महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जो बायडेन यांनी आज अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे आजपासून अमेरिकेत बायडेन पर्वाला सुरुवात झाली आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतलीय. शपथविधी सोहळा कॅपिटल हिलमध्ये पार पडत आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा या समारंभास उपस्थित आहेत.
कोरोना संकट काळात संचारबंदी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी सेक्शन 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. अनिल देशमुख यांनी ट्विटरवर याबाबतमी माहिती दिली आहे
COVID-19 नियमों का उल्लंघन करने के लिए IPC – 188 के अंतर्गत दाखिल किए गए केसेस को राज्य सरकार न्यायाईक प्रक्रिया का पालन करते हुए वापस लेगी। pic.twitter.com/weHyWghyUZ
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 20, 2021
“ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जबाबदारी घ्यायची नसेल, मुख्यमंत्र्यांकडे जबाबदारी ढकलायची असेल तर त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांकडे ते खातं सोपवावं. जर आपल्याला मंत्रीपदाचे सर्व अधिकार हवे असतील तर यातनाही सहन करायच्या असतात. नितीन राऊत अशाप्रकारे जबाबदारी झटकू शकत नाहीत. ते मुख्यमंत्र्यांकडे विषय मांडू शकतात”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले.
नवी दिल्ली : केंद्र सरकारसोबतची शेतकरी संघटनांची दहावी बैठक संपली आहे. केंद्र सरकारने कृषी कायद्यांना एका निश्चित वेळेपुरता स्थगित करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला. मात्र, त्यासाठी एका समितीची स्थापन करण्याती अट ठेवण्यात आली. या समितीत शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारची माणसं असतील, असा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, हा प्रस्तावही शेतकरी संघटनांनी फेटाळला. त्यामुळे आजच्या बैठकीतही काहीच निष्पन्न झालं नाही. आता शेतकरी आणि केंद्र सरकारमधील पुढील बैठक ही 22 जानेवारी दुपारी बारा वाजता होईल.
बेळगाव : उद्याचा मराठी भाषिकांचा मोर्चा स्थगित, मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नाही, झेंडा काढण्याबाबत उद्या पहिली बैठक होणार, कन्नड संघटनेच्या ध्वजाबाबत उद्या पहिली बैठक होणार, जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत होणार बैठक
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी तरुणाने केलं विष प्राशन, औरंगाबादच्या क्रांती चौकातील घटना, दत्ता भोकरे असं विष प्राशन केलेल्या तरुणाचं नाव, क्रांती चौकात फेसबुक लाईव्ह करत व्यक्त केली खदखद, विषारी औषध प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या मदतीने तरुणाला केलं रुग्णालयात दाखल
नोकरभरती करण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. गृहखात्याप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढून नोकरभरती करण्याची मागणी केली होती ती मान्य करण्यात आली आहे. अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.
सरकारी दफ्तर बेकायदा ताब्यात ठेवणे जळगावातील 9 ग्रामसेवकांना भोवले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी 9 ग्रामसेवकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बोदवड, धरणगाव आणि चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकांचा समावेश आहे. या ग्रामसेवकांनी सरकारी दफ्तर बेकायदा ताब्यात ठेवले होते या प्रकरणाची जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी गंभीर दखल घेतली आहे.
पालघर – बोईसर एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला भीषण आग, प्लॉट नंबर एन 44 वरील अंबानी केमिकल कंपनीत आग, घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन बंब दाखल
एक तर्फी प्रेमातून प्रतीक्षा मेहेत्रे या 24 वर्षीय युवतीची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या राहुल बबन भड या युवकास आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी-फालके यांच्या न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे. 23 नोव्हेंबर 2017 रोजी राहुलने प्रतीक्षाची हत्या केली होती.
ग्रामपंचायत निवडणुकीत नारायण राणे कुटुंबाने मोठी ताकद लावून सिंधुदुर्गात भाजपला मोठा विजय मिळवून दिला आहे. सिंधुदुर्गात शिवसेनेवर मात केल्यानंतर लगेच निलेश राणे यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप नेते नारायण राणे यांना केंद्राने Y दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने राणेंना Y दर्जाची सुरक्षा दिली आहे. ठाकरे सरकारनं सुरक्षा काढल्यानंतर मोदी सरकारकडून नारायण राणेंना सुरक्षा देण्यात आली आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ मंत्री बैठकीला उपस्थित आहेत. कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहत होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पहिल्यांदाच सह्याद्रीवर सर्व मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आह
बीडमधील मोची पिंपळगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी पराभूत उमेदवाराच्या घरासमोर कपबशा फोडून जल्लोष केला आहे. पराभूत उमेदवार हा वंचित बहुनज आघाडी पक्षाचा आहे. दरम्यान याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुण्यासह मुंबई, नागपूर, लातूर इथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार, सरकारने सुरवातीला PIFF साठी 4 कोटी रुपयांच अनुदान जाहीर केलं होत, मात्र, कोरोना आपत्ती काळात परिस्थितीचा विचार करत आम्हीच चार कोटी ऐवजी अडीच कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी केली, पुढच्या वर्षीपासून सरकारकडून 4 कोटी रुपये अनुदान मिळेल
नागपूर : गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाला बाळासाहेबांचं नाव देण्यास विरोध, विदर्भवादी संघटना आक्रमक, ‘विदर्भ राज्य आंदोलन समिती’चा विरोध, विदर्भ राज्य आंदोलन समिती थोड्याच वेळात सरकारच्या जीआरची होळी, बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याला होतो विरोध
राज्य सरकारमधील नोकर भरती पुन्हा सुरु करावी याबाबत कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार?, सूत्रांची माहिती, मराठा आरक्षण पुढील तारीख दिल्यानंतर आता सरकार नोकर भरती सुरु करण्यासंदर्भात चर्चा करणार, कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार, कॅबिनेट बैठकीत काही ओबीसी नेते आग्रही मागणी नोकर भरती सुरू करावी अशी करणार असल्याची माहिती, मराठा आरक्षण फेब्रुवारीत सर्वोच्य न्यायलयात सुनावणी होणार त्यामुळे इतर समाजातील विद्यार्थी अन्याय नको अशी भूमिका घेत काही मंत्री कॅबिनेट यात मांडण्याची शक्यता
सोलापूर : माधव नगर येथील यंत्रमाग कारखान्याला आग, पेंटीं यांच्या यंत्रमाग कारखान्याला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना, आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती
औरंगाबाद : राष्ट्रवादीकडून नाराज कार्यकर्त्यांचं पुनर्वसन सुरु, पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती, संदीपान भुमरे यांना सेनेने मंत्रिपद दिल्यानंतर राष्ट्रवादीकडूनही पक्षाबंधणी सुरू, विधानसभेला राष्ट्रवादीचे तिकीट हुकलेल्या वाघचौरे यांना नवी संधी, वाघचौरे यांची प्रदेश कार्यकारिणीवर केली निवड, शिवसेनेच्या गडावर ताकत वाढवण्यासाठी राष्ट्रवादीची नवी खेळी, नाराज कार्यकर्त्यांची मोठ्या पदावर लावली जातेय वर्णी
भाजपमधून कोणीही बाहेर जाणार नाही, उलट आमच्याकडेच लोक येणार आहेत,
सरकार ठाम भूमिका मांडू शकत नाही, प्रत्येकवेळी नवीन भूमिका मांडली जाते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात घोळ होतात, सरकारने कमिटी स्थापन केली, पण त्या कमिटीत काय निर्णय होतात कळत नाही, हे प्रकरण अत्यंत वाईट पद्धतीने हाताळलं जात आहे
मराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे, राज्य सरकारच्या मनात काय कळत नाही, राज्य सरकार या विषयात काय करु इच्छिते हे कळत नाही
सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर आज होणारी सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी पाच फेब्रुवारीला होणार
इचलकरंजी : माजी खासदार राजू शेट्टी महा विकास आघाडी सरकारवर टीका, लॉकडाऊन काळातील लाईट बिल तीन महिन्याची सवलत देण्याची ऊर्जामंत्री यांनी सांगितले होते, दिवाळीनंतर गोड बातमी देणार ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले होते, ते हवेत राहिले आहे, घरगुती लाईट बिल ऊर्जामंत्री आणि महावितरणने तोडून दाखवावे, त्यांना आमच्या परीने उत्तर देऊ, हिम्मत असेल तर घरगुती कनेक्शन तोडून दाखवावे मंत्र्यांनी राज्यातील दौरे करावे आणि घरगुती लाईट बिल संदर्भात नागरिकांचे मत घ्यावे, राज्य सरकारने लाईट बिल माफ केले पाहिजे, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत सरकारची दोन हात करण्यासाठी आम्ही तयार आहोत ऊर्जा मंत्री आणि काय करायचे करावे
गेले चार महिने तेजीत असलेले टोमॅटोचे दर अवघे एक ते दोन रुपये किलोवर आल्याने येवला तालुक्यातील देशमाने शिवारातील शेतकऱ्याने नाशिक-औरंगाबाद राजमार्गाच्या कडेला टोमॅटो आणून फेकून दिल्याची घटना घडली, 20 किलोच्या कॅरेटला 250 ते 901 रुपयांपर्यंत डिसेंबर या कालावधीत बाजार भाव मिळत होता, परंतु दुबई, बांग्लादेश या देशात स्थानिक टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणात आल्याने भारतातून मागणी बंद झाल्यामुळे जानेवारीत अवघे 20 ते 40 रुपयांपर्यंत बाजार भाव आल्याने उत्पादनखर्च तर दूरच वाहतूक खर्चही निघणे मुश्कील झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल
पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा अभिषेक आणि आरती, काही वेळातच राज्यपाल दगडूशेठ गणपती मंदिरात पोहोचणार
पुणे : फेसबुक पोस्ट टाकत आत्महत्या करणाऱ्या तरुणीला पुणे पोलिसांनी वाचवले, नोकरी मिळत नसल्याने नैराश्येत आलेल्या तरुणीने उचलले थेट आत्महत्येचे पाऊल, पोलीस आयुक्त कार्यालयातील महिला दामिनी पथकाने काही तासातच काढले शोधून, पोलिसांनी चौकशी केली असता नैराश्येत येऊन आत्महत्या करत असल्याचं समोर, दामिनी पथकाच्या सुजाता दानमे यांनी केले तरुणीचे समुपदेशन, एका पोस्टमुळे आत्महत्या करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीला वाचविण्यात पोलिसांना यश
उस्मानाबाद : जिल्ह्यातील नळदुर्ग येथील सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर पेट्रोल भरुन पेट्रोल पंपाच्या बाहेर पडणाऱ्या स्विफ्ट कार ला टँकरने मागच्या बाजूने धडक दिल्याने टीएस 15 ई.व्ही.4548 या स्विफ्ट गाडीचा चक्काचुर झाला आहे. यामधील प्रतीक सोनावणे या युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमीला खासगी वाहनाने नळदुर्ग ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.तर टँकरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे.
पुढील तपास नळदुर्ग वाहतूक पोलीस करत आहेत.
औरंगाबाद : मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, सुनावणीकडे मराठा क्रांती मोर्चासह संपूर्ण समाजाचं लक्ष, सुप्रीम कोर्टात होणार प्रीप्रॉनंड सुनावणी, 25 तारखेपासून होणाऱ्या सुनावणीला 20 तारखेपासून सुरुवात, सुप्रीम कोर्टाने केली आजपासून सूनवणीला सुरुवात, आजपासून सुनावणीला सुरुवात झाल्यामुळे मराठा समाजाला दिलासा, मात्र निकाल काय लागणार याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष
औरंगाबाद : अपघातानंतर वाळूज परिसरात जमावाची ड्रॉयव्हरला बेदम मारहाण, वाळूजच्या लांजी चौकात जमावाने केली बेदम मारहाण, बोलेरो गाडीने दुचाकी आणि रिक्षाला दिली जोरदार धडक, अपघातात रिक्षा आणि दुचाकीतील पाच गंभीर जखमी, अपघातानंतर जमावाने बोलेरो गाडीच्या चालकाला केली बेदम मारहाण
नाशिक – कॉलेज रोडवरील अवैध वृक्षतोड प्रकरण, अखेर तीन दिवसानंतर महापालिकेकडून गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस घेणार आरोपींचा शोध
कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे 950 उमेदवार विजयी झाल्याचा जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा दावा, 100 पेक्षा अधिक सदस्य बिनविरोध आल्याचा हे घाटगेंचा दावा, राज्यात सत्ता नसताना ही 1760 पैकी 950 उमेदवार हे कार्यकर्त्यांच्या परिश्रमाच यश असल्याचं केलं नमूद, महाविकास आघाडीवर लोकांची नाराज स्पष्ठ झाल्याचा ही लगावला टोला
औरंगाबाद : भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ, गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरणी सभासदांचा जामीन नाकारला, वैजापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने नाकारला जामीन, सहा सदस्यांनी वैजापूर जिल्हा न्यायालयात केला होता जामीन अर्ज, जामीन नाकारल्यामुळे सभासदांवर अटकेची टांगती तलवार, सभासदांचा जमीन नाकारल्यामुळे आमदार प्रशांत बंब यांचाही जामीन अधांतरी, सभासदांना जामीन मिळत नसल्यामुळे प्रशांत बंब यांच्या अडचणीत वाढ
ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील गडचिरोली जिल्ह्यात आज (20 जानेवारी) मतदान होत आहे. जिल्ह्यातील 150 ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालंय. आज 20 जानेवारीला सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदारांनी मतदानासाठी केंद्रावर गर्दी केली आहे. सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
भंडारा – 10 नवजात बाळांच्या मृत्यूचं प्रकरण, 11 दिवस लोटूनंही अद्याप चौकशी अहवाल नाही, सरकार आरोपींना वाचवत असल्याचा भाजपचा आरोप, भंडाऱ्याचे माजी पालकमंत्री परिणय फुके यांचा आरोप, 11 दिवस लोटूनंही अद्याप अहवाल का नाही?, 11 दिवस लोटूनंही अद्याप एकावरंही कारवाई का नाही, भाजप नेते परिणय फुके यांनी उपस्थित केले सवाल, कारवाई झाली नाही तर भाजपचा आंदोलनाचा इशारा
नाशिक – महापालिकेच्या बस सेवेचा मुहूर्त अखेर हुकला, राज्य सरकारकडून बस ऑपरेशन परवाना अद्याप प्राप्त न झाल्याने लागला ब्रेक, 26 जानेवारी रोजी सुरु होणार होती बहुप्रतिक्षित नाशिक महापालिकेची शहर बस सेवा, राज्य शासनाकडून वेळेत परवानगी मिळत नसल्याने सुरू होत नाही बस सेवा, पहिल्या टप्प्यात 50 डिझेल बस रस्त्यावर आणण्याची होती तयारी, नाशिकरोड आणि पंचवटीतून नऊ मार्गांवर सुरू होणार होती ही बस सेवा
नाशिक – डॉक्टर्स , वकील, सीए, आर्किटेक्ट यांना आता निवासी दरानेच घरपट्टी, महापौर सतीश कुलकर्णी यांचा महत्वपूर्ण निर्णय, कोरोनाच्या संकटातून बाहेर पडणाऱ्या व्यावसायिक आणि उद्योजकांना महापालिकेचा मोठा दिलासा, घरगुती स्वरूपात उद्योग करणाऱयांना देखील याच पद्धतीने सवलत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय, महापालिकेच्या महासभेत झाला निर्णय
नागपूर : जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव, नागपुरातील वारंगा गावातील कोंबड्यांचे नमुने पॅाझिटीव्ह, एक किमी परिसरात कोंबड्या नष्ट करण्याची मोहिम राबवणार, चेतना फार्महाऊसवरील 23 कोंबड्यांचा आठवड्यापूर्वी मृत्यू झाला होता, नमुने पॅाझिटीव्ह आल्यानंतर वारंगा गावातील 460 कोंबड्या नष्ट करणार
नागपूर : नागपुरातील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव, प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री करणार उद्घाटन, ‘प्राणीसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नको’, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भूमिका, गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात लवकरंच सफारीला होणार सुरुवात
चंद्रपूर : चंद्रपुरात स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शहराच्या एंट्री पॉईंटवर पकडला 7 गाडी भरुन देशी दारुचा साठा, गाड्या पकडून पोलिसांच्या स्वाधीन, गेले काही महिने जिल्ह्यातील दारुबंदीविरोधातील पोलीस कारवाई थंडावल्याची होती कुजबुज, हा एकूण मुद्देमाल 50 लाखांहून अधिक रकमेचा असल्याची प्राथमिक माहिती, बुलडाणा पासिंगच्या या गाड्या शेकडो पोलीस ठाणे आणि जिल्ह्यातील नाकेबंदी चुकवून जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचल्याने पोलिस बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह, पडोली पोलीस ठाण्यात कारवाईची प्रक्रिया सुरु
नालासोपाऱ्यात कोंबिग ऑपरेशन करत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या 18 नायजेरियन नागरिकांना तुळिंज पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली, यात 15 नायजेरियन पुरुष आणि 3 स्त्रियांचा समावेश, नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर मध्ये एच पी बिल्डिंग, बसेरा बिल्डिंग, के.डी.एम बिल्डिंगमध्ये हे नायजेरियन नागरिक अनधिकृत रित्या वास्तव्यास होते
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना लसीकरणला सुरुवात, उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील केंद्रात आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात येत आहे, लसीकरणच्या पहिल्या दिवशी 16 जानेवारीला ज्या डॉक्टरांनी लस घेतली त्यातील काही जणांना अंगदुखी, ताप यासारखी सौम्य लक्षणे एक दिवसासाठी आढळली मात्र त्यानंतर कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही, त्यामुळे लस सुरक्षित असून लसीकरण करावे असे आवाहन केले आहे
ठाण्याच्या पाचपाखडी विभागात असलेल्या श्री स्वामी नारायण सत्संग हॉलला मंगळवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग, आगीत काही सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल, तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळविले, सुदैवाने यात कोणी ही जखमी झाले नाही, मात्र हे सत्संग भवन आगीत जळून खाक झाले, या ठिकाणी अग्निशमन दलाने दहा पेक्षा जास्त गॅस सिलेंडर बाहेर काढले, सुदैवाने यातील फक्त एकच सिलेंडरचा स्फोट झाला आणि तेव्हा अग्निशमन दल ही घटनास्थळी उपस्थित होते, ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट