महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे औरंगाबादेत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांची बरीच गर्दी पाहायला मिळाली.
माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये बैठक, बंद दाराआड सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये बैठक,
आजच्या अचानक भेटीनं ज्यांना राजकीय चर्चा करायची त्यांना करू द्या, बैठकीत फक्तं माझ्या मतदारसंघतील विकास कामांसंदर्भात चर्चा झाली. तसेच चंद्रपूर विमानतळासंदर्भातदेखील चर्चा झाली, सुधीर मुनगंटीवार यांची माहीती
मुंबई : या सरकारला शरम वाटायला हवी, असं बोलल्यावर आम्ही चौकशी करु असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात. तुम्ही कशाची चौकशी करता. हा व्हिडीओ सर्व ठिकाणी आहे. तो व्हायरल होत आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रात कोणी सडकं म्हणत असेल आणि सरकार ऐकून घेणार असेल. तर भाजप ऐकून घेणार नाही. त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक केली नाही तर त्याच्याविरुद्ध आम्ही आंदोलन सुरु करु असा इशारा फडणवीसांनी दिली.
आम्ही बाबरी मशिद बांधू, अशा लोकांना राज्यात प्रवेश का देता. जर प्रवेश दिला, तरी कार्यक्रम का करु देता? ही परिषद केवळ आग ओतण्याकरिता आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी झाली आहे. तेच त्यांचं काम आहे.
कुठेतरी सरकारची मिलीभगत आहे. हे सर्व सरकारच्या मर्जीने बोललं जात आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.
मुंबई : कुणीतरी शरजील उस्मानी नावाचा सडक्या डोक्याचा इसम पुण्यात येतो. एल्गार परिषदेत हिंदूंना सडका म्हणतो, त्याच्यावर काहीही कारवाई होत नाही. हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का? या राज्यात मोगलाई आहे का? या सरकारला शरम वाटायला हवी : देवेंद्र फडणवीस
भाजप वाढीव वीज बिलांवरुन आक्रमक झालं असून महावितरणच्या कार्यालयांना 5 फेब्रुवारीला टाळे ठोकणार असल्याचं भाजप नेते माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनुकळेंनी सांगितले.
मुंबईतील अंधेरी येथील लक्ष्मी प्लाझा बिल्डींगमध्ये सहाव्या मजल्यावर आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या माहितनुसार अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या असून आग विझवण्याचं काम सुरु आहे.
सिंधुदुर्ग : मालवण-दांडी येथे पुन्हा आढळला महाकाय जेलिफिश, दांडी येथील रापणीच्या जाळ्यात हा जेलिफिश सापडला, आठ दिवसांपूर्वीही याच समुद्रात आढळला होता महाकाय जेलिफिश, सायनिया रोझी या प्रजातीतील हा महाकाय जेलिफिश ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड लगतच्या पॅसिफिक महासागरात पाहायला मिळतो, या महाकाय जेलिफिशचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय मत्स्यकी संशोधन संस्था वर्सोवा, मुंबईची टीम लवकरच मालवण मध्ये येणार
औरंगाबाद : कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याला औरंगाबादेत मारहाण, सिडको बसस्थानक चौकामध्ये पोलीस अधिकाऱ्यास मारहाण, ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांना मारहाण, पोलीस अधिकारी भांडण सोडण्यासाठी गेल्यास घडला प्रकार, भांडण मिटवण्यासाठी गेले असताना कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यास मारहाण, रात्री साडे अकरा दरम्यान घडली घटना
अभिनेता सुशांतसिंह राजपूत ड्रग्स प्रकरणात सुशांतच्या मॅनेजरला अटक, चौकशीसाठी हजर राहण्याबाबत दिलं होतं समन्स, मात्र तो झाला होता फरार. ऋषिकेश पवार असं मॅनेजरचं नाव, ऋषिकेश चेंबूर येथे राहतो. एनसीबी अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी धाडही टाकली होती. यावेळी त्याच्या घरातील लॅपटॉपमध्ये महत्वाची माहिती होती. त्याची हार्ड डिस्क एनसीबी अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. ऋषिकेशच्या विरोधात अनेक पुरावे एनसीबी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहेत. अटक टाळण्यासाठी ऋषिकेश पवारने सेशन कोर्टात धाव घेतली होती. मात्र, सेशन कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
औरंगाबाद : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आज पुन्हा बीड जिल्हा दौऱ्यावर, बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला राहणार उपस्थित, बीड जिल्ह्यात आज पुन्हा धांनजय मुंडे यांचं स्वागत होण्याची शक्यता, औरंगाबादलाही संध्याकाळी सहा वाजता समर्थक करणार जंगी स्वागत
सोलापूर : 566 थकबाकीदारांकडून पहिल्याच दिवशी पाच कोटी रुपये वसूल, लॉकडाऊन काळातील कोट्यवधी रुपयांची वीज बिलांची थकबाकी वसुली मोहीम सुरू, पहिल्या दिवशी शहराने जिल्ह्यात 566 वीज थकबाकीदारांनी 4 कोटी 92 लाख रुपयांची थकबाकी भरली
सोलापूर : 15 गावांचा सरपंच पदाचे आरक्षण चुकले, तहसिलदारांनी दिला अहवाल, सरपंच पदाचे आरक्षण काढताना झालेल्या चुकांमुळे तीन तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीचे पुन्हा आरक्षण काढण्यात येणार, नव्याने आरक्षण काढण्यासाठी शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात येणार, माढा करमाळा आणि बार्शी तालुक्यातील पंधरा गावचा समावेश
सर्वसामान्यांसाठी रेल्वेचा आजचा दुसरा दिवस, कालपेक्षा प्रवाशांची गर्दी वाढली, सकाळी सात वाजेच्या आधी सर्वसामान्यांना प्रवास करायचा असल्याने गुलाबी थंडीच्या दिवसात सकाळी लवकर उठण्याची वेळ प्रवाशांवर आलीये, मात्र यावेळी सर्वच प्रवासी मास्क घालून प्रवास करताना दिसून आले
पुणे : शहरातील अतिक्रमणांच्या शोधासाठी महापालिका राबवणार खास यंत्रणा राबवून, शहरातील अतिक्रमणे शोधून, त्यावर नियमित कारवाई करण्यासाठी महापालिका आता करणार आर्टिफिशिअल इंटीलिजेन्सचा (गुगल मॅपिंग) वापर, पुढील वर्षात सर्वत्र प्रभावीपणे हा प्रयोग राबवून, पुणे अतिक्रमणमुक्त करण्याचे महापालिकेचे नियोजन, या यंत्रणेसाठी स्वतंत्र संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) तयार करण्यात येणार, त्यासाठी पुन्हा खासगी कंपनीची नेमणूक केली जाणार असल्याची प्रशासनाची माहिती
पुणे : जिल्ह्यात नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या ग्रामपंचायतीत येत्या 9 आणि 10 फेब्रुवारीला सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या संदर्भात सर्व तहसिलदारांना दिले आदेश, सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून अव्वल कारकून, मंडल अधिकान्याची अथवा समकक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे तहसीलदारांना आदेश, दरम्यान,पुरंदर तालुक्यातील पिंगोरी, हवेली तालुक्यातील शेवाळेवाडी, औताडे-हांडेवाडी व बारामती तालुक्यातील माळेगांव या चार ग्रामपंचायतीमध्ये एक द्वितीयांशा इतकी सदस्य पदे निवडून आलेली नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासक नेमणेबाबत संबंधीत गटविकास अधिकारी यांना लेखी आदेश
पुणे : येत्या आठवडाभरात शहरात हलक्या पावसाचा हवामान शास्त्र विभागाचा इशारा, तर, पुढील 3 ते 4 दिवस सायंकाळच्या वेळी ढगाळ वातावरण राहाण्याची शक्यताही, ईशान्येकडील आणि दक्षिण तसंच दक्षिण पूर्वेकडील वाऱ्यांमुळे हवामानात बदल होणार, याच कारणामुळे पुणे जिल्ह्यासह उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ विभागातही पावसाची शक्यता, पुण्याशिवाय राज्यातील इतरही अनेक भागांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस सायंकाळच्या वेळी वातावरण ढगाळ राहणार, त्यामुळे, 4 आणि 5 फेब्रुवारीला वातावरण अंशतः ढगाळ तर त्यानंतर आकाश सामान्यतः ढगाळ असेल, या ढगाळ वातावरणामुळे कांदा तसंच इतर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता
पुणे : आजपासून लालमहाल सर्वांसाठी खुला होणार, गेली पाच वर्ष दुरुस्तीच्या कामासाठी लाल महाल होता बंद, लाल महाल सुरु करण्यासाठी संभाजी बिग्रेडचा पाठपुरवा, संभाजी बिग्रेड आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर झाला लाल महाल सुरू करण्याचा निर्णय
पुणे : पुणे महापालिका प्रशासनाच्या निर्णयानुसार शहरातील पाचवी ते आठवीच्या एकूण 950 शाळांपैकी 398 शाळाच सुरु, महापालिकेच्या पथकाकडून शाळांच्या सुविधांची पाहणी केल्यानंतर वर्ग सुरू करण्यास मान्यता, शहरात पाचवी ते आठवीचे वर्ग असलेल्या 950 शाळा आहेत, त्यात महापालिकेच्या अखत्यारितील आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांचा समावेश, त्यातील 480 शाळांची तपासणी पूर्ण असून 398 शाळातील वर्ग सुरू, त्यामुळे पहिल्या दिवशी सर्व शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत, पुढील काही दिवसांत महापालिकेच्या पथकाकडून शाळांची तपासणी मान्यता दिल्यानंतर अन्य शाळांतील पाचवी ते आठवीचे वर्गही पुढील काही दिवसांत सुरू होतील
डोंबिवली मनसे शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, डोंबिवली शिवसेना शाखेकडून राजेश कदमसह शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व कार्यकाऱ्यांचा डोंबिवली शिवसेना शाखेकडून जोरदार स्वागत करण्यात आला