महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : तब्बल 26 ठिकाणी रंगणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना, पाहा संपूर्ण यादी

| Updated on: Oct 25, 2024 | 8:20 AM

यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. पण त्यातही अनेकांचे लक्ष हे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट या लढतीकडे लागले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत तब्बल २६ ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा सामना पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : तब्बल 26 ठिकाणी रंगणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना, पाहा संपूर्ण यादी
शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत; पाहा संपूर्ण यादी
Follow us on

Shivsena VS Shivsena Fight : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारी यादीची घोषणा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. पण त्यातही अनेकांचे लक्ष हे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट या लढतीकडे लागले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत तब्बल २६ ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा सामना पाहायला मिळणार आहे.

ठाकरे गटाकडून 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर 

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने महाराष्ट्र विधानसभेसाठी 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे, कोपरी – पाचपाखडी मतदारसंघातून केदार दिघे, ठाणे मतदारसंघात माजी खासदार राजन विचारे, वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांसह अनेक दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या यादीत अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

शिंदे गटाकडून ४५ उमेदवारांची यादी जाहीर

तर शिवसेना शिंदे गटाकडून ४५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे, महाड मतदारसंघातून भरत गोगावले, कुडाळ मतदारसंघातून निलेश राणे यांसह अनेक दिग्गजांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मतदारसंघशिवसेना (ठाकरे गट) उमेदवार शिवसेना (शिंदे गट) उमेदवार
कोपरी-पाचपाखाडीकेदार दिघेएकनाथ शिंदे
ओवळा माजिवडानरेश मणेराप्रताप सरनाईक
मागाठणे
अनंत (बाळा) नर मनिषा वायकर
कुर्लाप्रविणा मोरजकरमंगेश कुडाळकर
माहिम
महेश सावंतसदा सरवणकर
महाडस्नेहल जगताप
भरत गोगावले
राधानगरीके. पी. पाटील
प्रकाश आबिटकर
राजापूर राजन साळवी
किरण सामंत
सावंतवाडी
राजन तेली दीपक केसरकर
कुडाळ
वैभव नाईकनिलेश राणे
रत्नागिरी सुरेंद्रनाथ (बाळ) मानेउदय सामंत
दापोली
संजय कदमयोगेश कदम
पाटण
हर्षद कदमशंभूराज देसाई
सांगोला
दीपक आबा साळुंखेशहाजी बापू पाटील
परांडा राहुल ज्ञानेश्वर पाटील तानाजी सावंत
कर्जत नितीन सावंत महेंद्र थोरवे
मालेगाव बाह्य अद्वय हिरे दादा भुसे
नांदगाव गणेश धात्रक सुहास कांदे
वैजापूर
दिनेश परदेशी रणेश बोरणारे
संभाजीनगर पश्चिम
राजू शिंदे संजय शिरसाठ
संभाजीनगर किशनचंद तनवाणीप्रदीप जयस्वाल
सिल्लोड सुरेश बनकर अब्दुल सत्तार
कळमनुरी
डॉ. संतोष टाळफेसंतोष बांगर
रामटेक विशाल बरबटे आशिष जयस्वाल
मेहकरसिद्धार्थ खरातसंजय पायमुलकर
पाचोरावैशाली सूर्यवंशी किशोर धनसिंग पाटील

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान

दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली होती. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २८८ मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. एकीकडे विविध पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर होत आहेत. तर दुसरीकडे उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे.