महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
मुंबई : माहिती आणि जनसंपर्क विभागाचे संचालक अजय आंबेकर यांची स्वेच्छानिवृत्ती
माहिती आणि जनसंपर्क विभागातील जाहिरात गैरव्यवहारप्रकरणी सुरु होती आंबेकर यांची चौकशी
चौकशी प्राथमिक स्तरावर आहे
आंबेकर यांनी केला होता स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज, सरकारने अर्ज स्वीकारला
चौकशी सुरु असतानाच आंबेकर यांची स्वेच्छानिवृत्ती
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण
रियाजुद्दीन काजी आणि प्रकाश ओव्हाळ यांची आजची चौकशी संपली
एनआयए कडून तब्बल आठ ते दहा तास चौकशी
रियाजुद्दीन काजी आणि प्रकाश ओव्हाळ हे दोघेही सचिन वाजे यांचे निकटचे सहकारी
औरंगाबाद : शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांचा काँग्रेसला झटका
नवनिर्वाचित जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांची शिवसेनेत एन्ट्री
उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत नितीन पाटील यांनी केला शिवसेनेत प्रवेश
नितीन पाटील यांच्या शिवसेना प्रवेशासाठी अब्दुल सत्तार होते प्रयत्नशील
गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली जिल्हा बँक आता सेनेच्या ताब्यात
जिल्ह्यातील एक मोठी सहकारी संस्था ताब्यात आल्यामुळे सेनेचं बळ आणखी वाढलं
अंबरनाथ : अंबरनाथच्या पाईपलाईन हायवेवर मोठा अपघात
ट्रकने डिव्हायडर तोडून कार आणि बाईकला दिली धडक
अपघातात बाईकस्वाराचा जागीच मृत्यू
ट्रक आणि कारचं मोठं नुकसान
5-10 मिनिटांपूर्वी झाला अपघात
पाईपलाईन रोडवर बदलापूरहून डोंबिवलीकडे जाणारा रस्ता बंद
-नवी मुंबई पालिका मुख्यालय आवारात विषारी साप!
-पालिका मुख्यालयात कोबारा जातीचा साप
-मुख्यालयाच्या पार्किंग आवारात सापाचे दर्शन
– सफाई कर्मचाऱ्यांनी पकडून साप सर्पमित्रांच्या हवाली
-आयुक्त, उपायुक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वाहन पार्किंग स्थळ
-वाहन चालकांसह अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
– सफाई कर्मचारी आणि वाहन चालक यांच्या जीवाला धोका
पुणे –
– 10 दिवसावर परीक्षा असताना विद्यापीठाची तयारी अजूनही पुर्ण नाहीच!
– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षेला अवघे 9 दिवस शिल्लक,
– तरीही विद्यापीठाकडून परीक्षेचं वेळापत्रक जाहीर नाही, काही परीक्षांच वेळापत्रक केलं जाहीर,
– 11 एप्रिलपासून सूरु होणार आहे, विद्यापीठाची प्रथम सत्र परीक्षा,
– ऑनलाईन पद्धतीने 6 लाख विद्यार्थ्यांची घेतली जाणार परीक्षा,
– मात्र वेळापत्रक जाहीर झालं नसल्यानं विद्यार्थी चिंतेत,
– वेळापत्रक लवकर जाहीर करण्याची विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडे मागणी
पुणे –
– भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांची पत्रकार परिषद,
– आजच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचे समोर येणार,
– राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यावर बलात्काराचा आरोप,
– पीडितेसोबत घेणार पत्रकार परिषद,
नाशिक –
– महापालिकेत ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू
– रुग्णालयात बेड मिळत नसल्यानं महापालिका मुख्यालयात रुग्णानं केलं होतं आंदोलन
-काल संध्याकाळी महापालिका मुख्यालयात रुग्णानं ऑक्सिजन सिलेंडरसह मांडला होता ठिय्या
– आंदोलनानंतर पालिका प्रशासनानं बिटको रुग्णालयात रुग्णाला केलं होतं दाखल
– मध्यरात्री बिटको रुग्णालयात संबंधित रुग्णाचा मृत्यू
– तर बेड मिळत नसल्याने संबंधित रुग्णाला महापालिकेत आणणाऱ्या व्यक्तींवर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे –
– महापालिका आजपासून मोठ्या सोसायट्यांमधील कचरा उचलणार नाही,
– शंभर किलोपेक्षा अधिक कचरा तयार होणाऱ्या सोसायट्यांमधील कचरा न उचलण्याचा पालिकेचा निर्णय,
– त्यावर योग्य ती प्रक्रिया करून जिरवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
– आजपासून हा निर्णय लागू होणार असल्याचं पालिकेने काढलेल्या नोटिसमधून नमूद,
-पालिकेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसल्यानं जवळपास तीनशे ते चारशे टन कचरा डंपिंग करावा लागत आहे,
सोलापूर –
जिल्ह्यात 20 वर्षात 329 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
सावकारी तगादा, नापीकी,शेतजमिनी वारंवार पडणारा दुष्काळ यामुळे आत्महत्या
सर्वाधिक आत्महत्यांची प्रकरणे बार्शी तालुक्यात
बार्शी तालुक्यात तब्बल 93 शेतकऱ्यांची वीस वर्षात आत्महत्या
329 शेतकऱ्यांपैकी केवळ 113 आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत
उर्वरित 216 आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नाही
शासकीय निकषात आत्महत्या प्रकरण येत नसल्याचा शेरा जिल्हा प्रशासनाकडून शेरा
औरंगाबाद –
हॉटेलवरील गोळीबार प्रकरणाचा अखेर लागला छडा
पाडेगाव परिसरातील हॉटेलवर काल मध्यरात्री केला होता गोळीबार
हॉटेल मालकाच्या मुलाने आरोपीला आवडणाऱ्या मुलीशी लग्न करू नये म्हणून झाला गोळीबार
विशाल गाडेकर असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव
नागपूर –
नागपुरात तापमान वाढीला सुरवात
मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी तापमान 41.9 वर पोहोचले
एप्रिल महिन्यात आणखी तापमान वाढण्याचा अंदाज
नागपूरकरांना सोसाव्या लागणार उन्हा च्या झळा
नागपूर –
नागपुरातील कुख्यात गुंड रणजित सफेलकर ला 7 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी
दोन मोठ्या हत्याकांड चा आरोप असलेल्या आरोपीला अटक करून त्याला कोर्टात हजर करण्यात आले
सफेलकर ला कोर्टात हजर करत असताना पोलिसांनी त्याची आकाशवाणी चौका पासून पैदल वरात काढली
हाप पॅन्ट आणि पायात चपल नाही याची नागपुरात जोरदार चर्चा
मोठ्या गुंडाची पोलिसांनी वरातच काढल्याने इतर गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले
पोलिसांनी सध्या नागपुरात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे अभियान सुरू केल्याने
अनेक गुंड बसले लपून
कोल्हापूर :
कैद्याचा तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न
कळंबा मध्यवर्ती कारागृहातील प्रकार
करण सूर्यवंशी या कैद्यांन तुरुंगअधिकारी प्रवीण औंढेकर यांच्यावर केला हल्ल्याचा प्रयत्न
तुरुंग अंतर्गत बरॅकची तपासणी करत असताना घडला प्रकार
कैदी करणं सूर्यवंशी विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस
रश्मी ठाकरे मुखपत्र ‘सामना’च्याही संपादक
कोरोनाची बाधा झाल्याने रश्मी ठाकरे यांच्यावर एच. एन. रिलायन्स रुग्णालयतात उपचार सुरू आहेत.
त्यांची प्रकृती स्थिर असून, त्या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. तब्येत झपाटयाने सुधारत आहे.
पाच दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर काही आरोग्य चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसंच चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सांगली –
दहा लाखाच्या सोने लुटीचा पर्दाफाश
मिरज रॅल्वे स्टेशन वर घडला प्रकार
संशयित दोन लष्करी जवानासह एका साथीदाराला मिरज रेल्वे पोलिसांनी केली अटक
मिरज रेल्वे स्थानकात पोलीस असलेची बतावणी करून 24 तोळे सोने लुटले
चार दिवसांनी मिरज रेल्वे पोलिसांनी लावला सोने लुटीचा छडा
अमृतसर येथील जोतिराम पाटील यांनी केली होती लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
सचिन चव्हाण राहुल चव्हाण आणि अतुल सूर्यवंशी असे अटक केलेल्या संशयित ची नावे
कोल्हापूर :
गोकुळ दूध संघासाठी उमेदवारी अर्ज भरायचा आजचा शेवटचा दिवस
शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता
काल दिवसभरात 71 जणांनी दाखल केले अर्ज
आमदार राजेश पाटील माजी आमदार सुजित मिणचेकर आणि देखील दाखल केला गोकुळ साठी उमेदवारी अर्ज
इतिहासात पहिल्यांदाच होतात उच्चांकी उमेदवारी अर्ज दाखल
5 एप्रिल होणार अर्जांची छाननी
पिंपरी चिंचवड
– पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई; 12 लाख 30 हजारांचा प्रतिबंधित गुटखा पकडला
– मुंबईहून हडपसर येथे प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पोलिसांनी कारवाई करून एक पिकअप ताब्यात घेतला आहे
– या पिकअपची झडती घेतली असता त्यात 12 लाख 30 हजार 560 रुपयांचा गुटखा आला आढळून पोलिसांनी गुटखा, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि पिकअप असा एकूण 20 लाख 54 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर –
शिवाजी विद्यापीठाला राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून ए प्लस प्लस मानांकन
नॅकच्या नव्या मानांकनासह 3.52 गुण मिळवत शिवाजी विद्यापीठ राज्यात ठरलं अव्वल
संशोधनातील कामगिरी, नाविन्यपूर्ण उपक्रम अशा अनेक वर्गात विद्यापीठांन मारली बाजी
नॅकच्या सर्वोच्च मानांकणामुळे विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
विद्यापीठातील प्रशासकीय प्रमुख प्राध्यापक तसच अधीविभागांमध्ये उत्साहाचं वातावरण
सांगली –
महापालिकेचे 754 कोटीचे बजेट महासभेत सादर
प्रतापसिंह उद्यानात शिवसृष्टी ,मिरजेत आर्ट गॅलरी ,कुपवाड च्या विकास कामासाठी विशेष तरतूद ,नगरसेवकांसाठी 21 कोटी अशा कामाचा बजेट मध्ये समावेश
स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे यांनी केले सन 2021-22 चे बजेट सादर
बीड :
नांदेडच्या घटनेची पुनरावृत्ती बीडमध्ये टळली
केजच्या तहसिलदारांवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न
तहसीलदार दुलाजी मेंडके थोडक्यात वाचले
केज बस स्थानकासमोरील घटनेने बीड हादरले
विचलित करणारा व्हिडीओ व्हायरल
तहसीलदारांची अद्याप तक्रार नाही
रत्नागिरी –
मुंबई – गोवा महामार्गावर वनविभागाने सापळा रचून
खवले मांजराची विक्री करणाऱ्या सहा शिकाऱ्यांना रंगेहात पकडले
त्यांच्याकडे एक जिवंत दुर्मिळ खवले मांजर सापडले.
तर दोन दुचाकीसुद्धा यावेळी ताब्यात घेण्यात आल्या.
नवी दिल्ली :
घरगुती गॅसच्या वाढलेल्या किंमतींनी हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.
महागाईनं हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा
एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १० रुपयांची कपात
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडनं दिली माहिती
घट झालेल्या किंमती आजपासून लागू होतील. अशी माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून देण्यात आलीय.
मुंबई –
पेडर रोडवर असलेल्या एवरेस्ट इमारतीच्या थर्ड फ्लोरवर कमरा नंबर 20 मध्ये रात्री जवळपास चार च्या सुमारास अचानक एसीमध्ये शॉटसर्किट झाल्याने आग
घटनास्थळी मनपा अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पोहोचल्या
आग लगेच नियंत्रणात आली
या घटनेत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही
दोंडाईचा शहरात फायरिंग, मुलीची छेड काढल्यावरुन पोलिसात पोस्कोचा गुन्हा दाखल
पोलिसांनी 2 जणांना अटक केल्यानंतर जमावाने पोलीस ठाण्यात केला राडा
जमावाने आरोपी नेले पळवून
जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केले हवेत 2 राउंड फायर
वरिष्ठ अधिकारी घटना स्थळी दाखल
तर दुसऱ्या गटातून हाणामारीत एकाच मृत्यू