काका विरुद्ध पुतण्या, बाप विरुद्ध लेक, ‘या’ मतदारसंघात होणार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत, पाहा यादी

| Updated on: Oct 25, 2024 | 10:18 AM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटांनी स्वतःचे उमेदवार जाहीर केले आहेत. यामुळे निवडणुकीत रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे.

काका विरुद्ध पुतण्या, बाप विरुद्ध लेक, या मतदारसंघात होणार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत, पाहा यादी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ : राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत कुठे? पाहा यादी
Image Credit source: Facebook
Follow us on

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. निवडणुकांचे बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाकड़ून आतापर्यंत उमेदवारी यादी जाहीर करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे महाविकासआघाडीकडून ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. पण त्यातही शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या लढतींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून यादी जाहीर करण्यात आली आहे. यात बारामतीतून अजित पवार, परळीतून धनंजय मुंडे, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील आणि कोपरगावमधून आशुतोष काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शरद पवारांनीही या मतदारसंघात त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे तब्बल १६ मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत होणार आहे.

मतदारसंघराष्ट्रवादी (अजित पवार गट)राष्ट्रवादी (शरद पवार गट)
बारामतीअजित पवार युगेंद्र पवार
अहेरीधर्मराव आत्राम भाग्यश्री आत्राम
इंदापूरदत्तात्रय भरणेहर्षवर्धन पाटील
कागलहसन मुश्रीफ
समरजीत घाटगे
आंबेगाव
दिलीप वळसे पाटीलदेवदत्त निकम
मुंब्रा-कळवानजीब मुल्ला जितेंद्र आव्हाड
वडगाव शेरी
सुनील टिंगरे बापूसाहेब पठारे
वसमत
चंद्रकांत नवघरेजयप्रकाश दांडेगावकर
हडपसर चेतन तुपेप्रशांत जगताप
चिपळूण शेखर निकमप्रशांत यादव
कोपरगावआशुतोष काळेसंदीप वर्पे
उदगीर संजय बनसोडे सुधाकर भालेराव
इस्लामपूरडॉ निशिकांत पाटीलजयंत पाटील
तासगाव-कवठे महांकाळसंजयकाका पाटीलरोहित पाटील
वडगाव शेरीसुनील टिंगरेबापूसाहेब पठारे
शिरुरज्ञानेश्वर कटकेअशोक पवार