Maharashtra CM Uddhav Thackeray Vidhan Sabha Speech Live Updates: मुंबई : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, मुंबईतील बातम्या, पुण्यातील बातम्या, मनोरंजन विश्व, क्रीडा जगत, शेती, उद्योग, व्यापार, सोने यासह सर्व घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर पाहू शकाल. त्याशिवाय, राजकीय सर्व अपडेट पाहा टीव्ही 9 मराठीवर. (Live Updates Maharashtra)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाजपला टोले लगावले आहेत. कोरोना विषाणू रोखण्यासाठी महाराष्ट्रानं केलेल्या कामाबद्दल कौतुक न करणाऱ्या भाजपवर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. कोरोना संपला नसल्यामुळे अधिवेशन दोन दिवसाचे घ्यावे लागले. जी गोष्ट डब्ल्यूएचओला दिसली, वॉशिग्टंन पोस्टला दिसली ती तुम्हाला दिसली नाही याचं वाईट वाटतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
विरोधकांच्या सर्वच आरोपांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही, माझ्या सहकारी मंत्र्यांनी उत्तर दिलं आहे, तुम्ही मानगुटीवरच बसायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही काही करु शकणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात वकिलांची फौज जशीच्या तशी आहे, भूमिकेत बदल नाही, काहीही बदलेलं नाही – मुख्यमंत्री
मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात, ही लढाई आम्ही जिंकणारच, ही लढाई लढत असताना मध्येच कुणी टुमणं काढलं इतर समाजाचं आरक्षण काढणार का वगैरे..पण मी सभागृहात ग्वाही देतो, मराठा आरक्षण देताना अन्य कुणाचं आरक्षण काढणार नाही. हे रेकॉर्डवर आहे, समाजात जे कोणी आग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर पाणी टाकावं लागेल. मी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने बोलतोय
मराठा आरक्षण उच्च न्यायालयात गेलं तेव्हा केवळ दोन आरक्षणच टिकली, एक तामिळनाडूचं दुसरा मराठा आरक्षण. सर्वोच्च न्यायालयात आमच्या सरकारच्या काळात प्रकरण गेलं, तेव्हा आम्ही तयारी केली, त्यावेळी सरन्यायाधीशांनी स्टे देण्यास नकार दिला. परंतु त्यानंतर त्याबाबतची सुनावणी या सरकारच्या काळात झाली. आ बैल मुझे मार असं झालं. यांनीच कोर्टाने न विचारता सांगितलं आम्ही कुठलीही भरती करणार नाही वगैरे.. तसं करण्याची गरज नव्हती, कोर्टाने विचारलं नव्हतं. ज्या नियुक्त्या दिल्या त्या ठिक आहेत, मात्र तुमच्या आदेशापर्यंत नव्या नियुक्त्या करत नाही असं सुप्रीम कोर्टात यांनी सांगितलं असतं तर योग्य ठरलं असतं. या सरकारने जर मनात आणलं तर काही ना काही मार्ग काढता येऊ शकेल. प्रोटेक्शन देता येईल का वगैरे विचार करता येऊ शकतो. मात्र दुर्दैवाने सरकारच्या वतीने टोलवा टोलवी शिवाय काहीही होत नाही. मात्र जोपर्यंत हा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करु. सरकारला चांगले पर्यायही सूचवू. मराठा आरक्षण हा रजकीय प्रश्न नाही, राजकीय पोळी भाजायची नाहीय, हा तरुणांचा प्रश्न आहे. सरकारने मार्ग काढायला हवा. तरुणांच्या स्वप्नांवर आघात झालाय. टोकाचा संघर्ष करावा लागला तर करु, पण तरुणांना न्याय मिळावा- देवेंद्र फडणवीस
LIVETV- देवेंद्र फडणवीस म्हणत होते मराठा आरक्षणाबाबत फुल प्रूफ कायदा करु, आरक्षण कोर्टात टिकेल असं म्हणत होते, मग आता कोर्टाने त्याला स्थगिती का दिली? – अशोक चव्हाण लाईव्ह https://t.co/ImprYi4kJH @AshokChavanINC @Dev_Fadnavis pic.twitter.com/H70vb5QjO2
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 15, 2020
वर्षा बंगल्याचा एक रुपयाही थकीत बिल नाही, तशीच स्थिती देवगिरी बंगल्याची, बातम्यात कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. ड्रेसकोडबाबत सरकार फेरविचार करतंय, जे योग्य आहे ते केलं जाईल
केंद्राकडून जीएसटीचा राज्याला जो हिस्सा यायला हवा तो मिळाला नाही. केंद्राकडून ३० हजार ५३७ कोटी अजून दिलेले नाहीत. कायदा करत असताना राज्याला ठराविक रक्कम दरवर्षी दिली जाते पण ती दिली जात नाही. केंद्राचा निधी आला नाही, आपल्यालाही जेवढे उत्पन्न मिळायला हवं ते मिळालं नाही. १२ हजार कोटी पगार आणि पेन्शनला जातात, ते राज्याने थकवले नाहीत. बाकीच्या बाबतीत जितकी काटकसर करता येईल तेवढी केली. आमदार निधी, डोंगरी विकास निधी, जिल्हा नियोजन निधीला आम्ही कात्री लावली नाही- अजित पवार
राज्यात दिसत असणारी विकासकामं आमच्या सरकारच्या काळात सुरु झाली होती. आरेमध्ये कारशेड तयार करण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतला. उच्च न्यायालयानं, सर्वोच्च न्यायालयानं आरेविरोधातील याचिका फेटाळली. आरेमध्ये काम सुरु केले. त्यानंतर 100 कोटी खर्च करण्यात आले. त्यांनंतर कारशेड कांजूरला हलवण्यात आले, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
देशामध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले. राज्यात 50 हजार लोकं मेली. देशातील कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असूनही राज्यात सर्वात जास्त मृत्यू होत आहेत. सरासरी मृत्यूमध्ये वाढ होत आहे. कोरोना काळातील भ्रष्टाचार रोखायला हवा होता.
तुमच्या पुस्तकात आमचीच कामं का? विधानसभेत फडणवीसांचा ठाकरेंना सवाल, आमच्या योजनांची नावं बदलून तेच पुढे नेलं जातंय, आमची घोषणा होती हरघर मोदी, घरघर मोदी, त्याची कॉपी ग्राम विकास विभागाने केली, हरघर गोठे, घरघर गोठे, तुम्ही काहीतरी कल्पकता वापरा, आमचं कशाला कॉपी करताय? – फडणवीस pic.twitter.com/EGOngdeJVv
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 15, 2020
महाबीजच्या बियाण्यामुळे शेतकऱ्यांना तिबार पेरणी करावी लागली. तिसऱ्या पेरणीनंतर उगवलेलं पावसानं गेले. शेतकऱ्यांना घोषणा केलेले पैसे मिळाले नाहीत. मदतीच्या वाटपातही दुजाभाव करण्यात आला. सरकारच्या कृषी विभागानं बोंडअळीच्या संदर्भातील शेतीशाळा घेतल्या नाहीत. बोंडआळीमुळं कापूस गेला. सोयाबीन गेलं, तूर गेली. शेतकरी उद्धवस्त झाला आहे.
2013 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह, शरद पवार यांनी देशभरातील मंत्र्यांची एक कमिटी स्थापन केली होती. त्यासमितीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील होते. त्या समितीनं दिलेल्या अहवालात अत्यावश्यक सेवा कायद्यातील तरतुदींमुळे शेती क्षेत्रात गुंतवणूक होण्यात अडचणी होत असल्याचे नमूद असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी पुढे बोलताना तुमच्या वर्षभराच्या कार्यकाळाच्या कामकाजाचा अहवाल सांगणाऱ्या पुस्तकात आमच्याच काळातील कामं का?, असा सवाल विचारला.
महाराष्ट्रात खासगी एपीएमसीमधून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतोय. बाळासाहेब थोरात यांनी ट्रॅक्टर चालवले. मात्र, त्यांच्या आंदोलनात शेतकरी उतरले नाहीत.
सोलापूर- शेतीविषयक तीनही विधेयके शेतकऱ्यांचे कवच कुंडले आहेत, हे विधेयक कोणत्याही परिस्थितीत मागे घेतली जाणार नाहीत, किसान संघटनांनी ठेका घेतला आहे तो देश विघातक आहे. बळीराजाचा जीव धोक्यात आणला जात आहे, भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांचं विधान
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याच्या निर्णयाला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी विरोध केला आहे. गावच्या प्रस्थापितांच्या हातात रिमोट जाईल, आणि घोडेबाजारही थांबणार नाही, अशा शब्दात जानकरांनी संताप व्यक्त केला. तर सरकारचा हा निर्णय राजकीय हेतूनं प्रेरीत असल्याची टीकाही विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केलीय.
अनेक राज्यांमध्ये निवडणुकांनंतर सरपंचपदाची आरक्षण काढण्याची पद्धत, पद मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने निर्णय – हसन मुश्रीफ
पुढील नवीन वर्षात 1 तारखेपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार आहे, त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे, मंत्री वडेट्टीवारांची माहिती
औरंगाबाद : औरंगाबादेत कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ, 5 महिन्यात 130 कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना, तर 5 महिन्यात 25 महिलांना पतीने दिले घरातून हाकलून, 130 महिलांनी दिलेल्या तक्रारीतून माहिती समोर, मोबाईलवर बोलण्याच्या संशयावरून सर्वाधिक घडतायत कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना
नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांनी केला 1 लाखांचा आकडा पार, गेल्या 24 तासात जिल्ह्यात 237 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह, तर 3 रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यात मृत्यूचा एकूण आकडा झाला 1,867 वर, सद्य स्थितीत जिल्ह्यात 3,467 रुग्णांवर उपचार सुरु
औरंगाबाद : आजपासून औरंगाबाद शहरात 11 वी आणि 12 वीचे वर्ग सुरु, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांचा निर्णय, 3 जानेवारीपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा यापूर्वी घेतला होता निर्णय, मात्र, कोरोना कमी होत असल्यामुळे 11 वी आणि 12 चे वर्ग आजपासून सुरु, मात्र प्राथमिक आणि माध्यमिक शाळा अजूनही रहाणार बंदच
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास विश्वस्तपदी आमदार विकास ठाकरेंची नियुक्ती, फडणवीस सरकारकडून नासुप्र बरखास्तीची घोषणा, ठाकरे सरकारकडून नासुप्र पुनरुज्जीवीत करण्याच्या हालचाली, आमदार विकास ठाकरेंना विश्वस्त करुन नासुप्र पुनरुज्जीवीत करण्याच्या हालचाली
नागपूर : थकीत मालमत्ता करावरील दंड माफ करण्याचा नागपूर मनपाचा निर्णय, थकीत करवसुलीसाठी मनपाने लागू केली अभय योजना, नागपूरातील लाखो थकबाकीदारांना मोठा दिलासा, अभय योजनेचा कालावधी 15 डिसेंबर 2020 ते 15 फेब्रुवारी 2021, कोरोनामुळे आर्थिक स्थिती खालावल्याने मनपा मोठा निर्णय
नागपूर : नागपुरात हुंडी दलालाने व्यापाऱ्यांना 10 कोटी रुपयांनी गंडवले, प्रसिद्ध फर्मच्या नावावर खोटे दस्तावेज तयार करुन व्यापाऱ्यांना गंडवले, इतवारी परिसरात अनेक हुंडी दलाल सक्रिय, व्यापाऱ्यांच्या फसवणुकीची वर्षभरातील पाचवी घटना, नागपूरात वाढत आहेत आर्थिक फसवणुकीचे प्रकार
पालघर : वाढवण बंदरा विरोधात जन आंदोलन आक्रमक, वाढवण बंदरा विरोधात मुंबई ते गुजरातच्या सीमेवरील झाई किनारपट्टीपर्यंत बंदची हाक, 15 डिसेंबरला राहणार वसई, पालघर, डहाणू पर्यंत किनारपट्टीवरील मासळी बाजरपेठ गावात कडकडीत बंद , वाढवण बंदरा मुळे शेतकरी, बागायतदार, डायमेकींग व्यवसायिक उद्धवस्त होऊन देशोधडीला लागणार असल्याने होतोय बंदराला मोठा विरोध