EC Announced Maharashtra Assembly Election Voting and Result Date LIVE : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा अखेर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल, अशी महत्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे.
महाराष्ट्रासोबत झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. झारखंडमध्ये १३ नोव्हेंबरला निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडेल. तर २० नोव्हेंबरला निवडणुकांचा दुसरा टप्पा पार पडेल. विशेष म्हणजे येत्या २३ नोव्हेंबरला झारखंडमध्ये मतमोजणी केली जाणर आहे.
झारखंडमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख 18 ऑक्टोबर असणार आहे. ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 30 ऑक्टोबर आहे. दोन टप्प्यात निवडणुका होणार असून पहिल्या टप्प्यासाठी 13 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे.
Maharashtra Assembly Election Date 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु
– महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार
– 22 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरता येणार
– 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख
– 30 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होणार
– 4 नोव्होंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
– 20 नोव्होंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार
– 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार
महाराष्ट्रासोबत झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. झारखंडमध्ये १३ नोव्हेंबरला निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडेल. तर २० नोव्हेंबरला निवडणुकांचा दुसरा टप्पा पार पडेल. विशेष म्हणजे येत्या २३ नोव्हेंबरला झारखंडमध्ये मतमोजणी केली जाणर आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच फेजमध्ये होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल, अशी महत्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, २० नोव्हेंबरला होणार मतदान
Maharashtra Election 2024 Date: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान; वाचा A टू Z माहितीhttps://t.co/6cSz2Gyie7 #MaharashtraElection2024
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 15, 2024
Maharashtra Assembly Election Date 2024 : सर्व पोलिंग स्टेशनवर सर्व सुविधा देण्यात येणार आहे. आम्ही रिव्ह्यू केला आहे. बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना डीओबी जाहीर करण्यात आलं आहे. ते सर्व रिसोर्स वापरतील.
लाइनच्यामध्ये खुर्ची आणि बेंच ठेवणार आहे. रांगेत उभं राहणाऱ्यांना बसायला मिळेल. थकवा दूर होईल.
ज्येष्ठ नागरिकांना मतदान करणं सोपं जावं यासाठी ८५ वर्षाच्या वरच्या व्यक्तीला घरून मतदान करता येणार आहे. फॉर्म भरून देणाऱ्याकडे आमची टीम तिकडे जाणार आहे. तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे. त्यांनाही सोबत घेतलं जाईल. सर्व गोष्टींची व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे. रेकॉर्ड ठेवलं जाणार आहे. प्रत्येक निवडणुकीत व्हिडीओग्राफी केली जाते.
महाराष्ट्रात १ लाख १८६ पोलिंग स्टेशन, 57 हजार 601 ग्रामीण पोलिंग स्टेशन, शहरी 42 हजार 582 पोलिंग स्टेशन
85 वर्ष वरच्या मतदारांना घरातून मतदान करता येणार
मोठीं रांग असेल तर मध्ये खुर्ची व्यवस्था केली जाणार
Maharashtra Assembly Election Date 2024 : महाराष्ट्रात एकूण मतदार ९.६३ कोटी मतदार आहेत.
यात पुरुष मतदारांची संख्या ४.९७ कोटी इतकी आहे. तर ४.६६ कोटी या महिला मतदार आहेत. यात २०.९९ लाख लोक हे पहिल्यांदा मतदान करणार आहे.
Maharashtra Assembly Election Date 2024 : येत्या २६ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रात नवीन सरकार बनेल – केंद्रीय निवडणूक आयोग
अवघ्या काही मिनिटांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची नवी दिल्लीत पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी पत्रकार परिषद होणार आहे. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम होणार केला जाणार आहे. महाराष्ट्रात नक्की किती टप्प्यांमध्ये आणि केव्हा मतदान होणार? तसेच मतमोजणी अर्थात निकाल केव्हा जाहीर केला जाणार? याकडे राजकीय पक्षांसह साऱ्या नागरिकांचं लक्ष लागून आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : वायनाडसह लोकसभेच्या 3 जागांवरही पोटनिवडणूक होऊ शकते, दोन्ही राज्यांतील निवडणुकांसह 13 राज्यांमधील 3 लोकसभा आणि 49 विधानसभा जागांवरही पोटनिवडणूक होऊ शकते. राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड मतदारसंघातून राजीनामा दिला आहे. काँग्रेस खासदाराच्या निधनामुळे महाराष्ट्रातील नांदेडची जागा रिक्त झाली आहे.
पश्चिम बंगालमधील बशीरहाट ही जागा तृणमूलच्या खासदाराच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. याशिवाय 13 राज्यांतील 49 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकाही जाहीर होऊ शकते. यामध्ये उत्तर प्रदेशातील 10 जागांचा समावेश आहे. राजस्थानची 7, पश्चिम बंगालची 6, आसामची 5, बिहारची 4, पंजाबची 4, कर्नाटकची 3, केरळची 3, मध्य प्रदेशची 2, सिक्कीमची 2, गुजरातची 1, उत्तराखंडची 1 आणि उत्तराखंडची 1 विधानसभा छत्तीसगडच्या जागांचा समावेश आहे.
काँग्रेसला 100 पेक्षा अधिक जागा मिळाव्यात ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे मात्र याबाबत योग्य तो निर्णय राज्यातील नेतृत्व आणि दिल्लीतील नेतृत्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वासात घेऊन करेल असे कॉंग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे.
धुळे शहर विधानसभेची जागा महायुतीमधून राष्ट्रवादी कॉंग्रेस लढवणार असल्याचे युवक जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी म्हटले आहे.
Maharashtra Election Date 2024 Announcement LIVE : महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर 2019 रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. पण यंदा हरियाणा विधानसभेची निवडणुकांची घोषणा आधी झाली.
Maharashtra Election Date 2024 Announcement LIVE : महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Maharashtra Election Date 2024 Announcement LIVE : महाराष्ट्र विधानसभा निकाल 2019 पक्षीय बलाबल काय?
भाजप – 105
शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 44
बहुजन विकास आघाडी – 03
प्रहार जनशक्ती – 02
एमआयएम – 02
समाजवादी पक्ष – 02
मनसे – 01
माकप – 01
जनसुराज्य शक्ती – 01
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01
शेकाप – 01
रासप – 01
स्वाभिमानी – 01
अपक्ष – 13
एकूण – 288
Maharashtra Election Date 2024 Announcement LIVE : 2019 मधील निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकासआघाडी स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मात्र अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेच्या 40 आमदारांसह पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी महायुतीमध्ये त्यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्यात आलं. यानंतर 2023 मध्ये अजित पवारही महायुतीमध्ये सहभागी झाले.
Maharashtra Election Date 2024 Announcement LIVE : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर ही पहिली विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठे राजकीय भूकंप झाले आहेत. सर्वात आधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं, यानंतर एकनाथ शिंदे भाजपच्या साथीनं महायुती सरकारमध्ये जात स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यानंतर अजित पवार राष्ट्रवादीत बंड करत महायुतीत सहभागी झाले. यानंतर या दोघांनीही थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा ठोकला. यामुळे राज्याच्या राजकारणाला हादरे बसले.
Maharashtra Election Date 2024 Announcement LIVE : 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या आणि काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.
Maharashtra Election Date 2024 Announcement LIVE : महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती होती. पण यंदा हे चित्र पूर्णपणे बदललं आहे.
Maharashtra Election Date 2024 Announcement LIVE : निवडणूक आयोगाची आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणूक तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यात आजपासूनच आचारसंहिता लागणार असल्याचे बोललं जात आहे.