LIVE | भिवंडीत मैदानातील कचऱ्याला अचानक पेट, परिसरात धुराचे लोट

| Updated on: Feb 03, 2021 | 11:55 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE | भिवंडीत मैदानातील कचऱ्याला अचानक पेट, परिसरात धुराचे लोट
Breaking News
Follow us on

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु केली जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली.

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Feb 2021 07:07 PM (IST)

    भिवंडीत मैदानातील कचऱ्याला अचानक पेट, परिसरात धुराचे लोट

    भिवंडी शहरातील मंडई बाजारपेठ येथे भाजी मार्केट मागील मोकळ्या मैदानातील कचऱ्याने पेट घेतला. त्यामुळे परिसरात धुराचे लोट हवेत पसरले आहे. यामुळे परिसरातील निवासी आणि बाजारहाट करण्यासाठी आलेल्या नागरिकांना धुराचा त्रास होऊ लागला आहे.

  • 03 Feb 2021 05:16 PM (IST)

    75 टक्के उपस्थिती अनिवार्य नाही : उदय सामंत

    विद्यार्थी 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असली तरी यावर्षी तसं राहणार नाही याबाबत जी आर काढण्यात आला आहे, असे उदय सामंत म्हणाले. जे महाविद्यालयात येऊ शकत नाही त्यांना ऑनलाईन क्लासेसचा पर्याय उपलब्ध राहील, असेही उदय सामंत यांनी सांगितले. युजीसी गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे, असे उदय सामंत म्हणाले.


  • 03 Feb 2021 05:13 PM (IST)

    येत्या 15 फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालय सुरु : उदय सामंत

    मुंबई : राज्यातील महाविद्यालय सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती याबाबत काही बैठका देखील झाल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालय सुरू होणार आहे. सध्या पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू होणार, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

  • 03 Feb 2021 12:19 PM (IST)

    हिंदूंबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या शरजील उस्मानीला तात्काळ अटक करा, भाजपची मागणी

    पुणे : एल्गार परिषदेत शरजील उस्मानी यांनी हिंदू धर्मियांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या शरजील उस्मानीला तातडीने अटक करण्याची भाजपची मागणी, शरजिलच्या अटकेच्या मागणीसाठी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ घेणार पुणे पोलीस आयुक्तांची भेट

  • 03 Feb 2021 11:47 AM (IST)

    राज्यातील तारादुतांनी चर्चेचं निमंत्रण नाकारलं, आजच्या बैठकीवरती तारादूतांनी टाकला बहिष्कार

    राज्यातील तारादुतांनी चर्चेचं निमंत्रण नाकारलं, आजच्या बैठकीवरती तारादूतांनी टाकला बहिष्कार, 15 तारखेला सारथीबाहेर आंदोलन करण्यावर आंदोलक ठाम, सकल मराठा समाज आणि क्रांती मोर्चाला घेऊन करणार आंदोलन, चार दिवसांचा देणार अल्टीमेटम मागण्या मान्य झाल्या नाहीतर, 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी करणार आत्मदहन, तारादूतांच सारथीला आज अल्टीमेटम पत्र, चर्चेवरती घातला बहिष्कार, संचालक मंडळाच्या बैठकीला सुरुवात, सारथीचे संचालक उपस्थित

  • 03 Feb 2021 10:45 AM (IST)

    गोकुळ दूध संघाची आज 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा

    कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची आज 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा, गोकुळच्या कागल पंचतारांकित एमआयडीसी मधील प्लांट वर होणार सर्वसाधारण सभा, सभेच्या पार्श्वभूमीवर सभास्थळी मोठा पोलीस बंदोबस्तदुपारी एक वाजता होणार सभेला सुरुवात, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या सभेकडे जिल्ह्याचं लक्ष, सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाडिक पाटील गट आमने-सामने येण्याची शक्यता, संघाच्या खर्चा मधील अनियमितता आणि लेखापरीक्षण यामधील त्रुटींवर विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्याचा करणार प्रयत्न

  • 03 Feb 2021 10:44 AM (IST)

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं सटाणामध्ये आगमन, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून स्वागत

    नाशिक – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं सटाणामध्ये आगमन, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलं राज्यपालांचं स्वागत, थोड्याच वेळात कार्यक्रम स्थळी होणार आगमन, यशवंतराव महाराज समाधी नुत्नीकरणाच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी

  • 03 Feb 2021 10:43 AM (IST)

    एका पाठोपाठ एक दुकाने फोडून रोकड, मुद्दे माल लंपास, नाशकात दरोडेखोरांचा धुमाकूळ

    नाशिक – इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत दरोडेखोरांचा धुमाकूळ, शहरात एका पाठोपाठ एक दुकाने फोडून रोकड आणि मुद्दे माल लांबविल्याच्या घटना, इंदिरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री मोबाईल दुकान फोडून लाखों रुपयांचा मद्देमाल लांबविला, फोर व्हीलर मधून आलेल्या चोरांनी गॅस कटरच्या साह्याने दुकान फोडून मुद्देमाल लांबवला, तब्बल अडीच ते तीन तास सुरू होता चोरीचा थरार, इंदिरानगर पोलिसांच्या नाकावर टिचून चोरांचा शहरात धुमाकूळ, अवघ्या 5 दिवसात एकाच परिसरात दुसरी धाडसी चोरी, मोबाईल दुकानातील चोरीचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

  • 03 Feb 2021 08:18 AM (IST)

    हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना हॉटेल मानजमेंटने ठेवले डांबून, नाशकातील धक्कादायक प्रकार

    नाशिक – हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना हॉटेल मानजमेंटने ठेवले डांबून, मारहाण करत विद्यार्थ्याना ठेवलं होतं कोंडून, कोंडून ठेवलेल्या विद्यार्थ्यांनी केला थेट जितेंद्र आव्हाड यांना फोन, आव्हाडांनी नाशिकच्या कार्यकर्त्यांना सांगून केली मुलांची सुटका, स्थानिक पोलिसांची भूमिका मात्र संशयास्पद, हॉटेल प्रशासनावर अद्याप गुन्हा दाखल नाही

  • 03 Feb 2021 08:09 AM (IST)

    सऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणला चांगला प्रतिसाद

    नागपूर : दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणला चांगला प्रतिसाद,  पहिल्या दिवशी 2 हजार 65 जणांनी घेतली लस, 67.70 टक्के झालं जिल्ह्यात लसीकरण, दुसऱ्या टप्प्यात पोलीस , महसूल विभाग आणि कोरोना योद्धे मिळून 34हजार 192 जणांना दिली जाणार आहे लस, शहरातील 17 आणि ग्रामीण मधील 14 केंद्रा वर दिली जात आहे लस , अजून कुणालाही त्रास नाही

  • 03 Feb 2021 08:05 AM (IST)

    अमोल बधे खून प्रकरणात कुख्यात गुंड गजानन मारणेसह 22 जणांची निर्दोष मुक्तता

    पुणे : अमोल बधे खून प्रकरणात कुख्यात गुंड गजानन मारणेसह 22 जणांची निर्दोष मुक्तता, सव्वा सहा वर्षांपूर्वी टोळीच्या वर्चस्वातून नीलेश घायवळ टोळीतील अमोल बधे याचा नवी पेठेत गोळ्या घालून केला होता खून, या प्रकरणात कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यासह 22 जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता, विशेष मोक्का न्यायाधीश ए.वाय.थत्ते यांनी हा आदेश दिला, 29 नोव्हेंबर 2014 रोजी दुपारी 4.15 च्या सुमारास अमोल बधेचा नवी पेठेत झाला होता खून

  • 03 Feb 2021 08:03 AM (IST)

    नागपुरात खाजगीकरणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांचा संप

    नागपूर : खाजगीकरणाविरोधात आज वीज कर्मचाऱ्यांचा संप, वीज संशोधन विधेयकाच्या माध्यमातून खासगीकरणाचा घाट असल्याचा आरोप, वीज कर्मचाऱ्यांच्या नॅशनल कोॲार्डीनेशन कमिटीने केली संपाची घोषणा, आज एक दिवसांचा लाक्षणीक संप

  • 03 Feb 2021 08:02 AM (IST)

    उन्हाळ्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी नागपूर जिल्हा परिषद ने आताच केली उपाय योजना

    नागपूर : उन्हाळ्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी नागपूर जिल्हा परिषद ने आताच केली उपाय योजना, प्रस्तावित आराखड्याला दिली मंजुरी, तीन टप्प्यातील पाणी टंचाई साठी 51 कोटी 26 लाखाची कामे मंजूर करण्यात आली, यात जिल्ह्यातील 1 हजार 337 गावांमध्ये पाणी टंचाई ची कामे होणार आहे

  • 03 Feb 2021 07:04 AM (IST)

    मागण्या पूर्ण न झाल्यास ऑक्टोबरपर्यंत आंदोलन, शेतकरी नेता राकेश टिकैत यांचं मोठ्ठं वक्तव्य

    शेतकरी नेता राकेश टिकैत यांचं मोठ्ठं वक्तव्य, सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर दिल्लीत ऑक्टोबरपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा, देशभरात ४० लाख टिरॅक्टर रैली काढण्याचा इशारा, ट्विटरवर ‘अब किसान कमल काटेगा’ ट्रेंड सुरू…

  • 03 Feb 2021 06:33 AM (IST)

    मुंबई महापालिकेत निनावी पत्राने कंत्राटदारांची झोप उडवली

    मुंबई महापालिकेत सध्या एका निनावी पत्राने कंत्राटदारांची झोप उडवली, या निनावी पत्राद्वारे कंत्राटदारांची हातचलाखी उघड करण्यात आली आहे, सॅप प्रणालीमध्ये हस्तक्षेप करत काही मोजक्या कंत्राटदारांना मदत करत असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे, काही मोजक्याच कंत्राट कंपनींचा उल्लेख यात करण्यात आला आहे, त्यामुळे एकप्रकारे आयटीचे कर्मचारी, सॅप कंत्राट कंपनीचे कामगार आणि कंत्राटदार यांच्यामधील छुपी कार्यपध्दती बाहेर आणण्याचा प्रयत्न करत या पत्राद्वारे चौकशीची मागणी तक्रारदाराने केली आहे, असे असले तरी या निनावी पत्राची दखल प्रशासन किती घेते, हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल

  • 03 Feb 2021 06:31 AM (IST)

    काश्मीरची आयशा अजीज देशातील सर्वात तरुण महिला पायलट बनली

    जम्मू-काश्मीरः काश्मीरची आयशा अजीज ही देशातील सर्वात तरुण महिला पायलट बनली आहे. ती म्हणाली, “मला विमानाने प्रवास करणे आणि लोकांना भेटणे आवडते. यामुळे मी पायलट होण्याचे ठरविले. पायलट होण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या बळकट असले पाहिजे.”