Live | अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक, 21 पैकी 17 जागा बिनविरोध

| Updated on: Feb 11, 2021 | 11:51 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

Live | अहमदनगर  जिल्हा बँक निवडणूक, 21 पैकी 17 जागा बिनविरोध
उदयनराजे भोसले, भाजप खासदार
Follow us on

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवारांची भेट,  खासदार उदयनराजे यांचे स्पष्टीकरण

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Feb 2021 05:59 PM (IST)

    करायचं नसेल तर नाही म्हणून सांगा, जाहीर करा : उदयनराजे 

    तुम्हाला करायचं नसेल तर नाही म्हणून सांगा. श्वेतपत्रिका काढा. जाहीर करा. पण ते तसं करत नाही. अशोक चव्हाण यांना हे समजायला हवं. त्यांना अनुभव आहे, आर्थिक, सामाजिकरित्या मराठा समाज मागे आहे. राज्याने कायदा केला आहे, श्वेतपत्रिका जारी करायला हवं : उदयनराजे

  • 11 Feb 2021 05:56 PM (IST)

    मराठा समाजाचा उद्रेक होऊ देऊ नका : उदयनराजे 

    आरक्षण मिळालं नाही तर लोकांचा उद्रेक होईल. सरकारी वकिलांनी योग्य भूमिका मांडली नाही. मराठा समाजाचा उद्रेक होऊ देऊ नका : उदयनराजे


  • 11 Feb 2021 05:54 PM (IST)

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांच्या भेटीला, उदयनराजेंचं स्पष्टीकरण

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवारांची भेट,  खासदार उदयनराजे यांचे स्पष्टीकरण

  • 11 Feb 2021 05:46 PM (IST)

    शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींचं सभागृहातच मौन

    शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींनी सभागृहातच मौन जाहीर केलं. दोन मिनिटाचं मौन जाहीर केलं असतानाही सभागृहात मोठा गदारोळ

  • 11 Feb 2021 05:43 PM (IST)

    शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही, तुम्हाला कायदे परत घ्यावेच लागतील : राहुल गांधी

    उद्योगपतींचं कर्ज माफ केलं, आता हा देश रोजगार निर्मिती करु शकत नाही, कारण देशाचा कणा तुम्ही मोडीत काढला, हे शेतकऱ्यांचं नाही देशाचं आंदोलन, शेतकरी तर फक्त मार्ग दाखवतोय, संपूर्ण देश हम दो हमारे दो च्या विरोधात आवाज उठवतोय, शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही, तुम्हाला कायदे परत घ्यावेच लागतील : राहुल गांधी

  • 11 Feb 2021 05:42 PM (IST)

    नोटबंदी हा पहिला हल्ला, गब्बरसिंग टॅक्सनेही लोकांना लुटलं : राहुल गांधी 

    नोटबंदी हा पहिला हल्ला होता. गरीबांचा पैसा घेणं हाच नोटबंदीचा उद्देश होता. हा सगळा पैसा दोन व्यक्तींच्या घशात घातला. गब्बरसिंग टॅक्सनेही लोकांना लुटलं. देश फक्त 4 जण चालवतात : राहुल गांधी

  • 11 Feb 2021 05:40 PM (IST)

    देशातील लोकांना उपाशी मरावं लागेल, छोटे व्यापारी, दुकानदार संपणार : राहुल गांधी 

    फक्त दोन लोकांना याचा फायदा होईल, फक्त दोन लोक हा देश चालवतील, हम दो औऱ हमारे दो, देशातल्या लोकांना उपाशी मरावं लागेल, ग्रामीण अर्थव्यवस्था मोडीत निघणार, छोटे व्यापारी, दुकानदार संपणार : राहुल गांधी

  • 11 Feb 2021 05:36 PM (IST)

    ‘हे सरकार हम दो, हमारे दोचं सरकार’ : राहुल गांधी

    ‘हे सरकार हम दो, हमारे दोचं सरकार’, देशाच्या पाठीचा कणा मोडून, 2 मित्रांना देण्याचा मोदींचा डाव, अशी टीका राहुल गांधी यांनी लोकसभेतील भाषणादरम्यान केली.

  • 11 Feb 2021 05:31 PM (IST)

    राहुल गांधींचे लोकसभेत भाषण, भाषणादरम्यान गदारोळ

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कृषी कायद्यावर भाषण, बाजार समित्या संपवण्याचा हेतू, उद्योगपती हे सरकार चालवत आहेत, राहुल गांधींचे लोकसभेत भाषण, भाषणादरम्यान गदारोळ

  • 11 Feb 2021 03:11 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर उदयनराजे भोसले-शरद पवारांची पहिली भेट होणार

  • 11 Feb 2021 02:28 PM (IST)

    पुण्याला देशातील सर्वाधिक पर्यावरणपूरक शहर बनवणार: देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस महापौरांनी मला आढावा घेण्यासाठी निमंत्रित केलं होतं.मी मुख्यमंत्री असताना विविध योजना मंजूर केल्या आहेत. 24 / 7 पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. नदी पात्रातील सुशोभिकरनाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. मुळा मुठाचा जायका प्रकल्प फेब्रुवारी मध्ये टेंडर काढून जूनमध्ये काम सुरू केले जाईल, पुणे मेट्रोचा 21 किलोमीटरचा टप्पा यावर्षी सुरू केला जाणार आहे. पुणे मेट्रोच्या टप्पा 2 ला पुढील वर्षी निधी मिळेल यासाठी प्रयन्त करू, असं देवेंद्र फडणीस म्हणाले. अभय योजनेमुळे महापालिकेला मोठा पैसा जमा झालाय, इतर महापालिकेने हि योजना राबवावी. पुण्यात डिसेंबरपर्यंत आणखी 500 बसेसे धावतील, असं देवेंद्र फडणीवस म्हणाले.

  • 11 Feb 2021 12:10 PM (IST)

    राज्यपालांच्या प्रश्नावरुन उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकाराला सुनावलं

    राज्यपालांच्या प्रश्नावरुन उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकाराला सुनावलं, राज्यपालांना विमानातून खाली उतरावं लागलं, याप्रश्नावर अजित पवार पत्रकारावर भडकले, “मी तुम्हाला आधीच सांगितलं की मला याबाबत काहीही माहित नाही. मी रात्रीपर्यंत कुठे होतो आणि सकाळी कुठे होतो, हे सर्वच तुम्हाला सांगितलं, ज्यावेळी इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीबाबत आपण एखादा प्रश्न विचारता त्यावेळी मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून उत्तर देत असताना, पूर्ण त्याबाबतची मला माहिती नसताना, तुम्ही काा सारखा सारखा तोच प्रश्न विचारताय. मी आत्ताच सांगितलं की यानंतर मी मंत्रालयात जाणार आहे, मी तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांना विचारेन”

  • 11 Feb 2021 12:04 PM (IST)

    राज्यपालांच्या प्रकरणावर मला काहीही माहिती नाही : अजित पवार

    मला याबाबत काहीच माहिती नाही, आता तुमच्याशी बोलल्यानंतर मला ही घटना कळलीय, माहिती घेऊन या घटनेवर बोलेन : अजित पवार

  • 11 Feb 2021 11:55 AM (IST)

    नाशकात खाजगी शाळेबाहेर विद्यार्थ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

    नाशिक – खाजगी शाळेबाहेर विद्यार्थ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, दोघेही मुले दहावीत शिकणारी, हाणामारीचे कारण अस्पष्ट, पोलीस आणि शाळा प्रशासनाकडून तपास सुरु, लहान मुलांमध्ये वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय

  • 11 Feb 2021 11:24 AM (IST)

    ‘राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर संपूर्ण देश एकत्र होतो’

    तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात याने काहीही फरक पडत नाही, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर संपूर्ण देश एकत्र होतो

     

  • 11 Feb 2021 11:20 AM (IST)

    दोन्ही सेना आपल्या तळांवर परतलील

    राज्यसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंहानी सांगितलं की, फ्रिक्शन क्षेत्रात डिसइंगेजमेंटसाठी भारताचं हे मत आहे की 2020 च्या फॉरवर्ड डिप्लॉयमेंट जे एक-दूसऱ्याच्या खूप  जवळ आहे ते लांब झाले तर दोन्ही सेना आपल्या तळांवर परतलील

  • 11 Feb 2021 11:18 AM (IST)

    भारत-चीन टप्प्याटप्प्याने जवानांना सीमेवरुन हटवणार

    चाीनसोबत होणाऱ्या चर्चेने पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण भागातील गतिरोधावर करार झाला आहे, यानंतर भारत-चीन टप्प्याटप्प्याने जवानांना सीमेवरुन हटवणार

  • 11 Feb 2021 11:13 AM (IST)

    ‘आम्ही नियंत्रण रेषेवर शांतता राखण्यासाठी प्रतिबद्ध आहोत’

    आम्ही नियंत्रण रेषेवर शांतता राखण्यासाठी प्रतिबद्ध आहोत,  भारताने नेहमी द्विपक्षीय संबंधांना बनवून ठेवण्यावर जोर दिला आहे.

  • 11 Feb 2021 11:11 AM (IST)

    ‘आम्ही प्रत्येक आव्हानासाठी तयार आहोत’

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी गुरुवारी राज्यसभेत पूर्व लडाखमध्ये सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली, आपल्या सुरक्षा दलांनी हे सिद्ध केलं आहे की ते देशाच्या सार्वभौमत्वाची रक्षा करण्यासाठी कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार आहेत.

  • 11 Feb 2021 10:40 AM (IST)

    Rajnath Singh Live | सीमेवर भारतीय सैन्यानं धैर्य दाखवलं: राजनाथ सिंह

    भारतीय सैन्याने निकरानं लढा दिला. सीमेवर भारतीय सैन्यानं धैर्य दाखवलं. 1962 पासून चीन अतिक्रमण करतेय. एलएसीवर तणाव नको ही आमची भूमिका आहे: राजनाथ सिंह

  • 11 Feb 2021 09:45 AM (IST)

    कन्नड तालुक्यातील औराळा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

    औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील औराळा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, गाव परिसरात शिकारीसाठी बिबट्याचा धाडशी वावर, गावातील तरुणांनी फोर व्हीलर मधून केला बिबट्याचा पाठलाग, डुकरांच्या शोधत बिबट्याचा शेतवस्तीवर वावर, औराळा परिसरात बिबट्यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण

  • 11 Feb 2021 09:43 AM (IST)

    पुणे शहरात 2020 मध्ये डेंग्यूमुळे एकाही मृत्यूची नोंद नाही

    पुणे शहरात 2020 मध्ये डेंग्यूमुळे एकाही मृत्यूची नोंद नाही, 2019 साली पुण्यात 1407 जणांना डेंग्युची लागण झाली होती, त्यापैकी 10 जणांना आपला जीव गमवावा लागला होता, मात्र 2020 मध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या दरम्यान 183 जणांना डेंग्यूची लागण झाली मात्र सूदैवाने एकही बळी यात गेला नाही, शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात 15 जणांच्या पथकानं केलं सर्वेक्षण, सर्वेक्षणात माहिती आली समोर

  • 11 Feb 2021 09:42 AM (IST)

    मागील वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षांची निर्यात मंदावली, महाराष्ट्रातून 45 हजार 393 बागांची नोंद

    पुणे – मागील वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षांची निर्यात मंदावली, महाराष्ट्रातून 45 हजार 393 बागांची नोंदणी झालीये, 10 हजार 416 टन द्राक्षांची निर्यात केली गेली मात्र हेच प्रमाण गेल्यावर्षी हेच प्रमाण 12 हजार टनावर होतं, कोरोनाचा फटका हा द्राक्ष निर्यातीवर मोठ्या प्रमाणात बसलाय, आतापर्यंत सर्वात जास्त ही नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात करण्यात. आलीये, 10 हजार 165 टन एवढी नाशिक जिल्ह्यातून निर्यात, तर पुणे जिल्ह्यात अवघी 25 टन निर्यात करण्यात आलीये,

  • 11 Feb 2021 08:14 AM (IST)

    एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांची साखर जप्त करा, माजी खासदार राजू शेट्टी यांची साखर आयुक्तांकडे मागणी

    कोल्हापूर – एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांची साखर जप्त करा, माजी खासदार राजू शेट्टी यांची साखर आयुक्तांकडे मागणी, कारखानीस होऊन चार महिने उलटले तरी अनेक कारखान्यांनी एफ आर पी दिलेली नाही, एफ आर पी ची मोडतोड आणि गतवर्षीची एफ आर पी थकवणाऱ्यांवर ही कारवाईची शेट्टी यांची मागणी

  • 11 Feb 2021 08:13 AM (IST)

    सोलापूर- पंढरपूर विधानसभेचे बिगुल लवकरच वाजणार

    सोलापूर- पंढरपूर विधानसभेचे बिगुल लवकरच वाजणार, आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त राहिलेल्या पंढरपूर विधानसभा निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरु, निवडणूक आयोगाने मतदार संघातील मतदान केंद्राची यादी मागवली, विधानसभेचे पद रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याचा नियम असल्याने प्रशासकीय स्तरावर तयारी सुरु, फेब्रुवारी अखेर वा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पंढरपुर विधानसभेसाठी निवडणूक होण्याची शक्यता, मतदान यंत्राच्या तपासणीसाठी राजकीय पक्ष नेत्यांची बैठक घेण्यात येणार, निवडणुकीसाठी किती मतदान यंत्रे लागणार याची प्रशासनाकडून माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू

  • 11 Feb 2021 08:12 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात 129 ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच पदासाठी आज निवडणूक

    नागपूर जिल्ह्यात 129 ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच पदासाठी आज निवडणूक, सरपंच आणि उपसरपंच पदासाठी नेत्यांकडे मोर्चेबांधणी,  सकाळी १० ते १२ उमेदवारांची नामांकन प्रक्रिया,  २ वाजेपर्यंत घेता येणार अर्ज मागे,  २ नंतर ग्राम पंचायतीची विशेष सभा आणि निवडणूक प्रक्रिया,  पाच गावांमध्ये आरक्षण सोडतीमुळे निर्माण झाला पेच, आरक्षित प्रवर्गातील उमेदवार नसल्याने निर्माण झाला पेच

  • 11 Feb 2021 07:50 AM (IST)

    वसई विरार महापालिका हद्दीतील आस्थापना चालकांना मोठा दिलासा, प्रतिबंधित क्षेत्र वगळून, अस्थापणाच्या वेळ वाढविल्या

    वसई विरार महापालिका हद्दीतील आस्थापना चालकांना मोठा दिलासा, प्रतिबंधित क्षेत्र वगळून, अस्थापणाच्या वेळ वाढविल्या, हॉटेल्स, रेस्टॉरंट, रेस्टॉरंट & बार, बकवेट हॉल, फूड कोर्ट सकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत राहणार चालू, इतर दुकाने सकाळी 7 ते रात्री 11 तर मध्यविक्री करणारे दुकाने सकाळी 10 ते रात्री साडे दहा पर्यंत राहणार चालू, वेळ जरी वाढल्या तरी आस्थापना धारकांना कोरोनाच्या नियमांचे करावे लागणार काटेकोरपणे पालन, वसई विरार महापालिका आयुक्त गंगाथरण डी यांनी काढला आदेश

  • 11 Feb 2021 07:39 AM (IST)

    ‘नागपूर मनपा निवडणूकीच्या तयारीला लागा’, नाना पटोलेंचे नेत्यांना आदेश

    प्रदेशाध्यक्ष म्हणुन पहिल्या नागपूर भेटीत नाना पटोलेंनी नेत्यांना दिली पहिली असाईनमेंट, ‘नागपूर मनपा निवडणूकीच्या तयारीला लागा’,  नागपुरात भाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश, आजपासूनंच कामाला लागण्याचे दिले आदेश,  पहिल्याच भेटीत भाजपपासून सत्ता खेचून आणण्यासासाठी कामाला लागण्याचे आदेश दिलेय,  नागपूर शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांची ‘टीव्ही ९ मराठी’ला माहिती

  • 11 Feb 2021 07:38 AM (IST)

    औरंगाबादेत साताऱ्याच्या डोंगराला लागली आग, आगीत डोंगराचा सत्तर टक्के भाग जळाला

    औरंगाबादेत साताऱ्याच्या डोंगराला लागली आग, आगीत डोंगराचा सत्तर टक्के भाग जळाला, अनेक झाडं गवत आणि वनस्पतींचं नुकसान, रात्रभर चालू होती डोंगरावरली आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे झाले प्रयत्न, सकाळचा गार वारा आणि सर्द वातावरणामुळे विझली आग, आगीत डोंगरावरील झाडे, वनस्पती आणि सूक्ष्म जीवांचे मोठे नुकसान

  • 11 Feb 2021 07:37 AM (IST)

    अतिरिक्त शुल्क वसुली केल्यामुळे नागपुरातील पोद्दार, झेवियर्स, पलोटी शाळेवर कारवाई

    नागपुरात आणखी तीन सीबीएसई शाळांवर कारवाई, अतिरिक्त शुल्क वसुली केल्यामुळे पोद्दार, झेवियर्स, पलोटी शाळेवर कारवाई, पालकांकडून ९ कोटी रुपये अतिरिक्त शुल्क वसुली प्रकरण, शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केली कारवाई, महिनाभरात अतिरिक्त शुल्काचे पैसे परत करण्याचे आदेश

  • 11 Feb 2021 07:23 AM (IST)

    उमरेड कऱ्हांडला व्याघ्रप्रकल्पात टी-3 वाघिणीने दिलं पाच बछड्यांसह पर्यटकांना मुक्तपणे दर्शन

    उमरेड कऱ्हांडला व्याघ्रप्रकल्पात वाघिणीचे आपल्या बछड्यासह दर्शन, फेअरी टी-3 वाघिणीने दिलं पाच बछड्यांसह पर्यटकांना मुक्तपणे दर्शन,  वाघीणीने पाच बछडे देण्याची घटना दुर्मिळ,  पर्यटकांनी वाघिण आणि बछड्याचे व्हीडीओ कॅमेऱ्यात कैद केले अनेक दिवसांनी व्याघ्रप्रेमिंसाठी दिलासादाय दृश्य

  • 11 Feb 2021 06:53 AM (IST)

    बेकायदेशीरपणे सिलेंडरच्या टाक्या साठवल्या, वर्सोवा आग दुर्घटनेप्रकरणी एकाला अटक

    वर्सोवा आग दुर्घटनेप्रकरणी एकाला अटक, सिलेंडर टाक्या बेकायदेशीर पद्धतीने साठवल्याप्रकरणी केली अटक,
    होटी वाडीलाल असे अटक आरोपीचे नाव, आज सकाळी 11 वाजता कोर्टात करणार हजर

  • 11 Feb 2021 06:28 AM (IST)

    घणसोलीचे माजी नगरसेवक दीपक पाटील यांचे निधन

    नवी मुंबई : घणसोलीचे माजी नगरसेवक दीपक पाटील यांचे निधन, मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन, मंगळवारी सायंकाळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात केले होते दाखल, महापालिकेच्या इतिहासात वाढीव मालमत्ता कराविरोधात आंदोलन करणारे ते पहिले

  • 11 Feb 2021 06:26 AM (IST)

    कात्रज डोंगराला लागलेली आग तीन तासात नियंत्रणात

    पुणे : कात्रज डोंगराला लागलेली आग नियंत्रणात, अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या, अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासात आग नियंत्रणात आणलीय, सुदैवानं आगीत कुठलीही जीवितहानी किंवा जखमी कुणीही नाहीय, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, अग्निशमन दलाचे जवान सुजीत पाटील यांची माहिती