Gevrai Election Result 2024 : गेवराई विधानसभेत काय घडणार?, महायुती, मविआला मोठा धक्का?

| Updated on: Nov 23, 2024 | 7:30 AM

गेवराई हा बिड लोकसभा मतदारसंघातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात यावेळी चौरंगी लढत होती. त्यामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोची होती, अखेर निकाल हाती आला आहे.

Gevrai Election Result 2024 : गेवराई विधानसभेत काय घडणार?, महायुती, मविआला मोठा धक्का?
Follow us on

गेवराई हा बिड लोकसभा मतदारसंघातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात कधी राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलं तर कधी भाजपचं. सलग दोन विधानसभा टर्म इथे भाजपचा आमदार होता. मात्र यावेळी ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली. राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात विजयसिंह पंडित यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यापूर्वी अंतर्गत वादातून भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी भाजपमधून बाहेर पडत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर शिवसेना ठाकरे गटाकडून या मतदारसंघात माजी मंत्री बदामराव पंडित यांना उमेदवारी देण्यात आली. तर वंचितकडून देखील या मतदारसंघात यावेळी तगडा उमेदवार देण्यात आला. वंचित बहुजन आघाडीकडून प्रियांका शिवप्रसाद खेडकर या निवडणुकीच्या रिंगणात होत्या.

त्यामुळे या मतदारसंघात या विधानसभेला चौरंगी लढत पहायला मिळाली. महायुतीकडून विजयसिंह पंडित, महाविकास आघाडीकडून बदामराव पंडित तर अपक्ष उमेदवार लक्ष्मण पवार आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रियांका शिवप्रसाद खेडकर अशी चौरंगी लढत होती. सर्वच तगडे उमेदवार असल्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. लक्ष्मण पवार हे अपक्ष उमेदवार असूनही त्यांनी सुरुवातीपासूनच या मतदारसंघात आघाडी घेतली होती. तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियकां खेडकर यांना देखील या मतदारसंघात चांगला पाठिंबा मिळताना दिसत होता. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

गेवराई विधानसभा निवडणूक निकाल 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting

विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE

महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिझल्ट 2024 LIVE Updates

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Coverage