LIVE | लांब पल्ल्याच्या गाड्यातील प्रवाशांना मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी

| Updated on: Dec 28, 2020 | 4:05 PM

राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज,  दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या सर्व घडामोडी एकाच ठिकाणी

LIVE | लांब पल्ल्याच्या गाड्यातील प्रवाशांना मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी
Follow us on

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Dec 2020 11:21 PM (IST)

    लांब पल्ल्याच्या गाड्यातील प्रवाशांना मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी

    लांब पल्ल्याच्या गाड्यातील प्रवाशांना मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी, अटींच्या अधीन राहून प्रवासास परवानगी, बाहेरच्या प्रवाशांना तिकीट दाखवून विनापरतीचे उपनगरीय रेल्वेचे तिकीट खरेदी करुन मुंबई आणि महानगर प्रदेशातील कोणत्याही ठिकाणी उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी, उतरण्याच्या वेळेपासून सहा तासांपर्यंत करता येणार प्रवास

  • 17 Dec 2020 10:59 PM (IST)

    शुक्रवारी राज्यातील सर्व शाळांनी बंद पुकारावा, आमदार विक्रम काळे यांचे आवाहन

    राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने शाळेतील शिपाईयाचे पद रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात सर्व शाळांनी बंद पुकारावा, शुक्रवारी सर्व शाळांनी बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांचे आवाहन, राज्यातील 52 हजार शिपायांच्या नोकरीवर गंडांतर आणणारा हा निर्णय रद्द करावा अशी काळे यांची मागणी


  • 17 Dec 2020 10:03 PM (IST)

    नवी मुंबईत धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना दिलासा, 31 इमारतींच्या पुनर्विकासाची परवानगी

    नवी मुंबई : धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना महापालिकेचा दिलासा, 31 इमारतींना महापालिकेकडून पुनर्विकासाची परवानगी, 586 कुटुंबांना मिळणार दिलासा, ओळख समितीच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय, महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची माहिती

  • 17 Dec 2020 09:58 PM (IST)

    नागपुरात 430 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू

    नागपुरात 430 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, दिवसभरात 9 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू दिवसभरात एकूण 493 जणांची कोरोनावर मात, नागपुरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 18 हजार 777 वर

  • 17 Dec 2020 09:47 PM (IST)

    नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी परिसरातील प्लास्टिक कंपनीत आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

    नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी परिसरातील प्लास्टिक कंपनीत आग, प्लास्टिक प्रोसेसिंग चेजॉब तयार करत असलेल्या कंपनीत आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे प्रयत्न

  • 17 Dec 2020 09:29 PM (IST)

    सातारा जिल्ह्यात 879 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका, राजकीय धुरळा उडण्यास सुरुवात

    कोरोना विषाणूमुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्तांनी केली आहे, 15 जानेवारीला राज्यात सर्वत्र मतदान होणार, सातारा जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार, साताऱ्यात महाविकास आघाडीमधील घटकपक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार का याकडे लक्ष, जिल्ह्यात ठराविक तालुक्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्राबल्य

  • 17 Dec 2020 08:59 PM (IST)

    अवजड वाहन बेशिस्तपणे चालवण्याला आता चाप बसणार, नवी नियमावली लागू

    पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बेशिस्त वाहतूक चालवणाऱ्या अवजड वाहनांना आता चाप बसणार, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रत्यक्षात अवजड वाहतुकीमुळे झालेली कोंडी अनुभवली, त्यानंतर स्वतः द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर येऊन त्यांनी वाहतूक पोलिसांशी संवाद साधला, यावेळी दंडात्मक कारवाईच्या पलीकडे कठोर शासन होणार असल्याचे त्यांनी सांगितले, तीन वेळा दंडात्मक कारवाई झाल्यास लायसन्स रद्द होणार, नियमांची अंमलबजाणी शुक्रवारपासून होणार, शंभूराजे देसाई यांची माहिती

  • 17 Dec 2020 07:53 PM (IST)

    करण जोहरला एनसीबीचे समन्स, ड्रग्जशी संबधित ड्रग्ज कनेक्शनबाबत माहिती घेणार

    बॉलिूवडचा आघाडीचा निर्माता करण जोहरला एनसीबीचे समन्स, बॉलिवूड-ड्रग्ज कनेक्शनबाबत चौकशी होण्याची शक्यता, याआधीही अनेक सेलिब्रिटींची चौकशी, करण जोहरकडे असलेली माहिती एनसीबीला हवी असल्याने नोटीस

  • 17 Dec 2020 07:07 PM (IST)

    फ्रान्सच्या अध्यक्षांना कोरोनाची लागण, लवकर रिकव्हर व्हा म्हणत मोदींचे फ्रेन्चमध्ये ट्विट

    पॅरिस : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना कोरोनाची लागण झाली आहे, मागील काही दिवसांपासून त्यांना कोरोनासदृश्य लक्षणं जाणवत होते, कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले, सध्या मॅक्रॉन विलगिकरणात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रेन्च भाषेत ट्विट करत, मॅक्रॉन यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

  • 17 Dec 2020 07:00 PM (IST)

    लस देण्याबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे, स्टोरेजसाठी कोल्ड चेन व्यवस्था झाली आहे : राजेश टोपे

    लस देण्याबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे, हेल्थ वर्कर्स डेटा, अत्यावश्यक मधले लोक, 50 वर्षावरील इतर आजार असलेले, 50 वर्षाखालील लोक, हा सगळा डेटा तयार करत आहोत, 18 हजार लोकना ट्रेनिंग द्यायचं काम आता पूर्ण होईल, स्टोरेजसाठी कोल्ड चेन व्यवस्था झाली आहे, लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे, ज्या तारखेला लस द्यायची आहे त्या व्यक्तीला मेसेज मिळणार तो येणार, त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देणार, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली

  • 17 Dec 2020 05:30 PM (IST)

    शरद पवार भारत भालके यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार

    पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी (18 डिसेंबरला) पंढरपूर दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे 28 नोव्हेंबरला निधन झाले होते. शरद पवार भारत भालके यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.

  • 17 Dec 2020 04:13 PM (IST)

    टीम इंडियाला चौथा धक्का

  • 17 Dec 2020 04:02 PM (IST)

    सोनिया गांधी ‘त्या’ 23 नेत्यांची भेट लवकरचं भेट घेणार, तारीख ठरली

    काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा, असं पत्र लिहिणाऱ्या 23 काँग्रेस नेत्याना काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी 19 डिसेंबर रोजी भेटणार आहेत. 23 नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अध्यक्षपदाबाबत पत्र लिहले होते.

  • 17 Dec 2020 03:54 PM (IST)

    पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश येतो, त्या पद्धतीने आम्ही काम करतो: शंभूराज देसाई

    शिवसेना हा पक्ष आदेशाने करणारा पक्ष आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश येतो त्या पद्धतीने आम्ही सगळेजण काम करतो. जो आदेश येईल तशा पद्धतीने 100% काम करण्याच्या तयारीने आम्ही काम करतो, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी दिली.

  • 17 Dec 2020 03:48 PM (IST)

    पदवीधर निवडणुकीत कमी जास्त झालं असेल तर आगामी काळात भरुन काढू: जयंत पाटील

    पदवीधर,शिक्षक निवडणुकीत शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जरी कमी जास्त झालं असेल तरी भविष्यकाळात त्याची भरपाई होणार जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची साताऱ्यात माहिती.

  • 17 Dec 2020 03:42 PM (IST)

    मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष निवडण्यासाठी काँग्रेसची महत्वाची बैठक

    मुंबई अध्यक्ष निवडीवर काँग्रेस मुख्यालयात बैठक सुरू. काँग्रेस संघटनचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल, महाराष्ट्रचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यात बैठक सुरु आहे. मिलिंद देवरा यांच्या भेटीनंतर महत्वाची बैठक होत आहे. मुंबई अध्यक्ष निवडीवर आज अंतिम चर्चा करून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे.

  • 17 Dec 2020 03:41 PM (IST)

    सॅटेलाईट पीएसएलव्ही-सी50 रॉकेटचे लाँचिंग

  • 17 Dec 2020 02:33 PM (IST)

    मुंबई अध्यक्ष निवडीवर काँग्रेस मुख्यालयात बैठक सुरु, चर्चा करुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीकडे अहवाल सादर करणार

    मुंबई अध्यक्ष निवडीवर काँग्रेस मुख्यालयात बैठक सुरु, काँग्रेस संघटनचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटीलमध्ये बैठक सुरु, मिलिंद देवरा यांच्या भेटीनंतरची महत्वाची बैठक, मुंबई अध्यक्ष निवडीवर आज अंतिम चर्चा करुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीकडे अहवाल सादर करणार आहे

  • 17 Dec 2020 02:32 PM (IST)

    पाच जागा जिंकल्याने त्यांना जग जिंकल्यासारखं झालं, पण सर्वात मोठा जनादेश भाजपला : प्रवीण दरेकर

    विधान परिषदेच्या निवडणुका पाच जागा जिंकल्या नंतर त्यांना हत्तीचे बळ आल्यासारखे वाटत असेल परंतु येणाऱ्या काळामध्ये दूध का दूध आणि पाणी होऊन जाईल, कारण महाराष्ट्रातल्या जनतेने खरे म्हणजे सर्वात मोठा जनादेश भारतीय जनता पार्टीला दिला, परंतु आता विधान परिषदेच्या जागा खरं म्हणजे धर्म संयोगाने त्याठिकाणी आल्याकारणाने त्यांना जग जिंकल्यासारखे अविर्भाव झालं, परंतु ग्रामपंचायत भविष्यात निवडणुकीमध्ये हे राज्यातील जनता कोणाच्या पाठीशी आहे हे त्या ठिकाणी दिसेल आणि फोडाफोडीच्या राजकारणात ते माहीर आहेत, वेगळं आश्चर्य त्यांच्याकडून वाटायची कारण नाही, असं विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले

  • 17 Dec 2020 01:47 PM (IST)

    नाशकात घंटागाडीच्या धडकेत 22वर्षीय तरुणीचा मृत्यू

    नाशकात घंटागाडीच्या धडकेत युवतीचा मृत्यू, कामगार नगरमधील घटना, रोशनी जयस्वाल या 22 वर्षीय युवतीचा मृत्यू, सकाळी जॉगिंग करत असतांना धडक, सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 17 Dec 2020 01:28 PM (IST)

    शेतकरी आंदोलनावर निर्वाळा, मार्ग काढण्यासाठी कमिटी बनवावी, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना

    सर्वोच्च न्यायालयाचा शेतकरी आंदोलनावर निर्वाळा, मार्ग काढण्यासाठी कमिटी बनवावी, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना,  त्या कमिटीत पी. साईनाथही असू शकतात, बीकेयूचे नेतेही कमिटीत असू शकतात

  • 17 Dec 2020 01:10 PM (IST)

    थपडेवर थप्पड, थपडेवर थप्पड, भातखळकरांनी सेनेला पुन्हा डिवचलं

    शिवसेनाला मोठा धक्का; ‘ती’ 18 गावे पालिकेतच, कल्याण-डोंबिवली महापालिकेतून (केडीएमसी) 18 गावे वगळण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या दोन्ही अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी बेकायदा ठरवून रद्दबातल केल्या… थपडेवर थप्पड… थपडेवर थप्पड…

  • 17 Dec 2020 12:41 PM (IST)

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभाविपचे कार्यकर्ते आणि पोलिसात राडा

    औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राडा, अभाविपचे कार्यकर्ते आणि पोलिसात राडा, विद्यापीठ परीक्षांच्या निकालात झालेल्या घोळवरुन अभाविपचं आंदोलन, कुलगुरुंच्या बैठकीत घुसण्याचा अभाविप कार्यकर्त्यांचा प्रयत्न, कार्यकर्त्यांना रोखताना पोलिसांसोबत राडा

  • 17 Dec 2020 12:03 PM (IST)

    सेंसेक्सची 47 हजारांच्या दिशेने वाटचाल, बीएसइ 46,774 वर

    आज सेन्सेक्स 47 हजारांच्या दिशेने वाटचाल करत आहे, तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 108 अंकांनी वधारुन 46,774 वर पोहोचला, त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 31 अंकांच्या वाढीसह 13,713.55 वर उघडला

  • 17 Dec 2020 12:03 PM (IST)

    अल्पवयीन मावस बहिणींवर बलात्कार आणि विनयभंग, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

    पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मावस बहिणींवर बलात्कार आणि विनयभंग केल्याच्या घटनेने खळबळ, दोघा नराधमांपैकी एकाने 16 वर्षीय मुलीचा बलात्कार केला, तर दुसऱ्याने 14 वर्षीय मुलीचा विनयभंग, नंतर इतर तीन साथीदारांच्या मदतीने अजंठानगर येथून त्यांचं अपहरणही केलं, 15 डिसेंम्बरच्या रात्री साडे नऊ वाजता ही घटना, याप्रकरणी निगडी पोलिसांनी पाचही आरोपींना जेरबंद केलं,16 आणि 14 वर्षीय या दोन्ही मुली मावस बहिणी

  • 17 Dec 2020 11:54 AM (IST)

    साखरेचा दर 31 रुपये आहे, तो वाढवावा : अजित पवार

    साखरेचा दर 31 रुपये आहे, तो वाढवावा, पाच लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, 310 लाख टन साखर तयार आहे, असा माझा अंदाज आहे,

  • 17 Dec 2020 11:53 AM (IST)

    मुंबईत केंद्रीय कृषी कायद्याबाबत उपसमितीची बैठक

    दिल्लीत आंदोलन आजही सुरु आहे, त्यामुळे केंद्र सरकार काही ना काही बदल नक्कीच करतील, त्यानंतर त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे बदल होऊन त्याची अंमलबजावणी करण्याची भूमिका घेत आहेत का, त्याबाबत आज पहिली बैठक घेत आहोत

  • 17 Dec 2020 11:50 AM (IST)

    दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आमच्या तीनही पक्षांचा पाठिंबा : अजित पवार

    एका चर्चेतून हा प्रश्न सुटणार नाही, मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार आहे, चर्चा झाल्यानंतर आम्ही आमचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करु

  • 17 Dec 2020 11:46 AM (IST)

    भाजपा नगरसेवक नील सोमय्यांनी भारत बायोटेक निर्मित कोरोनाची पहिली लस घेतली

    मुंबई महापालिकेचे भाजपा नगरसेवक नील सोमय्या यांनी घेतली भारत बायोटेक हैद्राबाद निर्मित कोरोनाची पहिली लस, स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन लस ही त्यांनी काल सायन रुग्णालयात घेतली, दुसरा डोस 13 जानेवारीला घेणार

  • 17 Dec 2020 10:48 AM (IST)

    शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयात साडे बारा दरम्यान सुनावणी

    शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयात साडे बारा दरम्यान सुनावणी, आठ शेतकरी नेते आपली बाजू मांडतील, युनियनची हाजरी आवश्यक असेल, अशा सूचना CJI बोबडे यांनी दिल्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी समिती नेमण्यात येण्याची शक्यता

  • 17 Dec 2020 10:18 AM (IST)

    आरेचं जंगल वाचवणं यात कुठला अहंकार हे तर राष्ट्रीय कर्तव्य : संजय राऊत

    आरेचं जंगल वाचवणं यात कुठला अहंकार हे तर राष्ट्रीय कर्तव्य, हा तर केंद्र सरकारचाच कार्यक्रम, वाघ वाचवा, नदी वाचवा, जंगल वाचवा, हा मोदी सरकारचा कार्यक्रम, ही लढाई सुरुच राहील, महाष्ट्रातील सरकार आलं नाही याचं राजकीय दु:ख मी समजू शकतो, पण अशा प्रकारे केंद्राच्या अख्त्यारीतल्या यंत्रणा हाताशी धरुन महाराष्ट्राला त्रास देणं, जनतेचा छळ करणं हे फार काळ चालणार नाही

  • 17 Dec 2020 10:14 AM (IST)

    पंजाबमधील शेतकरी आत्महत्या करत आहेत, न्यायालयाने त्याकडे लक्ष द्यावं : संजय राऊत

    यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे, सरकारला बदनाम केलं जात आहे, जनतेवर आर्थिक बोजा वाढत आहे, ज्या गोष्टीत न्यायालयाने पडायला हवं, न्याय द्यायला हवा, अशी असंख्य प्रकरणं देशात आहेत, तिथे लोक तारीख पे तारीख करुन झिजत आहेत, पंजाबमधील शेतकरी आत्महत्या करत आहेत, काल एका संताने आत्महत्या केली, न्यायालयाने आणि केंद्र सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे, केंद्र सरकारला निर्देश दिले पाहिजे,  महाराष्ट्रातील सरकार भाजपचं नसल्यामुळे असे निर्णय येत आहेत का, अशा शंका सध्या लोकांच्या मनात येत आहेत

  • 17 Dec 2020 10:09 AM (IST)

    कांजुरच्या जागी कोणी राजकारणी बंगले, फार्महाऊस बांधणार नाहीत : संजय राऊत

    कांजुरच्या जागी कोणी राजकारणी बंगले, फार्महाऊस बांधणार नाहीत, हा मुंबई, महाराष्ट्र आमि पर्यायाने देशाच्या विकासाचा विषय आहे, त्यावर अशा प्रकारे निर्णय येणे चुकीचं, याच जमिनीवर पूर्वीचं सरकार पोलीस आणि दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प राबवणार होतं, म्हणजे जमिन सरकारचीच आहे ना,

  • 17 Dec 2020 10:08 AM (IST)

    कांजुरमार्ग मेट्रो कारशेडला विरोधी पक्षाने राजकीय विषय केला, त्यात न्यायालयाने पडू नये, प्रकाश आंबेडकरांचं विधान बरोबर : संजय राऊत

    प्रकाश आंबेडकरांचं एक विधान फार महत्त्वाचं आहे, त्याबाबत त्यांचं अभिनंदन, कांजुरमार्ग मेट्रो कारशेडला विरोधी पक्षाने राजकीय विषय केलाय, त्यात न्यायालयाने पडू नये, जमीन महाराष्ट्राची आहे, हे सरकार महाराष्ट्राचं आहे, आता मीठागरवाले आलेत कुठून, न्यायालय यात कशासाठी पडतंय

  • 17 Dec 2020 10:01 AM (IST)

    कोरोना लसीकरणासाठी कोरोना योद्धेच उदासीन, नागपूर जिल्ह्यात नोंदणीला कमी प्रतिसाद

    कोरोना लसीकरणासाठी कोरोना योद्धेच उदासीन, नागपूर जिल्ह्यात नोंदणीला कमी प्रतिसाद, जिल्ह्यात आतापर्यंत अवघी 62.5 टक्के नोंदणी, मनपाकडून सुरु असलेल्या नोंदणीला कमी प्रतिसाद, नागपूर मनपा आयुक्तांनी व्यक्त केली चिंता, पूर्व विदर्भात 88 हजार खाजगी आणि सरकारी आरोग्य कर्मचारी, 88 हजारपैकी 70 हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नोंदणी, चंद्रपूर जिल्ह्यात 100 तर वर्ध्यात 92 टक्के नोंदणी, कोरोना लसीकरणाबाबच नागपूरातील आरोग्य कर्मचारी उदासीन

  • 17 Dec 2020 09:54 AM (IST)

    टीम इंडियाला पहिला धक्का

  • 17 Dec 2020 09:47 AM (IST)

    सोलापूर निवडणूक कार्यालयाकडील 13,000 ईव्हीएम मशीन तामिळनाडुकडे रवाना

    सोलापूर निवडणूक कार्यालयाकडील 13,000 ईव्हीएम मशीन तामिळनाडुकडे रवाना, निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे ईव्हीएम मशीन तमिळनाडुला रवाना, लोकसभा निवडणुकीसाठी वापरलेले ईव्हीएम मशीन कन्याकुमारी, मदुराई, तीरुपात्तुर तमकल, कांचीपुरम पाच जिल्ह्यासाठी पाठवले, तर जुन्या कालबाह्य झालेले 18000 मशीन नष्ट करण्यासाठी तिरुपती रवाना

  • 17 Dec 2020 09:47 AM (IST)

    पुणे मनपात नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या गावांच्या विकासासाठी नऊ हजार कोटींची गरज, सरकारकडे मागणी

    पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या गावांच्या विकासासाठी नऊ हजार कोटींची गरज, पालिकेने राज्य सरकारकडे केली नऊ हजार कोटींची मागणी, यापूर्वी समाविष्ट केलेल्या अकरा गावातील विकासकामे प्रलंबित आहेत, या पार्श्वभूमीवर नव्याने समाविष्ट होणारी तेवीस गावे विकासापासून वंचित राहू नयेत, यासाठी पालिकेला तातडीने मदतीची गरज, अन्यथा ही गावे टप्प्याटप्प्याने समाविष्ट करावीत पालिकेची भूमिका

  • 17 Dec 2020 09:44 AM (IST)

    शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्टात सुनावणी, शेतकऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या मध्यस्थीची अपेक्षा

    शेतकरी आंदोलनाचा आजचा 22 वा दिवस, 5 डिग्री तापमानावर थंडीत सुरु आहे आंदोलन, शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्टात सुनावणी, सुनावणीचा आजचा दुसरा दिवस, शेतकऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या मध्यस्थीची अपेक्षा, ममता बॅनर्जी च्या टीएमसी पक्षातील शुभेद्रू अधिकारी भाजपात जाण्याची शक्यता

  • 17 Dec 2020 09:36 AM (IST)

    भाजपला रोखण्यासाठी ग्रामपंचायतीतही महाविकास आघाडी, गावागावात तिनही पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत

    भाजपला रोखण्यासाठी ग्रामपंचायतीतही महाविकास आघाडी, गावागावात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याच्या तयारीत, तिन्ही पक्ष गावागावात एकत्र लढवणार ग्रामपंचायत निवडणूक, औरंगाबाद जिल्ह्यातील 618 ग्रामपंचायतीत होणार महाविकास आघाडी, महाविकास आघाडीमुळे गावतीलही राजकीय समीकरणे बदलणार

  • 17 Dec 2020 09:04 AM (IST)

    टीम इंडियाने टॉस जिंकला

    टीम इंडियाने टॉस  जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • 17 Dec 2020 09:02 AM (IST)

    औरंगाबाद महापालिकेत महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता, अमित देशमुखांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली

    महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने बोलावली बैठक, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी बोलावली बैठक, काँग्रेसच्या मोजक्याच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक, अमित देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार बैठक, महापालिका स्वबळावर लढण्याचे अमित देशमुख यांनी यापूर्वी दिले होते आदेश, औरंगाबाद महापालिकेत महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता

  • 17 Dec 2020 09:00 AM (IST)

    शिवसेना नेते चंद्रकांत खैरे कोरोनामुक्त, 9 दिवसात कोरोनावर विजय

    शिवसेना नेते चंद्रकांत खैरे कोरोनामुक्त, 9 दिवसात चंद्रकांत खैरे यांनी कोरोनावर मिळवला विजय, औरंगाबादच्या खाजगी रुग्णालयात उपचार

  • 17 Dec 2020 08:44 AM (IST)

    औरंगाबाद-जळगाव महामार्गावर धुक्याची चादर, महामार्ग धुक्यात हरवत असल्यामुळे वाहनचालकांची कसरत

    औरंगाबाद-जळगाव महामार्गावर पसरली धुक्याची चादर, महामार्गावरील दाट धुक्यामुळे महामार्गावरली वाहतूक मंदावली, दोन दिवसांपासून पडतंय सर्वत्र दाट धुकं, महामार्ग धुक्यात हरवत असल्यामुळे वाहनचालकांची कसरत, दाट धुक्यामुळे सकाळचा प्रवास होतोय अत्यंत कठीण

  • 17 Dec 2020 08:43 AM (IST)

    गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांचं ट्विटर अकाऊंट काही काळासाठी हॅक, मुंबई सायबर सेलकडे तक्रार

    गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांचं ट्विटर अकाऊंट काही काळासाठी हॅक, सतेज पाटील यांची मुंबई सायबर सेलकडे तक्रार, ट्विटर अकाउंट वरुन अचानक नाव आणि फोटो ही झाला होता गायब, ट्विटर इंडियाने अकाउंट रिकव्हर करुन दिले, हॅकिंग काळात कोणताही आक्षेपही मजकूर पोस्ट झाला नसल्याच ही आलं समोर

  • 17 Dec 2020 08:35 AM (IST)

    कोल्हापुरात मगरीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, शिरोळ तालुक्यातील कवठेसार गावातली घटना

    कोल्हापुरात मगरीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, शिरोळ तालुक्यातील कवठेसार गावातली घटना, कुसुम नांदरेकर अस मृत महिलेच नाव, पाणी पिण्यासाठी वारणा नदीकाठी गेल्या असताना घडली घटना, मृत नांदरेकर रविवार पासून होत्या बेपत्ता, मृतदेह बुधवारी सायंकाळी वारणा नदी काठावरील मगरीच्या बिळा जवळ छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळला, घटनेमुळे वारणाकाठी खळबळ, मगरीच्या बंदोबस्ताची मागणी

  • 17 Dec 2020 08:33 AM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयं जानेवारीमध्ये उघडण्याची शक्यता

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयं जानेवारीमध्ये उघडण्याची शक्यता, प्राध्यापक आणि शिक्षक संघटनांची महाविद्यालय उघडण्यास अनुकुलता, डिसेंबरमध्ये महाविद्यालय उघडण्याचा घेतला होता निर्णय, मात्र कोरोनाच्या दूसऱ्या लाटेची शक्यता असल्याने निर्णय पुढे ढकलला, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन कळमळकर यांचे महाविद्यालय उघडण्याचे संकेत, जानेवारीला पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची घंटा वाजणार

  • 17 Dec 2020 08:32 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील 747 ग्रामपंचायतींचं सरपंच पद आरक्षण रद्द

    पुणे जिल्ह्यातील 747 ग्रामपंचायतींचं सरपंच पद आरक्षण रद्द, राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागानं सरपंच पद आरक्षण सोडत पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं जिल्हा प्रशासनाचा निर्णय, 15 जानेवारीला 747 ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान, मतदानानंतर 30 दिवसांच्या आत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्याचे आदेश

  • 17 Dec 2020 08:31 AM (IST)

    नाशिक स्मार्ट सिटी अधिकारी प्रकाश थविल यांची अखेर बदली

    नाशिक स्मार्ट सिटी अधिकारी प्रकाश थविल यांची अखेर बदली, गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधींकडून थविल यांच्या बदलीची होत होती मागणी, थविल वेळोवेळी माहिती न देता उडवाउडवीची उत्तर देऊन पुढे रेटत असल्याचा होता आरोप

  • 17 Dec 2020 08:15 AM (IST)

    पूर नुकसानीच्या पाहणीसाठी 24 डिसेंबरला केंद्रीय पथक नागपुरात

    पूर नुकसानीच्या पाहणीसाठी 24 डिसेंबरला केंद्रीय पथक नागपुरात, पुराच्या दोन महिन्यानंतर नुकसानीची काय पाहणी करणार, पूरग्रस्त शेतकऱ्यांचा सरकारला सवाल, केंद्रीय पथक दोन गटात करणार पूर्व विदर्भातील नुकसानीची पाहणी, नागपूर, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली जिल्ह्यात जाणार केंद्रीय पथक

  • 17 Dec 2020 07:45 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात दोन माजी सैनिकांच्या घरी दरोडा, 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल लंपास

    नागपूर : नागपूर जिल्ह्यात दोन माजी सैनिकांच्या घरी दरोडा, 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल लंपास, नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना, पाच अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरु

  • 17 Dec 2020 07:44 AM (IST)

    नागपुरातील ओसीडब्ल्यु कंपनीच्या अनियमिततेच्या चौकशी करा, विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंचे नगर विकास सचिवांना आदेश

    नागपूर : नागपुरातील ओसीडब्ल्यु कंपनीच्या अनियमिततेच्या चौकशीचे आदेश, विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंचे नगर विकास सचिवांना आदेश, 241 कोटी अतिरिक्त आर्थिक लाभ दिल्याचा आरोप, OCW नागपुरात पाणीपुरवठा करणारी कंपनी, 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना निर्धारित कालावधीत पूर्ण नाही

  • 17 Dec 2020 07:36 AM (IST)

    लाखो शेतकरी शेती कायद्याच्या समर्थनात : कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर

    एकीकडे शेती कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, तर दुसरीकडे लाखो शेतकरी या कायद्याच्या समर्थनात आहेत, ग्वालिअरमध्येही अनेक शेतकऱ्यांनी या कायद्याचं समर्थन केलं, असं कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर म्हणाले

  • 17 Dec 2020 07:33 AM (IST)

    सर्वोच्च न्यायालयात आठ शेतकरी नेते आपली बाजू मांडतील, युनियनची उपस्थिती आवश्यक, CJI यांच्या सूचना

    शेती कायद्याविरोधत सुरु असलेल्या आंदोलनाचा आजचा 22वा दिवस आहे, या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, यावेळी आठ शेतकरी नेते आपली बाजू मांडतील, युनियनची हाजरी आवश्यक असेल, अशा सूचना CJI बोबडे यांनी दिल्या

  • 17 Dec 2020 07:31 AM (IST)

    ते आठ शेतकरी नेते कोण? जे सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू मांडतील

    यामध्ये भारतीय शेतकरी युनियन (बीकेयू – राकेश टिकैत), बीकेयू-सिद्धपुर (जगजीत एस. डंगवाल), बीकेयू-राजेवाल (बलबीर सिंह राजेवाल), बीकेयू-लखोवाल (हरिंदर सिंह लखोवाल), जम्हूरी किसान सभा (कुलवंत सिंह संधू), बीकेयू-दकौंडा (बूटा सिंह बुर्जगिल), बीकेयू – दोआबा (मान सिंह सिंह) आणि कुल हिंद किसान महासंघ (प्रेम सिंह भंगू) या संघटनांचा समावेश असेल

  • 17 Dec 2020 07:22 AM (IST)

    बाबा राम सिंहांचा मृत्यू; राहुल गांधीकडून आक्रोश व्यक्त

    कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी संत बाबा राम सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला, बाबा राम सिंग यांना श्रद्धांजली वाहत राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला, अनेक शेतकऱ्यांनी बलिदान दिलं, मोदी सरकारने मात्र क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, असं राहुल गांधी म्हणाले.

  • 17 Dec 2020 07:17 AM (IST)

    शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी समिती नेमण्यात येईल : सर्वोच्च न्यायालय

    कृषी कायद्यांविरोधात तीन आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांशी केंद्राच्या वाटाघाटी यशस्वी ठरलेल्या नाहीत, त्यामुळे याबाबत तोडगा काढण्यासाठी समिती नेमण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले, शेतकऱ्यांच्या आंदोलनप्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर बुधवारी सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायाधीश ए. एस. बोपण्णा आणि न्या. व्ही. रामसुब्रह्मण्यम यांच्या खंडपीठापुढे दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे सुनावणी झाली

  • 17 Dec 2020 06:38 AM (IST)

    डोंबिवली, कल्याण क्राईम ब्रांचची मोठी कारवाई, बनावटी डिझेल तयार करणाऱ्या गोदामावर धाड

    डोंबिवली, कल्याण क्राईम ब्रांचची मोठी कारवाई, कल्याण ग्रामीणमधील आडीवली परिसरात कारवाई, बनावटी डिझेल तयार करणाऱ्या गोदामावर पोलिसांचा छापा, 11 हजार लिटर बनावटी डिझेल जप्त, 5 जणांना अटक, एक टेम्पो आणि टँकरही जप्त, आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता

  • 17 Dec 2020 06:34 AM (IST)

    विरारमधील शंभव नाथ जैन मंदिरात चोरी, अष्टधातूने बनविलेल्या मूर्ती चोरल्या

    विरार पश्चिमेकडील शंभव नाथ जैन मंदिरात चोरी करुन चोरटे फरार, चोरट्यांनी 1 लाख 58 हजार रुपये किमतीच्या अष्टधातूने बनविलेल्या मूर्ती चोरल्या, चोरीचा सर्व प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, 15 आणि 16 डिसेंबर च्या मध्यरात्री 2 वाजून 20 मिनिटाला ही चोरी झाली, मंदिरातील पुजारी गाड झोपेत असताना चोरट्याने मंदिराच्या दाराची कडी तोडून आतमध्ये प्रवेश करून, देवांच्या अष्ट धातूने बनविलेल्या मूर्ती आणि पुजाऱ्याचा मोबाईल ही घेऊन फरार

     

  • 17 Dec 2020 06:31 AM (IST)

    कुर्ला येथून पहिली एसी लोकल सीएसएमटीकडे रवाना

    कुर्ला येथून पहिली एसी लोकल सीएसएमटीकडे रवाना, सेंट्रल रेल्वेच्या प्रवाशांना आजपासून एसी लोकलची सुविधा मिळणार, पहिल्यांना सेंट्रल रेल्वेवर एसी लोकल सुरु