महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
जालना : सेफ्टी टॅंकमध्ये गुदमरून 3 जणांचा मृत्यू
जालन्यातील सोनल नगर मधील घटना
जुना सेफ्टी टॅंक साफ करत असताना घडली घटना
पुण्यात 61 हॉस्पिटल्सना महापालिकेच्या नोटिसा
आगप्रतिबंधक उपाय नसल्याने पाठवल्या नोटिसा
अग्निशमन दलाकडून 240 हॉस्पिटल्सचे ऑडिट
विरारमधील दुर्घटनेनंतर पुण्यात हॉस्पिटल्सचे ऑडिट
8 दिवसांत उपाययोजना करण्याची पालिकेकडून संधी
उपाययोजना न केल्यास कारवाई करणार
नाशिक – अंगावर वीज पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू तर एक गंभीर जखमी
– येवला-मनमाड रोडवरील येवला तालुक्यातील अंकाई येथील घटना
– दोघे मृत पुरुष तर गंभीर जखमीत मुलीचा समावेश
– अवकाळी पाऊस सुरू झाल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी उभे होते झाडाखाली
नाशिक : मनमाडसह, नांदगाव तालुक्यातील काही भागात वादळी वारा
विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची हजेरी
काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला
पावसामुळे खळ्यात, मळ्यात काढून ठेवलेला कांदा भिजून झाला खराब
इतर पिकांचेही नुकसान झाल्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात
पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला काहीसा दिलासा
धुळे : शहरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाची चिन्हं
अचानक वादळ-वारा आल्याने पोलिसांचा तंबूच उडाला
जोरदार वाऱ्यामुळे तंबूसह पोलिसांचे बॅरिकेड्ससुद्धा उडाले
तंबू वाचवण्यासाठी पोलिसांची कसरत
धुळ्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण
शिर्डी : सुजय विखे रेमडिसिव्हर प्रकरण
न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस विभागाची चौकशी सुरू
शिर्डी विमानतळावर पोलीस पथकाकडून चौकशी सुरू
न्यायालयाने सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे दिले आहेत आदेश
पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी शिर्डी विमानतळावर
गेल्या 4 तासांपासून सुरू आहे चौकशी
सोलापूर- जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात जनआंदोलन उभारणार
भाजप आमदार सुभाष देशमुख यांचा इशारा
सोलापुर जिल्ह्यात एक आणि इंदापूर तालुक्यात एक असे उजनीच्या पाण्याबद्दल वेगवेगळं बोलणाऱ्या पालकमंत्र्यांनी सत्तेचा दुरुपयोग करू नये- सुभाष देशमुख
पालकमंत्र्यांना हे शोभत नाही- सुभाष देशमुख
सोलापूरच्या हक्काचे पाणी पळविल्यास जे येतील त्यांच्या बरोबर आपण स्वतः जन आंदोलन करू- सुभाष देशमुख
उजनी पाणी प्रश्नावरून सोलापूर काँग्रेसनंतर भाजपचा इशारा
पालकमंत्र्यांनी सोलापूरच्या नादाला लागू नये, ब्रिटिशांविरुद्ध लढा दिलेला सोलापूर अन्याय खपवून घेत नाही याची जाण ठेवावी- सुभाष देशमुख
उजनीतील 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्यात आल्याची माहिती आली होती समोर, स्वतः भरणे यांनी मात्र हे वृत्त फेटाळले होते
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा
– राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवले पत्र
– मतदारसंघाकडे लक्ष देण्यासाठी कार्यमुक्त करण्याची चेतन तुपे यांची प्रदेशाध्यक्षांकडे विनंती
– गेल्या अडीच वर्षांपासून तुपे यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी
पुणे – पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात
– शहरात गारांचा पाऊस
– कात्रज, कोंढवा, धनकवडी ,भारती विद्यापीठ परिसरात पावसाची जोरदार बॅटींग
– जोरदार पावसानं पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा
– पाच दिवस पावसाचा पुणे हवामान वेधशाळेनं वर्तवला होता अंदाज
नवी मुंबईत थंडावलेले राजकारण पुन्हा गरम
नवी मुंबईतील काँग्रेसच्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
नामदेवराव भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश सोहळा छोटेखानी स्वरूपात- अजित पवार
गणेश नाईक जरी पक्ष सोडून गेले तरी आदरणीय पवार साहेबांवर निष्ठा असणारे अनेक कार्यकर्ते – जयंत पाटील
पुणे – लॉकडाऊनच्या काळातही पुण्यात गुन्ह्यांमध्ये वाढ
– वाहनचोरी, बलात्कार, अपहरण आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात वाढ
– 28 एप्रिल 2020 ते 28 एप्रिल 2021 पर्यंत खूनाच्या 18 घटना
– तर 19 घटना खूनाचा प्रयत्न, बलात्काराच्या 63 घटना,तर अपहरणाच्या 169 घटना
– तर वाहनचोरीच्या तब्बल 453 घटना
– पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतीच, पुणे पोलिसांनी सक्त अंमलबजावणी करणं गरजेचं
पुणे – विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हेंनी महापालिकेत झालेल्या गोंधळाची चौकशी करण्याचे दिले आदेश
– भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी आरोग्य अधिकारी वैशाली जाधव यांच्यावर केले होते आरोप
– आरोप करताच वैशाली जाधव यांना रडू कोसळलं काम न करण्याचा घेतला होता पवित्रा
– आयुक्त विक्रम कुमार यांनी चौकशी करून एकनाथ शिंदे यांना अहवाल देण्याच्या दिल्या सूचना
– भाजप नगरसेवकावर कारवाई होणार का ?
वाशिम : जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील फुलउमरी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
पावसामुळे परिसरातील नागरिकांना उकाड्या तात्पुरता पासून दिलासा
चंद्रपूर : मिनरल वॉटरच्या बॉक्समध्ये छुप्या पध्दतीने आणली जात असलेल्या 150 दारूच्या पेट्या जप्त
वरोरा तालुक्यातील खांबाडा चेक पोस्टवर पोलिसांची कारवाई
राज्यातील ब्रेक दी चेन दरम्यान जिल्ह्याच्या सीमांवर होत आहे तपासणी
पोलिसांच्या कारवाईत दारूसह 2 चारचाकी वाहनं केली जप्त
पोलिसांनी दारू तस्करी करणाऱ्या 4 आरोपींना केली अटक
कर्जतहून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा मागील दीड तासांपासून ठप्प
अंबरनाथ रेल्वे स्थानकात कोयंबतूर एलटीटी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड
१२.४७ वाजता पासून एक्स्प्रेस अंबरनाथ स्थानकात उभी
कर्जत तर मुंबई रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प, तर मुंबई ते कर्जत रेल्वेसेवा 20 मिनिटे उशिराने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक संपली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित होती बैठक
तीन तास देशातील कोरोना महत्वपूर्ण बैठक
महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात परिस्थिती गंभीर
केंद्र सरकार 100 टक्के लस का विकत घेत नाही
सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल
केंद्र जास्तीत जास्त ऑक्सिजन देण्ायत यावं
ऑक्सिजनच्या स्पलायसाठी टॅंकर देण्यात यावे
राष्ट्रीय स्तरावर हे समस्य़ा सोडवा
सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल
सांगली – कवठेमहांकाळ पोलिसांची धडक कारवाई केली आहे. चंदन तस्करी करणारी टोळीला गजाआड केले आहे. कारवाई दरम्यान एक लाख 42 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
औरंगाबादच्या जटवाड्यात शेतीच्या वादातून एका गर्भवती महिलेला जबर मारहाण करण्यात आली आहे
झालेल्या या मारहाणीत महिलेचा गर्भपात झाला आहे
या महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत
घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली
काही आरोपींना ताब्यात सुद्धा घेतले आहे
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरु होती
सोलापूर– विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई
वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई
शहरातल्या विविध भागात शहर गुन्हे शाखा कडून कारवाई
विनाकारण वाहनावर डबल सीट फिरणाऱ्या नागरिकावर कारवाई
औरंगाबादच्या जटवाड्यात शेतीच्या वादातून एक महिलेला जबर मारहाण
मारहाणीत महिलेचा गर्भपात
महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
दौलताबाद पोलिसांनी घटनास्थळी
काही आरोपींना ताब्यात
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
नाशिक पिंपळगाव परिसरातील जोपुळ रोड बाजारसमितीच्या शिवारात गाडीमध्ये बिघाड झाल्याने अचानक गाडीने पेट घेतला.त्यामुळे गाडी पूर्णपणे जळून खाक झाली
सुदैवाने जीवित हानी टळली
मात्र मारुती व्हॅन चे पूर्णपणे यात नुकसान
कारला आग लागताच तातडीने अग्निशमन दलाला बोलवण्यात आले.
मात्र अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली.
CNG लीक,किंव्हा शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पंढरपूर –
संगोल्यातील चांडोलेवाडी येथील बाबुराव मेटकरी यांच्या माडग्याळ जातीच्या सर्जा मेंढ्यांचा मृत्यू
या मेंढ्याला तब्बल ७१ लाख इतकी बोली आटपाडी च्या जत्रेत लागली होती.
मेटकरी कुटुंबातील एक सदस्य म्हणूनच त्याचा सांभाळ केला
होता.
वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पन्न हा मेंढा मिळवून देत होता.
निमोनिया आजार झाल्याने उपचार दरम्यान काल त्याचा मृत्यू झाला.
सोलापूर-
विनाकारण असणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई
वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई
शहरातल्या विविध भागात शहर गुन्हे शाखा कडून कारवाई
विनाकारण वाहनावर डबल सीट फिरणाऱ्या नागरिकावर कारवाई
सातारा : गज्या मारणे टोळीशी संबधित चौदा जण वाई पोलिसांच्या ताब्यात
वाई येथील बिल्डर आणि पाचगणी येथील एका व्यवहारातील पैशाच्या वसुलीसाठी आले असल्याची माहिती…
वाई पोलिसांकडुन 14 जणांवर खंडणीसह जिल्हाबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
– नागपूरसाठी काल कोरोना लसीचा पुरवठा नाही
– नागपूर महानगरपालिकेकडे लसीचे अवघे १० हजार डोजेस
– लसीचा साठा आला नाही तर आज दुपारनंतर लसीकरण ठप्प होण्याची शक्यता
– मनपा हद्दीत रोज १० ते १५ हजार जणांचं लसीकरण
– संपूर्ण नागपूर विभागातंच जानवतोय लसीचा तुटवडा
– काल नागपूर निभागासाठी लसीचा पुरवठा नाही
– नागपुरात कोरोना रुग्णाचं पाच लाखांचं बील 30 मिनिटांत आलं अडीच लाखांवर
– नागपुरातील न्यू इरा हॅास्पिटलमधला धक्कादायक प्रकार
– दिपक सोमानी यांच्या पत्नीचं बिल काढलं पाच लाख रुपये
– तक्रारीनंतर हॅास्पिटलमध्ये धडकले नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी
– संदीप जोशी यांनी चौकशी केल्यानंतर पाच लाखांचं बिल झालं अडीच लाख रुपये
– नागपूरला अनेक रुग्णालयांकडून सुरु आहे कोरोना रुग्णांची लूट
पुणे –
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच
विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने घेतला प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय
पुणे
महापालिकेच्या अधिकाऱ्याची ठेकेदारासह रंगली ओली पार्टी
उत्तमनगर पोलिसांनी फार्म हाऊसवर छापा टाकत उत्तमनगर छाप टाकत कनिष्ठ अभियंता विवेकानंद विष्णू बडे, तीन कॉन्ट्रॅक्टर, फार्म हाऊस मालक व इतर 4 अशा एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल करत केली अटक
खडकवासला धरणाच्या उजव्या बाजूला असलेल्या कुडजे गावच्या हद्दीत लबडे फार्म मध्ये ओली पार्टी
अभियंत्यासह ठेकेदार मद्यधुंद अवस्थेत मुंबई येथील चार व पुणे येथील एका तरुणीसह डीजे च्या तालावर नृत्य करताना आक्षेपार्ह स्थितीत आले आढळून
पोलिसांनी रिकाम्या मद्याच्या बाटल्या व इतर काही आक्षेपार्ह साहित्य केलं जप्त
रायगड –
पोस्को कपंनीतून भंगार घेऊन जणाऱ्या कंटेनरला आग, रात्रीची घटना
राष्ट्रवादी-शिवसेना कार्यकर्त्याचां काही दिवसांपुर्वी पोस्को कपंनीच्या गेट समोर भंगार घेण्याच्या ठकेदारीवरुन झाला होता राडा.
कपंनीतुन निघालेल्या 16 टायरच्या भंगारच्या कंटेनरला सुतारवाडी-कोलाड रोडवर पोस्को कपंनीपासुन काही अतंरावर निर्जन ठिकाणी लागली आग
भंगारच्या कंटेनरला आग लावली गेल्याची चर्चा
नागपूर –
– काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके विरोधात गुन्हा दाखल
– नाना पटोले यांच्यासमोर अधिकाऱ्यांना दिली होती जीवे मारण्याची धमकी
– सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, लकडगंड पोलीसांनी बजावली नोटीस
– बंटी शेळके यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात केला होता गोंधळ
– आयुक्तांना भेटायला गेलेल्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या शिष्टमंडळात होते बंटी शेळके