महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
नागपूर :
नागपूर मध्यवर्ती कारागृहात तीन कैद्यांची प्रतिस्पर्धी कैद्याला जबर मारहाण
हल्ला झालेल्या कैद्याचे नाव रोशन कयूम शेख असे असून तो मकोको कायद्यानुसार कारागृहात गेल्या दहा महिन्यांपासून बंद आहे.
रोशन कारागृहात देखील गुंडगिरी करत असल्याने त्याचे अनेकांसोबत वैर निर्माण झाले होते
आज सकाळी रोशन अंघोळ करून येत असताना वाटेत उभ्या असलेल्या काही कैद्यांना शिवीगाळ केल्याने संतप्त झालेल्या तिघांनी रोशन शेख वर हल्ला केला
रोशनची धुलाई केल्यानंतर आरोपींनी जेवणाच्या भांड्यापाऊसन तयार केलेल्या धारधार शस्त्राने रोशनवर वार करण्यात आले
रोशनच्या ओरडण्याचा आवाज आल्याने कारागृहातील इतर कैदी आणि सुरक्षा रक्षक धावून आल्यानंतर मारामारी करत असलेल्या कैद्यांना दूर करण्यात आले.
रोशन गंभीर जखमी असल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात तीन कैद्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सांगली : दुष्काळी भागात जोरदार अवकाळी पाऊस, तर वीज पडून महिलेचा मृत्यू.
चंद्रपूर : वाघाच्या अवयवांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या 4 जणांना वनविभागाने केली अटक, आरोपींकडून वाघाची 12 नखं, 4 दात आणि 15 मिश्या जप्त, गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाला माहिती मिळाली की काही लोकं वाघाचे अवयव विकण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे वनविभागाने सापळा रचून या लोकांना चंद्रपूर तालुक्यातील चेकबोर्डा – चेकनिंबाळा मार्गवर अटक केली. जप्त केलेले अवयव हे साधारण 4 ते 5 वर्ष आधी चेकनिंबाळा परिसरात मेलेल्या एका वाघाचे असल्याची आणि त्या वाघाचा मृत्यू नैसर्गिक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी आरोपींनी वाघाचे हे अवयव काढून विकण्याच्या उद्देशाने स्वतः जवळ ठेवले होते.
विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुर्घटना प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे
विजय वल्लभ रुग्णालयाचे सीईओ दिलीप शहा आणि डॉ शैलेश पाठक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहेत
रुग्णालयाने फायर अॅक्टनुसार अग्नी प्रतिबंधक नाहरकत प्रमाणपत्र घेतले नाही
रुग्णालयाचे फायर ऑडिट झालेले नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न
हे सर्व जाणीवपूर्वक टाळले असल्याचा अटक आरोपीवर ठपका
जर फायर ऑडिट झाले असते तर 15 जणांचे जीव वाचले असते
रुग्णालयात लाखो रुपयांचे बिल बनविले जाते, त्याप्रमाणे अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी बसविणे गरजेचे होते. तसे झाले नसल्याने आग लागून दुर्घटनेत लोकांचा जीव गेला आहे
याला हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न
पुणे :
डेक्कन येथील प्रभात रस्ता परिसरातील घरामध्ये डॉक्टर मृतावस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
तर त्यांची बहिण घरामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आली, पोलिसांनी तिला उपचारांसाठी रुग्णालयात केलं दाखल
मात्र उपचारादरम्यान बहिणीचाही मृत्यू, याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी केली अकस्मात मृत्युची नोंद
नेत्रतज्ञ डॉ.सुबीर सुधीर रॉय (वय 68, रा. श्वेता टेरेस, भोंडे कॉलनी, प्रभात रोड, डेक्कन), गितीका सुधीर रॉय (वय 65) असे मृत्यु झालेल्यांची नावे
डॉ. रॉय आणि गितिका दोघेही होते कोरोना बाधित
सोलापूर :
– उजनीचं पाणी जर इंदापूरसाठी घेतलं असलं तर राजकीय सन्यास घेईन
– उजनी धरणाचं 5 टीएमसी पाणी इंदापूरला पळवल्याचा सोलापूरच्या पालकमंत्र्यांवर झाला होता आरोप
– माझ्या भाकरीसाठी दुसऱ्याची भाकर कधी हिरावून घेणार नाही
– सोलापूर पालकमंत्री दत्तात्रय भरणेंनी भावना केल्या व्यक्त
– पालकमंत्री दत्तात्रय भरणे मागच्या दोन दिवसांपासून करतायत जिल्ह्याचा आढावा दौरा
विरार दुर्घटनेबाबत चौकशी समिती स्थापना 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश
विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातील भीषण आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी शासनाच्या वतीने पाच सदस्यांची एक समिती स्थापन
पालघर जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
स्थापन करण्यात आलेल्या समितीत वसई विरार महापालिका आयुक्त गंगाथरन डी,जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी, पोलीस उप आयुक्त ( झोन-2 ) संजयकुमार पाटील आणि वसई-विरार महापालिका अग्निशमन दल प्रमुख अधिकारी दिलीप पालव यांचा समावेश
सातारा : जावळी तालुक्यातील मेरुलिंग घाटात इर्टिगा कारचा भीषण अपघात…
अपघातात 3 जण ठार तर 5 जण जखमी…
मृतामध्ये शिवाजी जगन्नाथ साबळे 40,
लिलाबाई गणपत साबळे 55,सागर सर्जेराव साबळे 32 यांचा समावेश
रेशनिंग आणण्यासाठी जात असताना मेरुलिंग घाटातील एका वळणाचा अंदाज न आल्याने गाडी झाली पलटी
जखमींना मेढा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल
मेढा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद
आंबेगाव,पुणे
-मांडूळच्या तस्करी प्रकरणी आंबेगावात दोघांना अटक,मंचर पोलिसांची कारवाई
-ह्या मांडूळा चे वय वर्ष तीन असून त्याची किंमत अंदाजे चार ते पाच लाख रुपये इतकी
-या प्रकरणी संभाजी बाबुराव राजगुरू आणि सुनील दिलीप पवार यां दोघांना अटक
-ही दोन्ही मांडूळ आंबेगाव वनपाल यांच्या ताब्यात दिली असून लवकरच त्यांना जंगलामध्ये सोडण्यात येणार आहे
औरंगाबाद :-
दौलताबाद किल्ल्यासमोर दोन कारमध्ये भीषण अपघात
अपघातात तीन जण ठार तर दोन जण जखमी
शनिवारी रात्री साडेअकरा वाजता झाला भीषण अपघात
दीपक खोसरे, मदन जगताप आणि राजू मानकीकर अशी अपघातातील मायतांची नावे
तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
किल्ल्यासमोर रस्ता अरुंद असल्यामुळे झाला भीषण अपघात
औरंगाबाद :-
किरकोळ वादातून 21 वर्षीय तरुणाचा भोसकून खून
औरंगाबाद शहरातील एसबीओ शाळेसमोरील घटना
यश महेंद्रकर असं खून झालेल्या तरुणाचे नाव
अवघ्या चार मिनिटांत तरुणाचा भोसकून केला खून
राज नावाच्या आरोपीने तरुणाला चाकूने भोसकल्याची माहिती
पोलिसांकडून आरोपींचा कसून तपास सुरू
या घटनेमुळे मयूर पार्क परिसरात खळबळ
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे गटारीच्या बांधकामावरून दोन गटात जोरदार राडा
माजी उपनगराध्यक्ष आणि माजी पंचायत समिती उपसभापती यांच्यात वाद
हणामारी वेळी डोक्यात वीट फेकून मारल्यान विजय मेंगणे नावाचा युवक गंभीर जखमी
हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांत तुरळक ठिकाणी रविवारपासून पुढील पाच दिवस पावसाळी स्थिती निर्माण होणार
काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचा पुणे हवामान विभागाचा इशारा
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाची शक्यता असली, तरी पावसाच्या प्रमाणापेक्षा सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट अधिक राहणार
मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत प्रामुख्याने पुढील पाच दिवस पावसाची शक्यता
शिवसेनेची सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर जोरदार टीका
देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. मंदीच्या लाटेने सगळेच गटांगळय़ा खातील अशी स्थिती आहे. राज्यकर्ते आत्मसंतुष्ट व आत्मप्रौढीत मग्न असले की, हे असे होणारच! अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहेच. किमान पंतप्रधान मोदी यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून प्रे. रुझवेल्टच्या भूमिकेत शिरणे महत्त्वाचे आहे.
सीबीआयचा माजी गृहमंत्र्यांच्या घरावर छापा, तब्बल 11 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रियाhttps://t.co/dRk6ySww0e#CBI #AnilDeshmukh #Nagpur #SachinVaze #ParambirSingh #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 24, 2021