Bhokar Vidhan Sabha : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप मारणार का मुसंडी ? माजी मुख्यमंत्र्यांची लेक भोकरमध्ये फडकवणार का विजयी झेंडा ?

| Updated on: Oct 28, 2024 | 3:49 PM

राज्यात विविध मोठ्या , महत्वाच्या लढती होणार असून त्यातीलच एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे भोकर. हा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा मतदारसंघ असून तो काँग्रेसचा गड मानला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून या मतदारसंघात (माजी) काँग्रेस नेते अशोक चव्हाण कुटुंबियांचं वर्चस्व आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केल्याने आता समीकरण बदललं आहे.

Bhokar Vidhan Sabha : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप मारणार का मुसंडी ? माजी मुख्यमंत्र्यांची लेक भोकरमध्ये फडकवणार का विजयी झेंडा ?
माजी मुख्यमंत्र्यांची लेक जिंकणार फडकवणार का विजयी झेंडा ?
Image Credit source: social media
Follow us on

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित होताच मविआ आणि महायुतीने एकेक करून उमेदवारांच्या नावांची घोषणा करणारी लिस्ट जाहीर केली. भाजप, शिवसेना ( शिंदे गट) राष्ट्रवादी ( अजित पवार गट) , काँग्रेस, शिवसेना ( उबाठा गट), राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार गट) यासह इतर पक्षांनीही जागावाटपावर चर्चा करत अखेर उमेदवारांची नावं घोषित केली. मविआ असो किंवा महायुती, दोन्हीकडून मोठमोठ्या नेत्यांसह त्यांच्या कुटुंबातील लोकांना, नातलगांनाही उमेदवारी जाहीर झाली असून घराणेशाहीसाठी रेड कार्पेट अंथरल्याचं दित आहे. येत्या 20 तारखेला विधानसभेसाठी राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 तारखेला मतमोजणी होऊन निकाल लागेल. मतदारांनी महायुतीलाच पुन्हा कौल देत दिलाय की मविआला सत्ता स्थापनेची संधि मिळते हे चित्र अखेर 23 तारखेला स्पष्ट होईल.

याचदरम्यान राज्यात विविध मोठ्या , महत्वाच्या लढती होणार असून त्यातीलच एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे भोकर. हा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा मतदारसंघ असून तो काँग्रेसचा गड मानला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून या मतदारसंघात (माजी) काँग्रेस नेते अशोक चव्हाण कुटुंबियांचं वर्चस्व आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला असून ते राज्यसभेवर आहेत. याच पार्श्वभूमीवर हा गड जिंकून मुसंडी मारण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आता अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया हिला या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर तिच्यासमोर काँग्रेसमधील युवा नेतृत्व तिरुपती ऊर्फ पप्पू बाबुराव कदम कोंढेकर यांच आव्हान आहे, त्यांना काँग्रेसने अधिकृत उमेदवारी दिली आहे.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने इथली समीकरण बदलली आहेत. इतकी वर्ष हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र आता त्यांचा खंदा शिलेदार असलेले अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्यानंतरही काँग्रेसला भोकर मतदारसंघात विजय मिळवता येतो की श्रीजया यांच्यामार्फत भाजप पहिल्यांदाच या मतदारसंघात मुसंडी मारून विजय संपादन करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कसा आहे भोकर मतदारसंघाचा इतिहास ? काय आहे चित्र ?

दरम्यान भोकर मतदारसंघाचा इतिहास काय, सध्या इथली परिस्थिती, इथलं चित्र काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. भोकर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ही विधानसभा जागा नांदेड जिल्ह्यात आहे आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. येथील अनुसूचित जाती मतदारांची संख्या अंदाजे 47,720 आहे जी 2011 च्या जनगणनेनुसार अंदाजे 17.04% आहे.

मतदार यादीच्या विश्लेषणानुसार, भोकर विधानसभेत मुस्लिम मतदारांची संख्या अंदाजे 26 हजार 604 आहे जी अंदाजे 9.5 % आहे. येथील ग्रामीण मतदारांची संख्या अंदाजे 2 लाख 36 हजार 554 आहे जी 2011 च्या जनगणनेनुसार अंदाजे 84.47% आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवर नजर टाकली तर भोकर विधानसभेतील एकूण मतदार 2 लाख 80 हजार 045 असून मतदान केंद्रांची संख्या 324 आहे. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभेची मतदार टक्केवारी 74.06% होती.

2019 विधानसभा निवडणूक निकाल

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या अशोक चव्हाण हे 1 लाख 40 हजार 559 मतांनी विजयी झाले. तर भारतीय जनता पक्षाचे श्रीनिवास गोरठेकर यांना 43 हजार 114 मतं मिळाली, ते दुसऱ्या स्थानी होते. तर वंचित बहुजन आघाडीचे नामदेव अयालवज हे 17 हजार 813 मत मिळवून तिसऱ्या स्थानी होते.

2014 साली अशोक चव्हाण यांच्या पत्नीने जिंकली निवडणूक

2014 साली अशोक चव्हाण यांची पत्नी अमिता चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. तर आता अशोक चव्हाण यांची लेक श्रीजयना हिनेही राजकारण एंट्री घेतली आहे. ती वकील असून गेल्या बऱ्याच काळापासून ती राजकारणात सक्रीय आहे. अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर श्रीजया हिनेदेखील भाजपमध्ये प्रवेश केला असून यंदा ती भाजपकडून निवडमूक लढवत आहे.

भोकर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत निवडून आलेले आमदार

2019 विधानसभा निवडणूक : अशोकराव शंकरराव चव्हाण, काँग्रेस ( आता ते भाजपमध्ये आहेत)

2014 विधानसभा निवडणूक : अमिता अशोकराव चव्हाण , काँग्रेस

2009 विधानसभा निवडणूक : अशोक शंकरराव चव्हाण , काँग्रेस