महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
मंगळवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता
‘मंगळवारी सकळी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते निर्णय घेऊन जाहीर करणार कार्यक्रम
शिवसेना आमदारांना पक्षाकडून व्हीप देण्यात आला.
पुढील दोन दिवस सभागृह संपेपर्यत उपस्थिती महत्वाची.
नाशिक आणि मालेगाव मध्ये सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद
10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्याना पालकांची परवानगी घेऊन प्रवेश
नाशिक, निफाड , मालेगाव, नांदगावमधील सर्व शाळा बंद
शहरातील आणि जिल्ह्यातील आपत्कालीन दुकान सकाळी 7 ते संध्याकाळी 7
15 तारखेनंतर शहरात कोणताही लग्न समारंभ सोहळा होणार नाही
बार, खाद्यपदार्थ ठिकाण 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते रात्री 9 सुरू ठेवणार
सामाजिक, राजकीय, धार्मिक समारंभ पूर्ण पणे बंद
धार्मिक स्थळ सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरु
शनिवार आणि रविवारी सर्व धार्मिक स्थळं बंद
नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख कायम
– काल दिवसभरात 645 तर आज 675 नवे रुग्ण
– अवघ्या 2 दिवसांत 1320 नवे रुग्ण
– जिल्ह्यात आज 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
– बळींची संख्या झाली 2140 वर
– कोरोना प्रादुर्भावात होतेय धक्कादायक वाढ
– नाशिक शहरातही कोरना रुग्णांची झपाट्याने वाढ
– दिवसभरात नवे 450 रुग्ण
– दिवसभरात 4 मृत्यू, बळींची संख्या 1052 वर
सातारा : वडूज शहरात पेट्रोल भरताना दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाखांची रोकड लांबवल्याचा प्रकार घडला आहे.
ही रक्कम एका शेतकऱ्याने घराच्या बांधकामासाठी काढली होती. मात्र, दुचाकीत पेट्रोल भरत असताना अचानक अज्ञाताने येऊन हे पैसे पळवले आहेत.
हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला असून वडूज पोलिसांकडून पैसे पळवलेल्या युवकाचा शोध सुरु आहे.
नाशिक : मालेगाव शहर परिसरातील सर्व शाळा, विद्यालय, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस उद्या मंगळवारपासून बंद
महापौर ताहेरा शेख आणि सहायक आयुक्त नितीन कापडणीस यांचा निर्णय
कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याने घेण्यात आला निर्णय
मालेगावात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 390 वर
नागपुरात आज पुन्हा 1276 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
नागपुरात कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू
दिवसभरात 1039 जणांनी केली कोरोनावर मात
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली 15,9005 वर
नागपुरात आतापर्यंत 143528 जण कोरोनामुक्त
नागपूरमध्ये आतापर्यंत 4401 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
पालघर : खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या प्रकारणाची चौकशी सीआईडीमार्फत करण्याची मागणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून खासदार राजेंद्र गावित यांनी केली मागणी
पत्रामध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सार्वत्रिक करावी तसेच दोषींवर कारवाई करण्याची राजेंद्र गावित यांची मागणी
अमरावती जिल्हात कोरोनाचा कहर सुरुच
आज अमरावती जिल्हात आढळले आणखी 462 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
-आज 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
दिवसभरात 669 रुग्णांनी केली कोरोनावर मात
-जिल्हात आतापर्यंत 32968 रुग्णांनी केली कोरोनावर मात
-जिल्हात आतापर्यंत 39986 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
वाशिम जिल्ह्यात आढळले 138 नवे कोरोनाग्रस्त
जिल्ह्यात आज 313 जण झालेत कोरोनामुक्त
जिल्ह्यात मागील तेरा दिवसांत आढळले 2436 नवे कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 10358
जिल्ह्यात सध्या 1322 नवे कोरोना रुग्ण
यावतमाळमध्ये आतापर्यंत एकूण 163 जणांचा मृत्यू
पालघर: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालघर जिल्ह्यात सर्व यात्रा तसेच उत्सव यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून पुढील आदेश येईपर्यंत जिल्हाधिकार्यांनी हे निर्देश दिले आहेत.
यवतमाळ : आज यवतमाळमध्ये 151 नवे कोरोना रुग्ण आढळले. तस दिवसभरात एकूण 212 जण कोरोनामुक्त झाले.
यवतमाळमध्ये आज दिवसभरात 4 जणांचा मृत्यू झाला.
सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची सख्या 1872 वर
यवतमाळमध्ये कारोनाबाधितांची संख्या 19 हजार 425 वर
यवतमाळमध्ये आतापर्यंत एकूण 482 जणांचा मृत्यू
चंद्रपूर: गेल्या 24 तासात केवळ157 नमुने तपासणीतून 38 नव्या रुग्णांची नोंद
24 तासात 0 मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण : 24240
एकूण कोरोनामुक्त : 23215
ऍक्टिव्ह रुग्ण : 625
एकूण मृत्यू : 400
एकूण नमूने तपासणी : 222740
सोलापूर – भर दिवसा तलवारीने दोन गटात हाणामारी, जाधव आणि गाटे गटात हाणामारी, मोटारसायकलला कट लागल्याच्या कारणावरून हाणामारी, हाणामारीत चार जण जखमी, जखमीवर वैराग येथील इस्पितळात उपचार सुरू, बार्शी तालुक्यातील सारोळे येथील घटना, वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची माहिती
नाशिक – भीषण अपघातानं हादरलं विल्होळी, उभ्या कंटेनरला पिकअपची धडक, पिकअप मधील एकाचा जागीच मृत्यू, तर 1 गंभीर जखमी, अपघाताचा थरार CCTV त कैद, या भागात अपघातांची मालिका सुरूच, पहाटेची घटना
नाशिक – भीषण अपघातानं विल्होळी हादरलं
उभ्या कंटेनरला पिकअपची धडक
पिकअप मधील 1 जागीच ठार
तर 1 गंभीर जखमी
अपघाताचा थरार CCTV त कैद
या भागातअपघातांची मालिका सुरूच
पहाटेची घटना
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणाचा योग्य तो तपास सुरु आहे. चौकशीनंतर कारवाई होईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
जळगाव – जळगाव शिवसेना महिला आघाडी संघटनेतर्फे अनोखे आंदोलन, मनपा अधिकाऱ्याला भटके कुत्रे दिले भेट, शहरात भटक्या कुत्रांच्या संख्येत वाढ झाली असून मनपा लक्ष देत नसल्याने केले अनोखे आंदोलन
येत्या 15 तारखेला मराठा आरक्षणाप्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. 15- 16 – 17 या तारखेला होणार सुनावणी, 24 तारखेला 102 व्या घटनादुरुस्तीवर सर्व राज्यांना मत मांडण्याची सूचना, इतर राज्यांना मत मांडण्यासाठी नोटीस दिली गेली आहे, राज्यांना मत मांडायला सांगितलं आहे, पण हे राज्य वेळ मागवून घेऊ शकतात त्यामुळे आरक्षण प्रश्न लांबू शकतो त्यामुळे मराठा समाज आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते, अशी प्रतिक्रिया मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी दिली
नाशिक : पालिका तिजोरीच्या किल्ल्या पुन्हा भाजपच्याच ताब्यात ?
गणेश गीते यांचा स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल
भाजपनं दिली दुसऱ्यांदा संधी
गीते बिनविरोध होण्याची शक्यता
शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीची तलवार म्यान
मनसेच्या मदतीनंतर भाजपचा सभापती
सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता पुढील सुनावणी 15 मार्चला होणार आहे.
गोंदिया : गोंदिया बल्लारशा रेल्वे रुळावर सहा महिन्याच्या वाघाच्या बछड्याचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू, नागझिरा व्याघ्र प्रकलपातील टी 14 वाघिणीचे तिने बछडे आणि वाघिन रेल्वे रुळ ओलांडत असताना घडली घटना, बल्लारशाकडून गोंदियाच्या दिशेने येणाऱ्या माल गाडीने बछड्याला दिली धडक, सकाळी सहा वाजेची घटना
भाजपच्या महिला आमदार आज काळ्या साड्यामध्ये विधानभवनात दाखल
युवती मृत्यूप्रकरणी संजय राठोडवर एफआयआर नाही
महिलांना कुठल्याही प्रकारे न्याय मिळत नाही
राज्यात महिला अत्याचार वाढले आहेत
जागतिक महिला दिनी सरकारचा निषेधासाठी
बेळगावात शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट, बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज मोर्चा, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात प्रवेश बंदी, कार्यकर्त्यांकडून जिल्हा बंदीचे आदेश जाळले
बेळगाव
बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज धर्मवीर संभाजी चौकातून महामोर्चा सुरुवात होणार
कन्नड रक्षण वेदिकेच्या बेळगाव महानगरपालिकेसमोर लावलेला लाल पिवळा झेंडा काढण्यासाठी महामोर्चा
मोर्चाच्या पार्श्वभूमी कोल्हापूर जिल्हा शिवसेना अध्यक्ष विजय देवणे यांना कर्नाटक प्रशासनाकडून बेळगाव जिल्हा प्रवेश बंदी
बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समिती महामोर्चा काढण्यात येणार असल्याने कर्नाटक सरकारला धडक बसली आहे .
आज धर्मवीर संभाजी चौक मध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बेळगाव जिल्हा शिवसेना कार्यालय जवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे . कोल्हापूरचे शिवसेना अध्यक्ष देवणे यांना 144 कलमा नुसार सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत बेळगाव प्रवेश बंदी घालण्यात आली आहे .
नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील ओबीसी जागा रद्दचा निर्णय, राज्य सरकार विरोधात भाजपचं आंदोलन, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन
कोल्हापूर – जिल्ह्यातील शिवसैनिकांची बेळगाव कडे कूच, कागल शहरातून बाईक रॅलीने शिवसैनिक बेळगावला जाण्याच्या तयारीत, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह कार्यकर्त्यांना बेळगाव जिल्हा बंदी असतानाही कार्यकर्ते बेळगाव प्रवेशावर ठाम, शिवसेनेच्या बाईक रॅली पार्श्वभूमी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मोठा पोलिस बंदोबस्त, कर्नाटक पोलीस शिवसैनिकांना सीमेवरच रोखण्याची तयारीत
राज्यात उन्हाचा कडाका वाढणार, राज्यात पुढील पाच दिवस हवामान राहणार कोरडं, कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता, 10 आणि 11 मार्चला विदर्भाला जोरदार पावसाचा इशारा,चंद्रपूर , गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात होणार विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा पडण्याची शक्यता, पुणे हवामान वेधशाळेनं वर्तवला अंदाज, विदर्भातील तापमानानं गाठली चाळीसी, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमानात किंचितशी वाढ
पुणे –
– शहरात कोरोना संसर्गाचा विळखा पुन्हा घट्ट होण्यास सुरूवात,
– रविवारी नव्याने 984 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद,
– शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 08 हजार 330 इतकी झालीय,
– तर पुणे महापालिका हद्दीत नव्याने 5 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू,
– मृतांची एकूण संख्या 4 हजार 890 इतकी झाली आहे,
– तर काल दिवससभरात एकूण 750 जणांना डीचार्ज
नाशिक –
स्थायी समिती निवडणुकांच चित्र आज होणार स्पष्ट
नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर कळणार प्रत्यक्ष संख्याबळ
मनसेने भाजपाला साथ दिल्याने भाजपाचा सभापती होणार हे जवळपास निश्चित
शिवसेनेनं यापूर्वीच घोडेबाजार टाळण्यासाठी उमेदवार न देण्याची केली आहे घोषणा
औरंगाबाद –
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात 426 कोरोना रुग्णांची वाढ
रुग्णांचा आकडा पोचला 52969 वर
सध्या रुग्णालयात 3218 रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 48459 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
तर 1292 रुग्णांचा उपचारादरम्यान झाला मृत्यू
कोल्हापूर :
महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज बेळगावमध्ये मोर्चा
कन्नड रक्षण वेदिकेच्या बेळगाव महानगरपालिकेसमोर लावलेला दोष काढण्यासाठी मोर्चा
कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक मोर्चात सहभागी होण्याच्या तयारीत
कागल शहरात जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह कार्यकर्ते येणार एकत्र
मोर्चाच्या पार्श्वभूमी देवणे यांना कर्नाटक प्रशासनाकडून बेळगाव जिल्हा प्रवेश बंदी
मात्र देवणे यांच्यासह कार्यकर्ते बेळगावला जाण्यावर ठाम
औरंगाबाद-
औरंगाबाद शहरातील जाधवमंडीत नागरिकांची तुफान गर्दी
भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी केली तुफान गर्दी
औरंगाबाद शहर लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असूनही होतेय गर्दी
खरेदीसाठी हजारो लोकांची मंडईत उडाली गर्दी
नागरिकांच्या गर्दीपुढे प्रशासनही झाले हतबल
पुणे – शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने नागरिकांवर उपचार करण्यासाठी पुणे महापालिका कोविड सेंटर पुन्हा सुरू करणार, दळवी रुग्णालय आणि रक्षक नगर स्टेडीयम येथील कोवीड केअर सेंटर सुरू केले जाणार, उद्यापासून हे दोन्ही केंद्र कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाची तयारी, पुण्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्याने रुग्णालयांसह, वसतीगृहांमध्ये उपचार केंद्र व विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते, मात्र, रुग्णांची संख्या कमी होत गेल्याने ते केंद्र बंद करून कोरोना बाधितांना त्यांच्या घरातच विलगीकरण करण्यावर भर देण्यात आला, रुग्ण संख्या वाढत असल्याने मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करण्यासही सुरवात.
रत्नागिरी – यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे शिमगोत्सवाच्या आनंदावर विरजण, शिमगोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सुचना, कोरोनामुळे भैरीबुवाची पालखीची रथातूनच नगर प्रदक्षिणा, पालखीसोबत केवळ ५० माणसांना परवानगी, यंदा पालखीभेट सोहळा देखिल रंगणार नाही, पालखी खेळवण्यास देखिल मज्जाव
औरंगाबाद : लग्नावरुन निघालेल्या क्रूझर गाडीला भीषण अपघात, अपघातात दोन जण जागेवर ठार तर चार जण जखमी, गंगापूर तालुक्यातील शिवपूर फाटा या ठिकाणी झाला अपघात, ओव्हर टेक करत असताना आयसर ट्रक क्रूझरमध्ये झाला अपघात
मुंबई एनसीबीच्या गोव्याच्या अनेक ठिकाणी छापे सुरू आहेत, या छापामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आली असून काही ड्रग्सही पेडलर्सना ताब्यात केली आहेत, जवळपास 12 तास छापेमारी सुरू आहे.
उस्मानाबाद : कोरोना अपडेट
आज उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक 49 रुग्ण सापडले
उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 19 रुग्ण
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 239 ऍक्टिव्ह रुग्ण
उस्मानाबादेत 1 लाख 31 हजार 792 नमुने तपासले त्यापैकी 17 हजार 504 रुग्ण सापडले
रुग्ण सापडण्याच दर 13.57 टक्के
16 हजार 681 रुग्ण बरे
95.30 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर
584 रुग्णांचा मृत्यू
3.34 टक्के मृत्यू दर