LIVE | कैरी खाण्यासाठी झाडावर आलेल्या माकडाच्या डोक्यात काठी मारणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

| Updated on: Apr 07, 2021 | 9:10 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | कैरी खाण्यासाठी झाडावर आलेल्या माकडाच्या डोक्यात काठी मारणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
Breaking News
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Apr 2021 07:40 PM (IST)

    अनिल परब मातोश्रीच्या जवळचा माणूस, धागेदोरे ठाकरे कुटुंबापर्यंत जाणार, निलेश राणेंचं ट्विट

    निलंबित पोलीस साहायक सचिन वाझे यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बनंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. परब यांनी सचिन वाझेंकडून करण्यात आलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलं. मात्र, या विषयावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

    निलेश राणे नेमकं काय म्हणाले?

    “सचिन वाझेने सांगीतलं अनिल परब पण त्याच्यावर वसुलीसाठी दबाव टाकत होता. अनिल परब बंगल्यातला म्हणजे मातोश्रीचा जवळचा माणूस हे जगजाहीर आहे. त्यांचे धागेदोरे ठाकरे कुटुंबापर्यंत जाणारच कारण उद्धव ठाकरे शिंकले तरी रुमाल अनिल परब द्यायचे. स्पॉट नानाचे दिवस फिरले, खूप उड्या मारत होता”, असा खोचक टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

    निलेश राणे यांचं ट्विट

  • 07 Apr 2021 07:30 PM (IST)

    मुबंई पुणे एक्सप्रेस वे वर ट्रक पलटी होऊन दोन जण ठार

    रायगड : मुबंई पुणे एक्सप्रेस वे वर ट्रक पलटी होऊन दोन जण ठार झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. बोरघाटामधून मुबंईकडे येताना कापसाचा लोड असलेला ट्रकचा टायर फेल झाल्याने तो ट्रक पलटी झाला. या दुर्घटनेत ट्रकचालक आणि क्लीनर दोघांचा मृत्यू झाला आहे.


  • 07 Apr 2021 07:07 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ‘परीक्षा पे चर्चा’ माध्यमातून देशातील विद्यार्थ्यांशी संवाद

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विद्यार्थ्यांच्या शंकाचं निरसन केलं.

    पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

    नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे? हा परिक्षा पे चर्चाचा पहिल्यांदा वर्चूअल इडीशन आहे. तुम्ही जाणता आपण गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटाशी सामना करत आहोत. त्यामुळे अनेकांना वेगवेगळं इनोव्हेशन करावं लागत आहे. मलाही आपल्याला भेटण्याचा मोह आवरला गेला नाही. त्यामुळे मलादेखील एका नव्या फॉरमेटमध्ये तुमच्याजवळ यावं लागत आहे. तुम्हाला न भेटणं, तुमच्या चेहऱ्यावरील हास्य न दिसणं यामुळे माझं खूप मोठं नुकसान होत आहे. पण तरीही परीक्षा आहेत. त्यामुळे आपण परीक्षावर चर्चा करुया. यावर्षीही ब्रेक घेणार नाहीत. एक गोष्ट मी जरुर सांगू इच्छितो, ही परीक्षावर चर्चा आहे. पण फक्त परीक्षाचीच चर्चा नाही. भरपूर विषयांवर बातचित होऊ शकतो. हलकंफुलकं वातावरण तयार करायचं आहे.

    अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे घाबरायला हवं? तुम्ही पहिल्यांदा परीक्षा देताय का? मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा येते ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला परीक्षेची भीती नाही. तर तुमच्या आजूबाजूचं वातावरण तसं करण्यात आलंय. परीक्षा हेच जीवण असं वातावरण तयार करण्यात आलंय. मी सर्व पालकांना सांगू इच्छितो, ही सर्वात मोठी चूक आहे. आपण आवश्यकतेपेक्षा परीक्षेचा जास्त विचार करतो. आयुष्यात ही काय शेवटची परीक्षा नाही. हा तर छोटासा वाटा आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मित्रमंडळींनी तसं वातावरण तयार करु नका.

    पूर्वी आई-वडील मुलांच्या प्रत्येक कामात सोबत असायचे. मुलाची क्षमता आई-वडिलांना माहिती असते. मुलाला प्रोत्साहन दिलं तर त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो. मात्र, आज आई-वडिलांना वेळ नाही. मुलांची क्षमता बघण्यासाठी परीक्षांमध्ये आलेले गुण बघितले जातात. मात्र, परीक्षे व्यतिरिक्त विद्यार्थ्यांमध्ये इतर चांगलेही गुण असतात. परीक्षा ही एक संधी आहे. आपल्याला घडवण्याची संधी आहे. पण आपण बऱ्याचदा परीक्षेला जीवण-मरणाचा विषय बनवतो.

  • 07 Apr 2021 06:41 PM (IST)

    माझ्या दोन मुलींची आणि बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो, सचिन वाझेंचे माझ्यावरील आरोप खोटे : अनिल परब

    सचिन वाझे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर पत्राद्वारे गंभीर आरोप केले आहेत. पण हे आरोप परब यांनी फेटाळले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

    अनिल परब नेमकं काय म्हणाले?

    आज सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात एक पत्र दिलंय. त्या पत्रात त्यांनी माझा उल्लेख केला आहे. मी सचिन वाझे यांना बोलावलं होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. २०२० च्या जून, ऑगस्टमध्ये सचिन वाझे यांना एसबीयूटी प्रकरणामध्ये ट्रस्टींकडून 50 कोटी जमा करण्याचे आदेश मी त्यांना दिले, असा गंभीर आरोप वाझे यांनी पत्रात केला आहे. जानेवारी 2021 मध्ये मी मुंबई महापालिकेचा क्रॉन्ट्रक्टरकडून प्रत्येकी दोन कोटी जमा करण्याच्या सूचना दिल्या, असा दुसरा आरोप त्यांनी केलाय. या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवपसैनिक आहे. माझ्यावर अशाप्रकारचे खंडणीचे कुठलेही संस्कार नाही. म्हणून मी माझ्या दोन मुली आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, हे सर्व खोटं आहे. हे मला नाहक बदनाम करण्यासाठी आरोप करण्यात आले आहेत.

    भाजपचे पदाधिकारी आरडाओरड करत होते. या प्रकरणात आम्ही तिसरा बळी घेऊ, असं ते म्हणत होते. याचा अर्थ त्यांनी दोन-तीन दिवसांपासून हे प्रकरण शिजवलं आहे. त्यांनी सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्रकरण तयार केलं आहे. सचिन वाझे पत्र देणार हे कदाचित त्यांना माहिती होतं. त्यामुळे केंद्रीय यंत्रणेला हाताशी धरुन त्यांनी आरोप केले आहेत. या पत्रात वाझेंनी माझ्यावर, अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचा माणूस म्हणून एकावर आरोप केले आहेत. पण त्याने केलेले दोन आरोपांशी माझा काहीच संबंध नाही. महापालिकेच्या कुठल्याही कंत्राटदारासी माझी ओळख नाही. त्यामुळे मी आज कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे.

    मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या मानसाला बदनाम करणं गरजेचं आहे, ही स्ट्रॅटेजी आहे. तसं करुन सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. हे प्रकरण जाणीवपूर्वक वेगवेगळ्या दिशेला वळवले जात आहे. मी नार्कोटिक्ससाठी देखील तयार आहे. ज्या शिवसैनिकांना माझ्यावर विश्वास आहे त्यांना मी असं कधीही करणार नाही हे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद घेऊन आपलं मत मांडत आहे.

    अनिल परब नेमकं काय म्हणाले पाहा व्हिडीओ:

  • 07 Apr 2021 05:48 PM (IST)

    नाशिकमध्ये मनसे नेत्याची स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

    नाशिक : कामटवाडे येथील मनसे नेते नंदू आबा शिंदे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिंदे यांनी सटाणा-साक्री रोडवर स्कोडा गाडीत बसून स्वतःवर गोळी झाडली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येमुळे राजकीय आणि व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

  • 07 Apr 2021 05:28 PM (IST)

    प्रत्येक ऑफिसमध्ये लसीकरण सुरु करा, केंद्राचे राज्यांना आदेश

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं सर्व राज्यांना सूचना, ऑफिसेसमध्ये लसीकरणाला सुरुवात करा, 45 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना लस द्या, असा आदेश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्राद्वारे संबंधित आदेश दिले आहेत. येत्या 11 एप्रिल पासून लसीकरणाला सुरुवात करावी. लसीकरणासाठी जागा निश्चित करा आणि एका ऑफिसमधील किमान 100 कर्मचाऱ्यांना लस द्या, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

  • 07 Apr 2021 05:04 PM (IST)

    अनिल देशमुख यांनी माझ्या नियुक्तीसाठी 2 कोटी मागितले, सचिन वाझे यांचा गंभीर आरोप

    राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नियुक्तीसाठी दोन कोटी रुपये मागितले, असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. वाझे यांनी याबाबत एक पत्रही लिहिले आहे. या पत्रात महाविकास आघाडीच्या दोन मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. वाझे यांनी NIA च्या कस्टडीत बसून त्यांच्या वकिलांसमोर हे पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. वाझे यांचं निलंबन झालं तेव्हा स्वत: देशमुख यांनी त्यांना फोन केला होता. यावेळी परत सेवेत घेण्यासाठी गृहमंत्र्यांनी दोन कोटी रुपये मागितले, असा आरोप वाझेंनी केला आहे. एकूण तीन पानांचं हे पत्र आहे.

    मी सेवेत आल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार आणि पब आस्थापनांकडूनही वसुली करण्याचे टार्गेट दिलं होतं, असा खुलासा सचिन वाझेंनी लेटरबॉम्बमध्ये केला आहे. परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात केलेल्या आरोपासारखेच आहेत सचिन वाझेंचेही आरोप दिसत आहेत.

    सचिन वाझे यांच्या पत्रावरून आता कोर्टाचे सीबीआयला आदेश दिले आहेत. या पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. आता या प्रकरणी एनआयए बरोबरच सीबीआयकडूनही प्रत्यक्षरित्या तपासाला सुरूवात होणार आहे. इतकंच नाही तर सबंधित पत्रावरून मॅजिस्ट्रेट समोर वाझेंचा जबाब ही नोंदवण्यात आला आहे. लिहिलेल्या पत्रावरून वाझेंनी घुमजाव करू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

  • 07 Apr 2021 04:40 PM (IST)

    कुर्ला सीएसटी मोटर पार्ट मार्केटमध्ये भीषण आग

    मुंबई : कुर्ला सीएसटी मोटर पार्ट मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. आगीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, धुळीचे मोठे लोट हवेत मिळताना दिसत आहेत. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.

  • 07 Apr 2021 04:21 PM (IST)

    रायगड : कोलाड पुणे मार्गावर ट्रेलरचा अपघात, ट्रेलर 20 फूट खाली पडला

    रायगड : कोलाड पुणे मार्गावर दुपारी एक वाजेच्या सुमारास कोलाडकडून भरधाव वेगात स्टीलच्या कॉईल घेऊन ट्रेलर विळे येथील पोस्को स्टील कंपनीत जात होता. दरम्यान, ट्रेलर पाली फाट्याजवळ आला असता ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात एका उतारावर अवघड वळणावर ट्रेलर चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे ट्रेलर 20 फूट खाली गेला. या अपघात ट्रेलर चालक ट्रेलरच्या बाहेर फेकला गेला आणि त्याचा हात ट्रेलर खाली अडकून पडल्याने त्याला क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालकाला पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • 07 Apr 2021 04:06 PM (IST)

    नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही. त्यांना सरसकट उत्तीर्ण केलं जाणार आहे. तर दहा आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईनच होणार, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

  • 07 Apr 2021 04:04 PM (IST)

    ठाकरे सरकार व्यापाऱ्यांना सवलत देणार का? जितेंद्र आव्हाड म्हणतात…..

    “विरोधी पक्षनेत्यांची मी प्रशंसा केली होती. प्रत्येक वेळी विरोधी पक्षांनी विरोधच करायला हवं असं नाही. परिस्थीती गंभीर आहे. ठाण्यात मागील वर्षी ५६१ ही जास्तीत जास्त रुग्ण संख्या होती. काल ती १८०० होती. परिस्थिती गंभीर आहे. मलाही ठाणे जिल्ह्यातील विविध भागातील व्यापारी येऊन भेटले. सवलत द्या अशी त्यांनी मागणी केली. मी मुख्यमंत्र्यांना ही बाब कळवली आहे. यावर बैठक घेऊन पुन्हा विचार करावा लागेल. तशी मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

  • 07 Apr 2021 02:39 PM (IST)

    सीबीआयची टीम एनआईए कोर्टात, सचिन वाझेच्या चौकशीसाठी कोर्टाची परवानगी मागितली

    सीबीआयची टीम एनआईए कोर्टात

    सचिन वाझेच्या चौकशीसाठी कोर्टाची परवानगी मागितला

    कोर्टाकडून परवानगीसाठी दिलं एप्लिकेशन

    कोर्ट याबाबत काही वेळात देणार निर्णय

    त्यानंतर सीबीआय करु शकणार सचिन वाझेची चौकशी

    अनिल देशमुखवर 100 कोटी वसूली प्रकरणात सीबीआई करत आहे प्राथमिक तपास

  • 07 Apr 2021 02:16 PM (IST)

    दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घ्या, ग्रामीण भागातील पालक-विद्यार्थ्यांचे शिक्षण मंत्र्यांना फोन

    – दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घ्या

    – ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना फोन आणि मॅसेज

    – ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाहीत

    – त्यामुळे परीक्षा ऑनलाईन न घेता ऑफलाईन घेण्याची पालक, विद्यार्थीैची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

  • 07 Apr 2021 01:36 PM (IST)

    सचिन वाझेंसह दोघांना आज सेशन कोर्टात हजर करणार

    अम्बानी धमकी आणि मनसुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी सचिन वाझे , विनायक शिंदे नरेश गौर ह्या तिघाना आज सेशन कोर्टात रिमांड साठी हजर केलं जाणार

    आज तिघांची कस्टडी संपत आहे

    तिघाना आज एनआईए कोर्टात दुपारी हजर केला जाणार आहे

  • 07 Apr 2021 01:18 PM (IST)

    स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा तयारीत

    कोल्हापूर

    स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा तयारीत

    स्वाभिमानी स्वतंत्र निवडणूका लढवण्याची शक्यता

    लवकरच निर्णय घेणार

    राजू शेट्टी यांची माहिती

    केंद्रा नंतर आघाडी सरकारने ही आम्हाला फसवले

    शेट्टींचा आरोप

  • 07 Apr 2021 12:29 PM (IST)

    मुंबईच्या चेंबूर स्टेशन येथे शेकडो व्यापरी रस्त्यावर ऊतरले

    मुंबईच्या चेंबूर स्टेशन येथे शेकडो व्यापरी रस्त्यावर ऊतरले

    चेंबूर मुंबईतील ४ हाॅटस्पाॅटपैकी एक

    काँग्रेस नेते लक्ष्मण कोठारी यांनीच केलं आंदोलन

    सरकार लोकांच्या पोटावर मारत आहे, आठवड्यातून तीन दिवस दुकानं ऊघडायची परवानगी द्या, नाहीतर ऊपासमार होईल, अशी व्यक्त केली खंत

    वेळीच निर्णय घेतला नाही तर हजारोंच्या संख्येनं व्यापारी रस्त्यावर ऊतरेल असा गर्भित ईशारा….

  • 07 Apr 2021 12:28 PM (IST)

    कोल्हापुरातील अखेर जिल्हा बंदीचा आदेश मागे

    कोल्हापूर

    कोल्हापुरातील अखेर जिल्हा बंदीचा आदेश मागे

    जिल्हा प्रशासनाचा 24 तासात निर्णय मागे

    परजिल्ह्यातील किंवा जिल्हा अंतर्गत येणाऱ्या व्यक्तींना कुठलीही बंधन नसणार

    नागरिकांना त्रास होणार असल्याने निर्णय मागे

  • 07 Apr 2021 11:40 AM (IST)

    खारघरमध्ये आज पुन्हा व्यापारी गांधीगिरी रस्त्यावर उतरले

    पनवेल –

    खारघरमध्ये आज पुन्हा व्यापारी गांधीगिरी रस्त्यावर उतरले

    दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशाने व्यापारी, दुकानदार नाराज

    400 ते 500 व्यापारी यांचे रस्त्यावर सोशल डिस्टन्स शांततापूर्ण आंदोलन

    जिने दो, जिने दो व्यापारी को जिने दो म्हणत जोरदार घोषणाबाजी

    उत्सव चौकात हातात फलक घेऊन केला प्रशासनाचा निषेध

    उसत्व चौक ते से 12 असा काढला लॉन्ग मार्च

  • 07 Apr 2021 11:25 AM (IST)

    औरंगाबादच्या धानोरा गावात रोजगार हमीच्या कामावर शेकडो मजुरांना रोजगार

    औरंगाबाद –

    कोरोनाचा मार, रोजगार हमीचा आधार

    धानोरा गावात रोजगार हमीच्या कामावर शेकडो मजुरांना रोजगार

    लोकडाऊनमुळे गावी परतलेल्या कामगारांना रोजगार हमीवर मिळाले काम

    एकाच गावातील कामावर 250 मजुरांना मिळाला रोजगार

    गावागावात रोजगार हमीचे काम सुरू करण्याची परतलेल्या कामगारांची मागणी

  • 07 Apr 2021 11:24 AM (IST)

    दंडुकेशहीच्या जोरावर लोकशाही चालू शकत नाही – संदीप देशपांडे

    संदीप देशपांडे –

    अर्थ चक्र आणि निर्बंध याचा समतोल राखला गेला नाही तर जनता रस्त्यावर उतरेल हे आम्ही आधीच सांगितलं होतं

    दंडुकेशहीच्या जोरावर लोकशाही चालू शकत नाही

    अजूनही वेळ गेलेली नाही सरकारने सुधारणा करावी अन्यथा

    सरकारने नागरिक आणि व्यापारी याना फसवलं आहे

    अस करून खरंच कोरोना रुग्ण संख्या कमी होईल का

  • 07 Apr 2021 10:29 AM (IST)

    आमदार शशिकांत शिंदे शरद पवार यांना भेटून निघाले

    आमदार शशिकांत शिंदे शरद पवार यांना भेटून निघाले

    शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे

    राज्यात लसींचा तुटवडा आहे याबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे

    विरोधकांनी राजकारण करू नये

    रेमेडीसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत

  • 07 Apr 2021 10:00 AM (IST)

    परमबीर सिंग एनआयए कार्यालयात दाखल

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग एनआयए कार्यालयात दाखल

    परमबीर सिंगांची सचिन वाझे प्रकरणात चौकशी होणार

    स्फोटकं प्रकरणात एआयए त्यांचा जबाब नोंदवणार

     

  • 07 Apr 2021 09:30 AM (IST)

    मुंबई पोलीस आयुक्तांनी गृहखात्याला पाठवलेला अहवाल ‘टीव्ही 9’च्या हाती

    मुंबई पोलीस आयुक्तांनी गृहखात्याला पाठवलेला अहवाल टीव्ही ९ च्या हाती

    अहवालात परमवीर सिंग यांच्यावर ठपका

    सचिन वाझे यांची पुर्ननियुक्ती परमवीर सिंग यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आली

    तत्कालीन पोलीस सह आयुक्त गुन्हे यांचा वाझेंच्या‌ नियुक्तीला विरोध असतानाही परमवीर सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली, अहवालात खुलासा

    वाझे सर्वसाधारण पोलीस निरीक्षक असतानाही ते थेट परमवीर सिंग यांना रिपोर्ट करायचे

    विविध हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास परमवीर सिंग यांच्या सांगण्यानुसार वाझेंकडे‌ देण्यात आला होता

    वाझेंच्या टीममधल्या व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांना रिपोर्टिंग करण्यास मनाई करण्यात आली होती

    हायप्रोफाईल प्रकरणात‌ मंत्र्यांच्या ब्रिफिंगवेळी परमवीर सिंग यांच्याबरोबर वाझेसुद्धा हजर राहायचे

    सरकारी गाड्या उपलब्ध असताना वाझे मर्सिडिज, ऑडी या वाहनानं कार्यालयात यायचे

  • 07 Apr 2021 08:24 AM (IST)

    नाशिक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरचा राज्य सरकारला इशारा

    नाशिक –

    महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरचा राज्य सरकारला इशारा

    8 एप्रिल प्रयत्न लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्या, अन्यथा 9 तारखेपासून राज्य भरातीलदुकाने सुरू करणार

    सरकारने कडक निर्बंधांच्या नावाखाली लॉक डाऊनच सुरू केल्याचा आरोप

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांना निवेदन देणार

    राज्यभरातील विविध व्यापारी संघटना ची झाली ऑनलाइन बैठक

    बैठकीत सरकारला अलटिमेंटम

  • 07 Apr 2021 08:23 AM (IST)

    कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सह जिल्ह्यातील 4 हजार 982 सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

    कोल्हापूर

    जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सह जिल्ह्यातील 4 हजार 982 सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

    सहकार विभागाकडून आदेश जारी

    राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्या

    गोकुळ दूध संघाची निवडणूक मात्र यातून वगळली

    गोकुळची निवडणूक नियोजित कार्यक्रमानुसारच होणार

  • 07 Apr 2021 07:58 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमधील शहरातील काही भागातील गुरुवारचा पाणीपुरवठा बंद

    पिंपरी-चिंचवड

    -एमआयडीसीचा शहरातील काही भागातील गुरुवारचा पाणीपुरवठा बंद

    -रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम येत्या गुरुवारी करण्यात येणार आहे

    – त्यामुळे एमआयडीसी पाणीपुरवठा करत असलेल्या भागातील गुरुवारचा पाणीपुरवठा सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद राहणार

    -एमआयडीसीकडून होणा-या पिंपरी, चिंचवड,भोसरी, देहूरोड,कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी, दिघी, व्हीएसएनएल, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार

    -तर शुक्रवारी पाण्याचा पुरवठा हा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करावा. पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीने केले आहे.

  • 07 Apr 2021 07:52 AM (IST)

    वैजापूर तालुक्यातील निमगाव येथे घरगुती गॅसचा स्फोट होऊन एक 65 वर्षीय वृद्ध महिला भाजली

    वैजापूर तालुक्यातील निमगाव येथे घरगुती गॅसचा स्फोट होऊन एक 65 वर्षीय वृद्ध महिला भाजली

    या घटनेत संबंधित महिलेच्या घराचेही पूर्णपणे नुकसान

    सिलेंडरमधून गॅस लिक होत असल्यामुळे ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज

    सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु

  • 07 Apr 2021 07:40 AM (IST)

    पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आजपासून बस वाहतुक सुरू

    पुणे –

    – पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आजपासून बस वाहतुक सुरू,

    – यासाठी पीएमपी प्रशासनाने दोन्ही शहरातील २० मार्ग निश्चित केले आहेत,

    -अत्यावश्यक सेवेसाठी सध्या ४१ बसचे नियोजन करण्यात आले आहे.

    – दर एक तासांनी त्या बस मार्गांवर धावतील,

    – सकाळी सहा ते दुपारी एक आणि दुपारी एक ते रात्री नऊ दरम्यान ही बससेवा सुरू राहणार,

    – पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांची माहिती,

    – बसमध्ये दोन्ही महापालिकांचे कर्मचारी, ससून व खासगी रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी तसेच शासकीय कर्मचाऱयांनी ओळखपत्र दाखविल्यावर त्यांना प्रवेश मिळेल,

  • 07 Apr 2021 06:36 AM (IST)

    आमदार तमील सेल्वम यांची पोलिसांना धक्काबुकी

    मुंबई –

    आमदार तमील सेल्वम यांची पोलिसांना धक्काबुकी

    मुंबईत आज दुपारी झेंडा लावण्या वरून भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता

    त्यावेळी भाजपचे स्थानिक आमदार तमील सेल्वम सुद्धा उपस्थित होते

    पोलीस घटनास्थळी पोहचले आणि परिस्थिती शांत करण्याच्या प्रयत्न करत होते तेवढ्यातच आमदार तमील सेल्वम यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुकी केली

  • 07 Apr 2021 06:16 AM (IST)

    इचलकरंजीत पोलिसांची धडक कारवाई, 18 व्यावसायिकांवर गुन्हे

    इचलकरंजी –

    शहरातील पोलिसांची धडक कारवाई खाऊ गल्ली सुंदर बागे जवळील 18 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल

    खाऊ गल्ली मध्ये जमावबंदीचा आदेश भंग केल्याप्रकरणी 38 नागरिकांवर कारवाई

    शहरातील खाऊ गल्ली मध्ये 38 नागरिकांना गावभाग पोलिस आणि पाचशे रुपये दंडाची केली पावती गावभाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांची कारवाई

    शहरातील नागरिक व्यवसायिक यांनी शासनाने दिलेले नियम पाळावेत अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

    माझे कुटुंब माझी जबाबदारी या जबाबदारीने प्रत्येक नागरिकांनी वागले पाहिजे व आपल्या शहर कोरणा मुक्त करायचे आहे

  • 07 Apr 2021 06:14 AM (IST)

    ईडीकडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय व्यावसायिक योगेश देशमुख यांना अटक

    ईडीकडून व्यावसायिक योगेश देशमुख यांना अटक..

    योगेश देशमुख हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय…

    17 मार्च रोजी योगेश देशमुख यांच्या घरावर झाली होती ईडीची छापेमारी..

    योगेश देशमुख यांच्या पत्नीने त्याच ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली होती…

    NSEL मनी लौड्रिंग प्रकरणात योगेश देशमुख यांना अटक झाल्याची माहिती……

    ईडीच्या छापेमारीनंतर योगेश देशमुख यांना रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं होत..