Maharashtra Assembly Election 2024 Voting LIVE : वरळीकर सुज्ञ, शिंदे गटाला कोणताही पाठिंबा नाही – राज ठाकरे

| Updated on: Nov 20, 2024 | 11:00 AM

Maharashtra Assembly Elections 2024 Voting LIVE : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू झालं आहे. राज्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे. राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अनेक मतदारसंघांवर तर सकाळपासूनच रांगाच रांगा लागल्या आहेत. मतदार मोठ्या संख्येने मतदानाला उतरल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तर, आज संध्याकाळी उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार असून येत्या 23 तारखेला त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Voting LIVE : वरळीकर सुज्ञ, शिंदे गटाला कोणताही पाठिंबा नाही - राज ठाकरे
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Follow us on

LIVE NEWS & UPDATES

  • 20 Nov 2024 11:00 AM (IST)

    Maharashtra Assembly Elections 2024 : नवी मुंबई – नेरुळमध्ये मतदान केंद्राजवळ राऊटर आढळल्याने खळबळ

    नवी मुंबईतील नेरूळमधील शिवाजीनगर मतदान केंद्राजवळ राऊटर आढळले. एका वाहनात हे राऊटर आढळले असून तुर्भे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

  • 20 Nov 2024 10:57 AM (IST)

    Dhule Assembly Elections 2024 : धुळे शहर मतदार संघातील विद्यावर्धिनी महाविद्यालयात मतदान यंत्र बंद..

    धुळे शहरात दोन ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड , साक्री मतदारसंघातील जामदा येथे काही काळ मतदान केंद्रामध्ये बिघाड तर धुळे शहरातील विद्यावर्धिनी येथील मतदान केंद्रामध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली. मतदान यंत्र बंद पडल्याने मतदानाचा खोळंबा, काही काळ मतदारांना ताटकळत उभे राहण्याची वेळ आली होती. ही बाब लक्षात प्रशासनाने योग्य कारवाई करण्यासाठी पाऊले उचलली, मतदान पुन्हा सुरू.

     


  • 20 Nov 2024 10:54 AM (IST)

    Maharashtra Assembly Elections 2024 : वरळीकर सुज्ञ, शिंदे गटाला कोणताही पाठिंबा नाही – राज ठाकरे

    जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून मतदान कराव, राज ठाकरेंनी मतदारांना केलं आवाहन. वरळीत शिंदे गटाला कोणताही पाठिंबा दिलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

  • 20 Nov 2024 10:50 AM (IST)

    Sangli Assembly Elections 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनीही केलं मतदान

    राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील साखराळे या गावी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

  • 20 Nov 2024 10:42 AM (IST)

    Nagpur Assembly Elections 2024 : देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

    विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. देवेंद्र फडणवीस यंदाही निवडणुकीच्या रिंगणात असून ते नागपूर दक्षिण-पश्चिममधून निवडणूक लढवत आहेत.

    सर्वांनी मतदान करा. लोकशाहीमध्ये आपण सरकारकडून अपेक्षा ठेवतो, त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो, त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. आपल्या सरकारकडून आपल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल तर सर्वांनी भरभरून मतदान करावं, असं आवाहन फडणवीस यांनी मतदारांना केलं.


  • 20 Nov 2024 10:37 AM (IST)

    अतुल बेनके यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

    जुन्नर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार अतुल बेनके यांनी सहकुटुंब नारायणगाव येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अतुल बेनके यांनी जनता माझ्याच पाठीशी असून मलाच पुन्हा संधी देतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

  • 20 Nov 2024 10:34 AM (IST)

    आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण – शर्मिला ठाकरे

    राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यानंतर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. मी त्याच्यासोबत २० दिवस प्रचार केला आहे. लोकांनाही एक चांगला उमेदवार उभा आहे याचा आनंद आहे, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

  • 20 Nov 2024 10:28 AM (IST)

    Maharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

    Maharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी जनतेला केले.

  • 20 Nov 2024 10:25 AM (IST)

    Maharashtra Assembly Elections 2024 : धुळे शहर विधानसभा मतदारसंघात भाजप व वंचित कार्यकर्त्यांमध्ये राडा , पैसे वाटल्याचा आरोप

    धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील शिवाजी हायस्कूल परिसरात भाजप व वंचित कार्यकर्त्यांमध्ये राडा. पैसे वाटपाच्या संशया वरून या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला राडा. यादरम्यान मतदान केंद्रावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तात्काळ दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थिती आटोक्यात आणली.

  • 20 Nov 2024 10:16 AM (IST)

    Maharashtra Assembly Elections 2024 : शिर्डी विधानसभेत परराज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मतदान केल्याचा आरोप

    शिर्डी विधानसभेत परराज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मतदान केल्याचा आरोप करण्यात आला. शिर्डी विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी हा आरोप केला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.

  • 20 Nov 2024 10:13 AM (IST)

    Pune Poll Percentage : पुणे जिल्ह्यात सकाळी 9 पर्यंत 5.53% मतदान.

    पुणे जिल्ह्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत 5.53% मतदान झालं आहे. पुणे शहरातील 8 विधानसभा मतदार संघातील सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान किती झालं त्याची टक्केवारी खालीलप्रमाणे :

    कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ 7.44%. मतदान.

    पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ 5.53% मतदान.

    हडपसर विधानसभा मतदारसंघ 4.45 टक्के मतदान.

    पर्वती विधानसभा मतदारसंघ 6.30% मतदान.

    खडकवासला विधानसभा मतदारसंघ 5.44% मतदान.

    कोथरूड विधानसभा मतदारसंघ 6.50% मतदान.

    शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ 5.29% मतदान.

    वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ 6.37% मतदान.

     

  • 20 Nov 2024 10:03 AM (IST)

    Ratnagiri Poll Percentage : रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी किती झालं मतदान ?

    रत्नागिरी जिल्हा मतदानाची आकडेवारी 9 पर्यंत

    जिल्ह्याची सरासरी टक्केवारी : 8.96 %

    मतदारसंघाची टक्केवारी

    1)263 – दापोली – 8.54 %
    2)264 – गुहागर – 9.16
    3)265 – चिपळूण – 10.14
    4)266 – रत्नागिरी – 9.07
    5)267 – राजापूर – 8.89

  • 20 Nov 2024 09:59 AM (IST)

    नांदगाव-मनमाड रस्त्यावर दोन गटांमध्ये तूफान राडा, काय आहे प्रकरण ?

    सुहास कांदेंनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवलं. नांदगाव-मनमाड रस्त्यावरील प्रकार , दोन्ही गटांमध्ये तूफान राडा सुरू आहे.

  • 20 Nov 2024 09:56 AM (IST)

    Poll Percentage : जालना जिल्ह्यात सकाळी 9 पर्यंत किती मतदान झालं ?

    जालना जिल्ह्यात सकाळी 9 पर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी :

    99, परतूर विधानसभा मतदारसंघ

    सकाळी 9 वाजेपर्यंत – 6.22 टक्के

    100, घनसावंगी विधानसभा मतदारसंघ

    सकाळी 9 वाजेपर्यंत – 7.6 टक्के

    101,जालना विधानसभा मतदारसंघ

    सकाळी 9 वाजेपर्यंत – 7.7 टक्के

    102, बदनापुर विधानसभा मतदारसंघ (एससी राखीव)

    सकाळी 9 वाजेपर्यंत – 8.2 टक्के

    103, भोकरदन विधानसभा मतदारसंघ

    सकाळी 9 वाजेपर्यंत – 8.25 टक्के

  • 20 Nov 2024 09:51 AM (IST)

    Poll Percentage : ठाणे जिल्ह्यात दोन तासांत किती झालं मतदान ?

    विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात सकाळी सातपासून मतदान सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील सकाळी 7 ते 9.00 पर्यंत एकूण 6.66 टक्के मतदान झालंय.

  • 20 Nov 2024 09:48 AM (IST)

    Navi Mumbai Poll Percentage : नवी मुंबईत सकाळी 9 पर्यंत किती झालं मतदान ?

    नवी मुंबईत 7 ते 9 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी –

    ऐरोली विधानसभा 6. 98 % मतदान.

    बेलापूर बिधानसभा 7.32% मतदान.

     

  • 20 Nov 2024 09:40 AM (IST)

    Mulund Poll Percentage : मुंबई उपनगरात मुलुंड मध्ये सर्वाधिक मतदान

    मुंबई उपनगरात मुलुंड मध्ये सर्वाधिक मतदान झालं आगे. मुलुंड विधानसभेत पहिल्या दोन तासांत 10.71 टक्के मतदान झालं आहे. तर वांद्रे पूर्व याठिकाणी सर्वात कमी म्हणजे 5.04 टक्के मतदान झालं.

  • 20 Nov 2024 09:36 AM (IST)

    Latur Assembly Elections 2024 : रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख यांनी बजावला मतदानाचा अधिकार

    अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी लातूरमध्ये मतदानकेंद्रावर जाऊन मतदानाचा अधिकार बजावला. सर्वसामान्यांसह रांगेत उभं राहून त्यांनी मतदान केलं. निवडणुकीत दोन्ही भावांच्या प्रचारासाठी रितेश देशमुख होता सक्रीय, अनेक ठिकाणी भाषणंही केली.

  • 20 Nov 2024 09:33 AM (IST)

    Maharashtra Assembly Elections 2024 : परळी मतदारसंघात बोगस मतदान सुरू, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा आरोप

    परळी मतदारसंघात धर्मापुरी बूथवर बोगस मतदान सुरू आहे, असा आरोप शरद पवार गटातील उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे. सीसीटीव्ही बंद करून बोगस मतदान करण्यात येत असल्याच्या गंभीर आरोपामुळे केंद्रावर गोंधळ माजला आ

  • 20 Nov 2024 09:26 AM (IST)

    Washim Poll Percentage : विधानसभा निवडणुकीत सकाळी 9 वाजेपर्यंत वाशिम जिल्ह्यात तिन्ही मतदारसंघात सरासरी 5 टक्के मतदान

    विधानसभा निवडणुकीत सकाळी 9 वाजेपर्यंत वाशिम जिल्ह्यात तिन्ही मतदारसंघात सरासरी 5 टक्के मतदान झाले आहे.

    वाशिम: 6.38%

    रिसोड: 5.38%

    कारंजा: 4.06% मतदान

  • 20 Nov 2024 09:16 AM (IST)

    Maharashtra Assembly Elections 2024 : अहिल्यानगर – खासदार निलेश लंके यांनी बजावला मतदानाचा हक्क

    अहिल्यानगरमध्ये खासदार निलेश लंके यांनी बजावला मतदानाचा हक्क. पारनेर सह राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असा विश्वास निलेश लंके यांनी व्यक्त केला.

  • 20 Nov 2024 09:09 AM (IST)

    Baramati Assembly Elections 2024 : बारामतीमध्ये पवार. वि. पवार सामना, शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार

    राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा अधिकार. महाराष्ट्राच्या जनतेवर माझा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत असून संपूर्ण राज्याचे लक्ष बारामतीतील लढतीकडे लागलं आहे. तेथे पवार वि. पवार असा सामना रंगणार असून अजित पवार वि. युगेंद्र पवार यांच्यात लढत आहे. बारामतीची जनता कोणत्या पवारांना कौल देते हे 23 तारखेलाच स्पष्ट होईल.

     

  • 20 Nov 2024 09:00 AM (IST)

    Maharashtra Assembly Elections 2024 : राज ठाकरे यांच्या बनावट सहीचं पाठिंबापत्र तयार केल्याचा आरोप , शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याविरोधात मनसेची तक्रार

    वरळीत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याविरोधात मनसेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरे यांच्या बनावट सहीचं पाठिंबापत्र तयार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मनसेचा शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा असा उल्लेख खोट्या पत्रात करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या खोट्या प्रचारावर विश्वास ठेवू नका असं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

  • 20 Nov 2024 08:54 AM (IST)

    Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी बजावला मतदानाचा हक्क

    भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मतदानाचा हक्क बजावला. महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात कल्याणकारी योजना आणल्या, त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुती कार आणण्यासाठी राज्यभरातील लोक उत्सुक आहेत. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय नेते आहेत त्यांना कुठेतरी जाऊन पैसे वाटप करण्याची गरज नाही. तावडे यांनी पैसे वाटल्याचे आरोपात कोणतंही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी मतदानानंतर दिली.

  • 20 Nov 2024 08:47 AM (IST)

    Maharashtra Assembly Elections 2024 : चाळीसगाव – मॉक पोलदरम्यान 7 व्हीव्हीपॅड , दोन कंट्रोल मशीन बदलली

    मॉक पोलदरम्यान चाळीसगाव मध्ये सात व्हीव्हीपॅड तसेच दोन कंट्रोल मशीन बदलण्यात आली. मात्र याचा मतदानावर कुठलाही परिणाम झाला नाही. मॉक पोलदरम्यान व्हीव्हीपॅड व कंट्रोल मशीन मध्ये बिघाड झाल्याने ते बदलण्यात आले. व्हीव्हीपॅड व कंट्रोल मशीन बदलण्यात आलेल्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.

  • 20 Nov 2024 08:42 AM (IST)

    Maharashtra Assembly Elections 2024 : धुळ्यात 500 महिला एकाच वेळी वाजत गाजत मतदानासाठी निघाल्या

    धुळ्यामध्ये तब्बल 500 महिला एकाच वेळी मतदानासाठी निघालेल्या आहेत. सर्वांनी बाहेर पडून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, ही जनजागृती करण्यासाठी या महिला एकत्रितपणे वाजत गाजत मतदान केंद्रावर जाण्यासाठी निघाल्या आहेत.

  • 20 Nov 2024 08:36 AM (IST)

    Maharashtra Assembly Elections 2024 : रामनगर गावाचा मतदानावर बहिष्कार

    कन्नड तालुक्याती  रामनगर गावाने मतदानावर बहिष्कार टाकला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रावर शुकशुकाट पसरला आहे. गावात पायभूत सुविधा नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

  • 20 Nov 2024 08:32 AM (IST)

    Maharashtra Assembly Elections 2024 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही केलं मतदान

    क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. सचिनने संपूर्ण कुटुंबासह मतदान केलं. सर्वांनी बाहेर पडून मोठ्या प्रमाणाता मतदान करा, मतदानाचा हक्क जरूर बजावा, असं आवाहन सचिनने नागरिकांना केलं.

  • 20 Nov 2024 08:27 AM (IST)

    Maharashtra Assembly Elections 2024 : नांदगाव मतदारसंघातील मतदान केंद्रावरील ईव्हीएम दोनदा पडलं बंद

    नांदगाव मतदारसंघातील 164 नंबर मतदान केंद्रावरील मशीन पडले दोनदा बंद पडले. न्यू.इंग्लिश स्कूल येथील आदर्श महिला मतदान केंद्रावरील १६४ नंबरचे मतदान केंद्रांवरील प्रकार असून दोनदा मशीन बंद झाल्याने मतदार ताटकळले. ईव्हीएम पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • 20 Nov 2024 08:23 AM (IST)

    Baramati Assembly Elections 2024 : सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा अधिकार

    सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. बारामतीमध्ये पुन्हा पवार.वि.पवार असा सामना रंगला आहे. सर्व जनतेने बाहेर पडून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं. कथित ऑडिओ क्लिपमधील आवाज आपला नसल्याचेही स्पष्ट करत सुप्रिया सुळे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

     

  • 20 Nov 2024 08:18 AM (IST)

    Maharashtra Assembly Elections 2024 : मनसेचे इंजिन जोरात धावणार – मतदानानंतर अमित ठाकरेंना विश्वास

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यंदा मनसेचे इंजिन जोरात धावणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • 20 Nov 2024 08:14 AM (IST)

    Maharashta Assembly Elections 2024 : युगेंद्र पवारांनी कुटुंबियासह केलं मतदान

    युगेंद्र पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. युगेंद्र पवार हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांचा सामना अजित पवार यांच्याविरोधात आहे. बारामतीची जनता कोणाच्या पारड्यात कौल टाकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

  • 20 Nov 2024 08:10 AM (IST)

    Baramati Assembly Elections 2024 : बारामतीमध्ये सुप्रिया सुळे मतदानाठी मतदान केंद्रावर दाखल

    बारामतीमध्ये सुप्रिया सुळे मतदानाठी मतदान केंद्रावर दाखल झाल्या असून थोड्यात वेळात मतदानाचा हक्क बजावतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक असून येथे पवार वि. पवार असा सामना रंगणार आहे.

  • 20 Nov 2024 08:08 AM (IST)

    Maharashtra Assembly Elections 2024 : वरूण सरदेसाईंनी बजावला मतदानाचा हक्क.

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत असून सकाळी 7 पासूनच अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार वरूण सरदेसाई सुद्धा यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांचा सामना झिशान सिद्दीकी यांच्याविरोधात होत आहे. वरूण सरदेसाई यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला.

  • 20 Nov 2024 08:02 AM (IST)

    Malshiras Assembly Elections 2024 : माळशिरस विधानसभा मतदारसंघात मविआचे उत्तम जानकर यांच्याकडून मतदान

    माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर यांनी माळशिरस तालुक्यातील धानोरे गावात केले मतदान.

  • 20 Nov 2024 07:53 AM (IST)

    Shiwadi Assembly Election : शिवडी विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी यांचं मतदान

    शिवडी विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाला जाण्यापूर्वी अजय चौधरी यांचं औक्षण करण्यात आलं.

  • 20 Nov 2024 07:51 AM (IST)

    जळगाव – जामोद मतदारसंघात स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर हल्ला

    जळगाव – जामोद मतदारसंघात स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. शेगाव ते कालखेड गावाजवळ अज्ञात दुचाकी स्वारांकडून सकाळी साडेपाच ते पावणे सहा दरम्यान हल्ला झाला. हल्यानंतर प्रशांत डिक्कर यांच्यावर अकोला येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

  • 20 Nov 2024 07:46 AM (IST)

    Maharashtra Assembly Election : अभिनेता राजकुमार रावने बजावला मतदानाचा हक्क

    अभिनेता राजकुमार रावने मुंबईत मतदानाचा हक्का बजावला. सर्वांनी बाहेर पडून जास्तीत जास्त प्रमाणात करा मतदान, मतदारांना केलं आवाहन.

     

  • 20 Nov 2024 07:42 AM (IST)

    Ghatkopar Assembly Election : घाटकोपरमध्ये भाजपाचे उमेदवार पराग शाह यांचं मतदान

    राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज निवडणूक होत असून सकाळी 7 पासून मतदानास सुरूवात झाली आहे. घाटकोपर पूर्व भाजपचे ऊमेदवार पराग शाह यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.

     

  • 20 Nov 2024 07:38 AM (IST)

    Maharashtra Assembly Election : अभिनेता अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क

    अभिनेता अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क. वांद्रे येथील पाली हिल मतदान केंद्रावर अक्षय कुमारने मतदान केलं. सकाळी सात वाजता सर्वात प्रथम येऊन केलं मतदान.

     

  • 20 Nov 2024 07:26 AM (IST)

    Maharashtra Assembly Election : मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात मशीन बंद, मतदान थांबलं

    मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत बूथ क्रमांक 292 येथील मशीन बंद असल्याने मतदान प्रक्रिया थांबली आहे. सकाळी 7 पासून मशीन इन्व्हॅलिड दाखवत असल्याने मतदान प्रक्रिया पूर्णपणे ठप्प असून अनेक मतदार रांगेत ताटकळत उभे आहेत.

  • 20 Nov 2024 07:22 AM (IST)

    Maharashtra Assembly Election : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदानास सुरुवात

    कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मतदानासाठी नागरिकांची मोठी गर्दी असून मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत.

  • 20 Nov 2024 07:19 AM (IST)

    Maharashtra Assembly Election Voting : नांदेड मधील मतदान केंद्रावर 10 मिनिटे विलंबाने मतदान प्रक्रियेला सुरुवात.

    नांदेडमधील आंबेडकर नगर मतदान केंद्रावर रूम नंबर दोन मध्ये 10 मिनिटे विलंबाने मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. कर्मचाऱ्याकडून शाईच्या बॉटलचे झाकण निघत नसल्याने मतदान प्रक्रियेला विलंब. नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे .

  • 20 Nov 2024 07:13 AM (IST)

    Nagpur Assembly Election : सरसंघचालक मोहन भागवतांचं मतदान

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

  • 20 Nov 2024 07:10 AM (IST)

    Baramati Assembly Election : बारामतीमध्ये अजित पवार, सुनेत्रा पवारांनी केलं मतदान

    बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. बारामतीमधील जनता यावेळी मला मोठ्या मताधिक्याने निवडून देईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

  • 20 Nov 2024 06:56 AM (IST)

    Maharashtra Assembly Elections 2024 : प्रत्येकाने सद् विवेकबुद्धीने मतदान करावं, कोणाच्याही दबावाला बळी पडू नये – अजित पवारांचे मतदारांना आवाहन

    खुल्या वातावरणात सर्वांनी मतदान करावं. कोण चांगल्या प्रकारे काम करू शकेल, नेतृत्व करू शकेल याचा मनाापासून विचार करावा, प्रत्येकाने आपल्या सद् विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावं. जनतेने कोणाच्याही दबावाला बळी पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मतदारांना केलं

  • 20 Nov 2024 06:47 AM (IST)

    Maharashtra Assembly Elections 2024 : परळी विधानसभेसाठी आज मतदान, धनंजय मुंडे वि. राजासाहेब देशमुख रंगणार सामना

    परळी विधानसभेसाठी आज मतदान होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची संपूर्ण तयारी आहे. परळी मतदारसंघांमध्ये एकूण 12 संवेदनशील केंद्र आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार 11 रिंगणात आहेत मात्र मुख्य लढत दोघांमध्ये असणार आहे. महायुतीचे धनंजय मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे राजासाहेब देशमुख असा सामना रंगणार आहे.

  • 20 Nov 2024 06:43 AM (IST)

    Maharashtra Assembly Elections 2024 : थोड्याच वेळात मतदानाला होणार सुरूवात

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. थोड्याच वेळात सर्वत्र मतदानाला सुरूवात होणार असून निवडणूक आयोग सज्ज आहे.या निवडणुकीत महायुती-महाविकास आघाडीच्या प्रमुख 6 पक्षांमध्ये थेट टक्कर आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. आज सकाळी 7 पासून राज्यभरात असंख्य मतदारांनी मतदानाचं कर्तव्य पार पाडलं असून अनेक नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. आज सकाळी 7 पासून राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे की इतरांच्या मदतीने कुणाचे सरकार येणार हे लवकरच स्पष्ट होईल. त्यासाठी आज मतदार कोणाच्या पारड्यात मताचा कौल टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मतदान सुरळीत पार पडावं म्हणून निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकूण 25 हजार 696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदानाचे प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे अपडेट जाणून घेण्यासाठी दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.