महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, डीएपी खतांवर 1200 रुपयांचं अनुदान, डीएपीची एक पोतं आता 2400 ऐवजी 1200 रुपयांना मिळणार, उच्च स्तरीय बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत घोषणा केली आहे.
– मंत्री नवाब मलिक यांची ओएनजीसी कंपनीवर टिका
– बार्जमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या निष्पापांच्या मृत्यूला ओनएनजीसी प्रशासन जबाबदार
– केंद्र सरकारने वेळीच त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं असतं तर त्यांचा बळी गेला नसता
– ६० जण जे बेपत्ता आहेत त्याला ओएनजीसीचा हलगर्जीपणा जबाबदार अशी टिका…
ही धुळफेक आहे. महाराष्ट्र तुम्हांला कधीच माफ करणार नाही. मागसवर्ग अधिकारी-कर्मचारी यांच्या डोळ्यात धुळफेक करु नका. तुम्ही 7 मे चा जो शासन निर्णय आहे जो खुल्या म्हणजे जनरल सिनँरिटी प्रमाणे पदोन्नती करतात तो रद्द केला आहे, असा कांगावा करत आहात. पण 20 एप्रिलचा जो शासन निर्णय आहे तो 33 टक्के 12 बलुतेदारांना बाजुला ठेवुन केवळ खुल्या वर्गातील पदोन्नती करा असे म्हणतो. तो रद्द झाला नाही. गृहमंत्री फौजदारी प्रकियेत फक्त खुल्या वर्गातील लोकांना पाठवणार आहेत. ही चाल मराठा सामाजातील मोठ्या अधिकारींची आहे. ही धुळफेक आहे. अजित पवार, वर्षा गायकवाड, नितीन राऊत यांना 25 तारखेला मँट कोर्टात उभ करु,
दुध का दुध पाणी का पाणी करु, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
तौत्के वादळाचा फटका कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला बसला आहे. या वादळात 292 घरांचे नुकसान झाले असून चार जण किरकोळ जखमी झाले आहे. या घरांच्या नुकसानाची कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील चार मोठे निर्णय
1) इनाम किंवा वतन जमिनी ज्या भोगवटादार वर्ग-२ च्या आहेत त्यांची अकृषिक बांधकामे गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार. अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय
2) राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था (National Institute of Medicinal Plants NIMP) महाराष्ट्रात स्थापन करणार. आडाळी येथे 50 एकर जागा देणार
3) दिवा रेल्वे स्टेशन येथील लेव्हल क्रॉसिंगवर पुल बांधणे व पुलाचे जोड रस्त्याकरीता मंजूर विकास योजनेमध्ये फेरबदल करण्यास मान्यता.
4) ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दरमहा 1500 कायम प्रवासभत्ता
जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी पावसामुळे थेरोळा शिवारात वीज पडून 4 शेळ्या दगावल्या. 8 शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत घटनास्थळी पोलीस आणि पोलीस पाटील पंचनामा करत आहेत.
दिवंगत खासदार राजीव सातव यांना ऑनलाईन श्रद्धांजली सभेच आयोजन
कॉग्रेस चे राहुल गांधी यांच्या सह अनेक मोठे नेते होणार सहभागी
सायंकाळी 6 वाजता ऑनलाईन सभेच अयोजन
खलील लिंकवर ऑनलाइन श्रद्धांजली च्या सभेच आयोजन
आजच्या दिवसात वाघाच्या हल्ल्यात दुसरा बळी, भद्रावती आयुध निर्माणी जंगल भागातील चिपराळा बीट जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या रजनी भालेराव नामक 35 वर्षीय महिलेचा मृत्यू, वनपथक घटनास्थळी दाखल, वाघाचा मागोवा घेण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावणार
पदोन्नती आरक्षण रद्द निर्णयाला स्थगिती, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पदोन्नती रद्दचा निर्णय स्थगित करण्याबाबतचा निर्णय, मंत्री नितीन राऊत यांची माहिती
अनिल देशमुख ईडी प्रकरण, तक्रारदार अॅड. जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवला, ईडी अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवला, सुमारे चार तास जबाब नोंदवला
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिग यांनी आरोप केले होते.
अनिल देशमुख यांनी API सचिन वाझे यांना बार, पब यांच्या चालकांकडून दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप होता.
याबाबत जयश्री पाटील यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका केली होती. यावेळी हायकोर्टाने सीबीआयला चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार सीबीआयने चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे.
हा गुन्हा आता ईडीने तपासासाठी घेतला आहे. त्यावर ईडीने स्वतंत्र त्यांचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची चौकशी सुरू झाली आहे.
या प्रकरणात जयश्री पाटील या याचिकाकर्त्या आहेत. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी जयश्री पाटील यांना आज सकाळी 11 वाजता बोलावल होतं.
जयश्री पाटील काय म्हणाल्या?
मला प्रश्न उत्तर स्वरूपात माहिती विचारण्यात आली. मी त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिलीत. अनेक पुरावे दिलेत. ज्या लोकांकडून पैसे गोळा केले जात होते त्यांची माहिती दिली आहे. आज माझा जबाब पूर्ण झालेला नाही. मला पुन्हा बोलावलं जाणार आहे. त्यावेळी पुन्हा ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी हजर राहणार आहे.
गोंदिया आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तब्बल अर्धा तास मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळै रब्बी हंगामातील धानपिके संकटात आली आहे. तर अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे अगदी तोंडाशी आलेला घास हीरावून गेला आहे. आता त्वरीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा काकोडा परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण दुपारच्या सुमारास पावसाचा सरी बरसल्या नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला
राज्य सरकारने चक्रीवादळ बाधितांना भरघोस मदत करावी, निसर्ग वादळाची मदत अजून मिळालेली नाही, रायगडमध्ये फळबागा, शाळा, हजारो घरं, बोटींचं नुकसान झालं आहे, या सगळ्यांचं तातडीने पंचनामा होऊन सरकारने तातडीने मदत करावी, असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज रायगड दौऱ्यावर आहेत.
ठाणे महानगरपालिका विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचे पालिका महासभे अगोदर मुख्यालय दालनात झाडांच्या फांद्या घेऊन आंदोलन
शहरात गेल्या तीन दिवसांपासून पडलेल्या झाडांमुळे शहरातील नागरिक त्रस्त
पालिका सुरक्षा रक्षकांनी अडवली आंदोलनकर्त्यांची वाट
मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक
अखेर नौपाडा पोलीस पालिका मुख्यालयमध्ये हजर
ठाणे महानगरपालिका विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांना नौपाडा पोलिसांनी घेतले ताब्यात
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील घेतले ताब्यात
पालिका प्रशासनाचा आंधळा कारभार असल्याचा केला विरोधकांनी आरोप
जोपर्यंत शहरातील पडलेली झाडे उचलत नाही तोपर्यंत आंदोलन असेच सुरू राहणार, विरोधी पक्ष नेते शानू पठाण याचा पालिकेला इशारा
राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जून पासून घेण्यात येणार
– वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई दि. 19- राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता 10 ते 30 जून दरम्यान घेण्यात येणार आहेत अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिली.
राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षां संदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत आज मुंबईतील मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या परीक्षांमध्ये एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी. एच.एम.एस.,बी.पी.टी.एच.,बी.ओ. टी.एच.आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे.
या वैद्यकीय पदवी परीक्षां सोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूर –
नागपूरच्या बैद्यनाथ चौक, ग्रेट नाग रोडवर एका इनोव्हा चालकाने समोरुन येणाऱ्या ई-रिक्षा चालकाला जोरदार धडक दिली
ही धडक इतकी जोरदार होती की ई रिक्षा अक्षरशः चकनाचूर झाला.
तर इनोव्हा कार थेट दुभाजकावर चढून उलटी झाली.
या अपघातात ई चालकाचा मृत्यु झाला.
या अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती.
पोलिसांनी याप्रकरणी इनोव्हा चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.
पुणे –
दहावीच्या परीक्षा रद्दच्या निर्णयाला ब्राम्हण महासंघाचा विरोध,
परीक्षा हाच एकमेव गुणवत्तेचा निकष
हायकोर्टात याचिकाकर्त्यांच्या समर्थनार्थ दिलं पत्र,
ब्राम्हण महासंघानंही हायकोर्टात मांडली भूमिका,
शाळांच अंतर्गत मुल्यमापनचं झाल नाही तर मग पास करण्याचा निकष काय ठरवणार ?
दहावीच्या बोर्डाच्या संचालकांना भेटून देणार निवेदन
ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांची माहिती
INS कोची मुंबई बंदरावर दाखल
INS कोची जहाजातून 184 जणांना वाचवलं, 14 मृतदेह हाती, नौदलाची माहिती
अरबी समुद्रात बचाव कार्य सुरुच
तौक्तेमुळे अरबी समुद्रात तीन जहाजं भरकटली
अद्याप 61 जण बेपत्ता आहेत
#WATCH | A crew member of Barge P305 breaks down while speaking of Indian Navy’s rescue operations. He was rescued by INS Kochi and brought to Mumbai.
A total of 184 people have been rescued so far, search and rescue operations are still going on.#CycloneTauktae pic.twitter.com/7e8JU3zcT5
— ANI (@ANI) May 19, 2021
– संजय राऊतांवर मनसे सरचिटणिस संदीप देशपांडे यांची जहरी टीका
– पंतप्रधान हे आधी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांचं त्या राज्यावर प्रेम आहे आणि ते करुन ते दाखवत आहेत. पण आमचे मुख्यमंत्री हे तर महाराष्ट्राचे आहेत. मुबईत राहतात. ते तर मुंबईत सुद्धा बाहेर पडले नाही, तर घराच्या बाहेरच पडत नाही.
संजय राऊत काहीही बोलतात. ते सिक्रेट गेमचे तिवारी आहेत. त्यांना अहं ब्रम्हासी असल्याचे वाटते, त्यांच्या बद्दल काय बोलणार?
पंतप्रधानांनी महाराष्ट्रात यावं पाहणी करावी त्यातून ते गुजरातचे नाही तर भारताचे पंतप्रधान वाटतील आणि किमान पंतप्रधान आले म्हणून तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरतील
सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी काहीही केले तरी माफ असते आणि त्याव्यतिरिक्त इतर कुणी काहीही केले तरी राजकारण होते
पुणे –
राज्यातील तंत्रशिक्षण डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ,
तौक्ते चक्रीवादळाचा फटका आणि कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ,
तंत्रशिक्षण डिप्लोमाचे साधारण दोन लाख विद्यार्थी देणार परीक्षा ,
जूलैच्य अखेरीस परीक्षा होण्याची शक्यता,
26 ते 31 मे दरम्यान विलंब शुल्कानं अर्ज भरण्याची मुदत,
सुधारित वेळापत्रक संस्थास्तरावर जाहीर करण्यात येईल,
चंद्रपूर –
सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
पेंढरी परिसरातील दिवाण तलाव भागातील घटना
तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेली होती महिला
दबा धरून असलेल्या वाघाने केले लक्ष्य
सीताबाई गुलाब चौके 55 असे आहे नाव
वनपथक पोहोचले घटनास्थळी, घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याची कारवाई सुरु
जिल्ह्यात कोरोनामुळे रोजगार हिरावल्याने तेंदूपत्ता संकलनावर भर असला तरी सतत वाघ हल्ल्याने संकलन जिकीरीचे
INS कोची जहाजातून 184 जणांना वाचवलं, 6 मृतदेह हाती, अरबी समुद्रात बचाव कार्य सुरुच
125 लोकांना आयएनएस कोचीने आणण्यात आले आहे
65 लोक इतर जहाजांवर आहे त्यांना देखील आणलं जात आहे
बचाव कार्य अजूनही सुरु आहे
समुद्रात 6 लोकांचा मृतदेह सापडले
आयएनएस कोची हे जहाज दाखल
पी 305 बुडालेले बार्ज मधील काही लोकांना रेस्क्यू करून आणले आहे
184 जणांना रेस्क्यू केलं
आमचं सर्च ऑपरेशन चालू आहे, 17 तारखेला सुरु झालं होतं
पालकमंत्री उदय सामंत यांचा आज सिंधुदुर्ग दौरा
तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागांची पाहाणी आणि नुकसानीचा आढावा घेणार
वैभववाडी, देवगड, मालवण भागात जाऊन प्रत्यक्ष पाहाणी आणि वादळग्रस्त ग्रामस्थांशी संवाद
वैभववाडीतून पाहाणी करून पालकमंत्री आता देवगड येथे दाखल
वसई –
वसई-विरार नालासोपाऱ्यात तीन दिवसापासून पावसाचा जोर कायम आहे
सकल भागतील रस्त्यावर एक ते सव्वा फुट पाणी साचल आहे.
सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत.
नालासोपारा पूर्व, आचोले रोड, नगिनदास पाडा, गाला नगर, सेंट्रल पार्क रोड, अल्कापुरी, वसई एव्हरशाईन, विरार विवा कॉलेज रोडवर पाणीच पाणी आहे.
रस्त्यावरील साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना आणि नागरिकांना मोठी कसरत करावी लागते.
तीन दिवसापासून वसई विरार आणि नालासोपारा शहरातील बहुतेक भागात विज नाही
चक्रीवादळात महावितारणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
जवळपास 70 ते 80 पोल पडले, त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागेल
वसई
पोलवर चढून दुरुस्तीचे काम करीत असताना, पोलवरून खाली पडल्याने लाईनमनचा मृत्यू
मनोहर पवार असे मृत झालेल्या लाईनमन चे नाव आहे
वसई देवतलाव हद्दीत रात्री साडे दहाच्या सुमारास घडली घटना
वसई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
नागपूर –
नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर असलेल्या पिलरमधून शॉर्टसर्किटमुळे धूर
काही वेळेसाठी विमानतळावरील विद्युत पुरवठा केला खंडित,
अग्निशमन दलाच्या जवानांनी पिलर ला लागलेले ऍल्यूमिनियम चे पत्रे कापून केली दुरुस्ती,
विमानतळाबाहेर काहीवेळेसाठी गोंधळाची स्थिती
औरंगाबाद –
औरंगाबादमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि घाटी रुग्णालयातील मंजूर रिक्त पदे भरण्याचे तातडीचे आदेश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आदेश
शासकीय आरोग्य यंत्रणेत वर्ग 3 आणि 4 च्या पदाच्या भरतीच्या राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला दिल्या सूचना
घाटी ,सुपर स्पेशालिटी ,कर्करोग रुग्णालयातील रिक्त पदांची संख्या हजारहून अधिक
सर्व रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सूचना
कोल्हापूर
तौक्ते चक्रीवादळाचा कोल्हापूर जिल्ह्यालाही फटका
जिल्ह्यात 97 घरांची झाली पडझड तर पिकांचीही हानी
34 लाख 79 हजारांच्या नुकसानीची नोंद
शाहूवाडी आणि गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक नुकसान
नुकसानीचे पंचनामे आणि अहवाल तात्काळ सादर करण्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश
पुणे
महापालिकेच्या नदीसुधार योजनेच्या प्रत्यक्ष कामाला लवकरचं होणार सुरुवात,
मुळा मुळा नदीला येणारा महापूर टाळण्यासाठी नदीचं पात्र रुंदावणार, अनेक. ठिकाणी अतिक्रमणानं पात्र झालं अरूंद,
मुळा नदीचं पात्र 125 मीटर रूंद, तर मुठा नदीचं पात्र 130 मीटर रूंद केलं जणार,
2626 कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रकल्पाला लवकरचं सुरुवात होणार कामासाठी स्वतंत्र कंपनीची केली नियुक्ती,
अमेरिकेतील हायड्रोलिक इंजिनिअरिंग या कंपनीनं रिव्हर्स नॉलिसीस सिस्टीम या प्रणालीचा वापर करून सादर केला आराखडा,
डिसेंबर 2021 पर्यंत काम पुर्ण होण्याचा स्थायी समिती अध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास
पुणे –
महापालिकेत पावसाळापूर्व कामाची होणार आढावा बैठक
महापौर मुरलीधर मोहोळ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत गटनेत्यांची घेणार बैठक
शहरातील सुरू असलेल्या पावसाळापुर्व कामाची माहिती घेणार
गेल्यावर्षी पावसानं शहरात अनेक भागात नुकसान केलं होतं,
पाणी तुंबण्याची ठिकाण साफ करण्याच्या सूचना,
महापौर आणि आयुक्त राहणार बैठकीला हजर
कोल्हापूर –
तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन शाळकरी मुलाचा मृत्यू
हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील घटना
संस्कार गायकवाड असं मृत मुलाचं नाव
शेतामध्ये वैरण आणण्यासाठी गेला असता घडली दुर्घटना
दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तुटली होती विजेची तार
तुटलेल्या तारेचा स्पर्श होऊन मृत्यूची गेल्या चार दिवसातील ही दुसरी घटना
वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी तुटल्या आहेत तारा
शेतकऱयांनी सतर्क राहण्याच महावितरणच आवाहन
नाशिक – खासदार संभाजी राजे छत्रपती आज नाशिक दौऱ्यावर
पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाच्या निकला नंतर आरक्षनाहून राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणार
आरक्षणा बाबत भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याच कालच केलं होतं ट्विट
उपसमित्या आणि विरोधकांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरही संभाजी राजे काय बोलणार हे बघण महत्वाचं
नाशिक – शहरात पावसाची हजेरी
रात्रीपासून पावसाची संततधार सुरू
शहरासह जिल्ह्यात देखील पावसाचा शिडकावा
अनेक भागातील विद्युत पुरवठा रात्रीच्या सुमारास खंडित
तोक्ते चक्रीवादळाचा नाशिकला देखिल परिणाम
रत्नागिरी –
तौक्ते चक्रीवादळाने मौसमी पावसाला पुरक मार्ग तयार झाला
येत्या चार दिवसात मान्सुन अंदमानात दाखल होणार
8 जूनपर्यंत कोकणात मान्सुनचे आगमन होणार
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यास सुरवात
नैरुत्येकडून वारे वाहण्यास सुरवात, हवामान तंज्ञाचा अंदाज
रत्नागिरी –
तोक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यात अंदाजे 15 कोटीहून अधिकचे नुकसान
पंचनामे पूर्ण करण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता
घरे, गोठे आणि शाळांचे जवलपास पाच कोटीचे नुकसान
अडिज हजार हेक्टर फळबाग उद्धवस्थ
रत्नागिरी –
रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात तुरळक पाऊस
सकाळपासून रत्नागिरीत पावसाची रिमझिम, पावसाळ्यासारखे वातावरण
हवेत देखील आलाय गारवा
पुर्णतः ढगाळ हवामान, मध्यरात्री कोसळल्या पावसाच्या जोरदार सरी
किनारपट्टी भागात अजूनही वेगवान वारे
आज दिवसभर रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज
कोल्हापूर –
केंद्र सरकार विरोधातील आंदोलन कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या अंगलट
जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील,शहराध्यक्ष आर.के.पवार यांच्या सह 18 जणांवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
बंदी आदेश आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पेट्रोल डिझेल सुखात दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी केलं होतं आंदोलन
शहरातील शिवाजी चौकात एकत्र येत पदाधिकाऱ्यांनी केली होती केंद्र सरकार विरोधात निदर्शने
पिंपरी-चिंचवड
-सामाजिक सुरक्षा पथकाची हुक्का पार्लरवर कारवाई; सहा जणांवर गुन्हा दाखल
-नाशिक फाटा येथील फुगे कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर हॉटेल निसर्ग येथे सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली.
– यात 21 हजारांचा ऐवज जप्त करत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
-हॉटेल चालक गणेश नामदेव गोडसे, केतन सुखदेव वाघचौरे, शिवम शांताराम खोसे, राहुल भिमराव लोखंडे, महेश राजेश निकम, नितीन हिरामण गोडसे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे
पुणे
जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील लेखापालाला 20 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले
पोस्ट कोविड १९ चे फॉर्म व ऊस तोडणी कामगारांचे आरोग्य तपासणी पत्रिका छापण्याच्या कामाचे बिल काढण्याचा मोबदला म्हणून घेतली २० हजार रुपयांची लाच
विजय मधुकर चितोडे (वय ४५) असे या लेखापालाचे नाव
जिल्हा परिषदेतच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी सापळा लावून केली ही कारवाई
पुणे
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने आपल्या विभागातून सुरू होणाऱ्या २७ रेल्वे रद्द
यात २० हजार ७०० प्रवाशांनी काढले होतेआरक्षित तिकीट
मात्र रेल्वेच रद्द झाल्याने त्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने तिकीटाची पूर्ण रक्कम केली परत
तिकिटा पोटी घेण्यात आलेली १ कोटी ७० लाख रुपये प्रवाशांना परतावाच्या रुपात दिले परत
१६ ते २१ मे दरम्यान पश्चिम रेल्वे वरून धावणाऱ्या गाड्यांचा यात समावेश
पुणे
पुणे जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र आजपासून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार
मान्सूनचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असून, ग्रामीण भागात मान्सूनपूर्व शेती कामांना वेग
परंतु सध्या जिल्ह्यात असलेल्या लाॅकडाऊन व वेळेच्या मर्यादेमुळे शेतकऱ्यांची प्रचंड अडचण
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा जाहीर केला निर्णय
या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र, खते, बि-बायाणे व कीटकनाशके,औषधांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार
हिंगोली- अनेक गावांना भूकंपाचे धक्के
जिल्ह्यात काही वर्षा पासून बसत आहेत भुंकपाचे धक्के
लातूर येथिल भुंकप मापक केंद्रात अनेक वेळा नोंद ही झाली
सकाळी 6:30 च्या दरम्यान एका पाठोपाठ छोटे मोठे पाच ते सहा गूढ आवाज
वसमत व औंढानागनाथ तालुक्यातील अनेक गावांमध्ये जमीन हादरली
जमीन हदरल्याने नागरिक भयबीत..
पुणे –
– राज्यात यंदाच्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट म्हणजे एक हजार १२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप,
– यंदा एकूण १०.६२ लाख टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे.
– गतवर्षीच्या हंगामात ५५० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते,
– राज्यात यंदाच्या २०२०-२१ च्या हंगामात ९५ सहकारी आणि ९५ खासगी असा एकूण १९० कारखान्यांनी साखरेचे उत्पादन घेतले,
– राज्यात अद्याप चार साखर कारखाने सुरू असून, येत्या तीन-चार दिवसांत यंदाचा हंगाम संपेल,
– यंदा सर्वाधिक गाळप कोल्हापूर विभागात झाले असून साखरेच्या सरासरी उताऱ्याचे प्रमाण १२ टक्के इतके आहे.
– तर पुणे विभाग ऊस गाळपात दुसऱ्या क्रमांकावर असून सरासरी साखर उतारा १०.९७ टक्के इतका आहे.
– साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची माहिती
– विभागनिहाय ऊस गाळप (मेट्रिक टन), साखरेचे उत्पादन (लाख क्विंटलमध्ये) आणि उतारा टक्केवारी –
कोल्हापूर २३१.०९ २७७.३८ १२
पुणे २३०.९३ २५३.२६ १०.९७
सोलापूर १७५.८६ १६४.८९ ९.३८
नगर १६९.६४ १६६.५८ ९.८२
औरंगाबाद १००.०३ ९६.९० ९.६९
नांदेड ९४.२८ ९४ ९.९७
अमरावती ५.८२ ५.२० ८.९३
नागपूर ४.३५ ३.९० ८.९७
पुणे –
– खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खतांसह शेतीशी निगडित साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रे सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार,
– कोरोनाच्या कालावधीत गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय,
– शेतीशी निगडित साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रांवर गर्दी होते.
अशा परिस्थितीत दुकाने सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत उघडी ठेवल्यास गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
– त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आता दुपारी दोन वाजेपर्यंत कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत,
– कमीत कमी संपर्कात शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ऑनलाइन विक्रीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.