…अन् बापाच्या मदतीला लेक धावली, शरद पवारांकडून गद्दारीचा शिक्का, दिलीप वळसेंच्या कन्येचं रोख ठोक प्रत्युत्तर

| Updated on: Nov 14, 2024 | 6:01 PM

शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हणत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती, त्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांच्या मुलीनं पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

...अन् बापाच्या मदतीला लेक धावली, शरद पवारांकडून गद्दारीचा शिक्का, दिलीप वळसेंच्या कन्येचं रोख ठोक प्रत्युत्तर
शरद पवार
Follow us on

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे तर तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट म्हणजे दोन बड्या पक्षात पडलेल्या मोठ्या फुटीनंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली. एकीकडे शिवसेनेचे नेते आणि आता मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेत उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील शरद पवारांची साथ सोडली आणि महायुती सरकारला पाठिंबा दिला. त्यावेळी अजित पवार यांनी आपल्या नऊ सहकाऱ्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यामध्ये शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणाऱ्या दिलीप वळसे पाटलांचा देखील समावेश होता.

दरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे मतदार राजा कोणाच्या बाजुनं कौल देणार? राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार की महायुतीचं? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल करताना त्यांना गद्दार म्हटलं होतं. यावर अजून वळसे पाटील यांचं कोणंही उत्तर आलेलं नाही, मात्र त्यांच्या मुलीनं यावर शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांनी मंत्री दिलीप वळसेंवर थेट गद्दारीचा शिक्का मारला, यामुळं घायाळ झालेल्या वळसेंनी या आरोपांना प्रतिउत्तर देण्यासाठी 18 नोव्हेंबरच्या सांगता सभेचा मुहूर्त निवडलाय. पण त्यापूर्वी कन्या पूर्वा वळसेंनी मात्र आपलं मौन सोडलं आहे. दिलीप वळसेंनी जनतेचं पाणी वाचवून गद्दारी केली असेल तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही, असं म्हणत वळसे पाटील यांच्या कन्या  पूर्वा वळसे यांनी शरद पवार यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.