या गेल्या तीन निवडणुकांचा इतिहास आपण सविस्तरपणे जाणून घेतला. मात्र यावेळी राजकीय समीकरणे वेगळीच दिसत आहेत. शिवसेना उबाठा आणि शिंदे गटाच्या स्थापनेनंतर येथील राजकीय समीकरण खूपच रंजक बनले आहे. काँग्रेसने इथे लागोपाठ विजय मिळवला आहे. मात्र आता शिवसेना तसेच राष्ट्रवादी फुटून दोन गट झाल्यानंतर इथे काय परिस्थिती असेल ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

आता गेल्या वेळी काँग्रेसने या जागेवर विजय मिळवला होता, यावेळी राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्यानंतर येथे काय परिस्थिती असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण आता राष्ट्रवादी [अजित] गट महाआघाडीत सामील झाला आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसने ही जागा जिंकून हॅट्ट्रिक साधली होती, मात्र यावेळी काय होते ते पाहण्यासारखे असेल.यावेळीही काँग्रेसची विजयी पताका मुंबादेवी मतदारसंघात फडकेल की दुसऱ्या पक्षाचा विजयी गुलाला उधळला जाईल हे 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.