अकोला : शहरातील नेहरू पार्क चौकात MIDC येथून अकोलाकडे येत असलेल्या ट्रकखाली येऊन 65 वर्षीय तुरंत सखाराम बागडे या वृद्घाचा जागीच मृत्यू, रस्ता ओलांडत असतांना ट्रक खाली आल्याने मृत्यू, तर सिव्हिल लाईन पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला, ड्रायव्हरला अटक
“औरंगाबादचे नामांतर हा श्रद्धेचा विषय आहे. 8 मे 1988 ला आम्ही सगळे नगरसेवक झालो होतो. त्यावेळी शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळेस विजय मिळाव्यात शिवसेनाप्रमुखांनी जनतेचे आभार मानले होते. कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा विकासाचा असतो. नामांतराचा विषय हा श्रद्धेचा असतो. हा मुद्दा खरंतर क्लिअर केलं पाहिजे. संभाजी महाराजांच्या नावाला विरोध केला तर तुमच्या घरावर दगडफेक होईल. काँग्रेसला खरंतर मुस्लीम मतांची आशा आहे. संभाजी महाराजांचे शेवटचे चार महिने इथे गेले. त्यामुळे या शहराचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.
मुंबई : “मुंबई पोलीस आणि महापालिका नसती तर वरळी आजही कंटेन्मेंट झोन असता. अभिमान वाटेल अशी सुरुवात करतो आहोत. मॉडर्न टेक्नोलाजी असताना मुबंई पोलीस दलामुळे मुंबई सुरक्षित आहे”, असं पर्यावरण मंत्री आणि वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई पोलीस दलाच्या वतीने जनतेच्या सुरक्षेसाठी वरळी सी फेस येथे पोलिसांच्या गस्तीसाठी स्वसंतुलीत विद्युत स्कुटर्स (सेगवे) प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री अनिल देशमुख, अभिनेता अक्षय कुमार, पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील, अपर पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण उपस्थित होते.
ठाणे : “औरंगाबादचे नाव संभाजीनगर ठेवण्यात यावे ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी शिवसेना प्रमुखांची इच्छा पूर्ण करावी. संभाजीनगर हे नामकरण करण्याचा निर्णय कोणाच्याही दबावाला बळी न पडता घ्यावा. अन्य पक्षांनीही या नामकरणात राजकारण करु नये”, असे आवाहन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केले.
नागपूर : ख्यातनाम इतिहाससंशोधक डाॅ. भा. रा. अंधारे यांचे निधन, अंधारे यांनी वयाच्या 85 व्या सायंकाळी भरत नगरातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला, नागपूरकर भोसल्यांचे इतिहासकार म्हणून ते प्रसिद्ध होते, त्यांनी इतिहासात एम. ए., पीएच.डी आणि डि. लिट. मिळवली होती, ‘बुंदेलखंडातील मराठी राजवट’, ‘1857 च्या समरांगणातील विरांगना आणि निवडक क्रांतीकारक’, ‘देवगडचे गोंड राजे’, ‘मराठी स्वराज्य ब्राम्हण पेशव्यांनी बुडवले काय?’ आदीसह सुमारे 20 ग्रंथ त्यांनी लिहीले आहे. त्यांचे ‘रमा राम कथा’ हे आत्मकथन प्रसिद्ध आहे.
मुक्ताईनगर (जळगाव) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ग्रामपंचायत निवडणुकीची जवाबदारी कार्यकर्त्यांवर, मुक्ताईनगर तालुक्यातील 51 ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीपासून एकनाथ खडसे अलिप्त राहणार, स्थानिक शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या देखील मानेला दुखापत, तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका 15 जानेवारीला, दुसरीकडे खडसे राष्ट्रवादीत गेल्यामुळे मुक्ताईनगरात भाजपला खासदार रक्षा खडसेंच्या माध्यमातून नवीन चूल मांडून नवा संसार उभा करावा लागेल, राजकीय वर्तुळात चर्चा
उस्मानाबाद : इंग्लंडवरून आलेल्या एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ, उस्मानाबाद शहरातील 35 वर्षीय तरुणाचा रॅपिड अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह, उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू, स्टेनच्या चाचणीसाठी नमुना पुणे येथे पाठविला, आज उस्मानाबाद जिल्ह्यात 23 जण कोरोना पॉझिटिव्ह तर 147 सक्रीय रुग्ण, इंग्लंड येथून 8 दिवसापूर्वी उस्मानाबाद येथे तरुण आला असून तो पॉझिटिव्ह आल्याने चिंतेत भर
मुंबई : सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड, भारत बायोटिकची कोवॅक्सिन पाठोपाठ आता कॅडिलाच्या तिसऱ्या लसीला देखील परवानगी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. डीसीजीआयच्या मंजुरीनंतर लस वापरता येणार आहे. देशात आता एकूण तीन कोरोना लसींना मंजुरी देण्यात आली आहे.
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर आंबोली गावाजवळ ऑईल टँकरने संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पेट घेतला. ज्या ठिकाणी टँकरने पेट घेतला, त्याच ठिकाणी दोन्ही बाजूला पेट्रोल पंप आहेत.
मुंबई : “काही लोकांनी मुंबई पोलीस-महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचा विडा उचलला होता. करोना काळात दिवसरात्र काम करताना आमचे पोलीस थकले जरुर आहेत, पण हरले नाहीत. महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दल मॉडर्न टेकनोलॉजीने अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न आहेत. राज्य सरकारच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करीत अत्यंत साधेपणाने नववर्षाचे स्वागत केले, त्याबद्दल आभारी आहे”, अशा भावना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केल्या.
विरार : विरारच्या खानिवडे येथील हनुमान नगर परिसरात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुपारी साडे आकराच्या सुमारास एका घराची भिंत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर दोन मुली गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची विरार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. साहिल महेश वाघ (वय 07) असे मयत मुलाचे नाव आहे तर अंकिता वाघ (वय 5) आणि निधी वाघ ( वय 5) असे जखमी मुलांची नावे आहेत.
कोल्हापूर : इचलकरंजी नगरपरिषदेच्या विषय समित्यांचे सभापती निवडीची तारीख जाहीर. 6 जानेवारी 2021 ला पालिकेची विशेष सभा, उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती, पाणीपुरवठा सभापती, आरोग्य सभापती, शिक्षण सभापती, महिला आणि बालकल्याण सभापती आदींची नवीन निवड होणार. सध्या इचलकरंजी नगरपरिषदेत भारतीय जनता पार्टी, आवाडे गट आणि राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता आहे. मात्र सत्तेत बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीत 15 जानेवरी आणि 17 जानेवारीला होती, पण गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाघाचा नेहमी वावर असतो. निवडणुकीचा बहिष्कार म्हणून नक्षली दहशतीचे वातावरण निर्माण करत असतात. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दोन टप्पयात 15 जानेवारीला सहा तालुक्यात तर 20 जानेवारीला सहा तालुक्यात मतदान आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर 22 जानेवारीला मतमोजणी होईल. यासाठी गडचिरोली पोलीस विभागाकडून गुप्त महिती घेत अनेक ठिकाणी निवडणूक बंदोबस्त करिता पथके तयार करण्यात येत आहे. आज पोलीस आधिक्षक कार्यालयात पथके तयार करण्यात आली.
पालघर : निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून त्यामध्ये पालघर तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतआहे. ती बिनविरोध व्हावी यासाठी ग्रामस्थांचे गावपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तर 7 सदस्य पैकी तीन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण सात सदस्यांची ग्रामपंचायत संख्या असल्याने चार जागेसाठी निवडणूक होण्याचे चिन्ह दिसत असून त्याही बिनविरोध व्हाव्यात यासाठी सागावे ग्रामस्थ सर्वेतोपरी प्रयत्न करीत आहेत.
नंदुरबार : शहादा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. अनेक गावात या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल एवढी आहे. शहादा तालुक्यातील सावळदा भूकंप मापन केंद्रावर या भूकंपाची नोंद झाली आहे. महारष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात भूकंपाचे केंद्र असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली रुग्णालयात दाखल, कोलकात्यातील वूडलँड हॉस्पिटलमध्ये अॅडमिट, एएनआय वृत्तसंस्थेची माहिती
औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध, हे आमच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅमचा भाग नाही, आमची नुरा कुस्ती सुरू नाही तर आमची भाजप आणि एमआयएमसोबत थेट कुस्ती आहे, औरंगाबादच्या नामांतरावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया, औरगाबादच्या नामांतरावर मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेलं नाही हा विषय स्थानिक पातळीवरचा, अशोक चव्हाण
नाशिकमधून पुन्हा मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीकडे रवाना, किसान सभेच्या माध्यमातून दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुन्हा एक शेतकऱ्यांची तुकडी दिल्लीकडे रवाना, या आंदोलनात आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्य देखील घेणार सहभाग, नाशिकवरुन नागपूरला जाऊन हे शेतकरी जाणार दिल्लीला, उद्या नागपूर मध्ये राज्यातील इतर भागातील देखील शेतकरी एकवटणार, नागपूरमध्ये सभा झाल्यानंतर हे सर्व शेतकरी दिल्लीकडे होणार रवाना
पुण्यात आठ महिन्यानंतर पडणार ढोलकीवर थाप, बालगंधर्व रंगमंदिरात रंगणार लावणीचा कार्यक्रम, मैदानातील लावणी कार्यक्रमाला परवानगी द्यावी लावणी कलावंतांची मागणी, बालगंधर्व रंगमंदिरात घूमणार ढोलकी आणि घूंगराचा आवाज, लावणी कलावंतांमध्ये आनंदाच वातावरण,
फक्त दिल्लीतच नव्हे तर देशभरात कोरोनाची लस मोफत मिळणार, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची माहिती
#WATCH | Not just in Delhi, it will be free across the country: Union Health Minister Dr Harsh Vardhan on being asked if COVID-19 vaccine will be provided free of cost pic.twitter.com/xuN7gmiF8S
— ANI (@ANI) January 2, 2021
यशस्विनी महिला ब्रिगेड च्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरण, पत्रकार बाळ बोठेच्या स्टँडिग वॉरंटसाठी पोलिसांचा न्यायालयात अर्ज दाखल, वॉरंट मिळाल्यानंतर पोलिसांना राज्यात आणि अन्य राज्यांतही आरोपीचा शोध घेण्यास मदत होणार
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान त्रंबकेश्वर चरणी नतमस्तक, चौहान यांच्या हस्ते त्रंबकेश्वर राजाची महापूजा
कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडवर असलेल्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेलं, चारचाकीच्या धडकेत पाईपलाईनचा वॉल तुटल्याने हा प्रकार घडला, महापालिकेच्या कर्मचाऱ्याने पाईपलाईनची दुरुस्ती केली, मात्र काही काळ हा संपूर्ण परिसर जल मय झाला होता
सोलापुरात भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्यावर आज कारवाई होण्याची शक्यता, पालिका उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ वखरणी मागितल्याप्रकरणी राजेश काळे यांच्यावर गुन्हा दाखल, काळे यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिका कामगार संघटना आणि पक्षाचे नगरसेवक आणि आग्रही, महापालिका प्रशासन देणार शिस्तभंग अंतर्गत नोटीस, तर भाजपा पक्षातून निलंबित करण्याची शक्यता, काळे यांना पक्षाने नोटीस देत मागितला होता खुलासा, भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी संपूर्ण अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडे पाठविला, त्यावर आज निर्णय होऊन कारवाईची शक्यता
बाळासाहेब ठाकरे हे कायमच हिंदूहृदयसम्राट होते. कुठल्याही पक्षाच्या टिप्पणीमुळे त्यांचं स्थान कमी होणार नाही. जसा बाबर आमचा कोणी लागत नाही, तसा औरंगजेबही लागत नाही : संजय राऊत
चंद्रकांतदादा रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार.. अरे बापरे.. ताबडतोब.. भीती वाटते मला : संजय राऊत
एका बुधवर साधारणपणे 100 जणांचं लसीकरण केलं जाईल, असं नियोजन आहे, एका बुधवर दहाजणांचा प्रशिक्षित चमू असेल, ते सर्व जबाबदारी सांभाळतील
काही जणांना लशीचा थोडाफार परिणाम जाणवू शकतो, त्यांच्यासाठी त्यांना लस दिल्यावर अर्धा तास त्यांना ऑबझर्वेशनमध्ये ठेवलं जाईल, जर कुणाला काही त्रास जाणवला तर जवळच्या रुग्णालयात दाखल केलं जाईल
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरणाचं ड्रायरन, राज्यात आज पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार येथे ड्रायरन, आज लसीचा डोज नाही, तर फक्त प्रात्यक्षिक केलं जाईल,
नाशिक जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात लवकरच दररोज होणार रुग्णांची स्वॅब चाचणी, दररोज साडे तीन हजार रुग्णांची चाचणी होणार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक निखिल सैंदाने यांची माहिती, तर नवीन बिटको रुग्णालयात महापालिका उभारणार नवीन कोव्हिड टेस्टिंग लॅब, डीपीसीकडे निधीची मागणी, पालकमंत्री अॅक्शन मोडमध्ये
जालना जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा आज ड्रायरन, जालना जिल्ह्यात तीन ठिकाणी होणार ड्रायरन, जालना जिल्हा रुग्णालय, अंबड उपजिल्हा आणि सेलगाव उपजिल्हा रुग्णालयाची निवड, प्रत्येक रुग्णालयात 25 स्वयंसेवकांनवर होणार लसिकरणाचा डेमो, लसीकरणासाठी प्रत्येक केंद्रावर 6 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका, शिक्षक आणि पोलिसांची लसीकरण केंद्रावर नियुक्ती, आरोग्य मंत्री राजेश टोपे देणार ड्रायनला भेट
नवीन वर्षात पाणीपट्टी बिल न भरणाऱ्या थकबाकीदारांचे नळ जोडणी खंडित करुन होणार कारवाई, वसई-विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरण डी यांचा निर्णय, महापालिकेच्या नऊ ही प्रभागात स्वतंत्र पथका द्वारे होणार कारवाई, 31 जानेवारीपर्यंत प्रत्येक पाणीपट्टी धारकांनी पाणी बिल भरण्याचे महापालिकेकडून आवाहन, नळ जोडणी खंडित केल्या नंतर नव्याने पुन्हा नळ जोडणी करण्याकरिता 2500 रुपयांचा महापालिका लावणार चार्ज, मागील दोन महिन्यात विविध मालमत्ता करातून महापालिकेची 100 कोटींची वसुली, महापालिकेचा आर्थिक स्त्रोत वाढविण्यासाठी आयुक्त गंगाथरण डी यांची विशेष मोहीम सुरु
नागपुरात महिना भर 1 दिवसा आड पाणी पुरवठा होणार, पुढील 30 दिवसांकरिता नागपूर शहरातील 65 टक्के भागात 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे, पेंच धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये मोठे लिकेज, त्या मोठ्या लाईन दुरुस्त करण्यासाठी मनपाने हा निर्णय घेतला, नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, नागपूरला पेंचमधून 65% पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे हे लिकेज दुरुस्ती करणे आवश्यक आहे, साधारणत: या दुरुस्तीला 30 दिवस लागणार, हे लिकेच आता दुरुस्त केले नाही तर उन्हाळ्यात मोठी समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला
मराठवाड्यातील सहकार क्षेत्रातील निवडणुकांचा वाजला बिगुल, मराठवाड्यातील चार मोठ्या जिल्हा मध्यवर्ती बँकांची निवडणूक जाहीर, औरंगाबाद, बीड, परभणी आणि नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकांची होणार निवडणूक, विविध कार्यकारी सेवा संस्थांसह अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका घोषित, निवडणुका घोषित झाल्यामुळे सहकार क्षेत्र निघणार ढवळून
जालना शहरातील जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम होणार, जालना जिल्हा सामान्य रुग्णालय केंद्रावर आकर्षक सजावट, आज सकाळी 9 वाजल्यापासून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत हा ड्रायरन घेतला जाणार, आरोग्य यंत्रणा सज्ज
चिनी मांजा प्रकरणी औरंगाबाद पोलीस अॅक्शन मोडवर, चिनी मांजा बाळगणाऱ्या व्यापाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई सुरु, दोन दिवसात 20 व्यापाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, चिनी मांजा सापडल्यास पोलिसांकडून गुन्हे दाखल करायला सुरुवात, चिनी मांजा न वापरण्याचं पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचं आवाहन, चिनी मांजाच्या वापरामुळे दरवर्षी अनेकांना गमवावा लागतो प्राण
कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल सापडण्याचे सत्र थांबेना, कारागृहात पुन्हा आढळला एक मोबाईल आणि तीन बॅटऱ्या, कारागृहातील उंबराच्या झाडाखाली बिस्कीटच्या रिकाम्या पाकिटात आढळल्या वस्तू, गेल्या काही दिवसात कारागृहात सापडले तब्बल 12 मोबाईल आणि 11 बॅटऱ्या, वारंवार सापडणाऱ्या मोबाईलमुळे तुरुंग प्रशासन हादरले
विरारच्या नारंगी गावचे सुपुत्र किशन बाबुराव पाटील यांचे 79 व्या वर्षी अल्पशा आजाराने मृत्यू, पाटील हे विरारमधील आगरी समाजातील पहिले आणि एकमेव राष्ट्र्पती पदक विजेते, यशस्वी उद्योजक आणि प्रगतिशील शेतकरी, माजी नगरसेवक होते, औद्योगिक क्षेत्रात त्याची वेगळी ओळख होती, पाटील यांच्या पश्चात 3 मुलं, 1 मुलगी, सून, नातवंड असा परिवार आहे, पाटील यांच्या निधनाने औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा तथा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी श्रद्धांजली वाहताना व्यक्त केल्या भावना
वाघिण आणि दाेन बछडे मृतावस्थेत आढळले, विषप्रयाेगामुळे मृत्यू झाला असण्याची शक्यता, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील घटना, पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात काॅलरवाल्या वाघिणीसह तिचे दाेन बछडे मृतावस्थेत आढळून आले, शेजारीच एक गाईचे मृत वासरुही आढळले, विषबाधेने वाघांचा मृत्यू झाल्याची शक्यता, विषप्रयाेग करण्याच्या आराेपाखाली शेजारील शेतमालकाला अटक, तीन ते चार दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात दीड महिन्यापूर्वीच दाेन वाघांचा बळी गेला
नागपुरात तीन ठिकाणी होणार लसीकरणाची ट्रायलरन, तयारी पूर्ण, प्रत्येक केंद्रावर 25 लोकांचं सॅम्पल म्हणून यात सहभागी असणार, त्यांना लसीकरण करण्यात येणार नाही मात्र प्रक्रिया पूर्ण केली जाईल, शहारात डागा हॉस्पिटल आणि केटी नगर प्राथमिक आरोग्य केंद्र तर ग्रामीणमध्ये कामठी रुग्णालय येथे ट्रायल होणार, प्रत्येक केंद्रावर राहणार 4 वॅक्सिनेशन अधिकारी, पहिले covid app मध्ये एन्ट्री केल्या जाईल, लसीकरण केल्यासारखे करतील, मग थोड्या वेळ बाजूला आराम दिला जाईल जेणेकरुन काही परिणाम होते आहे का, हे तपासण्यात येईल
महाराष्ट्र पोलिसांची योगींच्या जिल्ह्यात कारवाई, ठाण्यात हत्या करुन गेल्या आठ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जिल्हा असलेल्या गोरखपूरमधून अटक केली
राज्यभरात आज कोरोना लसीकरणाची सराव फेरी, पुणे जिल्ह्यातील तीन ठिकाणी कोरोना लसीकरण सराव फेरी
घेण्यात येईल
महाराष्ट्रातील 4 राज्यात आजपासून लसीकरणाचा ड्रायरन सुरु होणार, तर मुंबईतल्या पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठीच्या तयारीचा आज आढावा घेतला जाणार, तसेच दुसऱ्या टप्प्यासाठीची लसीकरण केंद्रेही
तयार केली जाणार, आज महापालिका अतिरीक्त आयुक्त लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याचा दौरा करणार
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज नाशिकात, सकाळी त्र्यंबकेश्वरमध्ये महापूजा, साधारण सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार
मुद्रांक शुल्क सवलतीमुळे दस्तनोंदणीत 48 टक्के वाढ सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात दस्तनोंदणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 48 टक्के वाढ झाली, तर महसुलात 367 कोटी रुपयांची वाढ, डिसेंबरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रमी 4 लाख 59 हजार 607 दस्त नोंदणी झाली असून त्यातून 4314 कोटी रुपयांचा महसूल मिळाला, डिसेंबरअखेर एकूण 14 हजार 598 कोटी 83 लाखांचा महसूल मुद्रांक-नोंदणी शुल्कातून गोळा
मीरा रोड येथील मराठी मुलगी ऋतुजा रावण यांनी देश पातळीवर दिल्लीत आयोजित Diadem Miss India 2020 मध्ये उपविजेतेपद जिंकून महाराष्ट्राचा झेंडा देशात फडकविला, मीरा रोड येथील आपल्या घरी आल्यावर ऋतुजा रावण यांचा जोरदार सत्कार करण्यात आला