नेते तर नेते आता उमेदवारच गायब, पालघरमधून मोठी बातमी

| Updated on: Nov 02, 2024 | 5:04 PM

पालघरमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे नेते श्रीनिवास वनगा हे तिकीट न मिळाल्यानं नॉट रिचेबल झाले होते, त्यानंतर आता एक उमेदवारच गायब झाला आहे.

नेते तर नेते आता उमेदवारच गायब, पालघरमधून मोठी बातमी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Follow us on

पालघरमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे नेते श्रीनिवास वनगा हे तिकीट न मिळाल्यानं नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचा आणखी एक नेता जगदीश धोडी हे गेल्या तीन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. जगदीश धोडी नॉट रिचेबल असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पालघर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले अमित घोडा हे आता गायब आहेत. अमित घोडा यांनी भाजपमधून बंडखोरी करत पालघर विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र ते गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची बातमी समोर आली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी त्यांची समजूत काढण्यासाठी सातत्यानं वरिष्ठांकडून फोन येत असल्यानं अमित घोडा हे नॉट रिचेबल झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. शिवसेनेकडून यावेळी माजी खासदार राजेंद्र गावीत यांना पालघरमधून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. अमित घोडा यांनी बंडखोरी करत गावित यांच्याविरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांची देखील भेट घेतली होती.

हे सुद्धा वाचा

दरम्यान दुसरीकडे शिवसेनेचे आणखी एक नेते जगदीश धोडी हे गेल्या तीन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. ते शिवसेना शिंदे गटाचे आदिवासी राज्य संघटक आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आहेत. भाजपमधून आयात केलेल्या उमेदवारांना उमेदवारी मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज असल्याचं त्यांनी नॉट रिचेबल होण्यापूर्वी म्हटलं होतं. . जगदीश धोडी यांनी बोईसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे यांच्या विरोधात बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . त्यानंतर ते नॉट रिचेबल झाले आहेत. जगदीश धोडी हे नॉट रिचेबल झाल्यानं शिवसेनेची डोकेदूखी वाढण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये शिवसेनेच्या वाट्याला दोन विधानसभा मतदारसंघ आले आणि दोन्हीमध्ये देखील भाजपकडून आयात केलेल्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे पालघरमधील शिनसेना नेते नाराज असल्याचं चित्र आहे.