सावरकरांवर टीका, तरीही काँग्रेसची हुजरेगिरी सुरूच; नरेंद्र मोदी यांचा उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा

| Updated on: Oct 05, 2024 | 6:10 PM

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वाशिममधील काही विकास कामांचे उद्धाटन केले. त्यानंतर नरेंद्र मोदींनी ठाण्यातील काही प्रकल्पांचे लोकार्पण केले.

सावरकरांवर टीका, तरीही काँग्रेसची हुजरेगिरी सुरूच; नरेंद्र मोदी यांचा उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे
Follow us on

PM Narendra Modi Thane speech : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी वाशिममधील काही विकास कामांचे उद्धाटन केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाण्यात हजेरी लावली. यावेळी त्यांनी मेट्रोसह अनेक विकासकामांचे लोकापर्ण केले.

“काँग्रेससोबत राहून इतर पक्षही बर्बाद”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण्यात जोरदार भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. “मुंबईत आम्हाला विकास करायचे आणि काँग्रेसने केलेल्या खड्डे भरायचे आहे. काँग्रेसने केलेल्या या खड्ड्यांमुळे मुंबईचा विकास थांबला होता. मुंबईमधील वाहतूक वाढत होती. परंतु त्यावर उपाय काढले जात नव्हते. आमच्या सरकारने ही परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला. काँग्रेससोबत राहून इतर पक्षही बर्बाद होत आहे”, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.

“काँग्रेसचे चेले त्यांच्या पाठी उभे राहतात”

“जे आधी राष्ट्रवादावर बोलायचे ते आता लांगूलचालन करत आहे. आम्ही वक्फ बिल आणलं. पण लांगूलचालून करण्याच्या राजकारणात काँग्रेसचे नवीन चेले आम्हाला विरोध करत आहे. वक्फच्या अवैध जमिनी घेऊ देणार नाही, असं ते म्हणत आहे. वीर सावरकारांवर काँग्रेस टीका करते. तेव्हाही काँग्रेसचे चेले त्यांच्या पाठी उभे राहत आहे”, अशीही खोचक टीका नरेंद्र मोदींनी केली.

“काँग्रेस म्हणते जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम लागू करू. पण काँग्रेसच्या चेलांची बोलती बंद आहे. नवीन व्होट बँकेसाठी विचारधारेचं एवढं पतन, काँग्रेसची अशी हुजरेगिरी, काँग्रेसचं भूत ज्याच्या अंगात जातं त्याची हीच अवस्था होते. मी गेल्या काही दिवसांचा काही पिक्चर तुमच्यासमोर ठेवला आहे. संपूर्ण नाही. कारण वेळेची मर्यादा आहे. काँग्रेस पूर्वीपासूनच हे करत आहे. महाराष्ट्रात आतापासूनच काँग्रेस रंग दाखवत आहे”, असे नरेंद्र मोदींनी म्हटले.

महाविकास आघाडीला संधी मिळाली तर योजनांना टाळं

“आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली. बहिणींना १५०० महिना आणि तीन एलपीजी सिलिंडर मोफत करत आहे. महाविकास आघाडीना हे पचनी पडत नाही. महाविकास आघाडीला संधी मिळाली तर काहीच मिळणार नाही. सर्वात आधी काम शिंदेंवर राग काढतील आणि शिंदेंनी ज्या योजना केल्या त्यावर टाळं लावतील”, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.