महाविकासआघाडीत नाराजीनाट्य, काँग्रेसचे अनेक नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला, नेमकं घडतंय काय?

| Updated on: Nov 11, 2024 | 11:54 AM

काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे नाराज झाले होते. ते प्रचारात सहभागीही होत नव्हते. यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल भाषणादरम्यान काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेना प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

महाविकासआघाडीत नाराजीनाट्य, काँग्रेसचे अनेक नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला, नेमकं घडतंय काय?
Follow us on

Solapur South Constituency : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडत आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यातच आता सध्या महाविकासआघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात महाविकासआघाडीमध्ये उमेदवारीवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झाले होते. आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे अनेक नेते हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला दाखल झाले आहेत.

नेमकं काय घडतंय?

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या दिलीप माने यांना डावलून ठाकरे गटाचे अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाला होता. यामुळे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे नाराज झाले होते. ते प्रचारात सहभागीही होत नव्हते. यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल भाषणादरम्यान काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेना प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

यानंतर आता सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. काल दक्षिण सोलापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर चेतन नरोटे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. प्रणिती शिंदे हा सध्या सोलापुरात नसल्याने त्यांच्यावतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे हे भेटीसाठी दाखल झाले आहेत.

काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला

यानंतर आता काँग्रेसचे पंढरपूरचे उमेदवार भगीरथ भालके हे देखील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या सर्वच नेत्यांना महाविकास आघाडीचे काम करण्याचे आवाहन केले होते. उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर महायुतीतील नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि सोलापूर मध्यचे उमेदवार चेतन नरोटे, पंढरपूरचे उमेदवार भगीरथ भालके ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात महाविकासआघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. काँग्रेसकडून भगीरथ भालकी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अनिल सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. तर सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसच्या दिलीप माने यांना डावलून ठाकरे गटाच्या अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच्या प्रचारात खासदार प्रणिती शिंदे या सहभागी होत नसल्याचे पहाायला मिळाले होते.