धनंजय मुंडे यांची संपत्ती पाच वर्षापूर्वी 23 कोटी होती, आता किती वाढली?; चांदी-सोनेच इतक्या किलोचे

| Updated on: Oct 25, 2024 | 11:39 AM

परळी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे. त्यांची संपत्ती गेल्या पाच वर्षात दुप्पट झाली आहे. 2019 मध्ये 23 कोटी असलेली संपत्ती 2024 मध्ये 53.80 कोटींवर पोहोचली आहे.

धनंजय मुंडे यांची संपत्ती पाच वर्षापूर्वी 23 कोटी होती, आता किती वाढली?; चांदी-सोनेच इतक्या किलोचे
Dhananjay Munde
Image Credit source: Facebook
Follow us on

Dhananjay Munde Property : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. राज्यातील सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. त्यातच राज्याचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी काल परळी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात त्यांची एकूण संपत्ती किती याबद्दलची माहिती उघड झाली आहे.

धनंजय मुंडे यांनी गुरुवारी (२४ ऑक्टोबर) परळी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या दरम्यान दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्तीची माहिती नमूद करण्यात आली आहे. यानुसार धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे.

पाच वर्षांमध्ये संपत्तीत वाढ 

धनंजय मुंडेंकडे 2019 मध्ये 23 कोटींची संपत्ती होती. 2024 मध्ये सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात धनंजय मुंडेंकडे 53.80 कोटींची संपत्ती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये धनंजय मुंडेंच्या संपत्तीत सुमारे 31 कोटी रुपयांनी वाढली आहे. धनंजय मुंडे यांची पत्नी आणि कुटुंबाकडे 53 कोटी 80 लाखांची संपत्ती आहे.

१५ कोटींची वाहने

गेल्या पाच वर्षात यामध्येही दुपटीने म्हणजे 30.75 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 2019 मध्ये त्यांच्याकडे 23 कोटींची संपत्ती होती. धनंजय मुंडे यांच्याकडे 15 कोटींची वाहने आहेत. तर दीड किलो चांदी आहे. त्यांच्या नावे 15 कोटी 55 लाख 5 हजार 105 रुपयांची विविध वाहने आहेत. टँकर पासून ते बुलेटपर्यंतच्या सात वाहनांचा यात समावेश आहे. तसेच सात लाख तीन हजार रुपयांचे 190 ग्रॅम सोने आहे. तर पत्नीच्या नावे 31 लाख 78 हजार 675 रुपयांची दोन वाहने आहेत. 22 लाख 90 हजारांचे 620 ग्रॅम सोने आणि ७२ हजारांची दीड किलो चांदी आहे.

पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंची ओवाळणी

दरम्यान धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. बीडच्या परळी तहसील कार्यालयामध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे यांनी विधानसभेकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांची ओवाळणी केली होती