LIVE | औरंगाबाद शहरातील सिमेंट रस्ते होणार बंद, शहरात यापुढे एकही सिमेंट रस्ता बनवला जाणार नाही

| Updated on: Apr 15, 2021 | 3:45 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE | औरंगाबाद शहरातील सिमेंट रस्ते होणार बंद, शहरात यापुढे एकही सिमेंट रस्ता बनवला जाणार नाही
Breaking News
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Feb 2021 10:11 AM (IST)

    शेतकरी, उद्योग आणि रोजगाराला चालना देणारा अर्थसंकल्प असावा : विजय वडेट्टीवार

    शेतकरी, उद्योग आणि रोजगाराला चालना देणारा अर्थसंकल्प असावा, कोरोना काळात शेतीचं मोठं नुकसान झालं, मोदी सरकारवर शेतकरी नाराज आहेत, शेतीला उभारी देण्यासाठी मोठी घोषणा हवी, मनमोहन सरकारने 70 हजार कोटींची कर्जमाफी केली होती, तशाच मोठ्या शेतकरी कर्जमाफीची घोषणा या बजेटमध्ये असावी, असं विजय वडेट्टीवार म्हणाले

  • 01 Feb 2021 08:50 AM (IST)

    पुण्यात आज वाजणार शाळेची घंटा, आजपासून 5 वी ते 7 वीचे वर्ग होणार सुरु

    पुणे : पुण्यात आज वाजणार शाळेची घंटा, आजपासून 5 वी ते 7 वीचे वर्ग होणार सुरु, महापालिकेच्या दिन दयाळ उपाध्याय शाळेत आमदार चंद्रकांत पाटील करणार विद्यार्थ्यांचे स्वागत


  • 01 Feb 2021 08:49 AM (IST)

    सायबर सेलकडून नाशिककरांना हाय अलर्ट, पंचतारांकित हॉटेलमध्ये फ्री बुकिंगचं आमिष दाखवून केली जात आहे फसवणूक

    नाशिक : सायबर सेलकडून नाशिककरांना हाय अलर्ट, पंचतारांकित हॉटेलमध्ये फ्री बुकिंगचं आमिष दाखवून केली जाते आहे फसवणूक, शहरातील अनेकांना फ्री बुकिंगचे मेसेज आल्याने गोंधळ, वैयक्तिक माहिती संकलित करून फसवणूक होत असल्याचं आलं समोर, नागरिकांनी वैयक्तिक माहिती शेअर करू नये, नाशिकमधील सायबर क्राईम डिपार्टमेंट चा सल्ला

  • 01 Feb 2021 08:48 AM (IST)

    नाशकात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शहरातील गुन्हेगारीत वाढ, अनलॉकनंतर शहरात विनयभंगाचे 38 गुन्हे दाखल

    नाशिक – लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शहरातील गुन्हेगारीत वाढ, अनलॉकनंतर शहरात विनयभंगाचे 38 गुन्हे दाखल, तर अनलॉक नंतर बलात्काराचे 9 गुन्हे शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल, लॉकडाऊननंतर पोलिसांचा ताप वाढला

  • 01 Feb 2021 08:41 AM (IST)

    औरंगाबाद शहरातील सिमेंट रस्ते होणार बंद, शहरात यापुढे एकही सिमेंट रस्ता बनवला जाणार नाही

    औरंगाबाद :औरंगाबाद शहरातील सिमेंट रस्ते होणार बंद, शहरात यापुढे एकही सिमेंट रस्ता बनवला जाणार नाही, औरंगाबाद महापालिकेने घेतला महत्वपूर्ण निर्णय, सिमेंट रस्त्यामुळे पर्यावरणाला धोका होत आल्यामुळे निर्णय, सिमेंट रस्त्यामुळे तीन अंशपर्यंत तापमान वाढ होत असल्याचा दावा, पर्यावरण हानी टाळण्यासाठी सिमेंट रस्त्यांवर कायमची बंदी

  • 01 Feb 2021 08:40 AM (IST)

    नागपूर महानगरपालिकेच्या उद्यानात आता फिरायला जाण्यासाठी मोजावे लागणार शुल्क

    नागपूर महानगरपालिकेच्या उद्यानात आता फिरायला जाण्यासाठी मोजावे लागणार शुल्क,  महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने उत्पन्न वाढविण्यासाठी नवा शोध, शहरातील175 उद्याना पैकी 15 मोठी तर 54 लहान उद्याने खाजगी संस्थानला चालवायला देणार आहे, उद्यानात फिरायला जाणाऱ्या नागरिकांना आता दररोज 15 ते 25 रुपयांचा भुर्दंड बसणार आहे

  • 01 Feb 2021 07:23 AM (IST)

    कुर्ला स्थानकात 7 वाजेनंतर केवळ अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा

    कुर्ला स्थानकात 7 वाजेनंतर केवळ अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा, रेल्वे पोलिसांनी केली बॅरिकेटींग, महिला आणि पोलिसांचा ताफा आयडी कार्ड तपासणीसाठी सज्ज, तिकीट काऊंटरवर सर्वसामान्यांना तिकीट नाही

  • 01 Feb 2021 07:06 AM (IST)

    नव्या कृषी कायद्यासंदर्भात शरद पवारांनी कृषिमंत्र्यांना केलं तथ्य समोर आणण्याचे आवाहन

    पुणे : नव्या कृषी कायद्यासंदर्भात शरद पवारांनी कृषिमंत्र्यांना केलं तथ्य समोर आणण्याचे आवाहन, केंद्र सरकारने कृषी कायदे लागू करताना कोणत्याही पक्षाला, शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही, शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची, वेळेवर योग्य चर्चा व्हायला हवी, सत्य समोर ठेवण महत्वाचं, सरकारच्या वतीने हे काम केंद्रीय कृषिमंत्रीच करु शकणार असल्याचं पवारांचं म्हणणं, या कायद्यात शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य किंमत देण्याचे कोणतेही वचन देण्यात आलेलं नाही, नव्या यंत्रणेद्वारे बाजार समितीवर कोणताही परिणाम होणार नसल्याच कृषीमंत्री सांगत असले तरी प्रत्यक्षात ही तरतूद स्पर्धक कंपन्यांच्या हितासाठी असल्याचं शेतकरी संघटनांचे मत, कार्पोरेट क्षेत्रासह, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल अस आश्वासनही दिल जात नसल्याचं पवारांचं म्हणणं, केंद्रीय कृषीमंत्री लोकांपर्यंत यासंबंधात खरी तथ्य समोर आणत नसल्याचा केला आरोप

  • 01 Feb 2021 06:59 AM (IST)

    धावपट्टीच्या नूतनीकरणाच्या कामासाठी 26 एप्रिल-9 मेपर्यंत पुणे विमानतळ बंद राहणार

    पुणे : धावपट्टीच्या नूतनीकरणाच्या कामासाठी 26 एप्रिल ते 9 मे या 14 दिवसांच्या कालावधीत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे बंद राहणार, पुणे विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली माहिती, भारतीय हवाईदलाकडून विमानतळ प्राधिकरणाला देण्यात आलेल्या माहितीनुसार धावपट्टीच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी १४ दिवस विमानतळ बंद राहणार, सध्या केवळ दिवसा पुणे विमानतळावर विमान उड्डाण, रात्री आठ ते सकाळी आठ या कालावधीत धावपट्टीच्या कामासाठी विमानतळ बंद ठेवले जात आहे, मात्र, 26 एप्रिल ते 9 मे या कालावधीत पूर्ण वेळ विमानतळ बंद राहणार, त्यामुळे उन्हाळी सुट्य़ांसाठी प्रवासाचे नियोजन करताना पुणे विमानतळ कार्यरत नसल्याची नोंद घेण्याचे असे विमानतळ प्राधिकरणाचे आवाहन

  • 01 Feb 2021 06:56 AM (IST)

    कुर्ला रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवर सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी

    कुर्ला रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवर आज सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी, कामगार वर्गाने सकाळीच घराबाहेर पाऊल ठेवलं, रेल्वेच्या प्रवास दारावर ठेवलेले बॅरिकेट्सही आज हटवण्यात आल्याने मुंबईकरांना सुखद धक्का बसला

  • 01 Feb 2021 06:54 AM (IST)

    रेल्वे सुरु झाल्याने मुंबईकरांचा आनंद गगनात मावेना

    रेल्वे सुरु झाल्याने मुंबईकरांचा आनंद गगनात मावेना, मुंबईतील तरुणाईने धरली माथेरानची वाट, गुलाबी थंडीत भल्या पहाटे टिकीट काढून १० मित्र माथेरानला रवाना, राज्य सरकारचे मानले आभार, बऱ्याच दिवसांनी रेल्वेचं दर्शन घडल्याने सुखावले मुंबईकर,

  • 01 Feb 2021 06:53 AM (IST)

    लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु, सुरक्षा यंत्रणा सज्ज, कल्याण स्थानकात आरपीएफ आणि जीआरपी पोलीस तैनात

    कल्याण : आजपासून काही ठराविक वेळेत सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेने प्रवास करता येईल. सध्या कल्याण आणि डोंबिवली स्टेशनहून प्रवासी लोकलमधून प्रवास करत आहेत, गर्दी नाही. तरीही सुरक्षा यंत्रणा सज्ज,  कल्याण ते बदलापूर आणि कल्याण कसारा 84 किलोमीटरची हद्द कल्याण जीआरपी अंतर्गत येते प्रत्येक स्थानकात आरपीएफ आणि जीआरपी पोलीस तैनात आहेत. कल्याण जीआरपी चे 190 पोलीस कर्मचारी आणि 15 अधिक्कारी यांची ड्युटी लावण्यात आली आहे.

  • 01 Feb 2021 06:33 AM (IST)

    चाकरमान्यांच्या तिकीट खिडकीवर लांबच लांब रांगा,

    नालासोपारा : सर्वसामान्य प्रवाशांसाठी आजपासून लोकल सुरु, सकाळ पासूनच कामावर जाणाऱ्या प्रवाशांच्या तिकीट आणि पाससाठी नालासोपारा रेल्वेस्थानाकाच्या तिकीट खिडकीवर लांबच लांब रांगा, पहिल्या ट्रेन पासून सकाळी 7 पर्यंतच या प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश असणार आहे, पण तिकीट खिडकी दोनच असल्याने अर्धा ते 1 तासापासून तिकिटासाठीच प्रवाशी ताटकळत