मुंबई | 23 जानेवारी 2024 : आजच्या दिवसभरातील महत्वाच्या बातम्या… अयोध्येतील राम मंदिराचं काल उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह असंख्य भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आज राम मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली आहे. याबाबतही अपडेट्स येत आहेत. मराठा आरक्षणासाठी मोर्चा सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मोर्चा आज पुणे शहरात प्रवेश करणार आहे. ठाकरे गटाचं राज्यव्यापी महाधिवेशन आज नाशिकमध्ये होत आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
मीरा भाईंदर | नया नगर भागातील अनेक बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझरचा वापर करून कारवाई करण्यात आली आहे. मीरा रोडचा हा तोच नया नगर परिसर आहे जिथे काही वाहनांवर दगडफेक केली होती. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे.
भिवंडी | भिवंडीतून मोठी बातमी समोर आली आहे. भिवंडीत कालवार गावच्या हद्दीमधील गणराज कंपाउंड येथील कृष्णा कार्गो कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळता अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी आहेत. आगीचे कारण समजू शकलेलं नाही.
शिक्रापूर | मनोज जरांगे पाटील यांचं पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर या गावात जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यासाठी मराठा समाजाची दुतर्फा गर्दी झाली. विशेष करून मराठा समाजातील तरुणांची या रॅली मध्ये आणि स्वागतासाठीही मोठी गर्दी होती. जरांगे पाटील यांच्या रॅली मध्ये महिलाही घोषणा देत सहभागी झाल्या.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी भाजपच्या कार्याची आज देशभरात चर्चा होत असल्याचे म्हटले आहे. जे काँग्रेस 60 वर्षात करू शकले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 10 वर्षात केले आहे. केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवणे ही प्रमुख जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. एक गोष्ट सिद्ध झाली की भाजप हा देशातील एकमेव राजकीय पक्ष आहे ज्याने आपल्या जन्मापासून आजपर्यंत आपली विचारधारा जपली आहे आणि पुढेही नेली आहे.
देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ड्युटी पथावर होणारी परेड मुख्यत्वे महिला केंद्रित असेल. प्रथमच तिन्ही सैन्यदलातील महिला तुकडीही संचलन करणार आहे. केंद्रीय सशस्त्र दलाच्या तुकडीत महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा अयोध्येत पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरने गर्दीची हवाई पाहणीही केली.
आसाममध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा काढणाऱ्या राहुल गांधींनी आपल्या लढ्याला पाच आधारस्तंभ असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये युवा न्याय, सहभागी न्याय, महिला न्याय, शेतकरी न्याय आणि कामगार न्याय यांचा समावेश आहे. हे पाच न्यायमूर्ती मुठी बनून देशाची ताकद बनतील, असे ते म्हणाले.
नांदेड : राज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आयोगाच्या सुचनेनुसार आजपासुन संपूर्ण राज्यात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. नांदेड जिल्हयात साडे पाच लाख कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी 474 पर्यवेक्षक आणि 3648 प्रगणकांची नेमणूक करण्यात आली आहे.
जळगाव : 3 फेब्रुवारीपासून अंमळनेर येथे 18 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. या संमेलनासाठी एक मूठ धान्य आणि एक रुपया देणगी देण्याचे आवाहन विद्रोही साहित्य संमेलनाचे प्रवर्तक अविनाश पाटील, किशोर ढमाले यांनी केले आहे. धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाबाबत माहिती दिली. एक मूठ धान्य एक रुपया देणगीसाठी उद्या धुळ्यात फेरी काढली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परळी : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राणी लक्ष्मीबाई टावर येथे अभिवादन करण्यासाठी खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन केले यावेळेस शिवसेनेत मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मुंबई : मराठा आंदोलनाविरोधात याचिका करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करत याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते – डेरे यांच्या खंडपीठाने हे प्रकरण न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी वर्ग केलं आहे.
राज्यात अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्याने सर्वेक्षणासाठी दिलेले अॅप सुरु होत नाही. पंढरपुरात सर्वेक्षणाचे काम पहिल्या दिवशीच खोळंबलं आहे. पंढरपुरात सर्वेक्षणासाठि 33 वार्डात 303 कर्मचाऱ्यांची नेमणुक केली आहे. हे अॅप पुण्यातील गोखले इंस्टिट्यूटने बनवलं आहे.
पुणे लोकसभा लढण्यासाठी मी स्वतः इच्छुक आहे. मला तयारी करायची गरज नाही सर्व विधानसभा मतदारसंघात माझे कार्यकर्ते असल्याचं संजय काकडे यांनी म्हटलं आहे.
सर्वत्र लोकसभेची तयारी सुरूआहे. आम्ही संघटन मजबूत करण्यासाठी काम करत आहोत. येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीची बैठक आज होती
केंद्र सरकार पाठिंबा देत आहे. दावोसमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक इकडे आली आहे. त्यांनी बोलताना आत्मपरीक्षण करावं त्यांच्यावर ही वेळ का आली याचं. लोकं त्यांना सोडून का जात आहे याचा त्यांनी विचार करावा. एक खुर्चीसाठी वेविचार त्यांनी केला याचा त्यांना काय फळ मिळालं हे आज सर्व पाहत आहेत. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जो रामाचा नाही तो कोणत्याही कामाचा नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले आहे. अनेक वर्षांचा वनवास मोदींनी समपून रामलल्लाची मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली आहे. तो दिवस ऐतिहासिक होता. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. रामाने त्यांना सदबुद्धी द्यावी. लग्न एकाशी आणि संसार एकाशी केला. त्यांनी आत्मपरीक्षण करावे. राम आणि रावण कोण हे जनतेला माहित आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आज प्रत्येक मतदारसंघात अकरा हजार दिवे लावणार आहे. बाळासाहेब यांना अपेक्षित काम सरकारच्या माध्यमातून आम्ही करत आहोत.
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले.
मराठा सर्वेक्षणात तांत्रिक अडथळा. सर्वेक्षणासाठी दिलेल्या अॕपचे राज्यात अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन आहे. सर्वेक्षणाचे काम पहिल्या दिवशीच खोळंबले. हे अॕप गोखले इंस्टिट्यूटने बनवलं आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज सकाळपासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. पण जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्वेक्षण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना येत आहे अडथळा. पुणे जिल्ह्यासह राज्यात देखील सर्वेक्षणाला ॲप डाऊन झाल्याने फटका.
कराड : शिवसेना फुटली नाही. ओरिजनल आम्हीच आहोत. हिंदुत्वाशी कोणी प्रतारणा केली आहे याचं आत्मपरीक्षण ठाकरे गटाने करावं. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठी आरक्षणावर महत्त्वाची बैठक. या बैठकीला आमदार आणि खासदार उपस्थित. बाळासाहेब भवनात पार पडली महत्त्वाची बैठक.
जरांगे पाटील यांच्या पायी मोर्चाचा आडचा चौथा दिवस आहे. आज चंदनगरमध्ये जरांगे पाटलांचा मुक्काम असेल.
कथीत खिचडी घोटाळ्याप्रकणी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सूरज चव्हाण यांनी या विरोधात पाय कोर्टात धआव घेतली आहे.
अकोला जिल्ह्यात मराठा सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे. मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. सध्या ते रांजणगाव येथे पोहचले आहेत.
मीरा भाईदरमध्ये झालेल्या 2 गटातील राड्यानंतर पोलिस पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. नितेश राणे आज मीरा भाईदरमध्ये जाणार आहेत.
जरांगे पाटील पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती या शहरात पोहचले असून , जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी रांजणगाव मधील महिलांनी रांगोळी काढत जरांगे पाटील यांच्या स्वागताची तयारी केली आहे. मराठा समाजाच्या पुढच्या पिढीसाठी आरक्षण महत्वाचे असल्याच्या भावना यावेळी महिलांनी व्यक्त केल्या
श्रीराम हे कुणा एका व्यक्तीचे किंवा पक्षाते नाहीत… मोदी आणि अयोध्येला गेले, त्याआधी कधी गेले नव्हते… ज्याची महाराष्ट्रावर नजर पडली त्याची मुठमाती झाली… असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले…
छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर, राम मंदिर उभं राहूच शकलं नसतं… आज तुम्ही तिकडे जाऊन बसलात ते फक्त आणि फक्त महाराजांमुळे. नाही तर हे कोण्या येड्या-गबाळ्याचं काम नव्हतं.. असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
आसामचे मंत्रिमंडळ राम दर्शनासाठी जाणार … 22 फेब्रुवारीला अयोध्येत जाऊन संपूर्ण मंत्रिमंडळ रामाचे दर्शन घेणार… मुख्यमंत्री हेमंत बिश्वा शर्मा यांची घोषणा… मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्रीही रामाच्या दर्शनासाठी जाणार
नवी दिल्ली- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उद्या अयोध्येत जाणार आहेत. अयोध्येत जाऊन राम मंदिराचं ते दर्शन घेणार आहेत. उद्घाटनानंतर तिसऱ्याच दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष रामाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा पुण्यात प्रवेश करणार आहे. जरांगेच्या मोर्चामुळे पुण्यातील वाहतुकीच मोठे बदल करण्यात आले आहेत. पुण्यातून नगरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
“आम्हाला लढाई अंबानी-अदानीच्या मदतीने लढायची नाहीये. श्रीरामाने कुणा राजाची मदत घेतली नाही. राम आला की रावण येतोच. तेव्हा एकच रावण होता. आज सगळीकडे रावणच रावण दिसतायत. तो रावणसुद्धा अजिंक्य नव्हता. आजचा रावणही अजिंक्य नाही,” असं राऊत म्हणाले.
“शिवसेनेच्या वाघांमध्ये धैर्य होतं म्हणून बाबरी पाडली. दिल्लीतील रावणशाहीसमोर आम्ही झुकणार नाही. रामायण अयोध्येत कमी घडलं, पण या पंचवटीत जास्त घडलं. संयमी ही उपाधी प्रभू श्रीरामांना शोभून दिसते आणि हीच उपाधी उद्धव ठाकरेंना शोभून दिसते. रामाच्या हातात हळूहळू मशालही येईल,” असं राऊत म्हणाले.
“जो राम अयोध्येत आहे, तोच राम इथे पंचवटीत आहे. रामाचं जे धैर्य आहे ते शिवसेनेचं धैर्य आहे, रामाचं जे शौर्य आहे, ते शौर्य शिवसेनेचं आहे. रामाचा जो संयम आहे तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे,” असं वक्तव्य संजय राऊत म्हणाले.
“शिवसेना नसती तर अयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होऊच शकली नसती. श्रीरामाशी आमचं जुनं आणि जिव्हाळ्याचं नातं आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
ठाकरे गटाचं नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 30 वर्षांआधी बाळासाहेब ठाकरेंनी नाशिकमध्ये सेनेचे अधिवेशन घेतलं होतं. त्यानंतर आज 30 वर्षांनंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी अधिवेशन पार पडतंय,उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी भक्कम करण्यासाठी आजचं हे अधिवेशन असणार आहे.अधिवेशानाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग आज फुकलं जाणार आहे, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली आहे.
आजपासून राज्यात खुला प्रवर्ग आणि मागासवर्गीय यांचे सर्वेक्षण करायचा आहे आणि त्यांची नोंद घ्यायची आहे. मात्र खरा प्रश्न असा आहे की नेमलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करायचं आहे आणि नोंदी घ्यायचे आहे महत्त्वाचं म्हणजे पाच दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण शक्य आहे काय? असा सवाल ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी विचारला आहे.
मीरा रोड वादाप्रकरणात पोलिसांनी १३ ते १५ आरोपींना अटक केली आहे. काल हा वाद उफाळला होता. आज नितेश राणे या ठिकाणी भेट देणार असल्याचे ट्वीट त्यांनी केले आहे. सीसीटीव्ही फुटेजआधारे याप्रकरणातील इतर आरोपींना अटक करण्यात येणार आहे. अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
ठाकरे गटाचं आज नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशनाला थोड्याचवेळात सुरुवात होत आहे. या अधिवेशनाआधी उद्धव ठाकरे यांनी चित्रप्रदर्शनाला भेट दिली आहे. या अधिवेशनात पाच ठराव घेण्यात येतील. त्यात एक सरकारच्या निषेधाचा पण ठराव असणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारची वित्तीय तूट कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात कर संकलन वाढल्याने सरकार आर्थिक आघाडीवर सक्षम होत आहे. त्यामुळे मनरेगा, ग्रामीण रस्ते, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना आणि पीएम विश्वकर्मा योजनांसारख्या सामाजिक योजनांसाठी जास्त निधीची तरतूद होऊ शकते.
मराठा आता मुंबईत येण्यापासून कोणीही थांबू शकत नाहीत. मुंबईत मराठा येणार आहे. हे आंदोलन सरकारने हाताच्या बाहेर जाऊ देऊ नका. यंत्रणेच्या माध्यमातून सरकारने आंदोलक, कार्यकर्त्यांना धक्का जरी लागला तरी राज्यातील रस्त्यावर मराठा समाज दिसेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
अयोध्येत प्रभू श्रीराम आगमनाचा आणि प्राण प्रतिष्ठेचा सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा ठरला. अवघे जग त्याचे साक्षीदार झाले. सोने-चांदीत घसरणीचे सत्र सुरुच आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवार, शनिवार किंमती वधारल्या होत्या. तर रविवार आणि सोमवारी ग्राहकांना दिलासा मिळाला. भावात कोणतीही वाढ झाली नाही.
मनोज जरांगे यांच्या चौथ्या दिवशीच्या पदयात्रेला सुरुवात. रांजणगाव गणपती येथून मनोज जरांगे यांची पदयात्रा सुरू झाली आहे.
नार्वेकरांनी आत्तापर्यंत 10 पक्ष बदलले. नार्वेकर म्हणाले, म्हणजे आम्ही गट होत नाही. 10-20 लोक फुटले तो मिंधे गट , तो पक्ष नव्हे अशी टीका
संजय राऊत यांनी केली.
रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे. रोहित पवार यांच्या समर्थनार्थ शरद पवार हे मैदानात उतरले आहेत.
रोहित पवार यांची चौकशी सुरू असताना शरद पवार हे NCp ऑफीसमध्येच उपस्थित असतील.
नागपूर – नागपूर सह विदर्भात ढगाळ वातावरण असून विदर्भात दोन दिवस काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवला आहे. नागपुरात आज सकाळ पासून ढगाळ आणि पावसाचं वातावरण असून काही काही भागात थेंब थेंब पावसाची हजेरी आहे. वातावरणात गारवा वाढल्याने पुढील काही दिवस नागपूरकराना चांगल्या थंडीचा सामना करावा लागेल.
मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधी चंद्रचूड यांच्यासमोर होणार सुनावणी. मराठा समाज्याच्या वतीने खुली सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी होणार आहे. आज सकाळी 11 वाजता मुंबईत ईडी कार्यालयामध्ये त्यांची चौकशी केली जाणार आहेत. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकर यांच्यावर ईडीकडून मनी लॉन्ड्रीगचा ची गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच बनावट कागदपत्र बनवण्याचा आरोपही ईडीने लावला आहे.
पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकर वाडी इथं एका लाकडाच्या वखारीसह ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर मेकिंग कंपनीला लागलेल्या आगीत दोन कामगार मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. रात्री सव्वा दोनच्या सुमाराला दोन गोडाऊनला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली त्यानुसार अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. गोडाऊन मध्ये झोपलेले ललित चौधरी आणि कमलेश चौधरी हे विषारी वायूमुळे बेशुद्ध पडले आणि आगीमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलय. आगीचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.
कल्याणमध्ये तरुण आणि अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला. एकाच वेळेला दोन मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ. एका पडझड झालेल्या इमारतीत कुजलेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला, तर कल्याण रेल्वे स्थानकाजवळील रुळावर सापडला तरुणाचा मृतदेह. कल्याण पोलिसांनी सुरू केला तपास. प्रेमप्रकरणातून घटना घडल्याचा पोलिसांना संशय
नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार. सभास्थळी 70 बाय 40 फूट आकाराच्या मुख्य स्टेजची उभारणी. स्टेज समोरील भागात विशेष 2 हजार निमंत्रित व्यक्तींसाठी बसण्याची असणार व्यवस्था. सभेसाठी जवळपास 70 ते 80 हजार लोक येण्याचा अंदाज. या अगोदर 1994 साली याचा मैदानावर झाली होती बाळासाहेब ठाकरे यांची सभा. 1994 साली ‘दार उघड, बये दार उघड’ अशी साद घालण्यात आली, याचा परिणीती म्हणून 1995 साली राज्यात आली होती युतीची सत्ता.
पुण्यात पोलीस उपनिरीक्षकालाच लाच घेताना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल न करण्यासाठी पुण्यात पोलीस उपनिरीक्षक आणि 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गणेश चव्हाण अस लाच घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत गणेश चव्हाण कार्यरत आहे. वकिलाला लाच घेण्यासाठी चव्हाण यांनी प्रोत्साहित केले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचत गणेश चव्हाण या पोलीस उपनिरीक्षकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज ठाकरे गटाचे राज्यव्यापी महाधिवेशन होणार आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील डेमोक्रोसी हॉलमध्ये अधिवेशन पार पडणार आहे. अधिवेशनाला ठाकरे गटाचे सर्व खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडणार आहे. 10 वाजता अधिवेनाला सुरुवात होणार आहे.
मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला आजपासून सुरूवात होणार आहे. मराठा समाजाचे मागासले पण तपासण्यासाठी आजपासून प्रत्यक्षात सर्वेक्षण होणार आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यात देखील आजपासून मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण राहणार सुरू आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 6 हजार 596 कर्मचारी घरोघरी जात आरक्षणासाठी सर्वेक्षण करणार आहेत. मराठा समाजाचे मागासले पण तपासण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मनोज जारांगे पाटील यांचा मोर्चा आज पुणे शहरात प्रवेश करणार आहे. जरांगे पाटील यांच्या मोर्चामुळे पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पुण्यातून अहमदनगरकडे जाणारी वाहतूक आज सकाळी सहा वाजल्यापासून बंद आहे. नगरकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गचा करावा वापर करावा लागणार आहे. पुणे शहरातून नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने खराडी बायपास वरून वळण घेत मगरपट्टा चौकातून सोलापूर रस्त्याने मार्गस्थ करण्यात येतील. जरांगे पाटील यांचा मोर्चा आज पुण्यातील खराडी येथे मुक्कामी असणार आहे. जरांगे पाटील यांच्या मोर्चाच्या मार्गावरील अनेक मुख्य रस्ते आज वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.