माघार नाहीच; सरवणकरांचं ‘राजपुत्रा’विरोधात तगडं प्लॅनिंग, शेवटचा पत्ता केला ओपन

| Updated on: Nov 01, 2024 | 7:13 PM

सरवणकर यांनी आपण माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 'इथला मतदारसंघ आणि माझं आई मुलाच नातं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

माघार नाहीच; सरवणकरांचं राजपुत्राविरोधात तगडं प्लॅनिंग, शेवटचा पत्ता केला ओपन
Follow us on

विधानसा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. उमेदवारांनी अर्ज देखील भरले आहेत. येत्या चार नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. तर वीस नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार असून, तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान मुंबईच्या माहीम विधानसभा मतदारसंघात यंदा काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघातून यावेळी पहिल्यांदाच मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर हे निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार अमित ठाकरे यांच्यासाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली होती. भाजपकडून याबाबत शिवसेनेची देखील मनधरणी करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं, आता या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले सरवणकर?  

सरवणकर यांनी आपण माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘इथला मतदारसंघ आणि माझं आई मुलाच नातं आहे, त्यात खंड पडू देऊ नये. मी माघार घेणार नाही. मी या मतदारसंघात 365 दिवस उपलब्ध आहे असं सरवणकर यांनी म्हटलं आहे.’ त्यामुळे आता अमित ठाकरे आणि सरवणकर यांच्यामध्ये या मतदारसंघात लढत अटळ असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.

सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांकडून दबाव असल्याची देखील चर्चा होती. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये कुठलंही तथ्य नाही, मी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार आहे. एबी फॉर्म बीना आशिर्वादाचा भेटत नाही. मी फॉर्म भरला आहे, मला जनतेचा आशिर्वाद आहे. कार्यकर्ते दिवाळी साजरी करत आहेत, असं सरवणकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज ठाकरे यांच्या भेटीबाबत देखील सरवणकर यांनी माहिती दिली आहे. राज ठाकरे साहेबांना मी वेळ मागितली आहे, वेळ देतील तेंव्हा भेटणार आहे. माझी इच्छा आहे त्यांनी मला आशिर्वाद द्यावा.  मी त्यांना विनंती करणार आहे, या मतदारसंघात आई आणि मुलाचं नातं आहे. त्यांला खंड पडू देऊ नका, अस सरवणकर यांनी म्हटलं आहे.