विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे वातावरण तापलं आहे. भाजप ठिकठिकाणी आंदोलनं करत आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 192 वी जयंती आहे. त्यानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या शहरात घडणाऱ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगमधून आढावा घेणार आहोत. सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी, अर्थ, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील घडामोडीही इथे वाचायला मिळतील.
Marathi News LIVE Update
रेफ्रिजरेटरच्या किंमती महाग होण्याची शक्यता
रेफ्रिजरेटर्सच्या स्टार रेटिंगसंबंधीच्या नियमातील बदलामुळे किंमतीत वाढ
ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीचा निर्णय
स्टार रेटिंगचे सुधारित नियम लागू केले
1 जानेवारीपासून हे नियम लागू असतील
या बदलांमुळे रेफ्रिजरेटरच्या किंमती 5 टक्क्यांपर्यंत वाढतील
Marathi News LIVE Update
भारतीय वायदे बाजारात आज सोने आणि चांदीच्या भावात जोरदार उसळी
वायदे बाजारात चांदीचा भाव आज 70,000 रुपये प्रति किलोपेक्षाही अधिक
मंगळवारी सोन्याच्या भावात 0.67 टक्क्यांची वृद्धी
तर चांदीचा भाव आज 1.41 टक्क्यांनी वधारला
ठाणे : महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती मधील सर्व कर्मचारी आज मध्यरात्री पासून जाणार संपावर,
03 जानेवारीच्या रात्री 12 वाजल्यापासून पुढील 72 तासा साठी सर्व कर्मचारी जाणार संपावर,
संपा दरम्यान विद्युत पुरवठा काही कारणास्तव बंद झाल्यास कर्मचारी कामे करू शकणार नसल्याणनं नागरिक चिंतेत.
जळगाव : जळगाव शहरातील टॉवर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करत भाजपचा निषेध नोंदवण्यात आला,
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अजित पवारांनी केलेले वक्तव्य हे अभ्यासाअंती केलेलं आहे,
संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते असं म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या भूमिकेविरोधात आंदोलन केलं,
महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल आणि भाजप नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले.
– धूर आणि ऑइलयुक्त केमिकलमुळे हवेत विषारी वायू तयार होण्याची शक्यता
– जिंदाल परिसराच्या परिघातील सुमारे २० कि मी अंतरात येणाऱ्या जवळपास २५ गावांना मास्कसक्तीचे आदेश
– बाहेर निघताना पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करावे, मास्कचा वापरावा अशी दवंडी प्रत्येक गावात पेटवण्यात आली
मागील 20 दिवसांपासून एसटीच्या स्पेअर पार्ट साठी पैसेच आले नाही,
भंगार बस मूळे बसचा अपघात होण्याची शक्यता,
अनेक गाड्या 10 वर्षापेक्षा अधिक चालल्याने खराब होत आहे,
एसटी महामंडळच्या अधिकारी यांनी केली आहे नवीन बसची मागणी,
एकट्या अमरावती आगारातील सहा शिवशाही बस बंद.
ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये झालं निधन
कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये जमायला सुरुवात
मंत्री तानाजी सावंत हॉस्पिटलमध्ये आलेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष्मण जगतापांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार
जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा अंबादास दानवे यांनी केला विरोध,
औरंगजेब हा क्रूरच होता आणि हिंदू द्वेष्टा होता,
शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विचार वेगळेच आहेत,
अंबादास दानवे यांचं जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
सायंकाळी सहापर्यंत त्यांच्या पिंपळे गुरव येथील राहत्या घरी अंत्यदर्शन होईल.
सायंकाळी सात वाजता गावातीलच स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडतील.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. आपल्या भागातील अतिशय लोकप्रिय नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे जगताप कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे.
पुण्यातील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
लोकप्रिय नेत्याच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा
दुर्धर आजाराने ग्रस्त असतानाही विधानपरिषद, राज्यसभा निवडणूकीवेळी मतदानाचा बजावला होता हक्क
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष ते भाजप आसा जगताप यांचा राजकीय प्रवास
बारामतीत कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि पार्थ पवार एकत्र
सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीला शरद पवार,पार्थ पवार यांची भेट
यावेळी डेअरीच्या कामकाजाची शरद पवार माहिती घेणार
नाशिकच्या नाशिकरोड येथील गोरेवाडी परिसरातील घटना,
संशयित आरोपींनी घराबाहेरील रिक्षाची देखील केली तोडफोड,
महिलेच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,
साहित्याची तोडफोड करून टोळके फरार.
बाबासाहेब पुरंदरे यांचे राजा शिव छत्रपती हे पुस्तक देणार भेट
भोसले घराण्याचा इतिहास कळावा म्हणून हे पुस्तक भेट करणार
औरंगजेबावर आव्हाडांनी केलेले वक्तव्य चांगलेच पेटले आहे
जयंती निमित्त सावित्री माईंच्या गावी नायगावात दिंडीचं अयोजन
सावित्री बाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करुन दिंडीला सुरुवात
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले.
ठाणे येथील निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
भिडे वाड्याचं काम लवकरात लवकर करा
अन्यथा पुन्हा चळवळ करणार
हा वाद कोर्टात आहे असं खोटं सांगितले जातंय – डॉ. आढाव
महापालिकेनं लवकरात लवकर इथलं काम पूर्ण करण्याची मागणी
डॉक्टरांच्या संपाचा औरंगाबादच्या घाटी रुग्णालयावर गंभीर परिणाम
डॉक्टर संपावर गेल्यामुळे घाटी रुग्णालयातील 16 शस्त्रक्रिया
अपघात विभागातील 103 शस्त्रक्रिया खोळंबल्या
तर तब्बल 1200 डॉक्टर तपासण्या खोळंबल्या
डॉक्टरांच्या संपाच्या घाटी रुग्णालयातील रुग्णावर गंभीर परिणाम
जे पी नड्डा यांच्या सभेवर शिवसेनेचे कीर्तन पडले भारी
जे पी नड्डा यांच्या सभेतून नागरिकांनी घेतला काढता पाय
तर बजाजनागरातील शिवसेनेच्या कीर्तनाला प्रचंड गर्दी
औरंगाबाद शहरात शिवसेना आणि भाजप मध्ये कीर्तन आणि सभेवरून जोरदार चर्चा
शासनाला वारंवार सांगूनही शासनाने परत घेतला नाही कोरोना लसींचा साठा..
औरंगाबाद येथे नागरिकांना देण्यासाठी मनपाकडे एकही लस नाही शिल्लक..
राज्य शासनाने एक्सपायर होणारा साठा परत घेतला नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे मत..
जुना साठा घेतला तर नाहीच ,मात्र नवीन साठाही दिला नाही..
शासनाने डोस परत न घेतल्याने 14,000 डोस गेले वाया..
नाशिक : चार मल निस्सारण केंद्राच्या क्षमता वाढीसाठी 530 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राला सादर,
राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत निधी मिळविण्यासाठी मनपाचा प्रयत्न,
याअगोदर देखील अमृत-2 योजनेतून 332 कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे,
या दोन्ही योजनांपैकी एका योजनेतून निधी मिळण्याची शक्यता.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 192 वी जयंती
जयंतीनिमित्त सावित्रीबाईंच्या जन्मगावी विविध कार्यक्रमाचं आयोजन
नायगाव फुलं-रांगोळ्यांनी सजलं
गावातील अनेक घरावर उभारली गुडी
नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकदेखील सजलं
स्मारकाला आकर्षक फुलांची सजावट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील नायगाव येणार
आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस
पुण्यातील महात्मा फुले वाड्याला आकर्षक अशी रोषणाई
महात्मा फुलेवाडा रोषणाईने उजळला आहे
फुले दाम्पत्याला मानणारा वर्ग सावित्रीबाईंना अभिवादनासाठी फुलेवाडा, समता भूमी या ठिकाणी येत आहे.